Site icon

Navnathparayan

श्री नवनाथ पारायण पुजा विधी 

 

Navnathparayan

पूजा सामग्री:- श्रीफळ, सुपारी १२ नग, विड्याची पाने ७ नग, हळद, कुंकुं, अक्षदा, अष्टगंध, भस्म, अत्तर, गुलाब पाणी, गोमूत्र, दुध, दही, मध, तुप साजूक, तेल, कापुसवात, फुलवात, कापुर, खडिसाखर, समई, सुट्टेपैसे, लाल कपडा २.५ मिटर, चौरंग, आसन, श्री नवनाथ फोटो, ताब्या १ नग, काडेपेटी, फुले, हार, फले, रुमाल, निरंजन, अगरबत्ती, धुप, ऊद, श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ, सोवळे किंवा भगवी लुंगी.

Navnathparayan

सकाळी लवकर उठावे गोमुत्र टाकून स्नान करावे. सुर्यांस अर्ध द्यावे तुळशीस पाणी घालावे नैमित्तिक देवपुजा करावी. मोठ्या मंडळीनां नमस्कार करावा. नियोजीत जागेवर चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र  टाकावे  त्यावर श्री नावानाथांचा फोटो ठेवावा समोर तांदुळ याची रास मांडावी  त्याराशित एक नाणे ठेवावे त्यावर रिकामा ताब्या ठेवावा ताब्यात पाणी घालावे व पाण्यात हळद, कुंकुं, अक्षदा, एक नाणे, एक सुपारी टाकावी ५ विड्याची ची पाने लावावी. त्यावर श्रीफळ ठेवावे. तांब्यास अष्टगंधाची ५ बोटे ओढावीत स्वस्तिक, त्रिशूल काढावे श्रीफळावर ओम काढावा. कलशाच्या उजव्या बाजुस विड्याची २ पाने एक मेकावर ठेवावी त्यावर तांदुळाचीची रास मांडावी राशीत एक नाणे ठेवावे एक सुपारी पंचामृत, गुलाब पाणी शुध्दपाण्याने धुऊन पुसुन त्यावर ठेवावी (गणपतीचे नामस्मरण ११ वेळ करुन) हलद कुंकुं अक्षदा अत्तर गंध फुले वाहावी. मागे एका सरळ रेषेत तांदळाच्या ३ राशी माडाव्या अशा ३ ओळी माडाव्या समोर एक राश माडावी प्रत्येक राशीत एक एक नाणे ठेवावे. एक एक सुपारी घेऊन पंचामृत गुलाब पाणी व शुध्द पाण्याने स्वछं धुऊन पुसुन घ्यावे प्रत्येक राशीवर थोडे भस्म टाकावे व एक एक सुपारी राशीवर ठेवत जावी सर्व सुपारी ठेऊन झाल्यावर अत्तर लावावे. प्रत्येक सुपारीस गंधफुल वाहावे एक एक सुपारीस स्पर्श करुन गायत्री मंत्राचा ११ वेळ जप करावा फुले वाहावी व परत समोरील सुपारीस फुले तुळस पत्रे किंवा बेलपाने वाहत ११ वेळ……”ओम चैतन्य दत्तात्रयाय नम:” जप करावा व प्रत्येक सुपारीस अशीच पुजा करावी नवनाथांच्या नावाचा जप करा फुले तुळस, बेलपाने वाहावी.

 

ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम:।।
ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम:।।
ओम चैतन्य गहिनीनाथाय नम:।।
ओम चैतन्य जालिंदरनाथाय नम:।।
ओम चैतन्य कानिफनाथाय  नमः।।
ओम चैतन्य भर्तरीनाथाय नम:।।
ओम चैतन्य रेवननाथाय  नम:।।
ओम चैतन्य वटसिध्द नागनाथाय नम:।।
ओम चैतन्य चर्पटीनाथाय नम:।।

                      Navnathparayan

 
 

 

अशा प्रकारे मंत्र म्हणत फुले अक्षदा तुळस, बेलपाने वाहावी. अशी  २१ आर्वतने करावी, गुरुनीं दिलेल्या मंत्राचा एक माळ जप करावा. या चौरंगा समोर दुसरा चौरंग माडावा त्यावर लाल वस्त्र टाकावे श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवावा ग्रंथाचे पुजन करावे फुले वहावी चौरंगा भोवती रांगोळी काढावी. उजव्या बाजुस समई ठेऊन पेटवावी समई कायम तेवत ठेवावी ऊद जाळ।वा अगरबत्ती धुप पेटवावा नमस्कार करावा. महाराजांच्या फोटोला हार घालावा.
हातात पाणी घेऊन ३ , ५ , ७ , ९ , ४१ दिवसांचा संकल्प करावा हातातील पाणी जमीनीवर सोडावे. कापुर पेटवून श्री दत्त महाराजांची आरती करावी.
“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” हा जप करावा व हळुवार पणे ‘श्री नवनाथ भक्तिसार’ ग्रंथ वाचण्यास प्रारंभ करावा.

अगदी शांततेने व एकाग्रतेने वाचन करावे वाचन झाल्यावर निरंजन लावून श्री नवनाथ महाराजांची आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा.

 

Navnathparayan

प्रसाद:- खोबऱ्याचा किस अन्यथा सुंठ, खसखस, पिठी साखर ऐकत्र करुन दररोज वाटावे.
दररोज घरातील स्वयंपाकाचे एक पात्र भरुन सकाळ संध्याकाळ नैवद्य दाखवावा. घरात शांतता राखावी अतिथींचा आदर करावा .कुत्र्यास, गोमातेस नैवेद्य द्यावा. भिक्षा मागण्यास कुणी आल्यास यथाशक्ती भिक्षा द्यावी.

श्री नवनाथ महाराज घरात असल्यामुले घराला मंगल दिवस येतिल अशा भावपूर्ण श्र्रध्देने राहिल्यास पुजकास व ऐकणाऱ्यास फारच अलौकिक अनुभव येतील त्यांच्या मनो कामना पुर्ण होउन संसार सुखाचा होईल. आपल्या कामना अकल्पित रीतीने पुर्ण होतील. साधकाने व सर्व परिवाराने पुर्ण शाकाहारी व निरव्यसनी असणेआवश्यक आहे.
ईतर ठिकाणी किंवा परग्रही भोजन केव्हा अन्नग्रहण करु नये शक्य असल्यास उपवास करावा फलाहारी असावे.
परायणच्यासांगतेच्या दिवशी ९ + ३ लहान मुले व एक मेहुण भोजनास बोलवावे. शक्य असल्यास सर्वांना भगवी वस्त्र अर्पण करावी. सर्वांचे पाद्य पुजन करावे भस्म गंध फुले हार घालावे नमस्कार करावा आरती करावी . जेवणासवाढुन दक्षण। ठेवावी.

 

नवनाथ ग्रंथाच्या प्रत्तेक अध्यायाची फलश्रुती

Navnathparayan

अध्याय पहिला – याच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही घरातील समंध बाधा त्रासून निघून जाते.

अध्याय दुसरा – अपार धनाची प्राप्ती

अध्याय तिसरा – शत्रूंचा नाश

अध्याय चौथा – कपट, कारस्थाने बंद पडून शत्रूचा नाश होईल व निरंतर शांती लाभेल.

अध्याय पाचवा – घरात पिशाच्चसंचार होणार नाही. ती घरात असतील तर त्रासून निघून जातील.

अध्याय सहावा – शत्रूच्या मनातील कपट दूर होऊन तो सेवक बनेल.

अध्याय सातवा – चिंता-व्यथा दूर होऊन जखीणीचे भय असल्यास तेही दूर होईल. (यासाठी या अध्यायाचे त्रिकाल वाचन करून एक मंडळ (४२ दिवस) पूर्ण करावे.)

अध्याय आठवा – परदेशी गेलेला मित्र (प्रियकर) परत येऊन भेटेल व चिंता व व्यथा दूर होईल.

अध्याय नववा – चौदा विद्यांचे ज्ञान होईल.

अध्याय दहावा – याचे अनुष्ठान केले असता स्त्रियांचे विकार दूर होऊन संतती वाढेल.

अध्याय अकरावा – अग्निपिडा दूर होईल व गृहपीडा (दोष) दूर होऊन संतती व संपत्ती प्राप्त होईल.

अध्याय बारावा – देवतांचा क्षोभ दूर होऊन त्या सुख देतील.

अध्याय तेरावा – स्त्रीहत्येचा दोष नाहीसा होऊन पूर्वजांचा उद्धार होईल.

अध्याय चौदावा – कारागृहातून मुक्तता होईल.

अध्याय पंधरावा – घरची-बाहेरची भांडणे बंद होऊन सुख, शांती लाभेल.

अध्याय सोळावा – दुःस्वप्नांचा नाश होईल.

अध्याय सतरावा – योगमार्गात प्रगती होईल व दुष्टबुद्धी नष्ट होऊन पाठक सन्मार्गाला लागेल.

अध्याय अठरावा – ब्रह्महत्येचे पातक नष्ट होऊन पूर्वजांची नरकातून मुक्तता होईल.

अध्याय एकोणिसावा – मोक्षप्राप्ती होईल.

अध्याय विसावा – वेड दूर होईल, प्रपंच सुखाचा होईल

अध्याय एकविसावा – गोहत्येचे पातक दूर होऊन (मृत्युनंतर) तपोलोकाची प्राप्ती होईल.

अध्याय बाविसावा – पुत्राची इच्छा असणार्‍यास पुत्र होईल व तो विद्यावंत होऊन विद्‌वज्जनात मान्यता प्राप्त करेल.

अध्याय तेविसावा – घरात विपुल सुवर्ण राहिल.

अध्याय चोविसावा – बालहत्येचा दोष दूर होऊन वांझ स्त्रियांना पुत्रप्राप्ती होऊन तो पुत्र सुखात नांदेल.

अध्याय पंचविसावा – दुसर्‍याचे शाप बाधणार नाहीत. मानवाशिवाय अन्य जन्म मिळणार नाही. तसेच आरोग्य लाभून पतिव्रता स्त्रीची प्राप्ती होईल व गुणी पुत्राचा लाभ होईल.

अध्याय सव्विसावा – कुलात कुणाची हत्या झाली असेल तर तो दोष नाहिसा होईल. मुले शत्रुत्वाने वागणार नाहीत.

अध्याय सत्ताविसावा – स्थानभ्रष्ट झालेल्यांना आपले स्थान पुन्हा प्राप्त होईल. हरवलेली वस्तू सापडेल.

अध्याय अठ्ठाविसावा – पाठकाचा विवाह होईल व त्याला सेवाभावी व गुणवान धर्मपत्नी मिळेल.

अध्याय एकोणतिसावा – क्षयरोग दूर होऊन त्रिताप नष्ट होतील.

अध्याय तिसावा – चोराच्या दृष्टीला बंधन पडेल. (म्हणजेच चोरांपासून भय राहणार नाही)

अध्याय एकतिसावा – कुणाचेही कपटमंत्र चालणार नाहीत.

अध्याय बत्तिसावा – गंडांतरे आपोआप टळतील.

अध्याय तेहतिसावा – धनुर्वात होणार नाही व झाला असल्यास त्याची पीडा दूर होईल.

अध्याय चौतिसावा – कोणत्याही कार्यात यश मिळेल.

अध्याय पस्तिसावा – पोटी महासिद्धाचा जन्म होईल व त्याच्या योगे बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होऊन लोक त्याची स्तुती करतील.

अध्याय छत्तिसावा – सर्प किंवा विंचू चावला असल्यास त्याचे विष बाधणार नाही.

अध्याय सदतिसावा – पाठक विद्यावंत होईल, तसेच घराण्याला लागलेला डाग नष्ट होईल.

अध्याय अडतिसावा – हिवताप, नवज्वर यासारखे ताप दूर होतील.

अध्याय एकोणचाळीसावा – युद्धात जय प्राप्त होईल.

अध्याय चाळीसावा – यश श्री ऐश्वर्य पुत्र-पौत्र इ. सर्व गोष्टी प्राप्त होतील.

Navnathparayan

नव नाथ गायत्री मन्त्र

१) श्री आदिनाथ गायत्री मन्त्र-
ॐ आं आदिनाथाय विद्महे, ॐकार स्वरूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्

२) श्री उदयनाथ गायत्री मन्त्र-
ॐ उं उदयनाथाय विद्महे, धरित्री रूपाय धीमहि, तन्नो पराशक्ति प्रचोदयात्

३) श्री सत्यनाथ गायत्री मन्त्र-
ॐ सं सत्य नाथाय विद्महे, ब्रह्मा-स्वरूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्

४) श्री सन्तोषनाथ गायत्री मन्त्र-
ॐ सं सन्तोषनाथाय विद्महे, विष्णुरूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्

५) श्री अचम्भेनाथ गायत्री मन्त्र-
ॐ अं अचम्भेनाथाय विद्महे, शेषस्वरूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्

६) श्री गजबेली गजकन्थड़नाथ गायत्री मन्त्र-
ॐ गजबेली गजकन्थड़नाथाय विद्महे, गणपतिरूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्

७) श्री चौरंगीनाथ गायत्री मन्त्र-
ॐ चौं चौरंगीनाथाय विद्महे, चंद्ररूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्

८) श्री मत्स्येन्द्रनाथ गायत्री मन्त्र-
ॐ मं मत्स्येन्द्रनाथाय विद्महे, मायास्वरूपाय धीमहि, तन्नो निरञ्जन प्रचोदयात्

९) श्री गोरक्ष गायत्री मन्त्र-
ॐ गों गोरक्षनाथाय विद्महे, शून्यपुत्राय धीमहि,तन्नो गोरक्ष निरञ्जन प्रचोदयात्

१०) श्री नवनाथ गायत्री मन्त्र-
ॐ ह्रीं श्रीं क्रीं नवनाथाय विद्महे, सर्वस्वरूपाय धीमहि, तन्नो अलख निरञ्जन प्रचोदयात्

 

श्री स्वामी समर्थ

काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

Exit mobile version