Site icon

Dattavtar mahiti

दत्तावताराची प्रमुख वैशिष्ट्ये

 

 

Dattavtar mahiti

१) साधुंचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सध्दमाचे आचरण हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्ठ होय! इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यँत असाच चालू राहणार आहे.

२) ब्रम्हदेवाचा पुत्र अत्रि व त्याच्या कठोर तपश्र्चर्येचे फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला आणि म्हणूनच तो अयोनीसंभव मानला जातो.

३) या अवतारात ब्रम्हा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे व त्यांच्या परंपराचे ऐक्य आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय यासाठी प्रसिध्द असलेल्या या तीन देवांचे एकरुपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय.

४) दत्तावतार हा ब्राम्हण कुलातील असून सती अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास महत्व आहे.

५) राम, कृष्ण इ.अवतार हे गृहस्थाश्रमी होते तर दत्तावतार हा फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमात राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा आहे.

६) हा अवतार म्हणजे साक्षात परब्रम्हमूर्ती श्रीसद्गुरुंचाच अवतार होय आणि म्हणूनच साधक “श्री गुरुदेव दत्त”असायांच्या नावाचा जयघोष करतात.

७) श्रीदत्त हे केवळ गुरुदेव नसून ते “अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त”या स्वरुपात आहेत.

८) श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेषात व स्वरुपात म्हणजेच अवधूत, फकीर, मलंग, वाघ इ. दर्शने दिली आहेत.

९) दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पध्दतीचा पुरस्कार करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्याच्या उपासनेस कोणताच प्रतिबंध नाही.

१०) दत्त व दत्त संप्रदायाचा नाथ, महानुभाव, वारकरी, रामदासी इ. उपासना पंथांशी घनिष्ट संबंध आहे. उदा. गोरक्षनाथ हे दत्तात्रेयांचे शिष्य, महानुभाव पंथात एकमुखी दत्ताची पुजा होते. समर्थ रामदासांना श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले होते आणि विशेष म्हणजे स्वत: दत्तात्रेय हे निस्सिम देवीभक्त होते.

११) औदुंबरतळी वस्ती,जवळ धेनु व श्र्वानाचे सान्निध्य हे दत्तावताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य.

Dattavtar mahiti

१२) “त्रिमुखी” किंवा “एकमुखी” दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच “दत्तपादुका”ची ही पूजाअर्चा अनेक दत्तस्थानांवर केली जाते.

१३) “गुरुवार” हा दत्तांचा वार. याच दिवशी घराघरांतून व दत्तस्थानांतून दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले जाते. मार्गशीर्ष प्रौर्णिमा ही “दत्तजयंती” म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

१४) श्री दत्तात्रेयांचे १६ प्रमुख अवतार आहेत.

१५) श्रीदत्त उपासनेत योगाला अनन्य साधारण महत्व आहे. शाक्त व तांत्रिकांनीही श्री दत्तात्रेयांना आपले आराध्य दैवत मानले आहे.

१६) श्री दत्तात्रेय हे शरणगत वत्सल व भक्तांवर अनुकंपा व दया करणारे आहेत आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच ते भक्ताची आर्त हाक ऐकून धाऊन येतात.

१७) धर्म व अध्यात्मात व्यापक व उदार दृष्टीकोन हा दत्तावताराचा आणखी एक विशेष एक विशेष आहे.

१८) दत्त संप्रदायाचेचतत्वज्ञान उदात्त, दिव्य, भव्य, निर्मळ व सोलीव अव्दैत स्वरुप आहे..

१९) भूत-प्रेत-पिशाच्चे दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी राहात नाहीत.

२०) दत्तात्रेयांच्या व्यापक व उतार दृष्टीमुळे ही उपासना प्रणाली किंवा संप्रदाय कल्पान्तापर्यँत खचितच पथप्रदर्शन करीत राहील.

२१) जोपर्यँत जगामध्ये मानव हा तापत्रयांनी त्रस्त व पीडित असा राहील तोपर्यँत दत्तात्रेय अज्ञानान्धकारात त्यास सदैव मार्गदर्शन करीतच राहतील..

 

Dattavtar mahiti

दत्त महाराजांचे आपल्या भक्तांकडे नित्य अगदी बारीक लक्ष असते ,केवळ भक्तच नाहीत तर त्यांच्या मुलाबाळांचा योगक्षेम उत्तम चालला आहे ना हे ते आवर्जून पाहत असतात . आता इथे प्रश्न असा आहे कि असं काही वावगं वाटल्यास किंवा काही गरज असल्यास महाराज सांगत असतील का ? तर योग्यता असल्यास प्रत्यक्ष सांगतात आणि काहींना अप्रत्यक्ष सांगणे अथवा सूचित करणे मात्र अवश्य होते .

काही प्रत्यक्ष सूचित करण्याची उदाहरणे पाहता थोरल्या महाराजांची नृसिंहवाडी भेट पाहता येईल . वेषभूषेवरून थोरल्या महाराजांचे विषयी किंतु उत्पन्न होऊन पाणी घालू दिले नाही आणि तसेच थोरले महाराज घाट चढून वर येऊ लागले . त्याच वेळी गोविंदस्वामी महाराज वरती पोथी वाचत होते ,त्यांना दत्त महाराज म्हणाले, पोथी वाचण्याचे सोडून खाली काय चालले आहे ते पहा . लगेच पोथी वाचन थांबवून गोविंदस्वामी महाराज खाली घाटावर आले आणि आपला दंड थोरल्या महाराजांचे हाती देऊन त्यांना पाणी घालण्याकरता घेऊन गेले ,

दुसरे उदाहरण म्हणजे नारायणस्वामी महाराजांचे . आपल्या दोन्ही कन्यांना एका आप्तांकडे ठेऊन नारायणस्वामी महाराज नृसिंहवाडीला दत्त महाराजांचे सेवेत होते . एक दिवस दत्त महाराज नारायण स्वामी महाराजांना म्हणाले कि मुलांचे संगोपन जसे माता पित्याकडून होते तसे आप्त स्वकीयांकडून होतेच असे नाही तेव्हा दोन्ही मुलींना इथे आपलेपाशी घेऊन यावे . इथे गोविंद स्वामी महाराज आणि नारायण स्वामी महाराज हे अधिकारी होते त्यामुळे दत्त महाराज आणि त्यांचा थेट संवाद झाल्यास वावगे वाटणार नाही पण इतर अनेकांना महाराज कसे सूचित करत असतील ?

दत्त महाराज माध्यम रूपाने अनेकदा आपला मनोदय व्यक्त करतात ,याचे उदाहरण म्हणजे गर्ग मुनींनी कार्तवीर्याला केलेले मार्गदर्शन ,किंवा गुरुचरित्रात मांडीवर फोड झालेल्या बादशहाला झालेले मार्गदर्शन हे ह्याचेच उदाहरण आहे . अलर्काला वाटेत साधू कुठे भेटतील हे सांगणारा मार्गदर्शक कोणाच्या इच्छेने हे सांगत होता ? मनाचे कारक आणि बुद्धीचे प्रेरक दत्त महाराज आहेत . हे सर्व माध्यमरूपातून झालेले उपदेश म्हणजे दत्त महाराजांनी केलेली योजना होती असं म्हणायला हरकत नाही .

आपल्यासारख्या सामान्यांना देखील अनेकदा असे मार्गदर्शन होत असते पण मनाच्या कवाडांना बंद करून बसलेलो आम्ही ते ओळखू शकत नाही मग पुन्हा हात जोडून प्रार्थना करत म्हणतो
ते मन निष्ठुर न करी आता ll श्रीगुरुदत्ता l

Dattavtar mahiti

दत्त महाराजांकडे वरदान मागताना कार्तवीर्याने सदा असावी सत्संगती ll हे वरदान मागितलेले आहे . सत्संगाचे वरदान मागावे म्हणजे असं काय आहे सत्संगात ? अर्थातच दत्त महाराज तथास्तु म्हणाले . केवळ साधू अथवा सत्पुरुष यांच्या सहवासाने असा काय लाभ होतो ? सेवा किंवा उपासना सत्पुरुषांची असते ,तेव्हा त्यांना फळ मिळते त्यात आपला काय लाभ ? याचे उत्तर गुरुचरित्राच्या पन्नासाव्या अध्यायात दिले आहे . केवळ सत्पुरुषाच्या सहवासाने आणि त्याच्या कृपादृष्टीने कल्याण होते . तयाचे दृष्टी सुधारसी ll असं गुरुचरित्रात म्हटलं आहे . दत्त महाराजांना लीला दाखवायची होती आणि त्यांनी ती एका पळभराच्या सहवासाने दाखविली . एक स्फोटक (गळू किंवा मोठा फोड ) केवळ अमृतदृष्टीने घालविला आणि वर त्या बादशहाला पृच्छा केली ,कुठे आहे ? दाखव . अहो केवळ संकल्पाने सर्व कार्ये होतात . स्फोटक आहे कुठे ?? मांडीवर पाहू जाताच नाहीसा झाला .
संत संगाचे फळ फार मोठे आहे . त्यांच्या उपासनेतला भाग अनायासे आपल्या वाट्यास येतो ,वृत्ती पालटतात ,सात्विकतेकडे कल जातो ,षड्रिपू माघार घेतात . मात्र सत्पुरुषांना किंवा संतांना ओळखायची पात्रता तेव्हडी हवी आणि त्यासाठी आपल्या उपास्य दैवतावर आपली श्रद्धा हवी . तेराव्या अध्यायात सायंदेव ब्राह्मण गुरुमहाराजांना पाहताच नमस्काराला आला आणि त्याने त्यांना माध्यान्हाकरिता निमंत्रित केले . आता गुरुमहाराजांना ओळखणं आणि त्यांना पूज्य मानणं हे आपल्या पूर्व उपासनेशिवाय शक्य नाही .
सत्संगाचे जसे सकारात्मक फळ आहे तसेच वाईट संगाचे फळदेखील आत्यंतिक नकारात्मक मिळते . यापासून अर्थात कुसंगतीपासून आपला सांभाळ व्हावा म्हणून दत्त महाराजांची प्रार्थना करावी .

श्री गुरुदेव दत्त !!!— अभय आचार्य

श्रीगुरुदेव दत्त !!!

 

श्रीपादांनी भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने.

Dattavtar mahiti

१) माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सुक्ष्म रूपात असतो.

२) मनो वाक् काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून संभाळ करतो.

३) श्री पीठिकापुरममध्ये मी प्रतिदिन मध्यान्ह काळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैव रहस्य आहे.

४) सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो.

५) (अन्न हेच परब्रह्म- अन्नमोरामचंद्राय) अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास, मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो.

६) मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.

७) तुमचे अंत:करण शुद्ध असले, तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.

८) तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल, ती मलाच प्राप्त होईल.

९) तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह/ आशिर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे, तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला प्राप्त होतो.

१०) श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही. सकल देवता स्वरूप समस्त शक्तिचे अंश मिळून माझे विराट स्वरूप, अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल.

११) श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी, महासिद्धपुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत.

१२) तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा, कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो.

 

श्री स्वामी समर्थ

काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

Exit mobile version