Site icon

Margashirsha Guruwar

मार्गशीर्ष गुरुवार

 

 

 

Margashirsha Guruwar

लक्ष्मीपूजन 14 डिसेंबर 2023 गुरुवारपासून सुरू होत आहे. दुसरा गुरुवार 21 डिसेंबर, तिसरा गुरुवार 28 डिसेंबर, चवथा गुरुवार 4 जानेवारी आणि पाचवा 11 जानेवारीला आहेत.

श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना

दारात रांगोळी काढून त्यात देवीची पावले काढावी.

महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवी आईचे मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करुन घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याभोवती रांगोळी काढावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे.

पितळ्याचा किंवा चांदीचा स्वच्छ तांबा घेऊन पाण्याने पूर्ण भरावा. त्यात एक सुपारी, एक नाणं व दुर्वा घालाव्यात. पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा.

हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा. श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकवून ठेवावं.

ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः । हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ॐ गोविंदाय नमः । असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळद-कुंकू, फुलं वाहून देवीपुढे उदबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरांजन ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी.

श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी माहात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्रीमहालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन-अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल, ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी.
रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे.

दुसर्‍या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळद-कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्रीमहालक्ष्मीची पूजा करावी.

मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणार्‍या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. ब्राह्मणाला दान दिले जाते. सुवासिनी बोलावून हळद-कुंकू केलं जातं आणि त्यांना या व्रताचे माहात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते.

न चुकता दर वर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो. आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात.

श्री लक्ष्मीदेवीने पद्‍मपुराणात सांगितले आहे की, जो माझे व्रत नित्य-नेमाने करील, तो सदैव सुखी, समाधानी राहील !

गुरुवार हा श्रीदत्तगुरु-भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे.

श्री महालक्ष्मी व्रत करणार्‍यांसाठी व्रत-नियम
शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणसमेत लक्ष्मी आहे.

या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटल्या गुरुवारी करावे.

हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात.

व्रतधारी जातकांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण सेवन करणे टाळावे तसेच महिनाभर मांसाहार टाळावा.

हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे.

Margashirsha Guruwar

व्रताच्या दिवशी घरातील वातावण आनंदी असावं.

व्रत करणाराने लवकर उठून स्नान करावे व शरीराने, मनाने निर्मळ होऊन पूजा-विधी करावा.

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करावी, दर गुरुवारी श्री महालक्ष्मीव्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे त्या महिन्यात येत असलेले चार किंवा पाच गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे.

आपली श्रद्धा असल्यास एका महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते.

देवीच्या फोटोसमोर बसून श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा व माहात्म्य वाचावे.

उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी-वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्रीमहालक्ष्मीस्वरूप समजून त्यांना हळद-कुंकू देऊन प्रसाद म्हणून एकेक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी.

शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री-पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात.

व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी, दूध, फळे खावीत. रात्री भोजन करावे.

पद्‌मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती-पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात.

हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली, तर पूजा-आरती दुसर्‍या कुणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतःच करावा.

एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा-आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल, त्यांनी ते रात्री केले तरी चालेल. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा. फलाहार घ्यावा.

व्रत-पूजा व श्रीमहालक्ष्मी कथा ऐकण्यास कुटुंबीयांना तसेच शेजारी-पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने माहात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथीवाचन चालू असताना श्रीमहालक्ष्मीचे अप्रत्यक्षरीत्या अस्तित्व जाणवेल.

व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे.

व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसमवेत भोजन करून उपवास सोडावा.

मार्गशीर्ष गुरुवार

लक्ष्मीपूजन 14 डिसेंबर 2023 गुरुवारपासून सुरू होत आहे. दुसरा गुरुवार 21 डिसेंबर, तिसरा गुरुवार 28 डिसेंबर, चवथा गुरुवार 4 जानेवारी आणि पाचवा 11 जानेवारीला आहेत.

श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना
दारात रांगोळी काढून त्यात देवीची पावले काढावी.

महालक्ष्मी देवीची स्थापना करताना देवी आईचे मुख पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा स्वच्छ करुन घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याभोवती रांगोळी काढावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावे.

पितळ्याचा किंवा चांदीचा स्वच्छ तांबा घेऊन पाण्याने पूर्ण भरावा. त्यात एक सुपारी, एक नाणं व दुर्वा घालाव्यात. पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे एक नारळ ठेवावा.

हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर हा कलश नीट ठेवावा. श्री महालक्ष्मीचे चित्र कलशाला टेकवून ठेवावं.

ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः । हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ॐ गोविंदाय नमः । असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळद-कुंकू, फुलं वाहून देवीपुढे उदबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरांजन ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी.

श्री महालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी माहात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्रीमहालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन-अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल, ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी.
रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे.

दुसर्‍या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळद-कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्रीमहालक्ष्मीची पूजा करावी.

मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणार्‍या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. ब्राह्मणाला दान दिले जाते. सुवासिनी बोलावून हळद-कुंकू केलं जातं आणि त्यांना या व्रताचे माहात्म्य सांगणारी पुस्तिका भेट दिली जाते.

न चुकता दर वर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो. आपल्या कुटुंबाला धन- धान्य- समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात.

श्री लक्ष्मीदेवीने पद्‍मपुराणात सांगितले आहे की, जो माझे व्रत नित्य-नेमाने करील, तो सदैव सुखी, समाधानी राहील !

गुरुवार हा श्रीदत्तगुरु-भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे.

श्री महालक्ष्मी व्रत करणार्‍यांसाठी व्रत-नियम
शास्त्रीय व्रतांपैकीच मार्गशीर्ष गुरुवारचे हे लक्ष्मी व्रत असून या व्रताची देवता नारायणसमेत लक्ष्मी आहे.

या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करावी व उद्यापन शेवटल्या गुरुवारी करावे.

हे व्रत कोणतीही कन्या, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष करू शकतात.

व्रतधारी जातकांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण सेवन करणे टाळावे तसेच महिनाभर मांसाहार टाळावा.

हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे.

व्रताच्या दिवशी घरातील वातावण आनंदी असावं.

व्रत करणाराने लवकर उठून स्नान करावे व शरीराने, मनाने निर्मळ होऊन पूजा-विधी करावा.

मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करावी, दर गुरुवारी श्री महालक्ष्मीव्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे त्या महिन्यात येत असलेले चार किंवा पाच गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे.

Margashirsha Guruwar

१२ डिसेंबरला कार्तिक अमावस्या असून १३ डिसेंबरला पहाटे ५ वाजून १ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होत आहे.
हिंदू धर्मियांमध्ये व विशेषतः महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत केले जाते. महालक्ष्मीचे पूजन करून घट मांडण्याची पद्धत प्रचलित आहे. या महिन्यात सवाष्णींना वाण देण्याला तसेच कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना यंदा १३ डिसेंबर पासून सुरु होत आहे. १२ डिसेंबरला कार्तिक अमावस्या असून १३ डिसेंबरला पहाटे ५ वाजून १ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होत आहे. १३ तारखेपासून मार्गशीर्ष मासारंभ होत असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे १४ डिसेंबरला मार्गशीर्षातील पहिला गुरुवार असणार आहे. यंदा कोणत्या तारखेला मार्गशीर्ष गुरुवार असतील तसेच, या गुरुवारच्या व्रताचे महत्त्व, पूजा विधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
मार्गशीर्ष गुरुवार २०२३ – २४ तारखा यंदा मार्गशीर्षातील पहिला गुरुवार १४ डिसेंबर, दुसरा गुरुवार २१, तिसरा गुरुवार २८ डिसेंबर आणि चौथा गुरुवार ४ जानेवारी रोजी आहे. २८ डिसेंबरचा गुरुवार हा अत्यंत खास असणार आहे कारण याच दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून येत आहे.
आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवाराजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो.
मार्गशीर्ष गुरुवारची पूजा वीधी पुढील प्रमाणे करू या..मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा.चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर गहू वा तांदूळ ठेऊन वर तांब्याचा कलश ठेवावा.कलशाला हळद-कुंकु लावून आत दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी.विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा नारळावर वेणी अथवा गजरा ठेवावा आपआपल्या परिने घट हवातसा सजवावा. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, पाच ताजी फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे घटाला दाखवू शकता याप्रमाणे पुजा मांडणी करून देवीची मनोभावे पुजा करावी तसेच वैभलक्ष्मी आईचे व्रत पठण करावे.

 

 

मार्गशीर्ष पहीला गुरूवार दिनांक १४/१२/२०२३ महालक्ष्मीचे पूजन

 

 

Margashirsha Guruwar

हिंदू धर्मियांमध्ये व विशेषतः महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत केले जाते. महालक्ष्मीचे पूजन करून घट मांडण्याची पद्धत प्रचलित आहे. या महिन्यात सवाष्णींना वाण देण्याला तसेच कन्या पूजेला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिना यंदा १३ डिसेंबर पासून सुरु होत आहे. १२ डिसेंबरला कार्तिक अमावस्या असून १३ डिसेंबरला पहाटे ५ वाजून १ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होत आहे. १३ तारखेपासून मार्गशीर्ष मासारंभ होत असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे १४ डिसेंबरला मार्गशीर्षातील पहिला गुरुवार असणार आहे. यंदा कोणत्या तारखेला मार्गशीर्ष गुरुवार असतील तसेच, या गुरुवारच्या व्रताचे महत्त्व, पूजा विधी काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

मार्गशीर्ष गुरुवार २०२३ – २४ तारखा यंदा मार्गशीर्षातील पहिला गुरुवार १४ डिसेंबर, दुसरा गुरुवार २१, तिसरा गुरुवार २८ डिसेंबर आणि चौथा गुरुवार ४ जानेवारी रोजी आहे. २८ डिसेंबरचा गुरुवार हा अत्यंत खास असणार आहे कारण याच दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून येत आहे.

आपल्याकडे जे जे चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे व समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवाराजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. याच कथेचे पठण मार्गशीर्ष गुरुवारी केले जाते, तसेच महालक्ष्मी मंत्र जप करून देवीचे मनोभावे पूजन करण्याचा हा दिवस मानला जातो.

मार्गशीर्ष गुरुवारची पूजा वीधी पुढील प्रमाणे करू या. मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. चौरंगावर लाल कपडा ठेवून त्यावर गहू वा तांदूळ ठेऊन वर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळद-कुंकु लावून आत दूर्वा, एक नाणं आणि सुपारी घालावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा नारळावर वेणी अथवा गजरा ठेवावा आपआपल्या परिने घट हवातसा सजवावा. चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, पाच ताजी फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा. आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे घटाला दाखवू शकता याप्रमाणे पुजा मांडणी करून देवीची मनोभावे पुजा करावी तसेच वैभलक्ष्मी आईचे व्रत पठण करावे.

 

मार्गशीर्ष मासारंभ

Margashirsha Guruwar

हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेल भ्रमण लक्षात घेऊन त्याप्रमाणे ठरविले जातात. अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सान्निध्यात येते तेव्हां जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात.

मार्गशीर्ष महिना हा मराठी वर्षातला नववा महिना आहे. तो साधारण नोव्हेंबर, डिसेंबर अशा दोन्ही महिन्यात मिळून येतो. मार्गशीर्ष महिन्याला अग्रहायण मास असेही म्हणतात. या काळामध्ये पाऊस पूर्णपणे थांबलेला असतो. हवामान अतिशय आल्हाददायक आणि स्वच्छ सुंदर हवा उजेड असलेले असल्यामुळे सुखकर असते. त्यामुळे पूर्ण वर्षातल्या बारा महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा अतीशय उत्तम महिना आहे असे म्हटले जाते. या वेळी धनधान्याची सुबत्ता असते.

बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहं!
मासानां मार्गशीर्षोsहं ऋतूनाम कुसुमाकर:!!

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवतगीतेमधील विभूतीयोग नावाच्या दहाव्या अध्यायात साऱ्या विश्वातील श्रेष्ठ गोष्टी कशा माझ्यातच आहेत हे सांगताना मार्गशीर्ष महिन्याला सर्वोत्तम मास असे म्हणून गौरविले आहे. सामवेदातली गायन करण्यासाठी उच्च असलेली श्रुति म्हणजे बृहत्साम छंदामध्ये गायत्री छंद , सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष महिना आणि सर्व ऋतुंमध्ये वसंत ऋतु जसा श्रेष्ठ आहे असे सांगताना मार्गशीर्ष महिन्याचं पूर्णवर्षातलं उच्च स्थान कसे आहे ते भगवत गीतेत वर्णिले आहे.

मार्गशीर्ष महिन्यामध्ये सूर्य जेव्हां धनु राशीत प्रवेश करतो त्या दिवसापासून पौष महिन्यातल्या मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी या दिवसापर्यंतच्या काळाला धनुर्मास, खरमास, धुंधुर्मास असे म्हणतात. हा कालखंड दक्षिणायनात हेमंत ऋतूमध्ये असतो. त्यावेळी हवेत खूप गारठा असतो. दिवस लहान व रात्री मोठ्या असतात, त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर झाल्यामुळे मनुष्याला सकाळी लवकर भूक लागते. आरोग्याच्या दृष्टीने भूक लागल्यावर लगेच खाणे इष्ट असते. या काळात धुंधुरमासाचे व्रत केले जाते. आरोग्य शास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमासात दिसतो.

या व्रतामध्ये सूर्योदय झाला की ताजा स्वयंपाक करून सूर्योदयानंतर ऊन्ह चढायच्या आत जेवण केले जाते. या जेवणामध्ये मुगाच्या डाळीची खिचडी, वांग्याची भाजी, पावट्याची उसळ, वांग्याचे भरीत, गुळाची पोळी, बाजरीची भाकरी, लोणी असे विविध पदार्थ खाल्ले जातात. मुगाच्या डाळीची खिचडी सोडली तर बाकीचे सगळे पदार्थ पचायला जड आणि उष्ण असतात, त्यामुळे जसे ऊन वाढत जाईल तसे हे पदार्थ पचायला जड जातात म्हणून या आहाराला व्रताचे स्वरुप दिले गेले असावे. जो पर्यंत हवेत सुर्योदयापर्यंत गारठा असतो तो पर्यंत हे व्रत करावे असे सांगितले गेले आहे. कार्तिक शुद्ध त्रयोदशीला आवळी भोजन करायला सांगितले आहे,त्याचा हेतु हाच आहे की आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळ्याला खूप महत्व आहे आणि त्यामुळे आवळ्याला अमृत असे म्हटले आहे. आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवणाचे महत्व त्यामुळेच वर्णिले आहे.

त्रिपुरासुराचा वध झाल्यामुळे देवदिवाळी साजरी केली जाते त्याप्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला पण देवदिवाळी साजरी केली जाते.

देवीच्या नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे मातीचा घट स्थापन केला जातो त्याप्रमाणे खंडोबाच्या नवरात्राच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला कलश स्थापन केला जातो. ताम्हनामध्ये तांदूळ किंवा धान्य ठेऊन त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडले जाते. श्रीफळ कलशाची विधिवत पूजा केली जाते, त्याला बाहेरील बाजूने फुले- पानांची माळ बांधली जाते.

आशा रीतीने घटस्थापना झाल्यावर पाच अथवा सात पानांची माळ सोडतात. अखंड तेलाचा नंदादीप देवाजवळ सहाही दिवस तेवत राहील असे पाहतात, आणि देवाला गोडाचा नैवेद्य दाखवून आरती केली जाते. असा पूजा विधी सांगितला आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा या दिवसापासून चंपाषष्ठी पर्यंत खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो याला मार्तंड भैरव षडरात्रोत्सव किंवा खंडोबाचे नवरात्र असे म्हणतात .

प्रतिपदेपासून उत्सव काळामध्ये षष्ठीपर्यंत रोज मल्हारी महात्म्य, मार्तंड विजय ग्रंथ याचे पारायण करावे असे सांगितले आहे. या उत्सवातला दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पंचमी. मार्तंड भैरव हे शंकराचाच अवतार असल्यामुळे या उत्सवात नागदेवतेचे पण महत्व सांगितले आहे. पंचमीच्या दिवशी नागराजांची चंदनी गंधाने प्रतिमा काढून त्याच्या पुढे नागदिवे तयार करून ओवाळले जाते आणि त्याचा नैवेद्य दाखविला जातो.

चंपाषष्ठीच्या दिवशी दिवटी प्रज्वलित करून देवांना ओवाळले जाते. पुरणा वरणाचा आणि वांग्याचे भरीत रोडगा आणि कांदा पात या खंडोबाच्या आवडत्या गोष्टींचा नैवेद्य दाखविला जातो. घोडा कुत्रा आणि गाय या खंडोबाच्या परिवारातील प्राण्यांना पण नैवेद्य दिला जातो.

घरातल्या पै पाहुण्यांसह तळी भंडार करून त्यातला खोबर आणि भंडारा मार्तंड भैरवावर उधळून हा उत्सव साजरा केला जातो. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्ठीपर्यंत खंडोबाच आणि ऋषिमुनी आणि समस्त मानव जातीला त्रास देणाऱ्या मणी आणि मल्ल या दोन असुरांच युद्ध सहा दिवस चालू होते आणि या युद्धामध्ये खंडोबाने मणी आणि मल्लांचा संहार केला म्हणून असे म्हणतात की स्वर्गातल्या देवांना खूप आनंद झाल्यामुळे त्यांनी मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडेरायावर चंपक म्हणजेच चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली त्यामुळे या षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हणतात. आणि या उत्सवात देव दिवाळी साजरी केली जाते. या देव दिवाळीला भाजणीचे वडे आणि रव्याच्या सांज्याच्या गोड घारग्यांचा नैवेद्य दाखविला जातो.

ब्रम्हांड पुराणात सुद्धा चंपाषष्ठीच्या दिवशी रविवारी शततारका नक्षत्र असताना मल्हारी मार्तंड प्रगट झाल्याचा उल्लेख आहे, त्यावेळी देवांनी त्यांची पूजा करून त्यांच्यावर चंपक पुष्पांची वृष्टी केली असा उल्लेख आहे.

मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी महालक्षमी व्रत केले जाते.आपल्या घरातल्या सर्वांचं आरोग्य नीट राहावं यासाठी आणि घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता रहावी यासाठी हे व्रत केले जाते. या व्रतासाठी मोठी तयारी किंवा ब्राह्मणही बोलवावयची जरुरी नसते. जे लोक हे व्रत करणार असतील त्यांनी प्रत्येक गुरुवारी उपवास करावयाचा असतो.

ज्या ठिकाणी पूजा मांडायची असेल त्या ठिकाणी रांगोळी काढावयाची असते. त्यावर चौरंग ठेऊन एक ताम्हण ठेवून त्या ताम्हनात अक्षता ठेऊन त्यावर एक कलश ठेवून त्या कलशामध्ये पाणी, दुर्वा, द्रव्य टाकून त्याच्यावर विड्याची पाने गोलाकार ठेवून त्यावर श्रीफळ ठेवलं जातं. कलशाला आणि नारळाला हळदीकुंकू लावून पूजा केली जाते. काही ठिकाणी श्रीफळावर मंगळसूत्र घालून वर देवीचा मुखवटाही ठेवला जातो. लक्ष्मीमातेची विधिवत पूजा करून तिला फुलांची वेणी, आणि सौभाग्यच वाण दिले जाते आणि या व्रताचा महिमा सांगणारी जी पोथी आहे तिचे वाचन केले जाते. गोड शिऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो आणि रात्री हा उपवास सोडला जातो.

या व्रताच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनी आणि पाच कुमारिकांना घरी बोलावून त्यांना हळदकुंकू लावून आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना भेटवस्तू देऊन महालक्ष्मी व्रताची महती सांगणारे एक पुस्तक भेट देऊन त्यांचा मानसन्मान आणि आदर सत्कार केला जातो आणि त्यांना देवीचा प्रसाद दिला जातो. श्री. महालक्ष्मीची अनेक नावे आणि अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशिला, अशा विविध नावांनी श्री. महालक्ष्मी ओळखली जाते. हे महालक्ष्मीचे व्रत केले की करणाऱ्याचे मनोरथ पूर्ण होतात असे म्हटले जाते.

मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात. ह्या एकादशीचे व्रत केल्यावर मनुष्य प्राण्याला मोक्ष मिळतो असे म्हणतात. कुरुक्षेत्रावर जेव्हां कौरव पांडवांचे युद्ध सुरू होणार होते तेव्हां आपल्या नातलगांना, गुरूंना, भावंडांना मारून मला आमचा विजय मिळवावयाचा नाही, तरी मी त्यांच्याशी कसे लढू अशा संभ्रमात असलेल्या धनुर्धारी अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी कर्माविषयी आणि धर्माविषयी दिलेले ज्ञान म्हणजेच भगवतगीता होय. त्यामुळे या एकादशीच्या दिवशी गीता जयंती पण साजरी केली जाते कारण याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगून उपदेश केला होता.

एखाद्या ग्रंथाचा जन्मदिवस साजरा करणे ही गोष्ट अखिल विश्वात गीतेचे वैशिष्ट्य आणि महात्म्यच सांगून जाते. समग्र महाभारताचे सारच महर्षी व्यासांनी भगवत गीतेत सांगितले आहे. प्राचीन काळी गीतेला उपनिषदाचा पण मान दिला गेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला गीता सांगण्याच्या निमित्ताने समस्त मानवजातीला जीवन कसे जगावे याची शिकवणच दिली आहे. लोकमान्य टिळक, योगी अरविंद, आणि महात्मा गांधी या थोर राष्ट्रीय नेत्यांनी पण गीतेवर चिंतन केले आहे.

म्हणूनच गीता हा भारताचा धर्मग्रंथ बनला आहे आणि तो सर्वांना आदरणीय आणि वंदनीय पण आहे. म्हणून गीता जयंतीच्या दिवशी भगवत गीता ग्रंथाची पूजा केली जाते आणि त्याचे वाचन केले जाते. अलिकडच्या काळात आचार्य विनोबा भावे यांनी पण गीतेचे थोरपण अगदी आदराने, विनयाने, आणि भक्तिभावाने मान्य केले आहे.

भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला पाजलेल्या गितामृताच वर्णन संस्कृत श्लोकात केले आहे तो श्लोक खालीलप्रमाणे.

सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दन:
पार्थो वत्स: सुधीर्भोक्ता दुग्धम् गीतामृतं महत!

ज्याप्रमाणे एखादा गवळी आपल्या गोठ्यातल्या गाईचे दूध काढून तिच्याच वासराला प्यावयास देतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी सर्व उपनिषदांमधील जीवन विषयक तत्वज्ञान एकत्र करून गोंधळलेल्या अर्जुनाला हे गीतारूपी बोधामृत पाजून त्याला धर्मयुद्धासाठी तयार केले असा वरील श्लोकाचा अर्थ सांगता येईल.

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त गुरूंचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. दत्त जयंतीच्या आधी दत्तात्रेयांचे भक्तगण सात दिवस गुरुचरित्राचे वाचन करतात, त्याला गुरूचरित्राच्या परायणाचा सप्ताह असे म्हणतात. ठिकठिकाणच्या दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी भजन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी दत्त गुरूंची पूजा धूप दीप लावून आरती करून सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो. महाराष्ट्रात औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर इत्यादी दत्तक्षेत्रात दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर केला जातो.

दत्त जन्माची कथा अशा प्रकारे सांगितली जाते की दत्तगुरु हे अत्री ऋषी आणि माता अनसुयांचे सुपुत्र. हे भगवान विष्णूंचा अवतार समजले जातात. एकदा अत्री ऋषींनी खडतर तप केले होते. त्यांच्या या तपामुळे प्रसन्न होऊन ब्रम्हा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी अत्री ऋषींना दर्शन दिले. अत्री ऋषींच्या मागण्याप्रमाणे त्यांची पत्नी अनसूयेच्या पोटी तीन पुत्र जन्माला आले त्यांची नावे सोम म्हणजे चंद्र, दत्तात्रय आणि तिसरा दुर्वास अशी होती. पुराणानुसार दत्त जन्माची आणखीन एक गोष्ट सांगितली जाते.

इंद्र आणि इतर देवतांच्या मागणीप्रमाणे ब्रम्हा, विष्णू, आणि महेश अत्री ऋषींची पत्नी अनसूया हिचे पातिव्रत्य भंग करण्यासाठी किंवा तिच्या पातीव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी साधूंचा वेष करून अत्री ऋषींच्या आश्रमात भिक्षा मागण्यासाठी गेले. तिथे गेल्यावर त्यांनी अनसुयेकडे आम्हाला भूक लागली आहे तेव्हा आम्हाला जेवावयास वाढा अशी विनंती केली. अनसूयेने त्यांची पाद्य पूजा करून त्यांना जेवावयास पाटावर बसवून जेवण वाढण्यासाठी तयारी केली. पण आम्हाला तुम्ही विवस्त्र होऊन जेवण वाढावे अशी इच्छा तिच्याकडे तीनही साधूंनी व्यक्त केली. पतीपरायण आणि सत्शील असलेल्या अनसूयेने तिचे पती अत्री ऋषी यांची आठवण काढून त्या तीनही साधूंच्या अंगावर थोडेसे तीर्थ शिंपडले.

आता त्या ठिकाणी पाटावर तीन साधूंची तीन बाळे झाली होती आणि ती भुकेमुळे रडत होती. त्या तिघांना आपल्या छातीशी धरून अनसूया मातेने त्यांना दूध पाजून एकेकाला शांत केले आणि ती बाळे झोपी गेली. अनुष्ठानासाठी बाहेर गेलेले अत्री ऋषी जेव्हा आश्रमात परत आले तेव्हा सती अनसूयेने त्यांना घडलेला सर्व प्रसंग सांगितला. हे तीनही साधू नसून ब्रम्हा विष्णू आणि महेश आहेत हे अत्री ऋषींनी आपल्या तप:सामर्थ्याने ओळखले. मग हे तिघे जण अत्री आणि अनसूया यांच्यापुढे मूळ रुपात प्रगट झाले आणि त्यांना वर मागण्यास सांगितले.

अनसूयेने आपण आमच्या पोटी जन्म घ्यावा असे सांगून आपली इच्छा व्यक्त केली. अनसूया मातेला तीन पुत्र झाले. ब्रम्हदेव झाले सोम किंवा चंद्र,भगवान विष्णू झाले दत्तात्रेय, आणि महेश झाले दुर्वास. य तीनही पुत्रांमध्ये तीनही देवांचे अंश होते आणि तिन्ही देवांचे तत्व घेऊन अत्री ऋषींचा मुलगा देवांनी दिला म्हणून दत्तात्रेय या नावाने गुरुपरंपरेच मूळ पीठ म्हणून दत्तात्रेय महा प्रभू म्हणून पुजले जाऊ लागले.

ब्रम्हा विष्णू आणि महेश या तीनही देवांच तत्व किंवा देवांचा अंश असलेली तीन चेहेरे असलेली दत्तात्रयांची मूर्ती बऱ्याच ठिकाणी पहावयास मिळते. पण काही ठिकाणी तीन चेहेरे नसून एकाच चेहेऱ्याची दत्तात्रयांची मूर्ती असते तिला एक मुखी दत्त असे म्हणतात. दत्तगुरूंचे भक्तगण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा गुरुदेव दत्त अशा नावाचा जप करून किंवा घोष करून दत्तात्रयांची आराधना करतात. महाराष्ट्रात श्री. दत्त आराधनेची उज्वल परंपरा आहे.

महानुभाव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय आणि दत्त संप्रदाय ह्या पाच संप्रदायातील असलेले भक्तगण श्री. दत्तात्रयांची उपासना करतात. श्री. दत्तगुरु दररोज खूप भ्रमण करीत असत. ते स्नानासाठी वाराणसीला, चंदनाची उटी लावायला प्रयागला, तर दुपारची भिक्षा मागायला कोल्हापूरला जात असत. दुपारचे जेवण बीड जिल्ह्यातील पांचाळेश्वर येथील गोदावरी नदीच्या पात्रात घेत असत.

तांबूल भक्षणासाठी मराठवाडयातील बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथे जात असत तर प्रवचन आणि कीर्तन ऐकण्यासाठी नैमिशारण्यात पोहोचत असत. निद्रेसाठी मात्र माहूर गडावर आपल्या अनसूया मातेकडे जात असत आणि योगासाठी गिरनार पर्वतावर जात असत असे सांगितले जाते. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्ताचा पहिला अवतार, श्री.नृसिंह सरस्वती हा दुसरा तर स्वामी समर्थ हा तिसरा अवतार आहे असे म्हणतात. महाराष्ट्रात हिंदूंच्या प्रमाणे मुस्लिम समाजात पण दत्त गुरूंची उपासना केली जाते.

एकूणच मार्गशीर्ष या मराठी महिन्यातली उत्तम हवा, सुरू झालेली लग्न सराई, खंडोबाचे नवरात्र, देवदिवाळी, महालक्ष्मीचे व्रत, गीताजयंतीचा उत्सव आणि श्रेष्ठ अशा श्री. दत्तगुरूंचा जन्म सोहोळा आणि भोगीच्या दिवसापर्यंत चालणारा धुंधुरमास या सर्वांमुळे खरच हा महिना पूर्ण वर्षातला एकमेवाद्वितीय आहे असे म्हटल्यावाचून राहवत नाही.

दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद देवा तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे.

आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवून पालन करा..

एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, लबाड, अहंकारी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.

 

मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व….!!

Margashirsha Guruwar

मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीविष्णूचा आवडता महिना आहे. ह्या महिन्यात विष्णुची जी जी पूजा पाठ केली जाते त्याचे अगणित पूण्य मिळते.

ह्या महिन्यात लक्ष्मीपूजा करून त्या देवीजवळ तीच्या प्रिय म्हणजे विष्णूच्या नाम मुखात राहु दे व त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहु दे हे मागावे…

विष्णुचे राम कृष्ण अवतार आहेत. ह्या पैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णुला मिळते.

ह्या महिन्यात रामरक्षास्तोत्र, विष्णुसहस्त्र नामावली, भागवत ग्रंथ,भगवतगीता वाचावी.
हयाने विष्णु भगवान प्रसन्न होवून मनातल्या इच्छा पूर्ण होतात. ह्या महिन्यात जास्तीजास्त नामस्मरनाकडे ध्यान द्यावे. नामाने त्या देवाची शक्ति आपल्या घरात वास करते. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णुलाच मिळते. कारण देव हां एकच असून प्रत्येक देव हे विष्णुचि रुपे आहेत.म्हणजे सोने हे एकच आहेत पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनविले जातात पण मूळ सोने प्रत्येकात एक आहे.

म्हणून ह्या महिन्यात
लक्ष्मीपूजन,चपाशष्टि,
दत्तजयंती,गीताजयंती हे सण असतात.ह्या महिन्यात खोटे बोलणे, इतरांची निंदानालस्ती करणे., मनात द्वेष तिटकारा करणे टाळावे. त्यामुळे आपली जेवढी पूजा पाठ आहे ती फळाला येत नाही. जास्तीत जास्त मौन राहन्याचा प्रयत्न करावा. त्याने मानसिक शांती मिळते.
‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’
ह्या मंत्राचा जप करावा. ह्या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातली वासना.,वाईट विचार निघुन जातात.त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही.
भगवतगीता वाचताना त्या श्लोकाची एक एक शक्ति माणसाला नवसंजीवनी देते. त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही. पण हे सर्व करत असतांना आपले मन स्वच्छ ठेवावे. देवाचे नाम घेतांना फक्त नामाचा विचार करावा
बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा.
कारण ह्या महिन्याची पूजा पाठ मनुष्याला सुख शांती समाधान देवून मनातील वासना घालविते.तीच शक्ति माणसाला जगन्याचे धैर्य व् बळ देते.कारण ह्या महिन्याची वैशिष्टच तशी आहेत. ह्या माहिन्यात मन स्वच्छ ठेवलात व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याई मोठी आहे. सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महीना आहे.
मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करने व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणेे म्हणजे मार्गशीर्ष.
म्हणून मन तन आत्म्याने त्या देवाची एकनिष्टे ने पूजा करा.
कोणालाही काया वाचा मनाने दुखवु नका. गरीबांना पैशै, वस्त्र अन्नाची मदत करा. माणसात देव पाहणे हीच खरी विष्णुपूजा आहे.
कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णु वास करतो. त्या विष्णुमुळे आपले शरीर हे जीवंत आहे हे विसरु नका. म्हणून पूजा पाठाबरोबर माणुसकीचाही धर्म पाळा म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णुला मिळेल…कारण माणसातच खरा ईश्वर आहे…..!!
ॐ नमो भगवते वासुदेवाय.।।

 

श्रीमहालक्ष्मी-व्रत करणार्‍यांसाठी व्रत-नियम

 

हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे. व्रत करणाराने लवकर उठून स्नान करावे व शरीराने, मनाने निर्मळ होऊन पूजा-विधी करावा.
व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे.
कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी पण ह्या व्रताची सुरुवात करता येईल, दर गुरुवारी श्रीमहालक्ष्मीव्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे आठ गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. एक महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते. देवीच्या फोटोसमोर बसून श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा व माहात्म्य वाचावे.
उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी-वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्रीमहालक्ष्मीस्वरूप समजून त्यांना हळदी-कुंकू देऊन प्रसाद म्हणून एकेक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री-पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात.
व्रताच्या दिवशी उपवास करावा. फक्त केळी, दूध, फळे खावीत. रात्री भोजन करावे.
पद्‌मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती-पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात.
हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली, तर पूजा-आरती दुसर्‍या कुणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतःच करावा. अशा वेळी तो गुरुवार आठ गुरुवारांमध्ये धरू नये.
एकादशी, शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा-आरती करायला हरकत नाही. रात्री हवे तर भोजन करू नये. काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत नसेल, त्यांनी ते रात्री केले तरी चालेल. फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा. फलाहार घ्यावा.
व्रत-पूजा व श्रीमहालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी-पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने माहात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथीवाचन चालू असताना श्रीमहालक्ष्मीचे अप्रत्यक्षरीत्या अस्तित्व जाणवेल. एकाग्रता व मनाची शुद्धता असणार्‍यांनी बर्‍याचदा सुवासाची चांगलीच जाणीव जाणवेल.
व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसमवेत भोजन करून उपवास सोडावा.

 

श्री महालक्ष्मीची प्रतिष्ठापना व विसर्जन पूजा विधी

 

ही पूजा आपण स्वतःही करू शकतो. फक्त ती करताना मनोभावे करायची आहे. देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे. देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारवून घ्यावी. फरशी असल्यास स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी. ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची, त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा. त्याच्या सभोवती रांगोळी घालावी. थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरून ठेवावेत.
स्वच्छ घासलेला तांब्याचा एक तांब्या घ्यावा. (पितळेचा किंवा तत्सम धातूचाही चालू शकेल.) तो पाण्याने पूर्ण भरावा. एक सुपारी, एक नाणे व दुर्वा त्या पाण्यात घालाव्यात. पाच प्रकारच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची प्रत्येकी पाच पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील, अशा प्रकारे एक नारळ ठेवावा.
हळद व कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावावीत. तांदूळ किंवा गहू पसरलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा. श्रीमहालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिकटवून त्या चित्राची तसबीर समोर येईल अशा तर्‍हेने कलशाला टेकवून ठेवावी.
ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः । हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे. पळीने पाणी हातावर घेऊन ॐ गोविंदाय नमः ।
असे म्हणून हातातील पाणी ताम्हणात सोडावे. नंतर देवीला स्नान घालावे. हळदी-कुंकू, पुष्प वाहून देवीपुढे अगरबत्ती ओवाळावी. धूप दाखवून निरांजनाने ओवाळावे. देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल, ती सफल होण्याची विनंती करावी.
देवीच्या चौरंगावर पाट मांडून त्यावर बसून श्रीमहालक्ष्मीची व्रताची कथा वाचावी. नंतर श्रीमहालक्ष्मी माहात्म्य वाचावे. वाचताना किंवा दुसर्‍याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे.
देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले श्रीमहालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन-अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल, ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी.
रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी. एखाद्या गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा. गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे.
दुसर्‍या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी तुळशीत ओतावे. देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी-कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व एकूण आठ गुरुवार होईपर्यंत श्रीमहालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणार्‍या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता दर वर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो.
श्री लक्ष्मीदेवीने पद्‍मपुराणात सांगितले आहे की, जो माझे व्रत नित्य-नेमाने करील, तो सदैव सुखी, समाधानी राहील !
गुरुवार हा श्रीदत्तगुरु-भक्तांचा उपासना करण्याचा दिवस असल्यानेही याला महत्त्व आहे.

 

श्रीमहालक्ष्मी व्रत – कथा

गुरुवारची कहाणी

श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा-शांती-समाधान घरात नांदावे; म्हणून श्रीमहालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी,सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ध्यानी घ्यावी, अशी ही कहाणी आहे. द्वापार-युगातली. आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली.
तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता प्रजादक्ष होता. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकून आठ अपत्ये होती. सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा-राणीने कन्येचे नाव शामबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल; प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले, तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत-टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, “कोण गं बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय ? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली, “माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आलेय. कुठे आहे ती? दासी म्हणाली, “राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले, तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब.” म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली. “तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्‍नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी-तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणार्‍या श्रीमहालक्ष्मी-व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती, समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती-पत्‍नी लक्ष्मी-लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे.” म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, ” मला सांगाल ते व्रत? मी करीन ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही; घेतला वसा टाकणार नाही.”
म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार, तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, “कोण गं तू थेरडे? इथे कशाला आलीस ? जा इथून.” तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती, हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार, तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली, “आजी, रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते.” राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली. तिने शामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता.
पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले.
लवकरच शामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा-समाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव, ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती; ती स्थिती आता बदलली. अन्न-पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे; पण तो तरी काय करणार? एकेक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता.
एक दिवस भद्रश्रवाला वाटले, मुलीकडे जावे, तिला पहावे आणि चार-आठ दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून-चालून तो खूप दमला होता; म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शामबालालाही ते समजले. शामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान-सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली.
भद्रश्रवा परत जायला निघाला, तेव्हा शामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे, हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय? हंड्यात धन नव्हतेच. होते फक्त कोळसे ! महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्र्श्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता.
दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक-एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली. तेव्हा शामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शामबालाने आईकडूनही महालक्ष्मी-व्रत करवून घेतले. चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई-वडिलांना भेटण्यासाठी म्हणुन शामबाला माहेरी आली. पण ‘बाप’ भेटायला गेला असताना त्याला शामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता; पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही,’ हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली.
स्वगृही आल्यावर मालाधराने शामबालेला विचारले, ” माहेराहून काय आणलंस?” शामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले, तर हंड्यात मिठाचे खडे ! मालाधराने चकित होत पत्‍नीला विचारले, “हे काय? या मिठाचा काय उपयोग? शामबाला म्हणाली, “थोडं थांबा, म्हणजे कळेलच.” त्या दिवशी शामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न-पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. “हा मिठाचा उपयोग!’ शामबाला पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पटले
थोडक्यात, जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील.
महालक्ष्मीची ही कथा, कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ॥
ॐ महालक्ष्मी नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।

Exit mobile version