मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव प्रारंभ
Martand bhairav prarambh
देवीच्या नवरात्रामध्ये ज्याप्रमाणे मातीचा घट स्थापन केला जातो, त्याप्रमाणे षडःरात्रोत्सवामध्ये कलश स्थापन केला जातो. घटस्थापना विधीची आणि षडःरात्रोत्सवातील कुलाचाराची सविस्तर माहिती खास मल्हार भक्तांसाठी येथे देत आहोत..
घटस्थापनेच्या दिवशी आपल्या घरातील देवघर स्वच्छ साफ करून घ्यावे. सर्व देवतांच्या मूर्तींची स्वच्छ पाकाळणी (प्रक्षालन) करून पंचामृताने ( दुध, दही, तूप, मध, साखर.) अभिषेक घालून षोडशोपचारे अथवा पंचोपचारे अथवा यथोमिलीतोपचारे पूजा करावी. देवघरातील सर्व टांक आणि मूर्तींना नूतन वस्त्रासोबत विड्याच्या पानांचे आसन द्यावे.
नंदादीप घासून पुसून स्वच्छ करून सहा दिवस सतत तेवत राहील या पद्धतीने वात लावून प्रज्वलित करावा. ताम्हणामध्ये तांदुळ किंवा धान्य ठेवून त्यावर तांब्या अथवा पंचपात्र मांडावे, श्रीफळ कलशाची विधीवत पूजा करावी, त्याला बाहेरील बाजूने फुले-पानांची माळ बांधावी. अशा रीतीने घटस्थापना झाल्यानंतर पाच अथवा सात पानांची माळ टांगती अड्कवावी. गोड नैवेद्य दाखवून आरती करावी.
रोज सकाळी नियमितपणे देवाची पूजा करावी… देवाला गोड नैवेद्य अर्पण करावा. फुलांची माळ तयार करून घटावर लावावी. शक्य असेल तर दररोज वेगवेगळ्या फुलांची माळ लावावी, आणि शक्य नसेल तर उपलब्ध असलेल्या फुलांची माळ लावावी. उत्सव कालावधीमध्ये घरातील वातावरण पवित्र आणि मंगलमय ठेवावे. मल्हारी महात्म्य, मार्तंड विजय ग्रंथ यांचे पारायण, मल्हारी नामस्मरण करावे.
मार्गशीर्ष शुद्ध पंचमी या दिवशी श्रीक्षेत्र जेजुरी मध्ये श्रींना तैलस्नान घातले जाते, त्याला श्रीखंडोबा आणि म्हाळसा विवाहातील तेलवण विधी असे म्हणतात. या दिवशी तिन्हीसांजेला आपल्या घरातील व्यक्तींच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे आणि दोन मुटके तयार करावेत त्यासोबत पुरणाचे पाच दिवे तयार करून घ्यावेत. सर्व दिवे शुद्ध तुपाच्या वातींनी प्रज्वलित करून देवाला औक्षण करावे.
चंपाषष्ठी घटस्थापना
Martand bhairav prarambh
जयमल्हार
श्री खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असून नवरात्रात देवीची नऊ दिवस ज्याप्रमाणे घटस्थापना असते त्याप्रमाणे खंडोबाची सहा दिवस घटस्थापना असते याला चंपाषष्ठी असे नाव आहे, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच दिनांक 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत ही घटस्थापना करावयाची आहे.
सकाळी लवकर उठून आपल्या देव्हाऱ्यातील देवांची नेहमीप्रमाणे पूजा करायची आहे, ही पूजा करीत असताना देव नागिनिच्या पानांवर पुजायचे.
आपल्या देव्हारातील असलेल्या कलश सुशोभित करायचा.
संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर पाच पानांची माळ तयार करून, देव्हाऱ्यात पुढील भागात अडकवावी
अश्या प्रकारे दररोज पुढील पाच दिवस नगिनीच्या पानांची माळ लावावी.
भंडारा एका पत्रात भरून ठेवावा,
खोबऱ्याची वाटी पुढे ठेवावी,पानाचा विडा मांडावा,
अखंड तेलाचा वा शक्य असल्यास तुपाचा दिवा प्रज्वलित सहा दिवस ठेवावा,हा दिवा पानावर वा अक्षदांवर ठेवावा.
तेलाचा दिवा असल्यास,देव्हाऱ्याच्या उजवीकडे व तुपाचा डावीकडे ठेवावा.
देवाला धूप दीप दाखवावी,नेवेद्य दाखवून,श्री खंडोबा देवाची आरती करून उपवास प्रारंभ करावा.
शक्य असल्यास खंडोबाचा खालील कोणताही एका मंत्राचे मंत्र पठण करावे.
!ओम नमो मार्तंड भैरवाय!!
श्री मल्हारी मार्तंड षडरात्रीं घटस्थापना विधी
Martand bhairav prarambh
(मार्गशीर्ष शु. १ ते मार्गशीर्ष शु.६)
1) श्री स्वामीस्तवन
2) एक माळ श्री स्वामी समर्थ जप
मुनीनां सप्त कोटीणां वरदं भक्त वत्सलां। दुष्ट मर्दन देवेश वंदे हं म्हालसापती॥
हा मंत्र म्हणत पुरुषांनी हळद व महिलांनी हळदी-कुंकूस्वत:च्या कपाळी लावावे.
खालील मंत्रांनी चार वेळा तळहातावर पाणी घेऊन प्यावे.
१) ॐ ऐं आत्मतत्वं शोधयामी नम: स्वाहा।
२) ॐ र्हीं विद्यातत्वं शोधयामी नम: स्वाहा।
३) ॐ क्लीं शिवतत्वं शोधयामी नम: स्वाहा।
४) ॐ ऐं र्हीं क्लीं सर्वतत्वं शोधयामी नम: स्वाहा।
गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा.
संकल्प : ‘मी (अमुक) गोत्रात उत्पन्न (अमुक) नावाचा/नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्ती साठी, वर्धना साठी, सर्वदुरीत उपशमनासाठी अशुभशक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्यादी सकलग्रह पीडा शांतीसाठी, त्रिविधताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड-अचंचल-अभेद्य भक्ती, सेवा व सान्निध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे (अमुक) संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे.’
श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा पठण करावे.
‘ ॐ श्री गंगा-म्हाळसासहीत मणिमल्हारयेनम:’
या मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी.
१) घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा, त्यावर पिवळे वस्त्र अंथरावे, चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीपप्रज्वलितकरून त्याची पूजा करावी.
२) एक वेळूची टोपली त्या पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती, गहू मिसळून भरावी.
३) त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट पिवळ्या लोकरीचे सहा वेढे देऊन ठेवावा. त्यातपाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षता टाकाव्यात. विड्याची पाच पाने व आंब्याचा डहाळा लावावा.
४) घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते हळदीचे गंध लावावे, घटावर एका तांब्याच्या अथवा स्टिलच्या ताटलीत तांदुळ भरून त्यावर हळदीचे अष्टदल काढून ठेवावे.
५) खालील प्रमाणे खंडोबाची पूजा करावी.
Martand bhairav prarambh
ध्यानमंत्र::—-
ध्यायेन्मल्लारिदेवं कनकगिरिनिभं म्हाळसा भूषिताङकम्।
श्वेताश्वं खड्गहस्तं विबुधबुधगणै: सेव्यमानंकृतार्थे:॥
युक्तांघ्रिं दैत्यमूर्ध्नि डमरुविलसितं नैशचूर्णाभिरामम्।
नित्यं भक्तेषु तुष्टं स्वगणपरिवृतं नित्येमोंकाररूपम्॥
मंत्र म्हणून टाकास नमस्कार करावा.
खंडोबाच्याटाकावर १ वेळा श्री सूक्त व
१ वेळा रुद्र अथवा शिवमहिम्न म्हणून अभिषेक करावा.
घटावर विड्याची दोन पाने पुर्वेकडे देठकरून ठेवावी, त्यावर खंडोबाचा टाक झोपवून ठेवावा.
टाकाची पंचोपचार पूजा करावी.
पंचोपचारपूजा
१) ॐ श्री मार्तंड भैरवाय नम:।विलेपनार्थे चंदनम् समर्पयामि॥ (गंधलावावे.)
अलंकारार्थे अक्षताम् समर्पयामि॥हरिद्रां कुंकुम् सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि॥
(गंध लावावे, अक्षता वहाव्यात व हळद-कुंकूवहावे.)
२) ॐ श्री मार्तंड भैरवाय नम:।ऋतुकालोद्भव पुष्पम् समर्पयामि॥ (फुलेवहावीत.)
३) ॐ श्री मार्तंडभैरवाय नम:।
धूपम् आघ्रापयामि॥ (धूपओवाळावा)
४) ॐ श्री मार्तंडभैरवाय नम:।दीपं दर्शयामि। (दीपओवाळावा.)
५) ॐ श्री मार्तंडभैरवाय नम:।पंचामृतात्मकं नैवेद्य समर्पयामि॥
(पंचामृत वाटीत एकत्र करून त्याचा नैवेद्य दाखवावा.)
पूजेनंतर १ माळ घटावर खालील मंत्राने बांधावी
ॐमां माले महामाये सर्वशक्ति स्वरूपिणी।
चतूर्वर्ग त्वयी न्यस्ते स्तन्मान्मे सिद्धिदा भव॥’
पहिल्या दिवशी विड्याच्या पानां ची माळ बांधावी.
रोज घटावरील टाकाची दूरूनच पंचोपचार पूजा करून, टाकास हळद वाहावी व घटास रोज पिवळ्या फुलांची माळ बांधावी, आरती करावी.
सहा दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून १४ किंवा २८ पाठ श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे करावे.
चंपाषष्टीच्या दिवशी शंख किंवा घंटा ध्वनीत घटावरील खंडोबाचा टाक उचलून प्रतिपदेप्रमाणे अभिषेक व पूजन करावे.परंपरेनुसार कुलाचार व कुल धर्म पूर्ण करून,तळीभरून महानैवेद्यत्यात बाजरीची भाकरी, नव्या वांग्याचे भरीत,पातीचा कांदा, नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य तसेच पुरणपोळी सुद्धा करावी.
तळीभरणे
कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी तळी भरतात. ताम्हणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात. नंतर मध्यभागी तांब्यात पैसा, सुपारी वर नागवेलीची पाने ठेवून नारळ ठेवतात. याची कलशासह पूजा करतात. पाचमुलांनी हात लावून ताम्हण वर उचलून त्यावर तीनवेळा कपाळ टेकवतात व येळकोट मल्हार, सदानंदाचा येळकोट, म्हाळसाकान्त कडे पठार की जय’ असा जय जयकार करतात.
तसेच काही प्रदेशात,.
सदानंदाचा येळकोट,
Martand bhairav prarambh
येळकोट मल्हार येळकोट।हर हर महादेव।चिंतामण मोरया।
भैरोबाचा चांदोबा l अगडबंब नगारा l सोन्याची जेजुरी l मोत्याचा तुरा l निळा घोडा l पायी तोडा l कमर कर गोटा l बेंबी हिरा l गळ्यात कंठी l मोहन माळा l डोईवर शेला l अंगावर शाल l सदा हिलाल l जेजुरी जाई l शिकार खेळी l म्हाळसा सुंदरी l आरती करी l देवा ओवाळी l नानापरी l देवाच्या शृंगारा l कोट लागो शिखरा l खंडेरायाचा खंडका l भंडाराचा भडका l बोल सदानंदाचा येळकोट l
असे म्हणतात.हे म्हणताना हातात दिवटी बुधली असते.विवाहापूर्वी कुलधर्म असेल तर भाऊबंदांनी ही त्यांच्या दिवट्या आणायच्या असतात.नंतर वरील प्रमाणे जयजयकार करीत जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुधल्या घेऊन थोडे जायचे असते. (किमान पाच पावले )त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जय जयकार करून घरी यायचे. आणि नंतर नैवेद्य व पुरणाच्या 14 दिव्यांनी आरती करावी .जमल्यास धनगर जोडप्यास जेवू घालावे.
षष्ठीच्या दिवशी घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी. जमलेली हळद पुरुषांनी नित्य कपाळास लावण्यास ठेवावी.
खंडोबा सन्मान.
Martand bhairav prarambh
१)पिवळे धोतर, सव्वा मीटर पिवळा कपडा व फेटा.
२) १०८ बेलपत्र व भंडारा
३) ५ खोबरे वाट्या व भंडारा
४) पिवळया फुलांचा हार व दवना
५)नैवेद्य: बाजरीची भाकरी, वांगे भरीत, लसुन चटणी, पातीचा कांदा, लिंबू.
यासोबतच पुराणाचा नैवैद्य असला तरी चालेल.
टिप:- जातांना देवघरातील खंडोबा टाक सोबत घ्यावा, व देवाची भेट घडवून परत आणावा.
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे