कोजागिरी पौर्णिमा
Kojagiri Purnima
( दिंडोरी प्रणित उत्सव)
( आश्विन शु.१५.) (दि.२८ ऑक्टोबर २०२३)
पौर्णिमेची रात्र,चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा.
अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव अश्विन शुद्ध पौर्णिमा या दिवशी रात्री ठीक 12 ते 12. 39 या 39 मिनिटात करायचा असतो.
भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र ,कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकरांनी आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा (दूध )नैवेद्य करावा
पूजाविधी मांडणी
Kojagiri Purnima
मांडणी करताना एका पाटावर किंवा चौरंगावर
1. लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर श्री गुरुपीठातून घेतलेले सिद्ध श्री यंत्र ठेवावे. हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवावी.
2. त्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून श्री गुरु पिठातून घेतलेले सिद्ध लक्ष्मी कुबेर यंत्र ठेवावे हे यंत्र उपलब्ध नसल्यास सुपारी ठेवावी.
3. तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या किंवा गडवा त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून घ्यावा.
4. चंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा
. अशी मांडणी रात्री बारा वाजेपर्यंत करून ठेवावी.
रात्री ठीक बारा ते साडेबारा या ३० मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे. जेणेकरून चंद्रदेवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.
5. साडेबाराला पूजेच्या पाटा समोर पाण्याचे भरीव चौकोनी मंडल करून त्यावर दुधाचे भांडे ठेवून चारही देवांची हळदीकुंकू पांढरी फुले अक्षता अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकावे व नैवेद्य दाखवावा व खालील प्रार्थना म्हणावी.
ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय l
शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा l l
दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा.
जर पूजनासाठी सुपारींचा वापर केला असेल तर याच सुपार्या जपून दरवर्षी पुजाव्यात.
व दर कोजागिरीस व लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांची पूजा करावी.
12 ते 12.30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवा करावी
Kojagiri Purnima
लक्ष्मी प्राप्तीची सेवा.
1.श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळा जप
2.श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ
3.श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ
4.श्री कुबेर मंत्र 1 माळ
5. 16 वेळा श्री सूक्त
6.व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा
7.गीतेचा पंधरावा अध्याय वाचावा.
ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे.
लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा लक्ष्मी! अनेक प्रकारची आहे वित्त लक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे. कृपाळू आहे ती हित करणारी आहे . पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे.
मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात तिची अवकृपा झाली की, लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर रागवते. पण जे जागरण करतात,वरील सेवा करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते .कोण जागतो आहे? को जागर्ती ? यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडले. याच पौर्णिमेचे रात्री राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो. आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पहात असतो. वारंवार तो कोजागर्ता असे विचारतो यावरून हे नाव रूढ झाले आहे.
खंडग्रास चंद्रग्रहण
अश्विन शु.१५ 28/29 ऑक्टोबर 2023 शनिवार
ग्रहण स्पर्श – रात्री ०१:०५
ग्रहण मध्य – रात्री ०१:४४
ग्रहण मोक्ष – रात्री ०२:२३
ग्रहण पर्वकाल ०१ तास १८ मिनीट
हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.
ग्रहणाचा वेध- शनिवार दि.28ऑक्टोबर2023 रोजी दु.०३:१४ पासुन ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल,वृद्ध,अशक्त,आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी शनिवार सायं ०७:४१ पासुन वेध पाळावेत.
वेधकाळामध्ये भोजन करू नये. स्नान,जप,देवपूजा,श्राद्ध इत्यादी करता येतील तसेच पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग करता येईल.
ग्रहकाळात म्हणजे रात्री ०१:०५ ते ०२:२३ या काळात पाणी पिणे,झोपणे,मलमूत्रोत्सर्ग हे करु नयेत.
ग्रहणातील कृत्ये- ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्व काळामध्ये देवपूजा,तर्पन,श्राद्ध जप,होम,दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे. ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे.ग्रहण काळामध्ये झोप,मलमूत्रोत्सर्ग,अभ्यंग,भोजन व कामविषयसेवन हे कर्म करू नये. सुतक असता ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापूर्वी शुद्धी असते.
कोजागरी आणि ग्रहण
यावर्षी दि.28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण असुन रात्री ०१:०५ ते ०२:२३ असा ग्रहणाचा पर्वकाल आहे. त्यापूर्वी वेधकाळात प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखविता येईल मात्र प्रसाद म्हणून केवळ पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल.
खंडग्रास चंद्रग्रहण
Kojagiri Purnima
दि.28/10/2023 शनिवार रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण आहे .
ग्रहण स्पर्श –
29/10/2023 रोजी रात्री 01-05 मि.
ग्रहण मध्य –
रात्री 01-44 मि.
ग्रहण मोक्ष –
रात्री 02-23 मि.
ग्रहण पर्वकाल –
1तास 18 मि.चा आहे.
हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.
ग्रहण दिसणारे प्रदेश – भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण अफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसेल.
पुण्यकाल –
ग्रहण स्पर्शापासून ग्रहण मोक्षापर्यंत पुण्यकाल आहे.
ग्रहणाचा वेध –
हे ग्रहण रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात असल्याने 3 प्रहर आधी म्हणजे शनिवारी 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 03-14 मि. पासून ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी शनिवारी सायंकाळी 07-41 मि.पासून वेध पाळावेत. वेधामध्ये भोजन करू नये. स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इ. करता येतील, तसेच पाणी पिणे,झोपणे, मलमूत्रोत्सर्ग करता येईल.
ग्रहण पर्वकाळात म्हणजे दि.29 ऑक्टोबर रोजी 01-05 मि. ते 02-23 मि. या काळात पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग ही कर्मे करू नयेत.
ग्रहणातील कृत्ये
ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे.पर्वकालामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध , जप, होम, दान करावे.पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण चंद्रग्रहणात करावे, ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे. ग्रहणकालामध्ये (पर्वकालामध्ये) झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, भोजन, व कामविषयसेवन ही कर्मे करू नयेत. अशौच असता ग्रहणकालात ग्रहणासंबंधी स्नान, दान करण्यापुरती शुद्धी असते.
ग्रहणाचे राशिपरत्वे फल
मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशीना शुभफल.
सिंह, तुला, धनु, मीन या राशीना मिश्रफल.
मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशीना अनिष्ट फल आहे.
ज्या राशींना अनिष्ट आहे त्या राशीच्या व्यक्तीनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये.
यावर्षी 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच चंद्रग्रहण आल्यामुळे रात्री 01-05 मि. ते 02-23 मि.असा ग्रहणाचा पर्वकाल आहे . त्यापूर्वी प्रतीवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राचे पूजन करून दूध साखरेचा नैवेद्य दाखवता येईल . मात्र प्रसाद म्हणून केवळ एक पळीभर किंवा चमचाभर दूध प्राशन करावे. राहिलेले दूध दुसरे दिवशी घेता येईल त्यावर तुळशीपत्र ठेवावे.
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे