Site icon

Pornimechi Satyanarayan Puja

Pornimechi Satyanarayan Puja

दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा

०१/०८/२०२३- अधिक श्रावण पौर्णिमा. प्रारंभ मंगळवारी उत्तरा रात्रौ ३.५२, समाप्ती ०१/०८/२०२३ रात्री १२.०२!

Pornimechi Satyanarayan Puja: जन्म देण्याचे काम ब्रम्हदेव करत असतात व जन्म ते मृत्यु पर्यंत पालनपोषण करण्याचे काम , जबाबदारी भगवान विष्णुंवर आहे आणि मृत्युनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणुन मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असतेच.

श्रीक्षेञ ञ्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो. आपल्या घरात पुरेसे न पडणे , आर्थीक अडचणी येणे , अन्न चविष्ट न लागणे , अन्न खाऊन तृप्ती न होणे , महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटुन अनाठायी पैसा खर्च होणे. वरील सर्व बाबींचे कार्यकारण भाव आपणास समजत नाही. असे प्रश्न ज्या वेळेस श्री स्वामी समर्थ केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्याघरी करण्याचा सल्ला दिला जातो.

सतत १२ पौर्णिमांनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बर्‍याच अंशी सुटलेले असतात. बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात याचे कारण असे की, आपण जी सत्यनारायण पुजा करतो ती धान्याची पूजा असते. जुनी मंडळी असे म्हणतात की, घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही. कारण विकतचे आणलेल धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात. “ओकलेलं खाल्लं तर एकवेळेस ते चालेल परंतु टोकलेले खाऊ नये ” ‘ जैसे खावे अन्न वैसे उपजे मन’ या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावर वाईट परिणाम करु शकतात.

घरातील माणसे एकविचाराने न राहणे, घरात अन्नधान्य, पैसा पुरेसा न पडणे, या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसुन येते. म्हणुन आपल्या पुर्वजांनी फार बारीक अभ्यास करुन घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालुन दिली आहे.

आपल्या घरी असलेले अन्न व धन यांच्या पालनपोषनाची जबाबदारी भगवान विष्णु यांच्याकडे असल्याने, भगवान विष्णुंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातुन जर आपण पुजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहिसे होतात. तसेच तो पैसा धन, पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते. त्या ठिकाणी पविञता येऊन घरात सुख, शांती, आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते.

” सत्यनारायण पूजा ”

Pornimechi Satyanarayan Puja -” सत्यनारायण पूजा ” ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी (सूर्यास्ताअगोदर व नंतर २४ मि. ) करावयाची असते. ऐश्वर्य, धन, संपत्ती यांचे मालक विष्णु व माता लक्ष्मीदेवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्याघरी पूजा करावी. मकर संक्रांतीच्या दिवशीपण सत्यनारायण करावा.

पूजेचे साहित्य :- १ पाट , १ चौरंग, चौरंगाभोवती अांब्याचे चार डहाळे, चौरंगावर अर्धा मिटर पांढरे कापड , ताम्हणात तांदुळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा. तीन सुपार्‍या विड्याच्या पानावर ठेवाव्यात. (पहिली सुपारी- गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वरुणाची ) वरील पध्दतीने मांडणी करुन सर्वांची पंचोपचार पूजा करावी. नंतर रव्याचा प्रसाद करुन नैवेद्य , धूप, दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. आरती करुन प्रसाद वाटावा. हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तिंनीच खावा बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये. नातेवाईकांना सुध्दा देऊ नये.

यानंतर पूजेतील उरलेले गहु-तांदुळ त्या त्या धान्यात टाकावे. यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पविञ होतात. कारण जेंव्हा धान्य दुकानातुन विकत आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागले असतात. त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी, ते पविञ करण्यासाठी दर पौर्णिमा , संक्रातीला सत्यनारायण करावा. या विधीमुळे घरात सुखशांती नांदते, धनधान्य पुरते, आर्थीक स्थिती सुधारते.

 

Pornimechi Satynarayan Pooja- सर्व नवीन सेवेकर्यांनी उदयापासून दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन घरचे घरी करावे.आणि अनुभूती घ्यावी .

सत्यनारायण पूजनास जोडीने बसण्याची गरज नाही, स्त्रिया एकट्याने देखील पूजा करु शकतात.

काही अडचणीमुळे जर पौर्णिमेला पूजा करता आली नाही तर येणाऱ्या पौर्णिमेची वाट न बघता त्यापूर्वी चांगला दिवस बघून पूजा करू शकतात. असे आदरणीय दादासाहेब यांनी हितगुजातून सांगितले आहे.

 

Pornimechi Satyanarayan Puja-सत्यनारायण देवाची आरती

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा ॥
पंचारति ओवाळूं श्रीपति तुज भक्तिभावा ॥

विधियुक्त पूजुनी करिती पुराण श्रवण ॥
परिमलद्रव्यांसहित पुष्पमाळा अर्पून ॥
घृतयुक्तशर्करामिश्रित गोधूमचूर्ण ॥
प्रसाद भक्षण करितां तूं त्यां प्रसन्न नारायण ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

शतानंदे विप्रें पूर्वी व्रत हें आचरिलें ॥
दरिद्र दवडुनि अंतीं त्यातें मोक्षपदा नेलें ॥
त्यापासुनि हें व्रत या कलियुगीं सकळां श्रुत झालें ॥
भावार्थें पूजितां सर्वां इच्छित लाधलें ॥

जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

साधुवैश्यें संततिसाठीं तुजला प्रार्थियलें ॥
इच्छित पुरतां मदांध होऊनि व्रत न आचरिलें ॥
त्या पापानें संकटिं पडुनी दुःखहि भोगीलें ॥
स्मृति हो‍उनि आचरितां व्रत त्या तुवांचि उद्ध्रिलें ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा
प्रसाद विसरुनि पतिभेटीला कलावती गेली ॥
क्षोभ तुझा होतांचि तयाची नौका बुडाली ॥
अंगध्वजरायासी यापरि दुःखस्थिति आली ॥
मृतवार्ता शतपुत्रांची सत्वर कर्णीं परिसीली ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

पुनरपि पूजुनि प्रसाद ग्रहण करितां तत्क्षणीं ॥
पतिची नौका तरली देखे कलावती नयनीं ॥
अंगध्वजरायासी पुत्र भेटति येऊनि ॥
ऐसा भक्तां संकटिं पावसी तूं चक्रपाणी ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

अनन्यभावें पूजुनि हें व्रत जेजन आचरती ॥
इच्छित पुरविसि त्यांतें देउनि संतति संपत्ति ॥
संहरसी भवदुरितें सर्वहि बंधने तुटती ॥
राजा रंका समान मानुनि पावसि श्रीपती ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

ऐसा तव व्रतमहिमा अपार वर्णूं मी कैसा ।
भक्तिपुरःसर आचरती त्यां पावसि जगदीशा ।
भक्तांचा कनवाळू कल्पद्रुम तूं सर्वेशा ॥
मोरेश्वरसुत वासुदेव तुज विनवी भवनाशा ॥
जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा

घालीन लोटांगण’ या प्रार्थनेचे रहस्य तुम्हाला माहित आहे का ?

हे आवश्य वाचा 

कोणत्याही देवाच्या आरती नंतर एका सुरात व धावत्या चालीत
ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे. सर्वत्र म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात.

आज आपण या प्रार्थने मधील वैशिष्टे पाहूया व त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे.

वैशिष्ट्ये :
(१) प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिता वेगवेगळे आहेत.
(२) ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली आहेत.
(३) पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहेत.
(४) बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे. पण ही सर्व देवांच्या आरती नंतर म्हणली जाते.
(५) यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही.
(६) वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे.

आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया
१) घालीन लोटांगण वंदीन चरणl डोळ्यांनी पाहिन रूप तुझे |
प्रेमे आलिंगन आनंदे पूजीन |
भावे ओवाळीन म्हणे नामा |
वरील कडवे संत नामदेवांनी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे
अर्थ…
विठ्ठलाला उद्देशुन संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहिन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन.

२) त्वमेव माता च पिता त्वमेव |
त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव |
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव |
त्वमेव सर्व मम देव देव |
हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृत मध्ये आहे. हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे.
अर्थ..
तूच माझी माता व पिता आहेस. तूच माझा बंधू आणि मित्र आहेस. तूच माझे ज्ञान आणि धन आहेस. तूच माझे सर्वस्व आहेस.

(३) कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा |
बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात | करोमि यद्येत सकल परस्मै |
नारायणापि समर्पयामि ||
हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिलेले आहे.
अर्थ…
श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे माझे मन, माझी इंद्रिये, माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे.

(४) अच्युतम केशवम रामनारायणं |
कृष्ण दामोदरम वासुदेवं हरी |
श्रीधर माधवं गोपिकावल्लभं |
जानकी नायक रामचंद्र भजे ||

वरील कडवे आदि शंकराचार्यांच्या अच्युताकष्ठम् मधील आहे. म्हणजेच आठव्या शतकातील आहे.
अर्थ…
मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिकावल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि मी भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला.

हरे राम हरे राम |
राम राम हरे हरे |
हरे कृष्ण हरे कृष्ण |
कृष्ण कृष्ण हरे हरे |
हा सोळा अक्षरी मंत्र ‘कलीसंतरणं’ या उपनिषदातील आहे.
कलियुगाचा धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे.

अशी ही वेगवेगळ्या कवींची, वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवा पर्यंत पोचतो.

Pornimechi Satyanarayan Puja

 

pooja lifestyle या चॅनेल वर तुम्ही बघू शकता खालील लिंक वर जाऊन बघू शकता

श्री स्वामी समर्थ

काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

Exit mobile version