गुरूपुष्यामृत योगाचे महत्व
Gurupushyamrut Yogache Mahatva
गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरु पुष्यनक्षत्र योग.आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो.
गुरुपुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासाहित गुरुवारी येतो.असा हा शुभ योग खूप महत्वाचा मानला जातो.
या मुहूर्ताला आपण सर्व शुभ कार्याला सुरुवात म्हणजेच शुभारंभ करत असतो.
१) गृहप्रवेश
२) सोने व चांदी खरेदी
३) मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी
४) नवीन व्यवसाय सुरू
५) विद्यारंभ म्हणजेच शिक्षण सुरु करण्यासाठी व इतर.
तसेच या दिवशी गुरु मंत्र तसेच देवाचे नामस्मरण व इतर सर्व धार्मिक / अध्यात्मिक सेवा केल्यास सेवेकारयांना अत्यंत लाभ होतो.
पुष्यामृत गुरुवारी येणे हा योग दुर्मिळ आहे. म्हणूनच आपण याला अमृत योग असे संबोधितो.
पूजा विधी :-
घरातील ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच देवारयात उजव्या कोपऱ्याला श्रीसुक्त,पुरुषसुक्त वाचून व पंचोपचार पूजा करून कलश स्थापना केल्यास घरात धन-धान्य वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते.पुढीलप्रमाणे कलश स्थापना करावी :
एक चौरंग,एक पाट,चौरांगाभोवती आंब्याच्या चार डगळे लावावेत.चौरंगावर शुभ्र वस्त्र टाकावे.त्यावर मध्यभागी थोडे तांदूळ टाकावे.त्यावर एक कलश,त्यात पाणी,नाणे व सुपारी टाकून ठेवावा. त्यात पाच विड्याची पाने ठेवावीत.त्यावर श्रीफळ ठेवावे.
Gurupushyamrut Yogache Mahatva
गुरूपुष्यामृत योगाचे महत्व :-
ज्योतिष शास्त्रात ग्रह,नक्षत्र, वार,करण,तिथी, मास आदी महत्त्वपूर्ण घटक असतात.त्यांचा प्रभाव आणि युती यांच्यामुळे शुभ व अशुभ काळ निर्माण होतो.यांच्याच सहाय्याने मानवाला इच्छित कार्यात यश मिळू शकते.
गुरूवारी पुष्य नक्षत्राचा दिवस आल्यास तो अत्यंत शुभ मानला जातो.हा दिवस व नक्षत्र यांच्या संयोगातून गुरूपुष्यामृत योग निर्माण होतो. कोणत्याही कार्यात ९९.५ टक्के यश मिळविण्यासाठी त्याची सुरवात या दिवशी केली जाते.
‘गुरू’ ग्रह ज्ञान व यशस्वितेचा प्रतीक आहे. म्हणूनच या योगाच्या काळात उच्च शिक्षण, तंत्रज्ञान शिक्षण,कला,साहित्य,नाट्य,वाद्य वा कोणत्याही विषयातील संशोधनाचा प्रारंभ, शैक्षणिक वा अध्यात्मिक गुरू निवडणे, तंत्र,मंत्र व दीक्षा घेणे,परदेश यात्रा,व्यापार,धार्मिक कार्याचा प्रारंभ आदी कार्ये करणे शुभ मानले जाते.
या मुहूर्ताचा सुक्ष्म अभ्यास केल्या या दिवशी साधणार्या योगात चंद्रबल,तारा बल,गुरू-शुक्रादी ग्रहांचा उदय-अस्त,ग्रहणकाल,पितृपक्ष व अधिक मास आदी बाबींचा ही विचार केला जातो. म्हणूनच या योगात घराचे बांधकाम काढताना किंवा गृहप्रवेश करताना वा विवाह ठरवताना या सगळ्या बाबींचाही विचार करणे गरजेचे आहे.
ज्यांच्या कुंडलीत गुरू प्रतिकूल किंवा प्रभावहीन आहे त्यांनी या मुहूर्तावर पिवळ्या रंगाची डाळ,हळद,सोने आदी वस्तूंचे दान दिले पाहिजे.
काही लोक या वेळी कल्याण हेतूने व गुरूकृपा प्राप्त करण्यासाठी धार्मिक यात्रा करून तेथे खाद्यपदार्थ व वस्त्रांचे दान करतात.काही जण धार्मिक अनुष्ठाने करून,ब्राह्मणभोजन घालूनही पुण्य मिळवतात.
नशीब बदलणारा,दारिद्र्य दूर करणारा आणि इच्छित फळ देणारा असा हा गुरूपुष्यामृत योग आहे.
आज आपण या गुरुपुष्यामृत योगाबद्दल थोडक्यात महत्व जाणून घेणार आहोत.
गुरुपुष्यामृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्यामृत योग्य असतो.हा शुभ दिवस मानल्या जातो.या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा संबोधल्या जाते.या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे.या दिवशी कुठलेही काम केल्यास सफलता प्राप्त होते.या दिवशी माता लक्ष्मी ची पूजा केली जाते.
सर्व सामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो.
या गुरुपुष्यामृत योगामध्ये केलेले जप,तप,ध्यान, दान धर्म फार मोठे फळ देणारे असतात.
जर आपणास नेहमी कुठल्याही कार्यात अपयश येत असेल जसे की नौकरी,व्यवसाय,घरातील काही कार्य,काही बंद झालेले कार्य सुरु
करायचे असेल तर आपणास गुरुपुष्यामृत योग हा लाभदायक ठरू शकतो.
गुरुपुष्यामृत योग हा फार कमी वेळा येतो कारण की जेव्हाही गुरुवारी पुष्य नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा बनत असतो.
या शुभ मुहूर्तावर आपण सोने-चांदी खरेदी,नवीन घर,घराचे बांधकाम,वाहन घेणे हे कार्य करू शकता.
गुरुवारी कुठले ही शुभ कार्य करणे फार चांगले असते आपल्याला कुठल्याही कार्यात यश हे मिळू शकते.
जेव्हा गुरुवार व पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा अत्यंत शुभ फल देणारा अमृत योग तयार होतो आपण या दिवसाचा फायदा घेऊ शकतो.
आपणास लग्नाचा बस्ता फाडायचा आहे तर हा चांगला योग आहे.
एखादा व्यक्ती साधक असेल तर त्याच्या करीता देखील हा चांगला दिवस असतो.ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रसन्न करण्याचा दिवस.
ज्यांना या गुरुपुष्यामृत योग बद्दल माहिती आहे असे जाणकार ह्या दिवशी माता महालक्ष्मी ची साधना करतात.
या दिवशी कुठली ही साधना केल्यास चांगले फळ प्राप्त होतात.
याच गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्ता वर जाणकार माता महालक्ष्मीचे आवाहन करतात व सुख व समृद्धी प्राप्त करतात.
कोणीही व्यक्ती आपल्या उद्देशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास गुरुपुष्यामृत योगला आपल्या इष्ट देवाची पूजा,अर्चना व प्रार्थना केल्यास त्याला नक्कीच त्याच्या कार्यात व उद्देशात यश मिळते.
गुरुपुष्यामृत योग हा पूजा-अर्चना,मंत्र सिद्धि,तंत्र सिद्धि,यंत्र सिद्धि, साधना व संकल्प या करता उत्तम व यश देणारा आहे.
गुरुपुष्यामृत योगामुळे यश वृद्धिंगत होते.
नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगात ही अडचण दूर होऊ शकते.
गुरुपुष्य योगात करण्यात आलेले सोपे उपाय
Gurupushyamrut Yogache Mahatva
गुरूपुष्य नक्षत्रा मध्ये करा हे उपाय :-
१) मोती शंख :-
हा एक दुर्लभ प्रजातीचा शंख आहे. तंत्र शास्त्रानुसार हा शंख अत्यंत चमत्कारिक असतो. दिसायला खूपच सुंदर आणि चमक पांढर्या मोत्यासारखी असते.
◆ गुरुपुष्य योगामध्ये मोती शंख कारखान्यात स्थापित केल्यास आर्थिक उन्नती होते.
◆ मोती शंखामध्ये पाणी भरून लक्ष्मीच्या मूर्तीजवळ किंवा प्रतीमेजवळ ठेवल्यास लक्ष्मी प्रसन्न होते.
◆ मोती शंखाची घरामध्ये स्थापना करून दररोज श्री महालक्ष्मै नम: मंत्राचा दररोज ११ वेळेस जप करून १-१ तांदुळाचा दान यामध्ये टाकत राहा. ११ दिवस अशाप्रकारे जोप केल्यास आर्थिक अडचणी समाप्त होतील.
◆ जर व्यापारात नुकसान होत असेल किंवा दुकानातील उत्पन्न वाढत नसेल तर एक मोती शंख धनस्थानावर ठेवल्याने व्यापारात वृद्धी होईल.इतर उपाय :-
१) गुरुवारी संध्याकाळी लक्ष्मीची विधीनुसार पूजा करावी नंतर लक्ष्मीच्या चरणात सात कौड्या ठेवाव्या.अर्ध्या रात्री नंतर या कौड्यांना घरातील एखाद्या कोपर्यात खणून द्या. हा उपाय केल्याने धनाशी निगडित सर्व समस्या दूर होतात.
२) गुरु पुष्याच्या रात्री अंघोळ करून पिवळी धोती धारण करावी आणि एका आसनावर उत्तरेकडे तोंड करून बसावे. आता आपल्या समोर सिद्ध लक्ष्मी यंत्राला स्थापित करावे, जे विष्णू मंत्राने सिद्ध असेल आणि स्फटिक माळेच्या खाली लिहिलेल्या मंत्राचे २१ माळेचा जप करावा. मंत्र जप करताना मध्ये उठायचे नाही, मग साक्षात लक्ष्मी देखील तुमच्यासमोत आली तरी चालेल.
मंत्र – ऊं श्रीं ह्रीं श्रीं ऐं ह्रीं श्रीं फट्
या उपायाला विधिपूर्वक संपन्न केल्याने लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन जाते.
३) जुने चांदीचे नाणे आणि रुपयांसोबत कौडी ठेवून त्याची केशर आणि हळदीने पूजा करावी. पूजेनंतर त्यांना तिजोरीत ठेवावे. या उपायामुळे तुमच्या तिजोरीत बरकत कायम राहील.
४) गुरु पुष्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान इत्यादी कार्य आटपून लक्ष्मी मंदिरात जायला पाहिजे आणि देवीला कमळाचे फूल अर्पित करून पांढर्या रंगाच्या मिठाईचा प्रसाद द्यावा. लक्ष्मीसमोर धन संबंधी अडचणींना दूर करण्यासाठी प्रार्थना करावी. काही दिवसांत तुमच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळेल.
५) गुरु पुष्याला दक्षिणावर्ती शंखात पाणी भरून विष्णूचे अभिषेक करावे.हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
६) गुरुवारी संध्याकाळी घरातील ईशान्य कोपर्यात गायीच्या तुपाचा दिवा लावावा.वात कापसाची न लावता लाल रंगाच्या दोर्याची लावावी, तसेच दिव्यात थोडे केशर घालावे. हा प्रयोग केल्याने लवकरच धन प्राप्ती होते.
गुरुपुष्यामृत योग हा सणां एवढाच महत्त्वाचा योग मानतात
Gurupushyamrut Yogache Mahatva
गुरुपुष्यामृत योग म्हणजेच गुरू पुष्यनक्षत्र योग.हिंदुस्थानी संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग म्हणून ओळखला जातो.
या दिवशी मग गुरुमंत्र किंवा आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करून आध्यात्मिक रितीरिवाज पार पाडले जातात.या मुहूर्तावर ही कार्ये केल्यास त्यात लाभ होतो असं म्हटलं जातं.
गुरुपुष्यामृत योगात आपण
खाली दिलेली कामे करू शकता :-
१) आपणास लग्नाचा बस्ता फाडायचा आहे तर हा चांगला योग आहे.
२) एखादा व्यक्ती साधक असेल तर त्याच्या करीता देखील हा चांगला दिवस असतो.ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रसन्न करण्याचा दिवस.
३) ज्यांना या गुरुपुष्यामृत योग बद्दल माहिती आहे असे जाणकार या दिवशी माता महालक्ष्मी ची साधना करतात.
या दिवशी कुठली ही साधना केल्यास चांगले फळ प्राप्त होतात.
४) याच गुरुपुष्यामृत योगाच्या मुहूर्ता वर जाणकार माता महालक्ष्मीचे आवाहन करतात व सुख व समृद्धी प्राप्त करतात.
५) कोणी ही व्यक्ती आपल्या उद्देशात व कार्यात यश मिळवायचे असल्यास गुरुपुष्यामृत योगला आपल्या इष्ट देवाची पूजा,अर्चना व प्रार्थना केल्यास त्याला नक्कीच त्याच्या कार्यात व उद्देशात यश मिळते.
६) गुरुपुष्यामृत योग हा पूजा-अर्चना,मंत्र सिद्धि, तंत्र सिद्धि, यंत्र सिद्धि, साधना व संकल्प या करता उत्तम व यश देणारा आहे.
गुरुपुष्यामृत योगामुळे यश वृद्धिंगत होते.
७) नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगात ही अडचण दूर होऊ शकते.
गुरुपुष्यामृत योगात आपण खाली दिलेले नवीन उपक्रम सुरू करू शकतो :-
१) दिवसातून किमान १५ मिनिटे मनन करायचं. त्याची सुरुवात गुरुपुष्यामृताच्या निमित्ताने करता येईल.मनन कसं करायचं याबाबत कोणत्या ही पुस्तकात किंवा नेटवर माहिती मिळवता येईल.
२) मन शांत असेल तर कोणताही विकार शरीराला शिवू शकणार नाही.त्यासाठी मन शांत करण्याचे व्यायाम गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सुरू करायचे.
३) सकारात्मक विचार तर नेहमीच करायचा. त्यासाठी कोणताही मुहूर्त पाहायची गरज नाही. नकारार्थी विचार कराल तर मन कलुषित होऊन त्रास होतो.त्यापेक्षा सगळ्यांबद्दल चांगलाच विचार मनात आणायचा.
४) आनंद मिळत नसतो.तो मानण्यात असतो. आपण आनंदात आहोत ही सवय लावून घ्या.? कीमान त्यासाठी तरी गुरुपुष्यामृताचा मुहूर्त फायद्याचा ठरेल.
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे