Site icon

Durga Saptashati

Durga saptsati

श्री

दुर्गा सप्तशती पाठ माहिती 

 

Durga Saptashati

देशभरात नवरात्रोत्सवाची मोठी धूम असते. मात्र, करोना संकटामुळे उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या असल्या, तरी भाविकांच्या मनातील उत्सवाचा उत्साह कमी झालेला नाही, असेच दिसून येत आहे. देवीच्या विविध श्लोक, मंत्र, पाठ यांमध्ये श्रीदुर्गा सप्तशती विशेष महत्त्वाचे मानले गेले आहे. अनेक भविक नवरात्रातील प्रत्येक दिवशी दुर्गा सप्तशती पठण करतात. नवरात्रात दुर्गा सप्तशती पठण करणे विशेष शुभ पुण्यफलदायक मानले गेले आहे. दुर्गा सप्तशती म्हणण्यासाठी किमान तीन तास लागतात. मात्र, धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही संपूर्ण दुर्गा सप्तशतीचे पठण करणे शक्य होत नाही. तेव्हा काळजी करू नये. यावर एक सोपा उपाय सांगितला गेला आहे, जेणेकरून संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य लाभू शकेल. नेमके काय करावे? जाणून घेऊया.

सांसारिक अडी अडचणीकरिता ही उपासना ताबडतोब लागू पडते. सांसारिक जीवनात येणाऱ्या समस्या ,आर्थिक प्रश्न ,भांडणे,कोर्ट कचेऱ्या तील दावे,या अनेक समस्यांवर ही उपासना रामबाण योजना आहे. या ग्रंथाच्या माध्यमातून आदिमाया जगदंबेची आराधना करणाऱ्या साधकाचे अनेक प्रकारे कल्याण होते. त्याला ग्रहपीडा ,भूत बाधा ,दु:स्वप्न वन्य पशू इ.पासून कसलाही उपद्रव न होता तो साधक धन धान्य संपन्न होवून अंती मोक्षाचा अधिकारी बनतो. सर्व मंगल घडविण्याची शक्ती या दुर्गा सप्तशती पाठात उपासनेत आहे

दुर्गा सप्तशतीमध्ये देवीच्या उपासनेसाठी सर्व मंत्र, स्तोत्रं आणि साधना पद्धती सांगितल्या आहेत. परंतु सर्वात मान्यताप्राप्त आणि अचुक स्तोत्रं म्हणजे दुर्गा सप्तशती. मार्कंडेय ऋषींनी त्याची रचना केली होती. यातील प्रत्येक श्लोक हा एक महान मंत्र आहे. नियम जाणून घेतल्याशिवाय दुर्गा सप्तशती वाचू नये, असे सांगितले जाते.

दुर्गा सप्तशतीचे 13 अध्याय आहेत. त्यात एकूण 700 श्लोक आहेत. हे 700 श्लोक तीन भागात विभागलेले आहेत – पहिले अक्षर, मधले वर्ण आणि सर्वोत्तम वर्ण. दुर्गा सप्तशती पाठाच्या श्लोकांचा नक्कीच परिणाम होतो. वास्तविक सप्तशतीमध्ये शक्ती प्राप्त करण्याचे आणि वापरण्याचे एक अद्भुत शास्त्र आहे. दुर्गा सप्तशतीचे पठण केल्याने सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते असे म्हटले जाते.
दुर्गा सप्तशतीचे मंत्र जप नियम
प्रथम आपल्या इच्छेनुसार मंत्र निवडा. नवरात्रीमध्ये मंत्रजप सुरू करा. दररोज किमान तीन वेळा मंत्राचा जप करावा आणि नऊ दिवस मंत्राचा सतत जप करावा. सप्तशतीच्या पाठापूर्वी उत्कीलन मंत्राचा जप करावा. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही उत्कीलन मंत्रानंतर कवच, अर्गल आणि किलक पाठ करू शकता. सप्तशतीचे पूर्ण फळ मिळविण्यासाठी लाल वस्त्र परिधान करून पठण करावे. उपवास ठेवलात तर अजून बरे होईल. लाल चंदन किंवा रुद्राक्षाच्या माळाने मंत्राचा जप करावा.

Durga Saptashati

कधी करू शकतो सप्तशतीचे पठण?

सप्तशतीचा पाठ कधीही करू शकता, परंतु नवरात्रीच्या वेळी ते पाठ करणे चांगले आहे. देवीच्या समोर तुपाचा दिवा लावावा. त्यांना लाल फुले अर्पण करा. यानंतर नियमितपणे सप्तशती पाठ करा. जेवढे दिवस सप्तशती पाठ कराल तेवढे दिवस सात्त्विकता ठेवा.

या मुख्य मंत्रांनी संकटांपासून मुक्ती मिळेल
कल्याणकारी मंत्र

सर्व मंगलं मांगल्ये शिवे सर्वाथ साधिके ।
शरण्येत्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुऽते॥

सर्वविघ्ननाशक मंत्र

सर्वबाधा प्रशमनं त्रेलोक्याखिलेशवरी।
एवमेय त्वया कार्यमस्माद्वैरि विनाशनम् ॥

धन प्राप्तिसाठी मंत्र

सर्वाबाधा विनिर्मुक्तो धन धान्य सुतान्वितः।
मनुष्यों मत्प्रसादेन भविष्यति न संशय॥

 

।। श्री सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र ।।

ॐ अथ सप्तश्लोकी दुर्गा (सप्तशती)

शिव उवाच –

देवी त्वं भक्तसुलभे सर्वकार्यविधायिनी ।

कलौ हि कार्यसिद्ध्यर्थमुपायं त्रूहि यत्नतः ।।

देव्युवाच –

श्रृणु देव प्रवक्ष्यामि कलौ सर्वेष्टसाधनम् ।

मया तवैव स्नेहेनाप्यम्बास्तुतिः प्रकाश्यते ।।

ॐ अस्य श्री दुर्गा सप्तश्लोकी स्तोत्र मंत्रस्य

नारायण ऋषि: अनुष्टुप् छ्न्द:

श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वत्यो देवता:

श्री दुर्गा प्रीत्यर्थे सप्तश्लोकी दुर्गा पाठे विनियोग: ।

ॐ ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा

बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ।।१।।

दुर्गे स्मृता हरसिभीतिमशेष जन्तो:

स्वस्थै: स्मृता मति मतीव शुभां ददासि

दारिद्र्य दु:ख भय हारिणि का त्वदन्या

सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता ।।२।।

सर्व मङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके

शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते ।।३।।

शरणागत दीनार्त परित्राण परायणे

सर्वस्यार्ति हरे देवि नारायणि नमोऽस्तुते ।।४।।

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ति समन्विते

भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तुते ।।५।।

रोगान शेषा नपहंसि तुष्टा

रुष्टा तु कामान् सकलान भीष्टान् ।

त्वामाश्रितानां न विपन् नराणां

त्वामाश्रिता ह्या श्रयतां प्रयान्ति ।।६।।

सर्वा बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि

एकमेव त्वया कार्यमस्मद् वैरि विनाशनं ।।७।।

इति सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र सम्पूर्णा ।।

नवरात्र/घटस्थापना

Durga Saptashati

रविवार दि.१५|१०|२३ रोजी सुरू होत आहे व सोमवार दिनांक २३|१०|२३ रोजी संपतेय दि.२४ ला दसरा आहे.

नवरात्रीचे प्रकार. .कोणत्या दिवशी कसे सुरू करावेत .
▪️घटस्थापना दि.१५
▪️सप्तरात्रौत्सव दि.१७ पासून
▪️पंचरात्रौत्सव दि.१९ पासून
▪️त्रिरात्रौत्सव दि.२१ पासून
▪️एक रात्रौत्सव दि.२२ रोजी
▪️ललिता पंचमी दि. १९ रोजी
▪️घागरी फुंकणे दि.२१ ला आहे
▪️महा अष्टमीचा उपवास दि.२२ ला तर महा नवमीचा उपवास दि.२३ ला
▪️नवरात्र सांगता दि.२३ ला आहे /घट उठविणे. .

नवरात्रीची ४ प्रमुख अंगे आहेत
१) देवता स्थापन २) मालाबंधन
३) अखंड नंदादीप ४) कुमारीका पूजन.

Durga Saptashati

नवरात्र बसवल्यावर ज्या देवतेचे ‘नवरात्र ‘ असते त्या देवतेची पूजा करताना देवाचा / देवीचा टाक न हलवता फुलांनी किंचित पाणी शिंपडून,रोज फुले बदलून पुजा करावी मात्र इतर देव नेहमी प्रमाणेच ताम्हणात घेऊन दुधपाणी घालून रोजच्या सारखी पूजा करावी मात्र काही लोक नवरात्र बसविल्यावर
इतर देवांचीही पूजा करीत नाही – देव हलवित नाहीत हे शास्त्राला धरून नाही हा समज निव्वळ चुकीचा आहे.

प्रकृती खराब असेल – झेपणार नसेल तर वयोमानापरत्वे शक्य नसेल तेव्हा नवरात्र बसवितांना चा १ला दिवस व शेवटचा दिवस (उठता- बसता ) असे २ व नवमीचा १ असे ३ दिवस उपवास केला तरी चालतो किंवा फक्त अष्टमीचा ही करता येईल आणि नवमी स धान्य फराळ (भाजके अन्न ) करावा.

नवरात्रात “अखंड नंदादीप” लावला जातो त्यावर काजळी आल्यावर तो विझतो अगर वाऱ्याने, हवेने विझतो /मालवतो ते अशुभ नाही कुठलीही शंका न घेता दिव्याची वात स्वच्छ करून काजळी काढून वा बदलून तो परत लावावा ते आत १|२ कापराच्या वड्या बारीक करून टाकल्या तर काजळी येत नाही आणि वात मंद व शांत जळत राहील व प्रकाश ही स्वच्छ पडेल.

देवीस बाहेरून वस्तू आणून वाहतांना स्वच्छ करून वाहाव्यात ( जसे फुले,तुलसीपत्र, दुर्वा, इत्यादीं)

शक्यतो घरात तयार केलेलेच पदार्थ नैवैद्यास ठेवावे श्रध्देने- आत्मसमर्पणाने आनंदाने उत्सव साजरा करावा त्याचे चांगले फळ मिळते.

अष्टमीचे पूजनासाठी रात्रौ १२|| ते १|| ही वेळ घ्यावी कारण त्या आधी कधी कधी सप्तमी असू शकते.

दसरा (विजया दशमी ) हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने शुभ मानतात पण त्या दिवशी विवाह- वास्तू निक्षेप/शांती इ.शुभ कामे करू नयेत कारण अश्विन महिना हा त्यासाठी त्याज्य आहे मात्र वाहन खरेदी,घर खरेदी,कलशपूजन इ.करू शकता.

नवरात्र म्हणजे ९ दिवस असते असे नाही.

काळ्या मातीत सप्त धान्य हळदीच्या पाण्यात बुडवून पेरावेत घट बसविल्यावर रोज सुवासिक फुलांची माळ बाधांवी.

शक्यतो परान्न ( दुसऱ्याचे घरी) घेऊ नये.ब्रम्हचर्य पालन करावे पलंग,गादी,दाढी,कटींग वर्ज्य करावे.

नवरात्रात नवदुर्गा ९ आहेत त्याप्रमाणे रोज एकीचे पूजन केले जाते त्या अशा आहेत
१.शैलपुत्री २.ब्रह्मचारिणी ३.चंद्रघंटा ४. कुष्मांडा ५. स्कंदमाता ६.कात्यायनी ७. कालरात्री
८.महागौरी ९.सिद्धीधात्री

रोज एका कुमारीकेस वाढत्या वयाच्या क्रमाने बोलावून तिचे पाद्यपूजा, दुग्धपान, फलाहार, अल्पोपहार देऊन शेवटचे दिवशी जेवण – वस्त्र- अलंकार-उपयोगी वस्तू देऊन पुजन करून आशीर्वाद घ्यावेत.

स्कंद पुराणात वयानुसार कुमारिका पूजन त्याचे फळ सांगितले आहे देवी व्रतांमध्ये कुमारिका पूजन परमावश्यक आहे /असते.
१ वर्षाची कुमारीका.
फळ  मोक्ष व भोग प्राप्ती.
२ वर्षाची कुमारी.
फळ  ऐश्वर्य प्राप्ती
३ वर्षाची त्रिमूर्तीनी
फळ  धर्म, अर्थ, काम,मोक्ष
४ वर्षाची कल्याणी
फळ  राज्यपद प्राप्ती
५ वर्षाची रोहिणी
फळ  विद्या प्राप्ती
६ वर्षाची काली
फळ  षट्कर्म सिध्दी
७ वर्षाची चंडीका
फळ राज्य प्राप्ती
८ वर्षाची शांभवी
फळ  संपत्ती प्राप्ती
९ वर्षाची दुर्गा
फळ  पृथ्वी वरील राज्य
१० वर्षाची सुभद्रा
फळ  मने इच्छा प्राप्ती.

देवी भागवतात प्रत्येक वारी कोणता नैवैद्य दाखवावा ते सांगितले आहे ते असे
१ रविवारी ..पायस (खिर)
२ सोमवारी .. शुध्द तुप
३ मंगळवारी ..केळी
४ बुधवारी .. लोणी
५ गुरूवारी .. खडीसाखर
६ शुक्रवारी ..साखर
७ शनिवारी ..साजूक तुप.

बर्याच ठिकाणी सप्तशती पाठ करण्याची पध्दत आहे ते कोणत्या कार्यासाठी किती करावेत ते असे
▪️फल सिद्धी साठी .. १ पाठ
▪️उपद्रव शांती साठी .. ३ पाठ
▪️भयमुक्ती साठी ..७ पाठ
▪️यज्ञफल प्राप्ती साठी .९ पाठ
▪️राज्य प्राप्ती साठी . ११ पाठ
▪️कार्य सिद्धी साठी .. १२ पाठ
▪️सुख संपत्ती साठी ..१५ पाठ
▪️बंध मुक्ती साठी .. २५ पाठ
▪️प्रियव्यक्ती प्राप्ती .. १८ पाठ
▪️अनिष्ट ग्रह निवारण .. २० पाठ
▪️शत्रू, राजा,रोग,भय .. १७ पाठ
▪️पुत्र ,धन प्राप्ती साठी ..१६ पाठ
▪️एखाद्याला वश करणे .. १४ पाठ
▪️सामान्यतः सर्व प्रकारच्या
शांती साठी ..५ पाठ

नवरात्रात कोणते रंग परिधान करावेत याला धर्मशास्त्रात कुठलाही आधार नाही व उल्लेखही नाह
कारखानदार,दुकानदार,मिडीयावाले यांचे हे जाहिरातीचे फंडे आहेत तरीही स्री भावनांचा आदर म्हणून तसे रंग देत आहे
रविवार . केशरी ,अबोली
सोमवार .. पांढरा
मंगळवार.. लाल, डाळिंबी
बुधवार . निळा, आकाशी
गुरूवार .. पिवळा
शुक्रवार . हिरवा,पिस्ता, शेवाळी
शनीवार.जांभळा ,करडा (ग्रे )
रविवार .केशरी ,अबोली
सोमवार.मोरपंखी
मंगळवारी .गुलाबी

नवरात्र बसविल्यावर समजा घरात सुतक/ अशौच /वृध्दी आली तर सप्तशती पाठ थांबवून सुतक संपल्यानंतर राहिलेले पाठ पुर्ण करावेत मात्र नवरात्र उपवास चालू ठेवावेत व माळ/दिवा इत्यादी शेजारच्यांकडून अथवा ब्राम्हणाकडून, लांबचे नातेवाईकांकडून करावे आणि घरातील साहित्य वापरू नये.

नवरात्रीच्या आधीच असा प्रसंग आला तर मात्र १३ वा /१५वा झाल्यावर उरलेल्या दिवशी नवरात्र बसवता येईल जसे .७|५|३ व १ दिवसाचे बसवता येईल त्या नवरात्राला..सप्तरात्रौत्सव ( ७ दिवसांचे)..पंचरात्रौत्सव ( ५ दिवसांचे) त्रिरात्रौत्सव ( ३ दिवसांचे)
एक रात्रौत्सव (१ दिवसाचे) अशा पध्दतीने करता येईल तसे दिवस मोजून कसे बसवता येईल ते बघावे.

माहिती आवडली तर इतराना शेअर करा व आपल्या प्रतिक्रिया कळवा. कारण तुमची एक प्रतिक्रिया म्हणजे माझा उत्साह आहे

 

श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

Exit mobile version