Site icon

Ghatasthapana aani 9 colour

Ghatasthapana

Ghatasthapana

घटस्थापना/ नवरात्र

 

 

 

Ghatasthapana

आश्विन शु.१ ते अश्विन शु.९

शारदीय नवरात्र घट स्थापना विधी

श्री स्वामी स्तवन व एक माळ श्री स्वामी समर्थ जप

‘ॐ सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते l’

हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध व महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावावे.

खालील मंत्र चार वेळा तळहातावर पाणी घेवून प्यावे.

1.ॐ ऐं आत्मतत्वं शोधायामी नमः स्वाहा l

2. ॐ ह्रिं विद्यातत्वं शोधायामी नमः स्वाहा l

3.ॐ क्ली शिवतत्वं शोधायामी नमः स्वाहा l

4.ॐ ऐं ह्रीम ,क्लीम सर्वतत्वं शोधायामी नमः स्वाहा l

गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा

Ghatasthapana   

संकल्प

मी (अमुक) गोत्रात उत्पन्न ( अमुक) नावाचा/ नावाची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य ,विद्या ,ऐश्वर्य प्राप्तीसाठी ,वर्धनासाठी ,सर्व दुरीत उपशमनासाठी ,अशुभ शक्तिंचे भय उपद्रव निवारण्यासाठी ,आर्थिक सबलीकरणासाठी , अदित्यादी सकल ग्रह पिडा शांती साठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरू ची अखंड अचंचल अभेद्य भक्ती ,सेवा व संन्नीध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना ,अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती (संस्कृत /प्राकृत) ग्रंथाचे ( अमुक ) संख्येत पाठाचा संकल्प करीत आहे .

श्री गणपती अथर्वशीर्ष एक वेळा पठण करावे.

घटस्थापनेचा शुभ योग

शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीपूजन करण्याची परंपरा आहे. मात्र यात चित्रा नक्षत्र आणि वैधृती योग निषिद्ध मानले जातात. पंचांगानुसार, रविवार, १५ ऑक्टोबर २०२३ रोजी चित्रा नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी सुरू होईल आणि वैधृती योग सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी असेल. विशेष परिस्थितीत चित्रा नक्षत्र आणि वैधृती योग यांचे दोन चरण निघून गेल्यावर घटस्थापना करता येते.

घटस्थापनेचा शुभ मुहूर्त

रविवार १५ ऑक्टोबरला सकाळी चित्रा नक्षत्र आणि वैधृती योगाचे दोन चरण पूर्ण होतील. अशा स्थितीत घटस्थापनाही सकाळी करता येते. तसेच घटस्थापना अभिजीत मुहूर्तात करता येते. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ४४ मिनिटे ते १२ वाजून ३० मिनिटापर्यंत असेल. या काळात घटस्थापना करू शकता.

 

अखंड नवार्णव मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी.

1. घट स्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून एक पाट किंवा चौरंग ठेवावा . त्यावर लाल वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी.

2. एक वेळूची टोपली त्या पाट किंवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची मती ,गहू मिसळून भरावी.

3.त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल लोकरीचे नऊ वेढे देऊन ठेवावा. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा ,गंध ,अक्षता टाकाव्यात. विड्याची नऊ पाने व आंब्याचा डहाळा लावावा.

4. घटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे. घटावर एका तांब्याच्या ताटलीत अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावे.

5. खालील प्रमाणे कुलदेवी ची पूजा करावी

ॐ सर्व स्वरूपे सर्वेशे सर्व शक्ती समन्विते l
भयेभ्यस्त्राही नो देवी दुर्गे देवी नमोsस्तुते l l

म्हणून टाकास नमस्कार करणे.

देवीच्या टाकावर 16/1 वेळा श्री सुक्त म्हणून अभिषेक करावा.
घटावर विड्याची दोन पाने पूर्वेकडे देठ करून ठेवावी ,त्यावर देवीचा टाक झोपून ठेवावा.

टाकाची पंचोपचारे पूजा करावी

ध्यान

नमो दैव्यै , महादैव्यै शिवायै सततं नमः l
नमः प्रकृत्यै , भद्रायै , नियता: प्रणता: स्मताम l l
श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः l l
ध्यायम ध्यायामि l नमस्काराणी समर्पयामि l l

Ghatasthapana

पंचोपचार पूजा

1 श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः l l
विलेपनार्थे चंदनं समर्पयामि l l
अलंकारार्थे अक्षताम समर्पयामि l l
हरिद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्याणी समर्पयामि l l
( गंध लावावे , अक्षता वहाव्यात, व हळद कुंकू वहावे)

2. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः l
ऋतूकालोद्भव पुष्पम समर्पयामि l l
(फुले वाहवित)

3. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः l
धूपं आघ्रापयामी l l
(धूप ओवाळणे)

4. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः l दीपं दर्शयामी l l
(दीप ओवळणे)

5. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्यै नमः l
नैव्येद्यं समर्पयामि l l
(कोणत्याही गोड पदार्थाचा नैवद्य दाखवावा)

पूजे नंतर १ माळ घटावर खालील मंत्राने बांधावी.

ॐ मां माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी l चतुर्वर्ग त्वयि न्यस्तं स्तन्माने सिध्दीदा भव l l

पहिल्या दिवशी..विड्याच्या पानाची माळ बांधावी आरती करावी.

रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करावी घटास माळ चढवावी. व आरती करावी.

नऊ दिवसात सर्व कुटुंबीयांनी मिळून 14 किंवा 28 पाठ दुर्गा सप्तशती संस्कृत/प्राकृत ग्रंथाचे वाचन करावे.

कुलाचारप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा करावा.
अष्टमी किंवा नवमी ला परंपरे प्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेविचा टाक घटावरून उचलावा. त्यांची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्री सुक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करावे. त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावे.पुरणाच्या 21 दिव्यांनी महा आरती करावी

नवमीच्या दिवशी सायंकाळी आरती नंतर यथाशक्ती कुमारिका व सवाष्ण भोजन करवावे. व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा.

दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन स जाताना घट,टोपली प्रवाहात विसर्जन करावी. मातीवर आलेले धान्य , आपट्याच्या पानासमावेत श्री स्वामी समर्थ महाराजांना , कुलदेवी ला ,कुलदैवत, व घरातील ज्येष्ठांना द्यावेत.प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत. व पुरुषांनी टोपिखाली किंवा कानावर धारण करावेत.

घटाची माती आपल्या क्षेत्रात अथवा पवित्र ठिकाणी विसर्जित करावी.

🙏 श्री स्वामी समर्थ🙏

★ नवरात्री घटमाळा ★
१ ला दिवस – विडयाची पाने
रविवार – लाल जास्वंद
सोमवार – बेल, निळा धोतरा,रुई
मंगळवार – दुर्वा, झेंडु
बुधवार – मोगरा, जाई-जुई
गुरुवार – तुळशी
शुक्रवार – गुलाब, कमळ
शनिवार – शेवंती, कृष्णकमळ
९वी माळ – लिंबु

★ नवरात्री नैवद्य ★
नवरात्रात प्रत्येक वारी कोणते नैवेद्य देवीस दाखवावे ते देवी भागवतात सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे:-
रविवारी – पायस (खीर)
सोमवारी – गायीचे तूप
मंगळवारी – केळी
बुधवारी – लोणी
गुरुवारी – खडीसाखर
शुक्रवारी – साखर
शनिवारी – गायीचे तूप.

★ नवरात्रात प्रामुख्याने करायची सेवा ★

दुर्गा सप्तशती पाठ / श्रीसूक्त
दुर्गास्तोत्र / महालक्ष्मी अष्टक / कनकधारा स्तोत्र / रामरक्षा / देव्यपराध स्तोत्र / शुलिनीदुर्गा सुमुखी स्तोत्र इत्यादी स्तोत्रांचे यथाशक्ती पठण करावे.

 

 

नवरात्री नऊ दिवसाचे नऊ रंग कोणते जाणून घ्या

 

Ghatasthapana

नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपीत स्वरूपात साजरे होतात. तर चैत्र आणि शारदिय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू

हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित *.

१५ ऑक्टोबर रविवार- नारंगी रंग

केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते. हा रंग सकारात्मक उर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो.

६ ऑक्टोबर सोमवार- पांढरा रंग

पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो. देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे. पांढरा रंग शांतता * सुरक्षिततेची भावना देतो.

१७ ऑक्टोबर मंगळवार- लाल रंग

मंगळवारी नवरात्रोत्सवासाठी लाल रंग वापरा. लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे खूप लोकप्रिय आहे. हा रंग भक्तांमध्ये शक्ती आणि चैतन्य भरतो.

१८ ऑक्टोबर बुधवार- गडद निळा रंग

बुधवारी नवरात्रोत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग सुख समृद्धी आणि शांतता *.

१९ ऑक्टोबर गुरुवार- पिवळा रंग

नवरात्रोत्सवात गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते. हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो.

२० ऑक्टोबर शुक्रवार- हिरवा रंग

हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो. शुक्रवारी हिरवा रंग वापरा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करा. हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो.

२१ ऑक्टोबर शनिवार- राखाडी रंग

राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो.

२२ ऑक्टोबर रविवार- जांभळा रंग

जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख-समृद्धी मिळते. त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घालावेत.

२३ ऑक्टोबर सोमवार- मोरपंखी रंग

मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या या विशेष मिश्रणाचा वापर केल्यास, दोन्ही रंगांच्या गुणांचा म्हणजेच समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळतो.

अंबे जय जगदंबे

 

श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

Exit mobile version