
1) विष्णुसहस्त्रनाम स्तोत्र किंवा नामावली
vishnu sahatranam stotra:
फलश्रुती :- राहू, पितृदोष, चांडाळ योग, करणी बाधा, कुंडली दोष निवारणार्थ.
सुरक्षा कवच, आयुरारोग्य व धनसंपत्ती प्राप्ती हेतू.
संख्या :- किमान 1 वेळा.
वेळ :- रोज सकाळी आणि संध्याकाळी
किंवा
कोणत्याही एक निश्चित समयी.
कालावधी :- 25 ते 35 मिनिटे.
2) महामृत्युंजय मंत्र
फलश्रुती :- अपमृत्यू योग निवारणार्थ व मृत्यू पश्चात मोक्षप्राप्ती हेतू.
संख्या :- 108 वेळा.
वेळ :- रोज सकाळी किंवा संध्याकाळी. कोणत्याही एक निश्चित समयी.
कालावधी :- जवळपास अर्धा तास.
3) कुलस्वामिनी सेवा
फलश्रुती :-
समस्त दोष व समस्त बाधा निवारणार्थ आणि सुरक्षा कवच व कृपा प्रसाद प्राप्ती हेतू.
कालावधी :- जन्मभर.
4) श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ अखंड नामस्मरण
फलश्रुती :-
समस्त जन्मांचे पाप क्षालन,
सर्व प्रकारे सुरक्षा कवच प्राप्ती हेतू, समस्त बळप्रदायक, सर्व प्रकारचे दोष व बाधा निवरणार्थ.
कालावधी :- जन्मभर.
5) श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
फलश्रुती :-
सर्व प्रकारे सुरक्षा कवच प्राप्ती व मनोवांच्छित मंगल कामना प्राप्ती हेतू, समस्त बळप्रदायक, सर्व प्रकारचे दोष व समस्त बाधा निवरणार्थ.
संख्या :- 11 वेळा.
वेळ :- रोज सकाळी आणि संध्याकाळी
किंवा
कोणत्याही एक निश्चित समयी.
कालावधी :- 10 ते 12 मिनिटे
6) कालभैरव अष्टक
फलश्रुती :-
पितृदोष, करणी बाधा व शत्रूपीडा निवारणार्थ,
सुरक्षा कवच व मोक्षप्राप्ती हेतू.
संख्या :- किमान 1 किंवा 3 किंवा जास्तीत जास्त 11 वेळा.
(कोणतीही 1 संख्या निश्चित करून, त्यानुसार ठरवून निश्चित केलेल्या संख्येनूसारच रोज पठण करणे.)
वेळ :- रात्री 10 नंतर.
कालावधी :- 10 ते 15 मिनिटे.
7) दुर्गा स्तोत्र आणि श्री महालक्ष्मी स्तोत्र
फलश्रुती :-
धनप्राप्ती, स्थिर व अचल संपत्ती हेतू.
संख्या :- दररोज किमान 1वेळा.
वेळ :- संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी.
कालावधी :- अनुक्रमे 3 मिनटे व 2 मिनिटे.
8) रामरक्षा स्तोत्र व हनुमान चालीसा, भीमरूपी स्तोत्र
फलश्रुती :-
करणीबाधा व कुंडली दोष निवारणार्थ,
सर्व प्रकारे रक्षण, सुरक्षा कवच व कृपा प्राप्ती हेतू.
संख्या :–
1.भीमरूपी स्तोत्र :- 1 वेळा
2. रामरक्षा स्तोत्र :- 1 किंवा 11 वेळा
3. हनुमान चालीसा :- 1 किंवा 11 वेळा
(कोणतीही 1 संख्या निश्चित करून, त्यानुसार ठरवून निश्चित केलेल्या संख्येनूसारच रोज पठण करणे.)
वेळ :- रोज कोणतीही एकच ठरवून निश्चित केलेली.
कालावधी :- अनुक्रमे 5 मिनिटे, 5 मिनिटे, 2 मिनटे.
9) पितृसेवा
फलश्रुती :–
पितृशांती, पितरांना सदगती व मोक्षप्राप्ती, पितृकृपा प्राप्ती,
समस्त प्रकारचे शत्रू व करणीबाधा यांपासून सुरक्षा कवच प्राप्ती हेतू.
1. दैनिक पितृसेवा(बाह्यशांती सूक्त, पितृस्तोत्र, पितृस्तुती, पितृ अष्टक यांचे वाचन),
2. पितृशांती साठी ll ॐ नमो भगवते वासुदेवायll या मंत्राचा रोज जाप,
3. वार्षिक व तीर्थक्षेत्री केलेले श्राद्धकर्म,
4. पिंपळ वृक्षाची सेवा,
5. कावळ्याला घास,
6. पितरांच्या नावाने केलेले सत्पात्री व गुप्तदान.
7. दिव्य ग्रंथाची परायाणे.
वेळ :- पहाटे पासून दुपारी 12 पर्यंत,
किंवा, आणि
सूर्यास्त नंतर.
.कालावधी :- जन्मभर
टीप :-1. पिता व पती जिवंत असल्यास,
पिंडदान व तर्पण
हे विधी सोडून, त्याव्यतिरिक्त इतर सर्व उपासना /सेवा / श्राद्धकर्म सर्वजण करू शकतात.
2. पितरांना केवळ सात्विक व शाकाहारी अन्नाचा नैवेद्य अर्पण करणे.
मांसाहारी पदार्थ, मसालेदार, तिखट, लसूण, कांदा वर्ज्य आहे.
10) संक्षिप्त गुरुचरित्र
(संपूर्ण श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे संक्षिप्त रूप)
फलश्रुती :-सुरुवात करताना प्रथम दिवशी इच्छित संकल्प घेऊन सुरुवात केल्यास मनोवांच्छित फलप्राप्ती.
तसेच, सर्व प्रकरच्या शत्रूबाधा, करणी बाधा यांपासून सुरक्षा कवच प्राप्ती.
संख्या :- दररोज 1 वेळा किंवा दर गुरुवारी.
वेळ :- दुपारी 12 ते 12.30 ची वेळ सोडून, त्याव्यतिरिक्त ठरवून निश्चित केलेली कोणतीही एक वेळ.
कालावधी :- अर्धा तास.
11) 52 श्लोकी श्रीगुरुचरित्र
फलश्रुती :-
सुरुवात करताना प्रथम दिवशी इच्छित संकल्प घेऊन सुरुवात केल्यास मनोवांच्छित फलप्राप्ती.
संख्या :–
प्रकार 1.
दररोज 1 वेळा किंवा दर गुरुवारी.
कालावधी :- 5 मिनिटे.
प्रकार 2:-
52 गुरुवार होईपर्यंत प्रत्येक गुरुवारी 52 वेळा.
(या उपायात अशक्य ते शक्य करण्याची ताकत आहे. 52 वा गुरुवार होण्यापूर्वी संकल्प मध्ये केलेली इच्छा निश्चित पूर्ण होते.
कालावधी :- 4 ते 5 तास.
वेळ :- दुपारी 12 ते 12.30 ची वेळ सोडून, त्याव्यतिरिक्त ठरवून निश्चित केलेली कोणतीही एक वेळ.
12) दिव्य ग्रंथाची पारायणे :-
उदाहरणार्थ :-1. श्रीगुरुचरित्र.
2. नवनाथ भक्तीसार.
3. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत.
4. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत.
5. गजानन विजय ग्रंथ.
6. शिवलीलामृत.
7. भागवत महापुराण.
8. सुलभ भागवत. (भागवत महापुराण या ग्रंथाचे संक्षिप्त रूप)
9. दत्त महात्म्य.
10. श्रीदत्त महापुराण.
11. विष्णू पुराण.
12. हरी विजय.
13. सुंदरकांड.
14. दुर्गासप्तशती.
फलश्रुती :- पूर्वसंचितातील समस्त पातके, महापातके दोष निवारणार्थ.
तसेच पितृदोष, वास्तू दोष, करणी बाधा, नजरदोष निवारणार्थ.
आणि
सकल सौभाग्य,
आयुरारोग्य,
पितृशांती व पितृ सौख्य,
समस्त भौतिक सौख्य,
वैवाहिक व संतान सौख्य,
धनसंपत्ती ऐश्वर्य यश कीर्ती मान सम्मान प्राप्ती हेतू, सर्व प्रकारचे आणि सर्व बाजूनी संरक्षण व सुरक्षा कवच प्राप्ती हेतू,
समस्त देवी देवता व कुलदैवत कृपा प्राप्ती हेतू.
टीप :- पारायण सुरु करण्याच्या प्रथमदिवशी इच्छित संकल्प घेतल्यास उत्तम.
संख्या :- दर महिन्याला, दर 3 महिन्यातून, दर 6 महिन्यातून, दर वर्षी.
वेळ :- दुपारी 12 ते 12.30 ची वेळ सोडून, त्याव्यतिरिक्त ठरवून निश्चित केलेली कोणतीही एक वेळ.
कालावधी :-
1. साप्ताहिक पारायण
2. तीन दिवसांचे पारायण
3. एक दिवसाचे पारायण
4. दहा दिवसाचे पारायण
( टीप :- दहा दिवसाचे पारायण खासकरून खूप मोठ्या ग्रंथा साठी केले जाते.
उदाहरणार्थ :- भागवत महापुराण.)
13) जागृत तीर्थक्षेत्री यात्रा
फलश्रुती :-
समबंधित तीर्थक्षेत्री असलेल्या जागृत दैवी शक्तीची कृपाशीर्वाद प्राप्ती,
पापक्षालन,
कुंडली दोष निवारणस मदत.
संख्या :-
दर महिन्यातून 1दा,
किंवा
दर 3 महिन्यातून एकदा,
किंवा
दर 6 महिन्यातून एकदा
किंवा
किमान दर वर्षी.
कालावधी :- जन्मभर.
14) तीर्थक्षेत्री गुप्तपणे केलेले दानधर्म
फलश्रुती :-
पूर्वसंचितातील समस्त पापांचे मोचन,
पुण्यफळ प्राप्ती.
कालावधी :- जन्मभर.
15) सत्पात्री गुप्तपणे केलेले दानधर्म
फलश्रुती :-
पूर्वसंचितातील समस्त पापांचे मोचन,
पुण्यफळ प्राप्ती,
पितरांची शांती.
केव्हा करावे :-
दररोज.
किंवा
प्रत्येक आठवड्यातून.
किंवा
प्रत्येक 15 दिवसातून.
किंवा
प्रत्येक महिन्याला.
कोणाला करावे :- गरीब, निर्धन, गरजू, असाहाय्य, अनाथ, लाचार, निराधार, वृद्ध, अधू, अपंग, अंध, आजारी, मानसिक किंवा शारीरिक किंवा आर्थिक दुर्बल व्यक्ती.
काय दान करावे :- जीवनावश्यक गोष्टी, अन्न, धान्य, औषधे, नवीन छत्री, नवीन चप्पल, योग्य किंवा नवीन कपडे, पैसे.
दान किती करावे :- यथाशक्ती.
कालावधी :- जन्मभर.
टीप :-
गुप्तदान किंवा गुप्त पणे केलेले दान म्हणजेच आपण जे दान करतो ते दान परमेश्वराचे नाव घेऊन, परमेश्वराच्या चरणी अर्पण करत आहे अशी भावना ठेवून, आपण आणि आपला परमेश्वर यांशिवाय अन्य कोणालाही कळून न देता केलेल्या दानास गुप्तदान किंवा गुप्त पणे केलेले दान असे म्हणतात.