Site icon

Vasubaras

गोवत्स द्वादशी (वसुबारस)

 

 

Vasubaras

(आश्विन कृष्ण ११, दि.९ नोव्हेंबर,२०२३)

या दिवशी सायंकाळी सवत्स गायीची वासरासह पूजा करावी. तिच्या पायावर अर्घ्य देवून,ओवाळून पंचोपचार पूजा करावी.नंतर तिला उडदाचे वडे व नैव्यद्य खावू घालावा.
या दिवसापासून दीपोत्सव सुरू होतो.त्यामुळे दारासमोर आकाश कंदील लावावा. दाराजवळ ,तुळशी जवळ रांगोळी काढावी. दिवे (पणत्या)लावावेत.भारतीय संस्कृतीप्रमाणे गायीला फार महत्त्व आहे. तिला माताही म्हणतात. ती सात्त्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्त्विक गुणांचा स्वीकार करावा, असे म्हटले जाते. सत्त्वगुणी, म्हणजेच आपल्या सहवासाने दुसर्‍याला पावन करणार्‍या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणार्‍या, आपले अंग-प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणार्‍या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणार्‍या, शेतीला उपयुक्‍त अशा बैलांना जन्म देणार्‍या गोमातेचे या दिवशी पूजन करतात. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण, संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्‍ती, तो समाज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही, असे सांगितले जाते. अशा गोमातेचे प्रथम तिच्या वत्सासहित पूजन करून दीपोत्सवाला सुरुवात होते.

 

आज वसुबारस

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो

वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. या सणाविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

वसुबारस (गोवत्स द्वादशी)

श्री विष्णूच्या आपतत्त्वात्मक लहरी कार्यरत होऊन ब्रह्मांडात येण्याचा दिवस म्हणजे वसुबारस

! या दिवशी विष्णुलोकातील वासवदत्ता नामक कामधेनु या लहरींचे वहन ब्रह्मांडापर्यंत करण्यासाठी अविरत कार्य करते. या दिवशी या कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते.
या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते. यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. बारस म्हणजे एखाद्या गोष्टीत नवीन चैतन्यबीजाची निर्मिती होणे. हेच देवत्व तिच्या ठायी कायमस्वरूपी विष्णूरूप पाहून जिवाने टिकवायचे असते आणि तिच्यातून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्यलहरींचा लाभ उठवायचा असतो.
तिथी : आश्विन वद्य द्वादशी
इतिहास : समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या, अशी कथा आहे. त्यातल्या नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हे व्रत आहे.
उद्देश : या व पुढील अनेक जन्मांतील कामना पूर्ण व्हाव्यात आणि पूजा करत असलेल्या गायीच्या शरीरावर जितके केस आहेत, तितकी वर्षे स्वर्गात रहायला मिळावे.
सण साजरा करण्याची पद्धत : या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सकाळी अथवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात

Vasubaras

गोवत्सद्वादशी वसुबारस

 

कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो.
या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.
ज्यांच्याकडेघरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात.
घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
काही ठिकाणी या दिवशी कामधेनूचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून अंगणात तुळशीवृंदावनाशी धेनु म्हणजेच गाय उभी करून तिचे प्रतिकात्मक रूपात पूजन केले जाते. या दिवशी आपल्या अंगणातील गाईला वासवदत्तेचे स्वरूप प्राप्त होते, म्हणजेच तिचे एकप्रकारे बारसे होऊन तिला देवत्व प्राप्त होते.
यासाठीच या दिवसाला वसुबारस असे म्हणतात. एका अर्थाने दुध-दुपत्यासाठी होणारा गायीचा उपयोग शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत ह्या गोष्टी लक्षांत घेऊन त्या गोधनाची केलेलीही कृतज्ञता पूजा होय.

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला।
स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया॥
परमपुज्य जी वंद्य या भारताला।
नमस्कार त्या दिव्य गो देवतेला॥

गायीचे मानवी जीवनातले स्थान अनन्यसाधारण आहे . अनादिकालापासून मनुष्यप्राणी शेती करून जगतो आहे . जगात जिथे जिथे म्हणून सुसंस्कृत लोकांनी वस्ती केली तिथे तिथे त्यांनी शिकारीवर गुजराण करणे बंद करुन शेतीवर पोट भरावयास सुरुवात केली . बाल्यावस्थेपासून मानवास गोमाताच दूध देई व शेतीची सर्व अवजड कामे करणाऱ्या बलवान बैलांची जननी देखील गोमाताच !अशा रितीने सर्व जगाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे पोसणारी गोमाता जी भारतीयांना परम वंदनीय आहे तिला पुजण्याचा आज दिवस !वसुबारस !केवळ गोपूजन पुरेसे नाही !गोरक्षण , गोसंगोपन , गोसंवर्धन , गोवंशशोधन ( वंश शुद्धी जपणे ) व गोसंशोधन या सर्व आघाड्या आपल्याला सांभाळायच्या आहेत . अखिल मानवजातीला पोसणाऱ्या गायीचा शत्रू हा अखिल मानवतेचाच शत्रू आहे हे जाणून वागले पाहिजे

शुभ दीपावली..

आपली हिन्दूधर्म संस्कृती

Vasubaras

आपणास व आपणा सर्वांच्या परीवारास आज पासून सुरू होणाऱ्या दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त माझ्याकडून अनेक हार्दिक शुभेच्छा

|| शुभ दिपावली ||

९ नोव्हेंबर पासून दीपावली ला सुरुवात होत आहे.
सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.. !!!!!
९ नोव्हेंबर २०२३- वसुबारस !
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास
लाभो !
१० नोव्हेंबर २०२३- धनत्रयोदशी !
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत !
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो !
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो !
१२ नोव्हेंबर २३- नरकचतुर्दशी !
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा !
अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ
आपल्याला लाभो !!
आपल्याकडून नेहमी सत्कर्म
घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !!
१२ नोव्हेंबर २०२३- लक्ष्मीपूजन !
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा !
नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त
होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य
आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न !
१४ नोव्हेंबर २०२३- पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे
आशीर्वाद आपल्याला मिळत राहो !
१५ नोव्हेंबर२०२३- भाऊबीज !
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट
राहू दे !
ही दीपावली आपणास आणि आपल्या कुटुंबास
आंनदाची आणि भरभराटिची जावो

Vasubaras

वसुबारस

गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो.. वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात..

भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे.. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात.. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते. पुष्कळ स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात..

आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा असते.

आश्विन वद्य द्वादशी ही गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून प्रसिध्द आहे. या दिवशी गायीची पाडसा सह पूजा केली जाते.

पूजेचे साहित्य :- हळद, कुंकू, फुले अक्षता, निरांजन, नैवेद्यासाठी उडदाचे वडे इत्यादी. घरातील सवाष्ण महिला गायीच्या पावलावर (पायांवर) पाणी घालून दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचारे पूजा करतात..पायावर अर्घ्य देऊन , तिला ओवाळून पूजा करावी. त्या वेळी खरीपाचे पीक तयार झालेले असते, त्याचा गोड घास खायला घालतात..

प्राचीन काळापासून हिंदू समाज गायीला पवित्र मानत आलेला आहे. गायीच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात, असे मानले जाते. तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. भगवान श्रीकृष्णांनी तर स्वत:ला गोपाल म्हणवून घेतले. आपण अनेक प्रसंगी दान करत असतो, त्यात गो दान हे सर्वश्रेठ दान मानले आहे..

“ज्याचे घरी गाय, तेथे विठ्ठलाचे पाय” असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूने या दिवशी सवत्स धेनुची पूजा करतात. वसु म्हणजे द्रव्य (धन). त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी ऊपवास करतात. ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत, त्यांचेकडे या दिवशी पुरणाच्या नैवेद्याचा स्वयंपाक करतात. या दिवशी गहू व मूग खाऊ नये. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारच्या शेंगांची भाजी यावर ऊपवास सोडतात. या दिवसापासून पणत्या लावायला सुरूवात करतात.

 

श्री स्वामी समर्थ

काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

Exit mobile version