श्रावण मास
shravanmasache mahatva
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे.. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा २३ जुले ते २२ ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो..
श्रावणाला हिंदीत सावन म्हणतात, संस्कृतमध्ये श्रावण आणि नभ(स्) असे कमीतकमी दोन शब्द आहेत.
श्रावणामध्ये पावसाच्या दोन जोरदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते. ते ज्याला सोसत नाही, ती व्यक्ती खरोखरच नाजूक असली पाहिजे. या श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे.
अधिक श्रावण.
साधारणपणे ८ किंवा ११ आणि क्वचित १९ वर्षांनी अधिक श्रावण येतो. त्या महिन्यात येणाऱ्या शुक्ल किंवा वद्य या दोन्ही एकादश्यांना कमला एकादशी हे नाव आहे. उत्तर हिंदुस्थानात या एकादश्यांना अनुक्रमे पद्मिनी आणि परम एकादशी म्हणतात. एकादश्या वगळल्या तर अधिक श्रावणात कोणतेही हिंदू सण किंवा व्रताचे दिवस येत नाहीत. ज्यावर्षी अधिक श्रावण असतो त्यावर्षी पाच महिन्यांचा चातुर्मास असतो. चातुर्मासात लग्ने होत नसल्याने ती अधिक श्रावणातही होत नाहीत.
अधिक श्रावण असलेली गेली आणि येणारी काही वर्षे : इसवी सन १९०१, १९०९, १९२०, १९२८, १९३९, १९४७, १९५८, १९६६, १९७७, १९८५, २००४ आणि २०२३, २०४२, २०६१ वगैरे.
सणांचा राजा..
श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैनधर्मीयांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.
श्रावण महिन्यातील सण.
श्रावण शुद्ध पंचमी- नागपंचमी..
या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे.
श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती असते..
श्रावण शुक्ल त्रयोदशी – नरहरी सोनार जयंती.
shravanmasache mahatva
श्रावण पौर्णिमा- रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा.
नारळी पौर्णिमा’ हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो..या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडित असलेल्या व्यवसायांतील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते. ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्याही मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात..
याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात.. ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री-पुरुष ती पोवती हातात बांधतात..
याच दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात. या विधीला श्रावणी असे नाव आहे..
श्रावणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही, श्रावणी हस्त नक्षत्रात चंद्र असताना ‘श्रावण शुक्ल पंचमी’ लाही असू शकते.. पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रावण पौर्णिमेला श्रावणी नक्कीच करत नाहीत. ऋग्वेद्यांची श्रावणी, यजुर्वेद्यांची श्रावणी, तैत्तिरीय शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्यकेशी उपशाखेच्या ब्राह्मणांची श्रावणी या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात..
श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते..
राखी पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्याच्या चंपावत जिह्यातल्या देईपुरी इलाख्यात बरही देवीला खुश करण्यासाठी गावातल्या दोन गटांत एकमेकांवर दगडफेक होते.. दगडफेकीत अनेकजण घायाळ होतात. २०१९ साली १२० लोक जखमी झाले होते. मात्र हायकोर्टाने दगडफेकीवर बंदी आणल्याने काही लोकांनी दगडांऐवजी सफरचंदे फेकून मारली..
श्रावण वद्य प्रतिपदा (मध्य प्रदेशातील भाद्रपद वद्य प्रतिपदा) : भुज(जा)रिया पर्व… राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भुजरिया पर्व असते. भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खेड्यांमध्ये हे धूमधडाक्यात साजरे होते. भुजरिया पर्वाची तयारी नागपंचमीपासून होते. या दिवशी घरांघरांत टोपल्यांमध्ये किंवा मातीच्या छोट्या कुंड्यांमध्ये माती भरून घरातले गव्हाचे बी पेरतात. अंकुर फुटल्यावर ती रोपे राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उपटून नदीच्या पाण्यात बुचकळून धुतात आणि एकमेकांना वाटतात. रोपांना कजलिया म्हणतात. गावातील वृद्ध माणसे कजलिया पाहून एक प्रकारे मातीचे आणि बियांचे परीक्षण करतात, व रोपे आणणाऱ्या मुलांना खाऊ देतात..
या निमित्ताने गावातले स्त्री-पुरुष टिमकी, ढोलक, झांजा, यांच्या तालावर नाचतात. स्त्रिया मंगलगीते गात गात नदीवर, जलाशयांवर जाऊन भुजारियांचे विसर्जन करतात..
श्रावण वद्य अष्टमी- श्रीकृष्ण जयंती/’कृष्ण जन्माष्टमी’
श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात, कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला.. या दिवशी भाविक स्त्रीपुरुष उपवास करतात व कृष्ण जन्माचा सोहळा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात..
पिठोरी अमावास्या/दर्भग्रहणी अमावास्या/ पोळा..
श्रावण महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे नाव आहे.. संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात. याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा नावाचा सण साजरा करतात. ]हा सण बैलांसंबंधी असून, या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात..
shravanmasache mahatva
व्रते
व्रत म्हणजे व्रतवैकल्ये! वैकल्यांचा अर्थ विकलता ! म्हणजे बारीक होणे. स्वार्थ व परमार्थ साधणारे हे व्रत आहे.
सोमवार.
श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.
मंगळवार.
नवविवाहित स्त्रिया श्रावणात दर मंगळवारी शिव मंगळागौरीची पूजा करतात… पहिली पाच वर्षे मंगळागौर केल्यानंतर, नंतरच्या एखाद्या वर्षी उद्यापन करतात. त्यावेळी आपल्या आईला वाण म्हणून सोन्याचा नाग देतात.
बुधवार
बुधाची पूजा
गुरुवार
बृहस्पती पूजा.
शुक्रवार
जिवती देवीचे पूजन, पुरणाच्या दिव्यांनी अपत्यांना ओवाळणे आणि हळदी-कुंकू करण्याचीही प्रथा आहे.
शनिवार
ब्रह्मचारी किंवा ब्राह्मण यांचे पूजन.
रविवार
आदित्य राणूबाई पूजन.
श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती महाराष्ट्रात प्रचलित झाली आहे.
दान
श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ब्राह्मणांना व गोरगरिबांना भोजन देतात. देवस्थानांतही या महिन्यात कथापुराणादी कार्यक्रम ठेवतात.
कावड नेणे
विचार पुष्प
shravanmasache mahatva :अवघड फक्त रस्ताच नसतो. जीवनात सुद्धा असेच रोज अवघड चढ उतार येत असतात. आपण फक्त मनाची रेस आणि जीवनाचा गियर बदलत संयमाने चालत राहायचं. आपले जीवन म्हणजे एक लहानसे कुरुक्षेत्रच आहे. प्रत्यक्ष रणांगणावरील लढाई जिंकणे तसं सोपं असतं, परंतु विकारांचा नायनाट करून, अहंकाराच्या मुसक्या बांधणे आणि शेवटी ईश्वराच्या चरणी त्याला बळी देणे, हे काही तितके सोपे नाही. कुरु क्षेत्रा वरील लढाई पेक्षा प्रत्यक्ष जीवनाची लढाई कठीण आहे .चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी, चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची शक्ती असते.
उत्तर भारतात विशेषतः बिहार मधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या शिवमंदिरात गंगेचे पाणी कावडीतून वाहून नेऊन शिवपिंडीला अभिषेक करण्याची परंपरा आहे.
घराबाहेर कोहळा का बांधतात ?
shravanmasache mahatva :आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळ बांधण्याची पद्धत आहे. काही काही ठिकाणी छोटीशी काळी बाहुली बांधण्याची पद्धत आहे. पण आपल्या घराबाहेर कोहळ बांधण्याचा काय फायदा आहे. कोहळ का बांधावा, याच्या बद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. आणि कोहळा बांधायचा असेल, तर त्याच्या काय पद्धती आहेत.
प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे पाहायला मिळते की, अनेक लोक आपल्या घराबाहेर कोहळा बांधतात. लाल कपड्यात जर कोहळ बांधला, तर घराला कोणाचीही नजर लागत नाही. जर आपल्या मुख्य दाराला बाहेरून कोहळा बांधलख, तर आपल्या घरात कोणतीही दृष्ट शक्ती येत नाही. आणि नजर दोषापासून आपल्या घराचं रक्षण होत असतं.
आपल्या घरातील लोकांना आयु व आरोग्य लाभावं म्हणून देखील पूर्वीपासून कोहळा बांधण्याची पद्धत आहे. बाहेरून कोहळ आणत असताना कधीही देटासकट आणावा. घरी आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवावा व स्वच्छ पुसावा.
त्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला ओम काढावा. तो गंधाने किंवा ओल्या कुंकवाने काढावा आणि खाली त्याच पद्धतीने स्वस्तिक काढावे, आणि मग त्या कोहळ्यावर काजळाने एखादी रेष ओढावी. मग ते कोहळा देवघरात नेऊन त्याची गंध अक्षता हळद कुंकू फुल यांनी पूजा करावी आणि देवाला प्रार्थना करावी की, आम्ही हा कोहळा घराबाहेर बांधत आहोत.
आपल्या घराला किंवा आपल्या घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये किंवा घरात कोणतीही दुष्ट शक्ती येऊ नये. त्यानंतर आपल्या मुख्य दाराला सर्वांना दिसेल असा हा कोहळा बांधायचा आहे. कोहळा हा शक्यतो लाल वस्त्रा मध्येच बांधावा. कधी कधी काही लोकांचा कोहळा हा लाल वस्त्रांमध्ये बांधल्यानंतर लवकर खराब होतो, तर अशा वेळेला आपल्या घरातील लोकांचा दृष्ट शक्तीपासून बचाव झाला आहे, असे समजावे.
मग तो कोहळा कचऱ्यामध्ये टाकावा व दुसरा आणून त्याची वरील प्रमाणे पूजा करावी आणि शक्यतो शनिवारीच हा कोहळा घराबाहेर बांधावा. पण तरीसुद्धा सोमवती अमावस्या शनि अमावस्या दिवाळी अमावस्या यावेळी हा कोहळा नक्की बदलावा.
कोहळा हा नेहमी सूर्यास्तानंतर बांधावा… आपण जर कोहळा बांधला, तर दृष्ट शक्ती नष्ट होते, चांगली शक्ती आपल्या घरामध्ये येत असते. आपल्या घरामध्ये मतभेद होत नाहीत. कोणालाही नजर लागत नाही, दुष्ट शक्तींपासून आपला बचाव होतो. म्हणून कोहळा घराबाहेर बांधण्याची पद्धत आहे. आणि या कोहळ्यामध्ये दुष्ट शक्ती नष्ट करण्याची एक वेगळी ताकत आहे.
म्हणूनच कोहळ्याला यज्ञामध्ये राक्षसा सारखे सजवतात. दुष्ट शक्ती सामावून घेण्याची ताकद या कोहळ्या मध्ये असते. मग त्या कोहळ्याचा बळी दिला जातो. आणि म्हणूनच शनिवारी किंवा अमावस्येच्या दिवशी हा कोहळा घराबाहेर बांधावा.
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.
शास्त्र असे सांगते
shravanmasache mahatva
प्रत्येक कर्माचा प्रारंभ आचमनाने करण्यात येतो, यामागे काय उद्देश आहे ? आचमनाचे शास्त्रीय स्वरूप काय ?
आचमन हे सर्व काम्य, नित्य, निष्काम कर्माचे एक अत्यंत महत्त्वाचे अंग आहे. केवळ धार्मिक दृष्ट्या नव्हे, तर वैज्ञानिक दृष्ट्याही आचमनाचे अनन्यसाधारण महत्व आहे. हल्ली चमच्याने थोडे थोडे पाणी घेत राहिल्यास कोणते फायदे होतात, हे संशोधनाने सिध्द झालेले आहे. एकदम पेलाभर पाणी पिण्यापेक्षा त्यातील थोडेसे पाणी चमच्याने घेत राहिल्यास ते पाणी व्याधिनाशक व अमृतोपम होते. आचमनाबाबत “त्रि : पिबेद् अपो गोकर्णवद् हस्तेन त्रिराचामेद्” अशी शास्त्राज्ञा आहे. आचमनासाठी उजव्या हाताची गोकर्ण मुद्रा सांगितलेली आहे. तर्जनीच्या तळाशी अंगठ्याने दाब द्यावा. त्यानंतर तर्जनीवर मध्यमा, मध्यमेवर अनामिका व अनामिकेवर कनिष्ठिका अशा रितीने ठेवत जावे की, हाताचा आकार गायीच्या कानाप्रमाणे होईल. आचमनासाठी ब्राम्हतीर्थाचा उपयोग करतात. ब्राम्हतीर्थास आत्मतीर्थही म्हणतात. तळहाताच्या मनगटाजवळील भागाचा मध्य म्हणजे ब्राम्हतीर्थ होय. तेथे ओठ टेकवून तळहातावरील पाणी ग्रहण करण्याची क्रिया तीनवेळा करणे व चौथ्यांदा उजव्या हातावर एक पळी पाणी सोडणे या क्रियेस आचमन म्हणतात.
आचमनाविषयी स्मृतीग्रंथात सांगितले आहे की, “प्रथमं यत् पिबती, तेन ऋग्वेदं प्रीणाति । यद् द्वितीयं तेन यजुर्वेदं प्रीणाति । यत् तृतीयं तेन सामवेदं प्रीणाति ।” यावरून आचमनाच्या प्रत्येक वेळी एकेका वेदाची संतुष्टता प्राप्त होते. प्रत्येक कर्माच्या प्रारंभी आचमन केल्यामुळे मनास, देहास व कर्मास प्रसन्नता प्राप्त होते. आचमन करून अनुष्ठानाला प्रारंभ केल्यास शिंक, ढेकर, जांभई इत्यादी उपद्रव होत नाहीत. निदान त्यांचे प्रमाण घटते असे दिसून येते. आचमनाखेरीज केलेले कर्म निष्फळ होते, असे म्हणण्याची प्रथा पडलेली आहे, त्यामागे हाच उद्देश आहे. अगदी ग्रहणकालीन पुरश्चरण, अंत्येष्टी इत्यादी प्रसंगी देखील आचमनानेच प्रारंभ आहे.
सोळा सोमवार व्रताच्या दिवशी दिवसभर तोंडात पाणीही घालता येत नाही. पण त्या दिवशी पूजा, अभिषेक करावयाचे झाल्यास, प्रारंभ आचमनानेच होणे आवश्यक असते. उपवासाचेवेळी भ्रम, पित्तप्रकोप, चक्कर येणे इत्यादी प्रकार घडू लागल्यास एकदा, दोनदा जरूर आचमन करावे. ज्वरादि शारीरिक व्याधीने ग्रस्त झाल्यास शुध्द पाण्याने आचमन केल्यास प्रकृतीस आराम पडतो. जमिनीवर पडून पाणी घ्यायचे झाल्यास ते चमच्याने घ्यावे.
अत्यम्बुपानान्न च जीर्यतेsन्नम् । अनम्बुपानाच्च भवेद्वि दोषः ।। तस्मान्नरो वन्हिविवर्धनाय । मुहुर्मुहुर्वारि पिबेदभूरिशः ।।
या वचनाचा अर्थ असा की, अतिजलपान केल्यास अन्नपचन होत नाही. पाणी अजिबात न घेणे दोषावह आहे. यास्तव जठराग्निप्रज्वलन व्हावे म्हणून माणसाने थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे पाणी प्राशन करावे.” येथे “मुहुर्मुहुः व अभूरिशः” या पदावरून आचमनाचा बोध होतो. थोडेसे पाणी प्राशन करताच भरपूर लालारस उत्पन्न होतो असे दिसून येते. लालारसामुळे अन्नातील कठिणांश ठिसूळ होऊन त्याचे उत्तम पचन होते. विशेषतः अग्निमांद्य, बध्दकोष्ठता हे जुनाट विकार आचमनामुळे नष्ट होतात. यासाठी आचमनाचे अत्यंत आवश्यक प्रसंग सांगताना मनूने म्हटले आहे –
झोपून उठल्यावर, भूक लागल्यावर, भोजन झाल्यावर, शिंकरल्यावर, असत्य भाषण घडल्यास, पाणी पिऊन झाल्यावर, अध्ययन झाल्यावर अवश्य आचरण करावे.” वरील सर्व गोष्टींचे नीट निरिक्षण केल्यास आढळून येईल की, वरील सर्व प्रसंगी लालाग्रंथीतून लालारस स्रवत असतो. अशावेळी आचमन केल्यास त्याचे शरीरावर सुपरिणाम होतात. भोजनोत्तर केलेल्या आचमनामुळे भरपूर लालारस पोटात जाऊन आन्नपचन होते. खोटे बोलण्याचा प्रसंग आल्यास आचमन केल्यावर असत्य भाषण प्रवृत्ती फारकाळ टिकत नाही व त्याचा दृढ परिणामही होत नाही.
शरीराचे विविध वायुविकार घडल्यास त्याचप्रमाणे भोजन, मलमूत्रविसर्जन, बीभत्सदर्शन इत्यादी प्रसंगीही आचरण सांगितले आहे. पण ढेकर, शिंक, उचकी, अपानवायु इत्यादी प्रत्येक विकाराचे वेळी जलाचमन करणे अव्यवहार्य व गैरसोयीचे ठरते. म्हणून शास्त्राने जलाचमनास “श्रोत्राचमन” हा पर्याय दिलेला आहे. श्रोत्राचमन म्हणजे अंगठ्याने उजव्या कानास स्पर्श करणे. श्रोत्राचमन हे सहजपणे अंगवळणी पडते.
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे
1 thought on “shravanmasache mahatva”