Shravan mahinychi mahiti aani upay
shravan mahinychi mahiti :आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना आला कि सगळ्या सणाला सुरुवात सगळयांच्या आवडीचा महिना म्हणजे श्रावण महिना हा महिना झाला कि हरतालिका,गौरी-गणपती,रक्षाबंधन असेच सगळ्या सणाला सुरुवात होते. श्रावण महिन्यात सात्विक भोजन ग्रहण केलं जात. या वर्षी श्रावण महिन्याला लागून अधिक महिना आला आहे .त्यामुळं या श्रावण महिन्यात एकूण ८ सोमवार आहे.या वर्षी श्रावण महिण्याची सुरुवात हि १६ ऑगस्ट ते १७ सप्टेंबर ला श्रावण महिना संपतो .
हे आहेत श्रावणाचे अचूक उपाय
शिवपुराणानुसार महादेवाला प्रसन्न करण्याचे उपाय या प्रकारे आहेत
1. महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धन प्राप्ती होते.
2. तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो.
3. जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते.
4. गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते
शिवपुराणानुसार जाणून घ्या, महादेवाला कोणत्या रसाने (द्रव्य) ने
अभिषेक केल्याने कोणते फळ प्राप्त होते.
श्रावण महिन्यात हिरवळ वातावरण असत या महिन्यात शिवलिंगावर बेलपत्र फुल अर्पण करून अभिषेक केल्या जातात . श्रावण सोमवार उपवास केल्यानेही फलप्राप्ती होते.
shravan mahinychi mahiti :
1. ताप (ज्वर) आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकर फरक पडेल. सुख आणि आपत्य वृद्धीसाठीसुद्धा महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मानण्यात आले आहे.
2. तलख्ख बुद्धीसाठी साखर मिश्रित दुध महादेवाला अर्पण करावे.
3. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व आनंदाची प्राप्ती होते.
4. महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो.
5. मधाने महादेवाचा अभिषेक केल्यास टीबी रोगातून आराम मिळतो.
6. जर शारीरिक रुपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायीच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा. या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते.
shravan mahinychi mahiti : आता श्रावण महिन्यात पूजा करतानी महादेवाला शिवामूठ अर्पण करतात. पहिल्या सोमवारी तांदूळ,दुसऱ्या सोमवारी तीळ,तिसऱ्या सोमवारी मुंग,चौथ्या सोमवारी जवस,असं दार सोमवारी शिवमयठ अर्पण करावी.श्रावण महिण्याच्या अगोदर अधिक महिना येतो म्हणून त्याला अधिक मास म्हंटले जाते. त्यानंतर श्रावण महिना येतो म्हणून त्याला निजी श्रावण महिना बोलले जाते. अधिक महिन्यात पुरुषोत्तम भगवान विंष्णू ची पूजा केली जाते आणि श्रावण महिन्यात भोलेनाथ शिवशंकर ची पूजा केली जाते. shravan mahinychi mahiti
शिवपुराणानुसार जाणून घ्या, महादेवाला कोणते फुल अर्पण केल्याने कोणते फळ प्राप्त होते
shravan mahinychi mahiti :
1. लाल व पांढऱ्या रुइचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो.
2. चमेलीचे फुल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते.
3. शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो
4. बेलाचे फुल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते
5. जाई-जुइचे फुल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.
7. कन्हेरीचे फुल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात.
8. प्राजक्तांच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास सुख-संपत्तीमध्ये वृद्धी होते
9. धोतार्याचे फुल अर्पण केल्याने महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करतात, जो कुळाचा उद्धार करतो.
10. दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते.
या उपायांनी प्रसन्न होतात महादेव
1. श्रावणात दररोज बेलाच्या 12 पानांवर ऊं नम: शिवाय लिहून, ही पाने शिवलिंगावर अर्पण करा. या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
2. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात दररोज सकाळी घरामध्ये गोमुत्र शिंपडावे.
3. लग्न जमण्यात अडचणी येत असेतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दुध अर्पण करा. या उपायाने लवकरच लग्नाचे योग जुळून येऊ शकतात.
4. श्रावणात दररोज नंदी (बैल)ला हिरवा चारा टाका.
5. श्रावणात गरिबांना अन्नदान करा. या उपायाने तुमच्या घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता राहणार नाही तसेच पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल.
6. श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक करून काळे तीळ अर्पण करावेत. त्यानंतर मंदिरात बसूनच ऊं नम: शिवाय मंत्राचा यथाशक्ती जप करावा. या उपायाने मानसिक शांती लाभेल.
7. श्रावणात एखाद्या नदी किंवा तलावातील माशांना पिठाच्या गोळ्या तयार करून खाऊ घालाव्यात. हा धन प्राप्तीचा सोपा उपाय आहे.
पुरुषोत्तममासाची माहिती हे पण वाचा
उत्पन्न वाढवण्यासाठी
श्रावण महिन्यात कोणत्याही दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिव्रत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळेस जप करावा.
ऐं ह्रीं श्रीं ऊं नम: शिवाय: श्रीं ह्रीं ऐं
प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे. बिल्वपत्राच्या तीन पानांवर क्रमशः ऐं, ह्री, श्रीं लिहावे.
शेवटचे 108 वे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पनात वाढ होऊ शकते असे मानले जाते.
आपत्य प्राप्तीसाठी
श्रावणात कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाची पूजा करावी. त्यानंतर गव्ह्याच्या पीठाचे 11 शिवलिंग तयार करावेत. त्यानंतर प्रत्येक शिवलिंगावर शिव महिम्न स्तोत्राचा उच्चार करीत जलाभिषेक करावा. अशाप्रकारे 11 जलाभिषेक करावेत. अभिषेक केलेल्या पाण्याचा काही भाग प्रसाद रुपात ग्रहण करावा. हा उपाय नियमितपणे 21 दिवस करावा. या उपायाने आपत्य प्राप्तीमध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात.
रोगमुक्त होण्यासाठी खास उपाय
श्रावण महिन्यात सोमवारी पाण्यामध्ये दुध आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर अभिषेक करावा. अभिषेक करताना ऊं जूं स: मंत्राचा जप करावा. त्यानंतर महादेवाकडे रोग निरावरणासाठी प्रार्थना करावी. या उपायाने आजार बरा होण्यास मदत होईल
गुरुदेव दत्त
शंकराची पिंड स्वरूपात पूजा
shravan mahinychi mahiti : सरस्वती नदीच्या किनारी सर्वच सप्तर्षी आणि ऋषीमुनी एकत्र येऊन महायज्ञ करत होते. नारदमुनींनी भ्रमण करत असतांना त्यांना पाहिले आणि ते त्यांना भेटायला गेले.
त्यांनी ऋषीमुनींना यज्ञाचे कारण विचारले असता सर्व ऋषी मुनींनी त्यांना आपण हा यज्ञ विश्वकल्याणासाठी करत आहोत असे सांगितले. तेव्हा नारदमुनींनी आपली शंका विचारण्याच्या उद्देशाने हा यज्ञ आपण कोणत्या देवतेला अर्पण करत आहात हे विचारले.
तेव्हा सर्व ऋषींनी नारद मुनींनाच याबाबत योग्य तो सल्ला द्यावा असे सुचवले.
नारद मुनींनीही मग विश्वकल्याणासारख्या उदात्त कारणासाठी यज्ञ होत असल्याने यज्ञाचे फळ हे त्रिमूर्तींपैकीच(ब्रह्मा-विष्णू-महेश)कुणालातरी अर्पण करावे असे सुचवले. तेव्हा सर्व ऋषींनी मिळून प्रतिनिधी रूपाने भृगु ऋषींना परीक्षक रूपाने त्रिमूर्ती मधून सर्वश्रेष्ठ देवतेला निवडण्यासाठी पाठवले.
सर्वप्रथम भृगू ऋषी सत्यलोकात म्हणजेच ब्रह्मदेवाच्या घरी गेले. तेथे ब्रम्हा सरस्वती सोबत वेदचर्चेत मग्न होते. त्यामुळे त्यांचे ऋषींकडे लक्ष गेले नाही. पुष्कळ वेळ थांबूनही आपल्याकडे लक्ष न दिल्यामुळे आपला अपमान झाला असे समजून त्यांनी ब्रह्मदेवाला त्यांची पूजा या पृथ्वीतलावर होणारच नाही असा शाप दिला.
त्यानंतर ते कैलास पर्वतावर गेले असता शंभू महादेव पार्वतीसह वार्तालाप करत असल्यामुळे त्यांचेही भृगूंकडे लक्ष गेले नाही. पुष्कळ वेळ झाल्याने ऋषींना राग आला. स्वतःच्या अपमानामुळे त्यांनी शंकराला शाप दिला ” आपल्याला यज्ञाचे सर्वश्रेष्ठ फळ मी देण्यासाठी आलो असतानाही आपण माझ्याकडे दुर्लक्ष केले. या चुकीबद्दल माझा तुम्हाला शाप आहे की आज पासून भूतलावर तुमचीही पूजा कोणीही करणार नाही.” शंकरांनी या बद्दल क्षमा मागितल्यावर उःशाप म्हणून त्यांची मूर्ती रुपात नव्हे तर केवळ प्रतीकात्मक रूपात म्हणजेच लिंग स्वरूपात पूजा-अर्चना केली जाईल, असे सांगितले.
शेवटी अपमानाने संतप्त आणि वैतागलेले भृगुऋषी वैकुंठधामाला म्हणजेच श्रीविष्णूच्या निवासस्थानी येऊन पोहोचले. तेथे त्यांनी शेषनागावर झोपलेल्या नारायणाला पाहिले. सलग तिसऱ्या ठिकाणीही उपेक्षा वाटेला आल्यामुळे क्रोधाने भडकलेल्या भृगूंनी संतापातच विष्णूच्या छातीवर लत्ताप्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे विष्णूची निद्रा भंग पावली. आपल्या छातीवर पाय देऊन उभे असलेल्या ऋषींकडे पाहून त्यांना परिस्थितीची जाणीव झाली. तात्काळ त्यांनी ऋषींचा पाय आपल्या हातात धरला. “आपल्या कोमल अशा पायांना माझ्या कठोर छातीवरच्या आघाताने केवढे त्रास झाले असतील” असे म्हणून डोळ्यातून अश्रू ढाळीत त्यांचे पाय चोळू लागले.
श्री विष्णूचा हा निरागसपणा आणि त्यांच्या परिस्थिती हाताळण्याच्या कौशल्यामुळे प्रभावित झालेल्या भृगूंनी शेवटी आपल्या यज्ञाचे फळ विष्णूंना अर्पण करण्याचे ठरवले.
shravan mahinychi mahiti ,https://youtu.be/3nES66NtYgQ
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे