रक्षा बंधन
raksha bandhan muhurt time: बुधवार 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10-59 पासून पौर्णिमा लागते ती गुरुवारी सकाळी 07-06 पर्यंत आहे.
बुधवारी लगेच भद्राकाल योग असल्याने रक्षाबंधन रात्री 09:02 नंतर करावे असा मतप्रवाह वहात आहे.त्याला आधार म्हणून काही जण उदाहरण देतात की रावणाच्या हातात शूर्पणखेने भद्राकालात राखी बांधल्याने रावणाचे फार वाईट झाले.पण तो पाताळ भद्राकाल होता आणि त्या घटनेचा आणि रक्षा बंधन चा काही सबंध येत नाही कारण रावण आपल्या कर्माने गतप्राण झाला. जरी राखी भद्रेत बांधली नसती तरी प्रभू श्रीरामांनी रावणास मारलेच असते असो.
यावेळी पृथ्वीलोकी भद्राकाल असल्याने दोष नाही म्हणून पौर्णिमेच्या दिवशीच बुधवारी 30 तारखेला सकाळी पौर्णिमा सुरू झाल्यावर म्हणजेच सकाळी 11 नंतर निःशंक मनाने, उत्साहात दिवसभर कधीही रक्षाबंधन करावे.
राखी पौर्णिमा खुलासा
raksha bandhan muhurt time : पूर्वी रक्षा सूत्र बंधन होते. रक्षा सूत्र बंधन हे राजा लढाईला जाण्यापूर्वी त्याच्या रक्षणासाठी हातात बांधण्याचे एक बंधन होते . रक्षा सूत्र बंधन करण्याचे कर्म हे खूप मोठे आहे . त्यामध्ये मंत्रोपचार करून ते रक्षा सूत्र राजाच्या हातात बांधले जाई . पुढे त्याचा उद्देश बदलला व बहिणीने भावाला बांधायची राखी हे स्वरूप त्याला आले. परंतु आजकाल कोणीही नवीन धर्मशास्त्र तयार करून राखी पौर्णिमा बद्दल लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करत आहेत . ज्यायोगे हिंदू धर्मावर लोकांची श्रद्धा कमी होईल किंवा त्यांनी सण साजरे करू नयेत अशा पद्धतीने प्रत्येक सणापूर्वी असे विचित्र मेसेज प्रसार माध्यमातून पाठवले जातात . आजकाल जी राखी पौर्णिमा साजरी केली जाते तो एक लौकिक विधी आहे . म्हणजे बहिणीने फक्त भावाच्या हाताला पवित्र धागा बांधण्याचा एक विधी आहे. त्यामध्ये कुठलेही मंत्र उपचार होत नाहीत किंवा कुठलाही विधी होत नाही . त्यामुळे त्याबद्दलचे भद्रा किंवा इतर कुठली मूहूर्त बघण्याची कोणतीही आवश्यकता नाही. सर्वांनी आपले सण आनंदाने साजरे करावेत असेच धर्मशास्त्र सांगते. पण आजकाल हे social media आल्यापासून खूप विचित्र मेसेज फॉरवर्ड होत आहेत. हे सांगणारे आहेत ते कोणीही धर्मपंडित नाहीत, ते असेच कुठून तरी गोळा करून आपल्या माथ्यावर ते शास्त्र थोपवत आहेत.
आज काल भद्रा दोष सांगितला जातो , वास्तविक दर वर्षीच राखी पौर्णिमेला भद्रा असतेच मग इतके दिवस आपले पूर्वजांनी कोणतेही बंधने आपल्याला सांगितलेली नाहीत . ते वेडे होते का ?
आपण सर्वसामान्य व्यक्तींनी याचा विचार केला पाहिजे की आपण सण का साजरे करत आहोत , त्यामागचा उद्देश काय आहे . आणि त्यानुसार आपण पूर्णपणे आनंदाने आपले सण साजरे करावेत. दिवसभरात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत राखी पौर्णिमा आपण साजरी करू शकतो. त्याबद्दल कुठलेही बंधन नाही आणि धर्मशास्त्रात असे कुठेही उल्लेख नाहीत .तेव्हा बंधू आणि भगिनींनो कुठलीही शंका न बाळगता आपल्या भावाला आपल्या प्रेमाच्या बंधनात बांधा औक्षण करा व त्याचे तोंड गोड करून पाठवा नाती व हिंदू संस्कृती जपा सणवार आनंदाने व प्रेमाने साजरे करा.
३०/८/२०२३- निज श्रावण पौर्णिमा. प्रारंभ बुधवार सकाळी १०.५९, समाप्ती गुरुवार ३१/०८/२०२३ सकाळी७.०६
बुधवारी सायंकाळी प्रदोष काळात पूजा करावी
जन्म देण्याचे काम ब्रम्हदेव करत असतात व जन्म ते मृत्यु पर्यंत पालनपोषण करण्याचे काम , जबाबदारी भगवान विष्णुंवर आहे आणि मृत्युनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणुन मेल्यानंतर मृत आत्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असतज.
श्रीक्षेञ ञ्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो. आपल्या घरात पुरेसे न पडणे , आर्थीक अडचणी येणे, अन्न चविष्ट न लागणे, अन्न खाऊन तृप्ती न होणे, महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे, घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे, पैसा घरात आला म्हणजे त्याला वाटा फुटुन अनाठायी पैसा खर्च होणे. वरील सर्व बाबींचे कार्यकारण भाव आपणास समजत नाही. असे प्रश्न ज्या वेळेस श्री स्वामी समर्थ केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्याघरी करण्याचा सल्ला दिला जातो.
सतत १२ पौर्णिमांनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बर्याच अंशी सुटलेले असतात. बरेच चांगले अनुभव लोकांना आलेले दिसतात याचे कारण असे की, आपण जी सत्यनारायण पुजा करतो ती धान्याची पूजा असते. जुनी मंडळी असे म्हणतात की, घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही. कारण विकतचे आणलेल धान्य आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात. ” ओकलेलं खाल्लं तर एकवेळेस ते चालेल परंतु टोकलेले खाऊ नये ” ‘ जैसे खावे अन्न वैसे उपजे मन’ या सर्व गोष्टी आपल्या कुटुंबावरती व आपल्यावर वाईट परिणाम करु शकतात.
घरातील माणसे एकविचाराने न राहणे, घरात अन्नधान्य, पैसा पुरेसा न पडणे, या सर्व गोष्टींचे मूळ आपल्याला या ठिकाणी दिसुन येते. म्हणुन अापल्या पुर्वजांनी फार बारीक अभ्यास करुन घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालुन दिली आहे.
आपल्या घरी असलेले अन्न व धन यांच्या पालनपोषनाची जबाबदारी भगवान विष्णु यांच्याकडे असल्याने, भगवान विष्णुंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातुन जर आपण पुजन केले तर त्या पैशाचे आणि धान्याचे सर्व दोष नाहिसे होतात. तसेच तो पैसा धन, पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते. त्या ठिकाणी पविञता येऊन घरात सुख, शांती, आनंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते.
” सत्यनारायण पूजा ” ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी (सूर्यास्ताअगोदर व नंतर २४ मि. ) करावयाची असते. ऐश्वर्य, धन, संपत्ती यांचे मालक विष्णु व माता लक्ष्मीदेवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्याघरी पूजा करावी. मकर संक्रांतीच्या दिवशीपण सत्यनारायण करावा.
पूजेचे साहित्य :- १ पाट , १ चौरंग, चौरंगाभोवती आंब्याचे चार डहाळे, चौरंगावर अर्धा मिटर पांढरे कापड , ताम्हणात तांदुळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा. तीन सुपार्या विड्याच्या पानावर ठेवाव्यात. (पहिली सुपारी- गणपतीची, दुसरी कुलदेवतेची, तिसरी वरुणाची ) वरील पध्दतीने मांडणी करुन सर्वांची पंचोपचार पूजा करावी. नंतर रव्याचा प्रसाद करुन नैवेद्य , धूप, दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी. पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा. आरती करुन प्रसाद वाटावा. हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तिंनीच खावा बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये. नातेवाईकांना सुध्दा देऊ नये.
यानंतर पूजेतील उरलेले गहु-तांदुळ त्या त्या धान्यात टाकावे. यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पविञ होतात. कारण जेंव्हा धान्य दुकानातुन विकत आणत असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागले असतात. त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी, ते पविञ करण्यासाठी दर पौर्णिमा , संक्रातीला सत्यनारायण करावा. या विधीमुळे घरात सुखशांती नांदते, धनधान्य पुरते, आर्थीक स्थिती सुधारते.
दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा
३०/८/२०२३- निज श्रावण पौर्णिमा. प्रारंभ बुधवार सकाळी १०.५९, समाप्ती गुरुवार ३१/०८/२०२३ सकाळी७.०६…!
पौर्णिमा ही बुधवारी ३० तारखेला सकाळी दहा वाजून एकोणसाठ मिनिटांनी चालू होते आणि गुरुवारी ३१ तारखेला सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी संपते आहे त्यामुळे श्री सत्यनारायण पुजा ही बुधवारी करावी
बहीणभावाच्या नात्याविषयी सुंदर असे भावनिक गाणं या खालील लिंक वर जाऊन तुम्ही बघू शकता
“बहिणाबाई”
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्यापाठीशी आहे