काहीं महत्वाच्या अध्यात्मिक गोष्टी
mahatvachya adhyatmik goshti: मंदिरात, केंद्रात हात पाय धुवून मगच जावे, कारण आपण सतत विचार करत असतो तसेच इतरही काही ना काही विचार मनात असतात या विचार लहरी तरंग रूपाने आपल्या भोवती असतात.इतरांच्या लहरींचा पण आपल्या मनावर परिणाम होत असतो. हात पाय धुतल्याने शरीर व मनाची मलीनता दूर होते. व मन ताजेतवाने होऊन चांगल्या प्रकारे सेवा आपण महाराजांच्या चरणी रुजू करू शकतो. स्वामी मठात जाऊन आपल्याला एक positive ऊर्जा मिळते स्वामी म्हणजे आपले गुरु आहे त्यासाठी आपल्याला त्या बद्दल काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणं गरजेच आहे. आपण सेवा करतो तर काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेऊन आमलात आणणे गरजेच आहे.
II श्री स्वामी समर्थ II
mahatvachya adhyatmik goshti
१. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना फक्त आपले काम सफल होईपर्यंत संकल्पित सेवा करायची नसून स्वामी सेवेच्या व्रताशी आपण सर्व बांधील आहोत या उद्देशाने सेवा करावी.
२. यश, अपयश, राग, अपमान हे सर्वच पचवता आले पाहिजे असे झाल्यास आत्महत्याचा विषय पुढे येणार नाही. शरीराप्रमाणे मनही खंबीर पाहीजेल.
३. मुलांना सहज मिळणाऱ्या पॉकेटमनी मूळे त्यांना पैशाचे महत्व उरले नाही यातूनच व्यसनाधीनता, आजार, नैराश्य, माता-पिता यांकडे दुर्लक्ष अशा अनेक समस्या उद्भवत आहेत.
४. गुरूंची आज्ञा पूर्ण श्रद्धेने व दृढ निश्चयाने पाळावी. गुरूंना व्यक्ती समजणे, त्यांचे आचरण तपासणे, तो ज्ञानी आहे की नाही याची चिकित्सा करणे यामुळे शिष्याचे परमहित साधत नाही उलट त्याचे अहित होते. म्हणून आपल्या गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांची आज्ञा पाळावी.
औदुंबर प्रदक्षिणा कशा कराव्यात
mahatvachya adhyatmik goshti: प्रदक्षिणा घालताना प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर येईल अशी पूर्व साधून मुजरा करावा. व नंतर प्रदक्षिणा करायला सुरुवात करावी. प्रत्येक प्रदक्षिणा पूर्ण करून क्षणभर थांबून स्वामींना नमस्कार करून पुढील प्रदक्षिणाकरावी. अन्यथा नुसत्या जलद गतीने 11 प्रदक्षिणा न थांबता घातल्यास ती एकच प्रदक्षिणा होईल. प्रदक्षिणा या शांततेने व संथ गतीने मनात श्री स्वामी समर्थ जप करत घालाव्यात.
दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत गेलेल्या घराण्याचे देव पूजी नयेत.ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत….. ते जरी सोन्याचे देव असले तरी विसर्जन च करावे. नाहीं तर पूजकाची ही वंश बुडी होईल..अनेक संकटांनी तो त्रस्त होईल
देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये . घराचे वातावरण स्मशानवत होईल. कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानात च तांडवनृत्य स्वरूपात मानले जाते…म्हणून पिंड स्वरूपात देवघरात शंकराची पूजा केली जाते
संसारी माणसाने मारुतीची देव घरात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. घरात सहा फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल.
तसेच देवघरात शनीचीपूजा करू नये. सर्व जीवन संकट मय अती उदास राहते.
देवघरात मुंजा पूजा करू नये.बाकीचे देव काम करत नाही,शिवाय मुंज्यास सद्गती पासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात.
देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये .कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अती कडक असते.अशा स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही.
देवघरात काल भैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली आहे . तो यम असून स्वभाव अती उग्र व कडक आहे
देवघरात म्हसोबा पूजू नये.त्यामुळे कुलदेविचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही.कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते
देवघरात पिराची अगर पिराच्या चिन्हांची पूजा करू नये.इतर हिंदू देवतांची कृपा लाभत नाही
,आसरा देखील देवघरात पूजु नये
देवाच्या मूर्ती शोभेसाठी शोकेस मध्ये ठेऊ नये .ते देव त्या कुटुंबाची शोभा करतात.
देवघरातील पूजेच्या मूर्ती तीन इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात..जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन कराव्यात
देव्हाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये.देव भग्न,छिद्र पडलेले,आसन,आयुधे हलत असलेले,चिर गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत.ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात.
बक्षीस मिळालेले,सापडलेले देव देव्हाऱ्यात पुजू नये.
देवता विसर्जन विधी
विसर्जन करावयाचे देव एका पाटावर ठेऊन त्यांना गंध,अक्षता, हळदी कुंकू वाहून पूजा करावी.दही भाताचा नैवेद्य दाखवावा. व हातात अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणत त्या देवतांवर वाहाव्यात.
यांतु देवगणा: सर्वे पूजा मादाय पार्थिवा l
इष्ट काम सिध्यर्थं पुनरागमनाय च l
नंतर एका पांढऱ्या कापडात सव्वा मूठ तांदूळ ,एक सुपारी,सुटे नाणे घेऊन त्यात विसर्जन केलेले देव ठेवावे.बरोबर नैव्यद्याचा दही भात ठेवावा. व ते पांढरे कापड व्यवस्थित गुंडाळून प्रवाहात विसर्जन करावे.
श्री स्वामी समर्थ सण वार, व्रत वैकल्ये.. दिंडोरी प्रणित ग्रंथ
सोन्याचा मुकुट आणि चांदीचे पाय
mahatvachya adhyatmik goshti:
एका मोठ्या शहरात भगवान श्रीविष्णुचे मोठे मंदिर होते. रोज अनेक भक्त त्या मंदिरात दर्शनासाठी येत असत.
हळूहळू मंदिराची ख्याती वाढू लागली, भक्तांची गर्दी होऊ लागली, मंदिराचा विस्तार होऊ लागला मग काही लोकांनी ठरविले भगवान विष्णुला एक सोन्याचा मुकुट करावा. त्यासाठी निधी गोळा करण्याचे ठरविले.
गावाच्या बाजूलाच एक अनाथ, अपंग मुलांचा आश्रम होता. त्या आश्रमालाही गावातील काही लोक दानधर्म करत. गावात भिकुशेठ नावाचे एक श्रीमंत सावकार राहत होते. भिकुशेट आपल्या पैशातून, नफ्यातून काही वाटा हा दानधर्मासाठी वापरत असत.
भक्तमंडळींना वाटले की भिकुशेटसारखा दिलदार मनाचा माणूस आपल्याला मदत करेल. सगळे मिळून भिकुशेटकडे गेले. भक्तमंडळीना आपल्या पेढीवर आलेले पाहून भिकुशेटला मोठा आनंद झाला. त्यांनी भक्तांचा मोठा आदरसत्कार केला. लोकांनी भगवान श्रीविष्णुसाठी सोन्याचा मुकुट करण्याचे सांगितले व भिकुशेटकडून मदतीची मागणी केली.
यावर भिकुशेट म्हणाले,”मंडळी मी तुमच्या कामात काही मदत करू शकत नाही कारण मी विष्णुला सोन्याचा मुकुट करण्यापेक्षा चांदीचे पाय करण्याचा विचार करत आहे.”
लोक म्हणाले आम्हाला निश्चित काय ते खरे सांगा. भिकुशेट सर्वांना दोन दिवसांनी येण्यासाठी सांगितले.
दोन दिवस निघुन गेले. लोक पुन्हा भिकुशेटच्या पेढीवर गेले असता भिकुशेटच्या शेजारी एक लहान मुलगा बसला होता. भिकुशेटने त्या मुलाला उठायला सांगितले. त्या मुलाला दोन्ही पाय नव्हते. मग भिकुशेटच्या नोकराने एका पेटीतून दोन वस्तू काढल्या ते कृत्रिम पाय होते ते त्या नोकराने त्या अपंग मुलाला व्यवस्थितपणे बसविले. मुलगा हळूहळू चालू लागला.
भिकुशेट म्हणाले,” भक्तांनो, या मुलाचे नाव विष्णु, हा अपंग असून अनाथ आहे. याला पाय नव्हते म्हणून मी शहरातून हे पाय विकत आणले असून तो आता हिंडू फिरू शकतो. त्या विष्णुला सोन्याचा मुकुटाचा तसा फारसा उपयोग नव्हता पण या विष्णुला पायांची गरज होती. मी याला दिलेले कृत्रिम पाय याच्या दृष्टीने सोन्याचांदीपेक्षा जास्त महत्वाचे आहेत.”
तात्पर्य :- मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा.
जप रोज व्हावा
mahatvachya adhyatmik goshti:
जप रोज व्हावा, असा प्रयत्न करावा. ती संख्या आपल्या व्यावहारिक जबाबदाऱ्या, रोजचा दिनक्रम,नोकरीची वेळ हे सर्व लक्षात घेऊन आपली आपणच ठरवावी. नंतर ती पाळण्याचा मात्र कसोशीनं प्रयत्न करावा. त्यानंतर ‘येता जाता खाता पिता उठता बसता धंदा करता’ मनातल्या मनात जप चालवण्याचा प्रयत्न सुरू करावा. नंतर रोजची जी संख्या आहे ती हळुहळू वाढवता येईल काय, याचा विचार करावा आणि त्यानुसार त्या वाढीव संख्येसाठी रोजच्या दिनक्रमातून कोणत्या गोष्टींत जाणारा वेळ कमी करता येईल, याचा विचार करावा. असा विचार केला की आपल्याला दिवसभरात बराच रिकामा वेळही मिळतो पण तो दुनियादारीत भरून जात असल्याने आपल्या लक्षात येत नाही, हे जाणवेल. श्रीमहाराजही सांगतात, “आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार अत्यंत बरोबर केल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल. खरे पाहिले असता सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावत नाही. म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवायचा आपण निश्चय करावा. नामाच्या आड सर्वच गोष्टी येतात, स्वतदेखील त्याच्या आड येतो. तेवढे सांभाळावे आणि जगाच्या नादी फारसे न लागता आपले नाम चालू ठेवावे.”
जन्माला येताना एकटे असलो तरी, जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे.
आपण आयुष्यात, खूप काही मिळवतो. पण बऱ्याच वेळा, ज्या कारणांसाठी, ही धडपड करतो. ती करणचं आपल्या बरोबर रहात नाहीत. मग राहून राहून मनात येतं, काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो.
माणसाच्या जीवनात, अहंकाराची हिरवळ असेल, तर त्याची फांदी ही वाळलेलीच असते, वेळ माणसाला यशस्वी करत नाही, वेळेचा योग्य वेळी वापर केल्याने, माणसांना यशस्वी बनवते, स्वतःची बुद्धी,आणि शहाणपण, खूप महत्त्वाचे असते, नाही तर अर्जुन, आणि दुर्योधनाचे गुरु एकच होते.
सल्ला अवश्य बाहेरच्या माणसांचा घ्या. पण घरातले निर्णय मात्र, घरातल्या माणसांनी मिळूनच घ्या. मानवी नात्यात, जर मोठा शत्रू कुणी असेल, तर तो म्हणजे गैरसमज, निवड, संधी, आणि बदल, या तिन्ही पण महत्त्वाच्या गोष्टी आहेत. संधी दिसतात निवड करता आली, तर बदल आपोआप होतो. संधी समोर दिसूनही, ज्याला निवड करता येत नाही. त्यात कधीही बदल घडत नाही.
असंख्य दुःखांना लपवून, चेहऱ्यावर स्मित हास्य निर्माण करणं, या सारखं बोलकं नाटक, कोणतं असू शकतं. मानवी आयुष्यात प्रत्येक गोष्ट, आवडेलचं असे नसते, पण न आवडणाऱ्या गोष्टीतही, चांगलं बघण्याची दृष्टी ठेवल्यास, जीवन सुकर होते.
तुम्हाला न रुचणाऱ्या गोष्टी, सोडून द्यायला शिका. कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय, पुढचा नविन श्वास घेताही येत नाही. जगात दोनच ज्योतिषी खरे आहेत, मनातलं ओळखणारी माय, आणि भविष्य घडवणारा बाप.
मनुष्याच्या दुःखाचे कारण, त्याचे दुःख नसून, त्याने केलेली सुखाची अपेक्षा असते. डोक्यात अनावश्यक द्वेषाची घाण, आणि डोळ्यात मूर्खपणाची धूळ साचली की, सूर्यप्रकाशा इतक्या, स्पष्ट असलेल्या गोष्टी सुद्धा, दिसत नाहीत.
आपले मन हळवे असावे, परंतु दुबळे नसावे, कारण हळव्या मनास भावना कळतात, आणि दुबळ्या मनास, नेहमी वेदना छळतात. दु:खाची एक अजबच तऱ्हा आहे. त्याला सहन करणारीच, लोक जास्त आवडतात!!
जगायचं कुणासाठी?, माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो. पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण आयुष्य का जगतो? कशासाठी जगतो? आणि कुणासाठी जगतो? याची मात्र काहीच कल्पना नसते.
आपली पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो. पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान-सहान कामे करतो, अंगमेहनतिचीही कामे करतो. पूर्वी ८०/९० वर्षांचे आयुष्य जगायचा,आता ६०/७० वर्षे जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात. मेल्यानंतर पृथ्वीतलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचंच संपुष्टात येतं.
आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त १०/१५ दिवसांपुरतीच असते. कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं. मग जगावं तरी कुणासाठी?? तर जगावं तर ते समाजासाठी,
तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता? तुम्ही काय उभारता ? तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का? यालाच तुमचं करियर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात. करियर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा. समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय.
माझ्याकडे खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत. यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्याप्रति असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हिच आयुष्यभराची कमाई असते.
आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही. पण समाजासाठी झटणारे साधु संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत.
उदाहरण घ्यायचच झाल तर संत गाडगेबाबा महाराज काय होतं त्यांच्याकडे फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेल्या मडक्याच खापर आणि अंगावर फाटका सदरा पैश्याचा तर विषयच नव्हता चलनाचं एक नाणंसुद्धा खिशात नसायचं. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. याच विचारांमुळे आज ते अजरामर झाले.
आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती साधुसंतांएवढी कि लोक आपल्याला वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील. पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं प्रत्येकाने कर्तृत्ववान व्हावं .
एकमेकांचा राग, द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं रहायला शिका. ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय, तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही. म्हातारे झाल्यावर आई-बाप काहीच काम करत नाहीत म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेवून ठेवलं जातं.
बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल-अपेष्टाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील, या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो कि आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी?
आपण समाजासाठी जगा, दान-धर्म करा, भुकेल्या माणसांना अन्न द्या. आनंदात जगून घ्या. फिरावंस वाटलं तर भरपूर फिरून घ्या. म्हातारपणी फिरावंस वाटल तरी तुमच शरीर मात्र साथ देणार नाही, म्हणून जोपर्यंत शरीर धडधाकट आहे, तोपर्यंतच सर्व फिरून पाहून घ्या.
जन्माला येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे.
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे