Site icon

Krushna janmache satya

श्री कृष्ण जन्मा चे पूर्ण सत्य
श्री कृष्णावतरण

 

Krushna janmache satya

एकदा वेगवेगळ्या राजांच्या अनावश्यक अशा सैन्यबळांचा या पृथ्वीला भार झाला होता हे सर्व राजे खरे पाहता असुर होते. परंतु स्वतःला मात्र ते शूर शत्रिय म्हणून घेत. त्यांच्यामुळे सर्व जग त्रासून गेले होते. अशावेळी पृथ्वीची अधिष्ठाञी भूमीदेवी दृष्ट राजांचा होणारा उपद्रव ब्रह्मदेवांना विधीत करण्याकरिता त्यांच्याकडे गेली. त्यावेळी भूमीदेवीने गाईचे रूप धारण केले आणि अश्रूपूर्ण नेत्रांनी ती भगवान ब्रह्मदेवांसमोर उभी राहिली. ती अनाथ होती आणि ब्रह्मदेवांची करुणा जागविण्याखातर ती रडू लागली. तिने पृथ्वीच्या उपदाग्रस्त स्थितीचे वर्णन केले. ते वर्णन ऐकून ब्रह्मदेवांना फार दुःख झाले आणि ते तात्काळ क्षीरसागराकडे निघाले क्षीरसागर हे भगवान विष्णूंचे निवासस्थान आहे. क्षीरसागराकडे प्रयाण करताना शिवप्रमुख सर्व देव त्यांच्या समवेत होते. पृथ्वी देखील त्यांच्याबरोबर निघाली. क्षीरसागराच्या किनाऱ्यावर आल्यावर भगवान ब्रह्मदेव भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा उपाय करू लागले. भगवान विष्णूंनीच पूर्वकाळात दिव्य वराह रूप धारण करून पृथ्वीला वाचविले होते.

वैदिक मंत्रात पुरुषसूक्त म्हणून एक विशिष्ट प्रकारचे सूक्त आहे. सामान्यता देवी-देवता पुरुषसूक्त चे उच्चारण करूनच भगवान विष्णूंना प्रणाम करतात. येथे असे समजून येते की प्रत्येक ग्रहाची अधिष्ठात्री देवता जेव्हा कधी आपल्या ग्रहावर उपद्रव निर्माण होतो, तेव्हा या विश्वाचे परम स्वामी ब्रह्मदेव यांना भेटू शकते आणि ब्रह्मदेव भगवान विष्णूंची भेट घेतात, पण ती प्रत्यक्षपणे नव्हे, तर क्षीरसागराच्या तटावर तीष्ठत राहुन! या विश्वात श्वेतद्वीप नावात चा एक लोक आहे. त्या लोकात क्षीरसागर आहे. अनेक वैदिक शास्त्रातून असे समजते की ज्याप्रमाणे या ग्रहावर खारट पाण्याचे समुद्र आहेत. त्याप्रमाणे इतर ग्रहांवर वेगवेगळे समुद्र आहे. काही ठिकाणी दुधाचे समुद्र आहे., काही ठिकाणी तेलाचे कोठे कोठे मद्याचे आणि असेच वेगवेगळे समुद्र आहेत. पुरुष सूक्त ही अशी एक आदर्श प्रार्थना आहे की देवता भगवान क्षीरोधकाशायी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी तिचे उच्चारण करतात. हे विष्णू भगवंत दुधाच्या समुद्रात बहु पडतात म्हणून त्यांना क्षीरोधकाशायी विष्णू असे म्हटले जाते.

देवतांनी पुरुष सूक्ताने भगवान विष्णूची स्तुती केली परंतु त्यांना काही प्रत्युत्तर मिळाले नाही नंतर स्वतः ब्रह्मदेव ध्यान करू लागले आणि तेव्हा विष्णूंकडून ब्रह्मदेवांना संदेश मिळाला तो संदेश ब्रह्मदेवांनी नंतर देवतांपर्यंत पोहोचविला वैदिक ज्ञान प्राप्त करण्याची हीच प्रक्रिया होय वैदिक ज्ञानप्रथमता भगवंतांकडून हृदयाच्या माध्यमातून ब्रह्मदेवांना प्राप्त झालेले आहे. श्रीमद् भागवतात प्रथमच म्हटले आहे तेने ब्रह्मदाय यादगवे अर्थात वेदांचे दिव्या ज्ञान हृदयातून ब्रह्मदेवांकडे संक्रमित करण्यात आले त्यानुसार येथेही भगवान विष्णू कडून प्राप्त झालेला संदेश केवळ ब्रह्मदेव समजू शकेल आणि तात्काळकृती व्हावी म्हणून त्यांनी तो संदेश देवतांपर्यंत पोहोचविला पूर्ण पुरुषोत्तम भगवान आपल्या परम प्रबळ शक्ती सहित लवकर धरतीवर अवतरी होत आहे आणि परित्राणायम साधूंना विनाशाय दृष्कृताम् हे आपले कार्य साधन करण्यासाठी जितका काळ ते या पृथ्वी ग्रहावर राहती तितका काळ देवतांनी देखील त्यांच्या साह्यार्थ येथे राहावे. त्या सर्वांनी त्वरित यदुवंशीय कुटुंबात जन्म घ्यावा आणि योग्य त्या समयी भगवंत ते देखील त्याच कुळात अवतरित होतील.

स्वयंपूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण वसुदेवांचे पुत्र म्हणून अवतरित झाले. त्यांच्या अवतरणापूर्वी, भगवंतांच्या कार्यात सहभागी होण्यासाठी आपल्या पत्न्यांसहित सर्व देवगन जगातील वेगवेगळ्या धार्मिक कुटुंबातून जन्माला आले येथे त्यात ‘ तत्पियार्थम् ‘ हा विशेष शब्द योजिलेला आहे. त्याचा अर्थ असा की भगवंताच्या प्रसन्नतेसाठी देवतांनी पृथ्वीवर जन्म घ्यावा दुसऱ्या शब्दात भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी जीवनयापन करणारा कोणताही प्राणी मात्र हा देवतांमध्येच मोडतो वरील संदेश सात देवतांना असेही समजले की जय भगवंताचे पूर्णांक आहेत तसेच आपल्या लक्षावधी फणांनी ते ब्रम्हांडातील ग्रहांना धारण करतात, ते अनंत देव देखील श्रीकृष्णांच्या अवतरणापूर्वीच अवतीर्ण होतील. तसेच सर्वबद्ध जीवांना भ्रमात टाकणारी विष्णूंची बहिरंगा शक्ती जी माया ती सुद्धा भगवंतांचा हेतू संपन्न करण्यासाठी अवतरीत होईल.
त्यानंतर भूमी सहित देवतांना आदेश देऊन आणि त्यांचे गोड शब्दांत सांत्वन करून प्रजापतींचे पिता ब्रह्मदेव भौतिक ब्रम्हांडातील सर्वोच्च ग्रह जो ब्रम्हलोक त्या आपल्या लोकात निघून गेले.

यदुवंश प्रमुख शूरसेन महाराज हे मथुरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्यावर आणि त्याचबरोबर शूरसेन जिल्ह्यावर राज्य करीत होते त्यांच्या राज्य शासनामुळे मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी बनली. यदुवंशातील कुटुंबे अत्यंत धार्मिक होती आणि जसे भगवान श्रीकृष्ण द्वारके शाश्वतपणे निवास करतात तसे मथुरेत देखील श्वास्वत निवास करतात याचे त्या सर्वांना ज्ञान होते. आणि मथुरा ही यदुवंशीय राजांची राजधानी होण्यास हे दुसरे कारण होते.

एके समय शूरसेनांचे पुत्र वसुदेव नुकतेच देवकी बरोबर विवाह झाल्यानंतर नववधू समवेत रथात बसून घरी चालले होते. देवकी चे पिता देवक यांनी प्रचूर हुंडा दिला होता, कारण आपल्या मुलीवर त्यांचा अत्यंत स्नेही होता. त्यांनी सुवर्णाने अलंकृत केलेले शेकडो रथ वसुदेवांना दिले होते. त्या समई उग्रसेनाचा पुत्र कंस यांने स्वेच्छेने आपली भगिनी देवकी हिच्या प्रसन्नतेसाठी वसुदेवाच्या रथाच्या घोड्यांचे लगाम हाती घेतले ,आणि तो रथ हाकू लागला जेव्हा मुलगी विवाहित होते तेव्हा तिच्या बंधूनी तिला आणि आपल्या मेव्हण्याला घरी पोहोचवायचे असते हा वैदिक संस्कृतीतील एक शिष्टाचार आहे नवविवाहित मुलीला आपल्या पितृ परिवाराचा फारच विरह होण्याची शक्यता असते आणि म्हणून बहिणीच्या सासर घरी पोहोचेपर्यंत भाऊ तिच्यासोबत जात असतो. राजा देवक यांनी वसुदेवांना पुढील प्रमाणे हुंडा दिला होता. सुवर्णहरांनी सजविलेले ४०० हत्ती, १५०० सजवलेले घोडे , १८०० रथ याशिवाय आपल्या करणे बरोबर जाण्यासाठी त्यांनी सुंदर अशा दोनशे मुलींची व्यवस्था केली होती. क्षत्रियांची विवाह पद्धती जी वर्तमान समई देखील भारतात प्रचलित आहे असे दाखविले की जेव्हा एक क्षत्रिय विवाह करतो तेव्हा वधूच्या वीस-पंचवीस तरुण मैत्रिणी देखील राजाच्या घरी जातात राणीच्या अशा अनुचर सखी दासी म्हणून ओळखण्यात येतात; परंतु त्या राणीच्या मैत्रिणी म्हणूनच वागत असतात ही प्रथा अनादी काळापासून चालत आलेली आहे आणि निधान ५००० वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या अवतरणापूर्वी तिचे अस्तित्व होते असे कळते. वसुदेवांनी आपल्या पत्नी समवेत २०० सुंदर स्त्री आपल्याबरोबर आणल्या.

नव वर वधू रथातून जात असताना मंगल सणांची सूचना म्हणून नानाविध संगीतवाद्य वाजत होती. त्यामध्ये शंख होते, शिंखे होते, ढोल होते, मृदंग होते, आणि सर्व मंगल बाते मिळून मधुर संगीताचा ध्वनी उत्पन्न होत होता. मिरवणूक अतिशय मनोरूपाने पुढे चालली होती, आणि कंस रथ भाकीत होता. अशावेळी आकाशातून आश्चर्यकारक आकाशवाणी ध्वनीत झाली; ती विशेषता कंसाला उद्देशून होती. कंसा तू अगदीच मूर्ख आहेस तू तुझ्या बहिणीचा आणि मेव्हण्याचा रथ हाकीत आहेस, परंतु याच बहिणीचे आठवे मूळ तुझा वध करील त्याची तुला जाणीव नाही.

Krushna janmache satya

कंस हा भोजवंशीय उग्रसेनाचा पुत्र होता. असे म्हटले आहे की , कंस सर्व भोजवंशीय राजांपैकी घोर आसुरी प्रवृत्तीचा होता. आकाशवाणी ऐकताच ताबडतोब त्याने देवकीचे केस पकडले आणि आपल्या तलवारीने तो देवकीला ठार मारण्याला प्रवृत्त झाला. कंसाचा स्वभाव पाहून वसुदेवांना आश्चर्य वाटले त्या क्रूर आणि निर्लज्ज मेहुण्याला शांत करण्याकरिता वसुदेव युक्तिवाद आणि प्रमाणासहित मोठ्या आणि विवेकाने बोलू लागले हे कंस तू तर भोज वंशाचा प्रसिद्ध राजा आहेस. तू एक सर्वश्रेष्ठ वीर आणि शौर्यवान राजा आहेस. हे सर्वश्रुत आहे, तू एका क्रोधाविष्ट झाला आहेस; की तू एका स्त्रीला आणि ती स्वतःची बहीण असताना तिच्या शुभविवाह प्रसंगी तिला ठार मारण्यास उद्युक्त आहेस. तू मृत्यूची इतकी धास्ती का घेतोस. तुझ्या जन्म सोबत तुझा मृत्यू जन्माला आला आहे. तू जन्म घेतला अगदी त्या दिवसापासून तुझी मरण्याची सुरुवात झाली आहे. समजा तू २५ वर्षाचा आहेस याचा अर्थ असा की २५ वर्ष तू मेला आहेस. प्रत्येक क्षणाला तू मरत आहेस. असे असताना तुला मृत्यूचे इतके भय का असावे? अखेर मृत्यू अवश्य येणार तू आज मृत्यू प्राप्त हो अथवा शंभर वर्षांनी परंतु मृत्यूपासून तू वाचू शकत नाहीस तुला इतके भय का असावे वस्तूत मृत्यू म्हणजे वर्तमान शरीराचा अंत जेव्हा वर्तमान शरीरसंचलित होत नाही. आणि पंचभौतिक तत्त्वांत विलीन होते. तेव्हा शरीरातील चेतन तत्व आपल्या वर्तमान कर्मविपाकानुसार दुसरे शरीर स्वीकार करते. जेव्हा कोणी रस्त्यावर चालतो तेव्हा तो आपले एक पाऊल पुढे टाकतो, आणि आपला पाय योग्य रीतीने टेकला आहे याचा विश्वास निर्माण होताच तो आपला दुसरा पाय उचलतो. अशीच ही प्रक्रिया आहे. या क्रमाने देह एकापाठोपाठ एक बदलतो. आणि आत्म्याचे ध्यान तर होते. पहा रोपट्यावरील किडे किती काळजीपूर्वक एका अंकुरावरुन दुसऱ्यावर जातातात ?त्याप्रमाणे श्रेष्ठ अधिकार ज्यावेळी पुढील देह ठरवितो त्याचवेळी जीव देह बदलतो. जितका काळ जीवाला या भौतिक जगात बध्द रहावे लागते तितका काळ त्याला एका मागून एक भौतिक देह द्यावेच लागतात. त्यांच्या वर्तमान जीवनातील कर्म व कर्मफळानुसार प्रकृतीच्या नियमाप्रमाणे त्याला दुसरा विशिष्ट देह देण्यात येतो.
हा देह देखील आपण नेहमी स्वप्नात पाहतो अगदी त्याप्रमाणे आहे. स्वप्नात आपण आपल्या मनोरचनेने अनेक देह निर्माण करतो. आपण सोने पाहिलेले असते आणि पर्वतही पाहिलेला असतो म्हणून दोघांना एकत्र करून स्वप्नात आपण सोन्याचा पर्वत पाहतो. कधी कधी आपण एक असा देह प्राप्त झाल्याचे पाहतो की तो आकाशात उडू शकतो आणि तेव्हा आपणाला वर्तमान देहाचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. अगदी त्याचप्रमाणे देह बदलतात एक देह प्राप्त होतास मागे देहाचा आपणाला विसर पडतो. स्वप्नात अनेक प्रकारच्या देहांशी आपला संबंध येऊ शकतो; परंतु जागृतव्यवस्थेत आपणाला सर्वांचा विसर पडतो आणि वस्तूतः तो हे भौतिक देह मानसिक कर्मांचेच सृजन आहे. परंतु वर्तमान क्षणाला आपण आपल्या मागे त्याचे स्मरण करू शकत नाही.
मनाचा स्वभाव चंचल आहे ते कधी एखादी वस्तू स्वीकारते तर तात्काळ त्याच वस्तूचा त्याग करते. रूप, रस, गंध, शब्द आणि स्पर्श या पाच इंद्रियविषयांच्या संबंधात सतत स्वीकार आणि अस्विकार अशी मनाची प्रक्रिया आहे. सतत भौतिक विषयांचे चिंतन हा मनाचा स्वभाव आहे. आणि त्यायोगे ते इंद्रियतृप्तीच्या विषयांच्या संपर्कात येते जीव जेव्हा एका विशिष्ट प्रकारच्या देहाची कामना करतो तेव्हा तो त्याला मिळतो म्हणून देह ही भौतिक प्रकृतीच्या नियमांची देणगी आहे. जीव देह धारण करतो आणि देह रचनेनुसार सुखदुःखांचा भोक करण्याकरिता पुन्हा या भौतिक जगात बाहेर पडतो. आपणाला विशिष्ट देह नसेल तर गत जीवनातील मानसिक अवस्थेनुसार आपण सुख अथवा दुःखाचा भोक करू शकत नाही. वस्तूचा आपल्या मृत्यू समयीच्या मानसिक अवस्थेनुसार हा विशिष्ट प्रकारचा वर्तमान देव आपणाला देण्यात आलेला आहे.
“सूर्य, चंद्र किंवा तारे यांसारखे प्रकाशमान ग्रह, जल, तैल घृत यांनी भरलेल्या पात्रात प्रतिबिंबित होतात. पात्र हलविण्याप्रमाणे प्रतिबिंबाची हालचाल होते चंद्राचे प्रतिबिंब पाडण्यात आलेले असते आणि पाण्याच्या संचलनामुळे चंद्र देखील हल्ल्याप्रमाणे वाटतो परंतु वस्तुतः चंद्र स्थिरच असतो त्याप्रमाणे मनोधर्माने जीव वेगवेगळ्या प्रकारचे देव मिळवितो आणि त्या अशा देहांशी वास्तविकपणे काही संबंध नसतो. मायेच्या संबंधाने मायेच्या प्रभावाखाली भुरळ पडून जीव स्वतःला एखादा विशिष्ट ध्येय समजतो. बुद्ध जीवाची अशी रीत आहे. उदाहरणार्थ जीव आता मानवी देयात आहे. तर तो स्वतः मानव समाजाचा घटक अथवा विशिष्ट देवासी किंवा स्नानवासी समजतो. स्वतःची अशी ओळख अंतकरणात बिंबल्यामुळे असा देवत भाव आवश्यकता नसताना नवीन देहाची तयारी होण्याला कारणीभूत ठरतो. अशा वाचना आणि मनोधर्म विविध देह प्राप्त होण्याची कारणे आहे. भौतिक प्रकृतीचा आवरणकारक प्रभाव माया हा इतका प्रबळ असतो की, जीवाला कोणताही देह प्राप्त होवो तो त्यामध्ये असंतुष्ट असतो. आणि त्या दिवशी वस्तूची ओळख करण्यात तो मोठ्या आनंदाचा अनुभव करतो. म्हणून आपल्याकडे मी प्रणती करतो की शरीर व मनाच्या संकेतावरून आदेशावरून विकारांच्या उव्देगात वाहून जाऊ नका.”
“अशा तऱ्हेने कंसाला आपल्या नवविवाहित बहिणीचा द्वेष न करण्याची वसुदेवाने विनंती केली कोणीही कोणाचा द्वेषी नसावे कारण द्वेष किंवा मस्तर हे हेही जगात आणि पुढे यमराजा समोर भीतीचे कारण ठरते वसुदेवांनी देव तिच्या बाजूने ती कंसाची लहान बहिण असल्याचे त्याला विनवून सांगितले. तसेच हा विवाहाचा मंगल प्रसंग आहे हे देखील विनवून सांगितले लहान भाऊ आणि बहीण यांचा सांभाळ मुलांप्रमाणे करणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. स्थिती फारच गंभीर आहे. वसुदेवांनी म्हटले जर तू तिला ठार करशील तर ते तुझ्या कीर्तीला कलंकित करणारे ठरेल.”
वसुदेवांनी सदुपदेश देऊन आणि तात्विक विधानान कंसाला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु कंस शांत होणारा नव्हता. कारण त्याला असुरांचा संघ होता. त्याचा जन्म एका श्रेष्ठ क्षत्रिय कुळात झाला होता. तरीही असुरी संगत असल्यामुळे तो नेहमी असुरी वृत्तीचा होता. असुराला सदुपदेशाबाबत काही कर्तव्य नसतेच तो एखाद्या सराई चोराप्रमाणे असतो. त्याला कितीही नैतिक उपदेश केला तरी ते परिणामकारक ठरत नाही. जे स्वभावच असुरी प्रवृत्तीचे किंवा नास्तिक असतात. त्यांना सदुपदेश फारसा रुचत नाही. मग तो उपदेश कितीही अधिकृत असो हाच सूर आणि असुरांतील भेद आहे. जे चांगला उपदेश स्वीकारू शकतात आणि त्यानंतर जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात त्यांना देवता किंवा सूर म्हटले जाते. परंतु जे असा सुदुपदेश धारण करण्यास अपात्र आहे. त्यांना असुर म्हटले जाते. कंसाला शांत करण्याचा प्रयत्न अपयश आल्याने आपली पत्नी देवकी हिचे रक्षण आपण कसे करणार याविषयी वसुदेव चिंतेत झाले. संकट अगदी जवळ येऊन ठेपले असताना बुद्धिमान मनुष्याने धोकादाय स्थिती शक्यतो टाळले असे वागावे. परंतु बुद्धिपणाला लावून देखील कोणाला संकट टाळता आले नाही तर तो त्याचा दोष नव्हे मनुष्याने कर्तव्य पार पाडण्याची पराकाष्टा करावी परंतु इतके करूनही प्रयत्न यशस्वी झाला तर त्यात त्याचा दोष नाही.

Krushna janmache satya

वसुदेव आपल्या पत्नी विषयी विचारू लागले प्रथम मला देवकीचा प्राण वाचू द्या पुढे भविष्यात मुले झाली तर त्यांना कसे वाचवावे ते मी नंतर पाहीन जर भविष्यात कंसाचा वध करणारे मुलं मला प्राप्त झाले आणि कंसही तोच विचार करीत आहे तर देवकी आणि मुलं असे दोघेही वाचले जातील मी तिचा नियम वंचित आहे. मात्र आता काहीही करून मला देवकीचे जीवन वाचविले पाहिजे.
जीवाचा एक विशिष्ट शरीराशी कसा संबंध येतो हे निश्चित नाही. अरण्यातील वनव्यात अग्नी कोणत्या प्रकारच्या लाकडाच्या संपर्कात येईल हे सांगता येत नाही. जेव्हा वनवा लागतो तेव्हा असे अनुभवयास येते की एका झाडाला अग्नी लागतो आणि वाऱ्यामुळे तो दुसऱ्या झाडाला पकडतो त्याप्रमाणे आपले कर्तव्य करण्यात प्राणी मात्र कितीही दक्ष असला तरीही पुढील जीवनात तो कोणत्या प्रकारचा देह मिळणार हे सांगणे त्याला अतिशय कठीण आहे. भरत महाराज आत्मसाक्षत्काराच्या मार्गात आपली कर्तव्य विश्वासाने पार पाडत होते. परंतु सहजगत्या त्यांचा एका हरणावर तत्कालीक स्नेह झाला आणि त्यांना पुढील जन्मात एका हरणाचा देह स्वीकारावा लागला.
कंस महापापी मनुष्य होता असे असूनही वसुदेवांनी आपल्या पत्नीचे प्राण कसे वाचवावे यावर विचार करून मोठ्या आदराने त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात केली. कधी कधी असे घडते की वसुदेवांसारख्या सर्वश्रेष्ठ नीतिमान पुरुषाला कंसासारख्या अतिदुराचारी मनुष्याचे स्तुती करावी लागते. सर्व कुटुणैतिक व्यापारांचा हाच मार्ग आहे. वसुदेव जरी अतिशय खिन्न झाले होते तरी त्यांनी बाहेरून स्वतःला खूप खूपच प्रसन्न असल्याचे दाखविणे त्यांनी निर्लक्ष कंसाला त्या प्रकारे संबोधित केले. कारण तो अतिशय निर्दयी होता वसुदेव कंसाला म्हणाले कंस माझा मेव्हणा आहेस तुझ्या बहिणीकडून तुला कोणतीही धोका नाही. असे कृपया समज तुझ्यावर भविष्यात संकट कोसळणार आहे. असे तुला वाटते कारण तू आकाशातून भविष्यवाणी ऐकले आहेस. परंतु संकटाची शक्यता तुझ्या बहिणीच्या पुत्राकडून आहे आणि त्यांचा सध्या जन्मही नाही, आणि कोण जाणतो भविष्यात कदाचित तिला पुत्र असतील अथवा नसतीलही या सर्वांचा विचार करता वर्तमान समय तरी तू सुरक्षित आहेच. तसेच तुझ्या बहिणीकडून भीतीचे कोणतेही कारण नाही. जर तिला पुत्र प्राप्त झालेच तर आवश्यक त्या कारवाईसाठी त्या सर्वांना मी तुझ्याकडे सुपूर्द करीन याबाबतीत मी वचनबद्ध आहे.
कंस हा वसुदेवांच्या शब्दांची किंमत जाणीत होता आणि त्यांच्या वचनावर त्याची खात्री पटली सत्य समय तरी तो स्वतःच्या बहिणीच्या वधासारख्या गृहीत कार्यापासून परावृत्त झाला. वसुदेवांना प्रसन्नता झाली. आणि कंसाच्या निर्णयाची त्यांनी स्तुती केली. अशा प्रकारे ते स्वसदनी परत आले.
कालांतराने वसुदेव- देवकी यांनी आठ बालकांना आणि त्याचबरोबर एका कन्येला जन्म दिला प्रथम बालकाचा जन्म होताच वसुदेवांनी वचनानुसार त्वरित त्या बालकाला कंसाकडे आणले अशी प्रसिद्ध आहे, की वसुदेव फारच संतवतीचे होते. आणि आपल्या वचनाबाबत प्रसिद्ध होते. त्यांना हा सन्मान जतन करायचा होता. नुकतेच जन्मलेले बालक कंसाकडे सुपूर्त केल्याने वसुदेवांच्या हृदयात अतोनात वेदना झाल्या परंतु कंसाला मात्र त्यामुळे अत्यानंद झाला वसुदेवांच्या स्वभावामुळे त्याच्या हृदयात काहीशी दया उत्पन्न झाली. ही घटना फारच आदर्श प्रत आहे. वसुदेवांसारख्या महात्म्या करिता कर्तव्यपालनात दुःखदायक समजण्यासारखे असे काहीच नाही. वसुदेवांसारखी व्यक्ती कोणताही संकोच न करता आपली कर्तव्य पार पाडतो. दुसरीकडे कंसासारखा असूर कोणतेही घृणित कार्य करण्यास कचरत नसतो. असे म्हटले आहे की, एक साधू पुरुष जीवनात येणारी सर्व प्रकारची दुःखे सहन करतो. एक विद्वान कोणत्याही अनुकूल परिस्थितीची वाट न पाहता आपली कर्तव्य पार पाडतो. कंसासारखा अघोरी मनुष्य कोणत्याही पापमय मार्गाने कृती करू शकतो, आणि भगवंताचा भक्त परमेश्वराला संतुष्ट करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकतो.
वसुदेवांच्या वागण्याने कंस प्रसन्न झाला. वसुदेवांनी आपले वचन पाळले त्याचे तो आश्चर्य करू लागला. वसुदेवांबाबत दया उत्पन्न झालेला आणि प्रसन्न झालेला कंस वसुदेवांना म्हणाला प्रिय वसुदेव हे मूल माझ्याकडे सुपूर्द करण्याची तुला आवश्यकता नाही. मला या मुलाकडून धोका नाही. देवकीचा आठवा पुत्र मला ठार मारी असे मी ऐकले आहे. मग अकारण मी या मुलाचा स्वीकार का करू तू त्याला परत घेऊन जा..

Krushna janmache satya

आपल्या पहिल्या जन्मलेल्या पुत्राला घेऊन वसुदेव घरी चालले होते. कंसाच्या वागणुकीमुळे त्यांना प्रसन्नताई झाली होती. परंतु तरीही कंसावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. कारण कंस कोणाच्याही नियंत्रणात नव्हता. नास्तिक मनुष्य कधीही वचनाशी दृढ असू शकत नाही. तो इंद्रियांचा संयम करू शकत नाही. तो आपल्या संकल्प आवर कधीही दृढ राहू शकत नाही. थोर राजनीति तज्ञ चाणक्य पंडित म्हणतात राजकारणी व्यक्ती आणि स्त्री यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. जे अननियंत्रित इंद्रिया तृप्तीला चटवलेले आहेत. ते कधीही सत्य वचने असू शकत नाही. आणि त्यांच्यावर विश्वासही ठेवला जाऊ शकत नाही.
अशावेळी कंसाच्या राज्यसभेत महर्षी नारदांचे आगमन झाले. कंसाने वसुदेवांवर दया दाखवली आणि त्याचे पहिले मूल परत दिले. याबाबत नारादांना कळविण्यात आले. महर्षी नारद तर शक्य तितक्या लवकर भगवान श्रीकृष्णाचे आगमन कसे होईल याबाबत उत्सुक होते. त्यांनी कंसाला सूचना दिली की ,एकीकडे वृंदावनात नंद महाराजांसारख्या व्यक्ती तसेच सर्व गवळी उपकन्या गवळ्यांच्या पत्न्या तर दुसरं दुसरीकडे वसुदेव यांचे पिता शूरसेन आणि यदुवंशाच्या वृष्णीकुळात जन्मलेले सर्व संबंधित भगवंताच्या आगमनाची तयारी करीत होते. नारदांनी कंसाला मित्र आणि हितचिंतक तसेच सर्व देवता ज्या ज्या कुळात जन्म घेत आहेत. त्या त्या कुळातील लोक यांविषयी सतर्क राहण्याचा इशारा दिला. कंस त्याचे मित्र आणि सल्लागार असे सगळेच असुर होते. असूरांना नेहमी देवतांची धास्ती असते वेगवेगळ्या परिवारात देवता जन्म घेत आहेत ही गोष्ट नारद मुनींकडून कंसाला समजली आणि कंस एकदम सतर्क झाला. त्याने जाणून घेतले की ज्या अर्थी देवी देवता अगोदरच प्रकट झाल्या आहेत. त्या आरती लवकरच विष्णूचे आगमन निश्चितच होणार. त्याने आपला मेव्हणा वसुदेव आणि देवकी यांना त्वरित अटक केली. आणि त्यांना कारागृहात टाकून दिले.
कारागृहात लोखंडी साखळ्या घातलेल्या अवस्थेतच प्रतिवर्षी देवकी व वसुदेव यांनी एका एका मुलाला जन्म दिला आणि त्यांच्यापैकी प्रत्येक मूल हे विष्णूचच आहे. असे समजून कंसाने एका मागून एक करीत त्या सर्वांना ठार केले. त्याला विशेषता आठव्या मुलाची भीती होती. परंतु नारदांच्या भेटीनंतर कोणतेही मूल विष्णू असू शकते. या निष्कर्षावर तो आला होता. म्हणूनच वसुदेव व देवकी यांची सर्वच मुले ठार मारणे त्याला योग्य वाटले.
कंसाचे ही कृत्य समजण्यास फारसे अवघड नाही. जगाच्या इतिहासात राजकुळातील व्यक्तींची असे अनेक उदाहरणे आहेत. की ज्यांनी आपल्या महत्वकांक्षाच्या कृतीसाठी आपले वडील, बंधू, कुटुंब व मित्र अशांना ठार मारलेले आहे. असुर प्रवृत्तीचा मनुष्य आपल्या विद्यांत अभिलाषेच्या कृती करिता कोणालाही ठार करू शकतो. म्हणून हे काही आश्चर्य करण्यासारखे नाही.
नारदांच्या कृपेने कंसाला त्यांच्या मागील जन्माची माहिती मिळाली होती. त्याला समजले की तो पूर्व जन्मात काल नेहमी नावाचा राक्षस होता. आणि त्याला विष्णूंनी ठार केले होते. भोज कुळात जन्म घेऊन त्याने यदुवंशाचा कट्टर शत्रू होण्याचे ठरविले. भगवान श्रीकृष्ण याच कुळात जन्म घेणार होते. आणि मागील जन्मात जसा काल नेहमी मारला गेला तसेच आपण श्रीकृष्णाकडून मारले जाऊ म्हणून कंस फारच भयभीत झालेला होता.
त्याने सर्वप्रथम आपले पिता उग्रसेन यांना बंदिस्त टाकले, कारण ते यदु ,भोज, अंधक यांच्यात प्रमुख राजा होते. तसेच वसुदेवांचे पिता शूरसेन यांचेही राज्य त्याने काबीज केले. आणि स्वतःला या सर्व प्रांताचा राजा घोषित केले.
अशा रीतीने ‘ कृष्ण, पूर्ण पुरुषोत्तम भगवान ‘ ग्रंथातील “श्रीकृष्णावतरण” नामक अद्यावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न

 

कृष्णचरित्र

Krushna janmache satya

यदुवंशाच्या वृष्णिकुलात कृष्णाचा जन्म झाला.वृष्णी हा यदुवंशातील भीम सात्वत याच्या चार पुत्रांपैकी एक पुत्र. भजमान, देवावृध, अंधक व वृष्णी या चार भावांमध्ये यादवांचे राज्य विभागले होते. अंधकाकडे मथुरा व तिच्या भोवतालचा परिसर होता. अंधकाचा पुत्र कुकुर. कुकुराच्या वंशातील आहुकाला देवक, उग्रसेन इ. पुत्र झाले. देवकाला चार मुलगे व सात मुली झाल्या. त्यांपैकी देवकी ही कृष्णाची माता होय. उग्रसेनाला नऊ पुत्र व पाच पुत्री झाल्या. उग्रसेनाचा सगळ्यात ज्येष्ठ पुत्र कंस होय. कंसाने आपला पिता उग्रसेन यास बंदिखान्यात टाकून मथुरेचे राज्य बळकावले. वसुदेव उग्रसेनाचा मंत्री होता. वृष्णी, अनमित्र, देवमीढुष, शूर आणि शूराचा वसुदेव अशा पिढ्या सांगितल्या आहेत. वसुदेवाची सख्खी बहीण ‘पृथा’ म्हणजे पहिल्या तीन पांडवांची माता कुंती होय. कुंती ही कुंतभोज राजाला दत्तक गेली होती. देवकाची कन्या देवकी ही वसुदेवाची पत्नी आणि कृष्णाची माता होय. वसुदेवाला देवकी, रोहिणी इ. सात भार्या होत्या.

वसुदेवाच्या विवाहाच्या अखेरीस वसुदेव व देवकी यांची रथावरून मिरवणूक निघाली. या रथाचे सारथ्य कंसाने आपली चुलत बहीण जी देवकी तिच्यावरील प्रेमामुळे केले. या मिरवणुकीच्या प्रसंगी आकाशवाणी झाली, की ‘कंसा तुझा शत्रू, तुझा वध करणारा, देवकीच्या पोटी जन्माला येणार आहे’. हरिवंशातील चरित्रात मात्र असे म्हटले आहे, की नारदमुनींनी कंसाचा आतिथ्यसत्कार स्वीकारल्यावर त्याला भविष्य सांगितले, की ‘देवकीचा आठवा गर्भ हा तुझा अंत करणारा होणार आहे’. वसुदेव हा उग्रसेनाचा मित्र असलेला मंत्री. त्याच्याबद्दल कंसाच्या मनात अढी होतीच. जरासंधाचा कंस हा जावई. जरासंध हा सर्व भारतवर्षातील सर्वश्रेष्ठ सम्राट, राजांचा राजा होता. त्याच्या पाठिंब्यावर कंसाने उग्रसेनाला म्हणजे आपल्या पित्याला पदच्युत करून सिंहासन बळकावले होते. कंस एका मोठ्या सम्राटाच्या पाठिंब्यामुळे अत्यंत उध्दट बनून त्याने प्रजेकडून जबरदस्त करभार वसूल करण्याचा सपाटा लावला. कंस यादवकुलीन होता. यादवांची विशेषतः वृष्णी आणि अंधक कुलांची गणराज्ये होती. स्वतः कंस गणांच्या संमतीने राजा न बनता आपल्या सासऱ्याच्या बळावर राजा बनला. त्यामुळे गणराज्याची पद्धत बिघडविल्या मुळे आणि जुलमी धोरण पतकरल्यामुळे कंसाविरुद्ध असंतोष माजला असावा आणि या असंतोषाचे प्रतिनिधी वसुदेवाचे दोन पुत्र बलराम आणि कृष्ण बनले, असा तर्क करण्यास बरीच जागा आहे.

वसुदेव हासुद्धा या असंतोषाच्या मुळाशी असावा.अनेक यादव कुले ही कृषी व गोपालन या व्यवसायांतील होती. पशुपालन व कृषिकर्म हे जोडधंदे, गंगा यमुनेच्या दुआबात भरभराटीस आले होते. भारी कारभारामुळे पशुपालन करणाऱ्या गणांमध्ये असंतोष माजला व नंदगोप हा वसुदेवाचा मित्र, कंसाचा गोपालक असूनही वसुदेवाच्या पक्षाला येऊन मिळाला. मथुरेच्या तीरावर ‘व्रज’ म्हणजे गोकुळ होते. ही विपुल समृद्धी मिळालेली व्रज्रभूमी होती. नंदगोपाकडे वसुदेवाने आपली दुसरी पत्नी रोहिणी ही सुरक्षिततेकरिता पाठविली होती.

आकाशवाणी वा नारदाची भविष्यवाणी ऐकल्यावर कंस भडकला आणि तो देवकीचा वध करण्यास उद्युक्त झाला. वसुदेवाने त्याची समजूत घातली व स्त्रीवधापासून त्याला परावृत्त केले, असे भागवतात म्हटले आहे. हरिवंशात ही मिरवणुकीतील आकाशवाणी सांगितली नाही. तेथे असे म्हटले आहे, की नारदाची भविष्यवाणी लक्षात ठेवून कंसाने वसुदेवाच्या घरावर गुप्त रक्षक ठेवले त्यांत स्त्रियाही होत्या. देवकीला संतती झाल्याबरोबर कंसाला संदेश येई आणि त्याप्रमाणे तो नवप्रसूत बालकाचा ताबडतोब वध करून निकाल लावी. अशी सहा बालके त्याने नष्ट केली. सातवा गर्भ उदरात आल्याबरोबर देवकीच्या गर्भाशयातून ओढून घेऊन योगनिद्रादेवीने तो रोहिणीच्या गर्भाशयात ठेवला. तोच बलराम म्हणून जन्मला. त्याचे जन्मनाव ‘संकर्षण’ होय. एकीकडून ओढून दुसरीकडे नेलेला म्हणजे ‘संकर्षण’ होय. आठवा गर्भ म्हणजे साक्षात विष्णूने मानवशरीर धारण केलेला कृष्ण होय. हा प्रसूतिकाली चतुर्भुज विष्णूच्या रूपाने देवकीपुढे प्रगट झाला परंतु देवकीच्या प्रार्थनेने त्याने पुन्हा नवजात बालकाचे रूप धारण केले. हा श्रावण कृष्ण अष्टमीस मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर किंवा अभिजित नक्षत्रावर जन्मला.

यावेळी भागवतात सांगितल्याप्रमाणे वसुदेव व देवकी यांच्या पायांत लोखंडी बेड्या कंसाने अडकविल्या होत्या, त्या एकदम निखळून त्यांचे पाय मोकळे झाले. हरिवंशाप्रमाणे बेड्या घातल्याच नव्हत्या. वसुदेवाने मध्यरात्रीच या बालकाला नंदगोपाच्या गोकुळात नेले. नंदगोपाची पत्नी यशोदा नुकतीच बाळंतीण झाली होती तिला मुलगी झाली होती. ती मुलगी वसुदेवाने उचलली, बालकृष्णाला तिच्या कुशीत झोपविले व तिच्या कन्येला घेऊन परत सूर्योदयाच्या आत तो मथुरेत स्वगृही परतला. भागवतामध्ये हा प्रसंग अधिक अद्भुतरम्य करून वर्णिला आहे.

Krushna janmache satya

कृष्णजन्माच्या वेळी भर पावसाळा सुरू होता, यमुना दुथडी भरून वाहत होती, तिने दुभंगून वसुदेवाला वाट दिली, असे तेथे म्हटले आहे. सकाळी कंसाला देवकी प्रसूत झाल्याची वार्ता मिळाली.वसुदेवाने आणलेली यशोदाकन्या त्याच्या हाती लागली. त्याने तिला शिळेवर आपटण्याकरिता उचलले. तोच ती त्याच्या हातातून निसटून तिने आकाशात आपले संपूर्ण शारदादेवीचे रूप प्रगट केले आणि कंसाला सांगितले, की ‘तुझा शत्रू अन्यत्र वाढत आहे’. ही योगनिद्रादेवी यशोदेच्या गर्भात आली, कंसाच्या हातून निसटली, विष्णूच्या वरदानामुळे विंध्यवासिनी देवी बनली आणि सर्व मानवांना पूजनीय, विघ्ननाशिनी व सर्वकाम प्रदायिनी बनली, असे सर्व पुराणांतल्या कृष्णचरित्रांत सांगितले आहे.

याचा अभिप्राय असा, की वासुदेव भक्तिसंप्रदायाने किंवा वैष्णव संप्रदायाने देवीपूजेचा वेदपूर्व धर्म मान्य केला.

 

श्री स्वामी समर्थ

काळजी करू नका, स्वामी आपल्यापाठीशी आहे

 

Exit mobile version