Site icon

Gurucharitra falshruti aani mahiti

श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायतील फलश्रुती

 

gurucharitra falshruti aani mahiti

अध्याय १:- नित्य गुरुचिन्तनाने संपूर्ण जीवन समृद्ध होते.

अध्याय २:- कलीबाधा व सर्व रोगबाधा नाहीशी होतात.

अध्याय३:- गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते.

अध्याय ४:- स्त्रीछलणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते.

अध्याय ५:- शाररिक व्यंगे नष्ट होतात. ज्ञानाची प्राप्ती होते.

अध्याय ६:- दैवी कोप दूर होतो. व विद्याप्राप्ती होते.

अध्याय ७:- पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात.

अध्याय ८:- बुध्दिमांद्य नाहिशे होतात. विवाह कार्य सुलभ होते.

अध्याय ९:- सर्व शुभ कामना गुरुकृपेने पूर्ण होतात.

अध्याय १०:- नवस फळाला येतात. चोरीचा आळ दूर होतो.

अध्याय ११:- वाचंदोष तसेच,वेड नाहीसे होते.

अध्याय १२:- संकटे, दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते.

अध्याय १३:- सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात.

अध्याय १४:- प्राणघातक गंडातरापासून स्वरक्षण लाभते.

अध्याय १५:- तिर्थयात्रांना सफलता प्राप्त होते.

अध्याय १६:- आदरणीयची निंदा, अपमान केल्याचा दोष दूर होतो.

अध्याय १७:- ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो.

अध्याय १८:- संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहिशे होते.

अध्याय १९:- भाग्य वृद्धी होते. सद्गुगुरूंचा लाभ होतो. त्रीस्थळी यातरपुण्य लाभते.

अध्याय २०:- गुरूस्मरण करुनी मनी, पूजा करी वो गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मासमंध परिहरेल!!

अध्याय २१:- मृत्यूभयापासून मुक्तता .

अध्याय २२:- वांझपण दूर होते. बाळणतिनिला चांगले दूध येते.

अध्याय २३:- पिशाच्चबाधा नष्ट होते. राजमान्यता प्राप्त होते.

अध्याय २४:- भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते.

अध्याय २५:- अपात्र लोकांचा संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात.

अध्याय २६:- शत्रू निषभ्रम होऊन शरण होतात.

अध्याय २७ :- गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते. विद्दानाचा छळ दोषांची निवृत्ती.

अध्याय २८:- वाईट कर्माचे दोष दूत होतात , सप्तथ सापडतो.

अध्याय २९:- स्त्रीछलदोष , वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते.

अध्याय ३०:- कुमारिकांना इच्छित पतीचा प्राप्ती होते. सौभाग्य वृद्धी होते.

अध्याय ३१:- पतीवर येणारे विघ्ने टळतात.

अध्याय ३२:- वैधव्याचे दुःख टळते. अथवा सुसह्य होते.

अध्याय ३३:- वचनभँग व व्यभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते.

अध्याय ३४ :- प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते.

अध्याय ३५ :- हरवलेले , नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तूटलेले संबंध जुळतात.

अध्याय ३६:- चूकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते.

अध्याय ३७:- मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मा प्राप्ती होते.

अध्याय ३८:- निदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते.

अध्याय ३९:- सद्गुगुरु ची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो .

अध्याय ४०:-कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते.

अध्याय ४१:- सद्गुगुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग.

अध्याय ४२:- विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारिला यश येते.

अध्याय ४३:- गर्व व क्रोध नाहीसा होऊन एशवर्या ची प्राप्ती होते.

अध्याय ४४:- मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो.

अध्याय ४५:- कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते. बुद्धी वाढते.

अध्याय ४६:- चिंताची स्थिरता लाभते. ज्ञानाची प्राप्ती होते.

अध्याय ४७:- पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वबुद्धी प्राप्त होते.

अध्याय ४८:- गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते.विघ्ने टळते.

अध्याय ४९:- तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो. सर्व पापांचे समान होते.

अध्याय ५०:- ग्रँथी रोग , त्वचारोग नष्ट होऊन शरीरसुख लाभते.

अध्याय ५१:- सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते.

अध्याय ५२ :- श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते.

gurucharitra falshruti aani mahiti

भक्ती, मुक्ती परमार्थ । जे जे वांछि मनी आर्त ।। त्वरित होय साद्यंत । गुरुचरित्र ऐकता ।।

 

 

स्वतःवर दाखवलेला आत्मविश्वास अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवू शकतो

 

gurucharitra falshruti aani mahiti :आपले व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट जी लागत असेल ती म्हणजे स्वतःवरचा आत्मविश्वास. या एका कौशल्यामध्ये इतकी ताकद आहे की जर तुमचा स्वतःवरचा विश्वास दृढ असेल तर अन्य कौशल्ये आत्मसात करणे सहज सोपे होते. स्वतःवर दाखवलेला आत्मविश्वास अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवू शकतो तर स्वतःवर दाखवलेला अविश्वास सहज आणि सोप्या गोष्टी सुध्दा एखाद्यासाठी कठिण बनवू शकतो. त्यामुळे स्वतःवरील आत्मविश्वास वाढवणे फार महत्त्वाचे आहे.

तो वाढवण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हे आपण आजच्या लेखात पाहणार आहोत.

 

(१) आपली ऊर्जा दूसर्‍याला प्रभावित करण्यासाठी घालवू नका.

आपण जे आहोत ते आहोत उगाच दूसर्‍याला प्रभावित करण्यासाठी किंवा खुष करण्यासाठी आपण कोणीतरी दूसरे असल्यासारखे वागू नका. जर आपण जसे आहोत तसे इतरांनी आपल्याला स्विकारावं असं तुम्हाला वाटत असेल तर पहिलं तुम्ही स्वतःला जसे आहात तसं स्विकारलं पाहिजे. कारण आपण प्रत्येक वेळी मुखवटा घालून फिरु शकत नाही, कधीकधी ना कधी हा मुखवटा गळून पडतोच. आपण जसे आहोत तसे कदाचित सर्वांना आवडणार नाही किंवा आपल्या मुखवट्याप्रमाणे त्याला प्रशंसा मिळणार नाही. पण आपल्याला हे विसरुन चालणार नाही की प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते आणि आपण प्रत्येकाला खुष करु शकत नाही. एखाद्याला प्रभावित करण्यासाठी आपण जे नाही ते दाखवण्याच्या प्रयत्नात आपण आपलाच आनंद नष्ट करत असतो. त्यापेक्षा आपण जसे आहोत तसेच सर्वासमोर आलो तर आनंदाबरोबरच आपला स्वतःवरचा आत्मविश्वास देखिल वाढतो.

(२)आपला आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतील अशा व्यक्तिंच्या सहवासात रहा.

आपण जशा लोकांच्या सानिध्यात राहतो त्याप्रमाणे आपले व्यक्तिमत्व बनते. इतर लोक ज्यांचा आदर करतात अशा लोकांच्या सहवासात राहीलात तर तुम्ही आपोआपच इतरांच्या आदरास पात्र ठराल. जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व सुधारायचे असेल तर अत्यंत हुशारीने आपण कशा माणसांसोबत वेळ घालवावा हे आपल्याला ठरवावं लागेल. असे केल्याने तुमच्या सवयी सुधारतीलच पण आत्मविश्वास देखिल वाढेल.

(३)आत्मविश्वास वाढवण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.

नकारात्मक विचार नकारात्मकता वाढवतात. नकारात्मक विचार असे आहेत जे आपण ज्याच्याबद्दल नकारात्मक आहोत त्याला कमी आणि आपल्याला जास्त हानिकारक ठरतात. त्यामुळे दूसर्‍याबद्दल आणि स्वतःबद्दल नकारत्मक विचारांना आपल्या मनात थारा कधीच देवू नका. त्यापेक्षा विचारांमध्ये सकारात्मकता आणून वाईटाला चांगल्या गोष्टीमध्ये, दू:खाला सुखामध्ये बदला.

(४)दूसर्‍यांसाठी जगा, त्यांच्या आनंदात आनंदी रहा.

नि:स्वार्थ भावना आपल्यामध्ये आनंद आणि आत्मविश्वास वाढवते. स्वार्थीपणा आपल्यातील माणूसकीला जगायला वाव देत नाही. आपल्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात झालेला चांगला बदल किंवा आलेला आनंद आपल्याला आत्मविश्वास आणि आपल्या कामाप्रति समाधान देऊन जातो. एखाद्याचे आयुष्य आपण योग्य मार्गाला वळवू शकलो या गोष्टीमुळे आपल्या स्वतःवरच्या आत्मविश्वाला बळ मिळते.

(५)आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी वेळेची मदत घ्या, वेळ वाया घालवू नका.

दूसरी कोणतीही व्यक्ति तुम्हाला कमी समजू शकत नाही जर तुम्ही स्वतःवर खुप मेहनत घेत असाल आणि स्वतःला कमी समजत नसाल. तुम्ही जे काम करताय त्यामुळे तुमच्या जगण्याला अर्थ आहे असे तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही समाधानी होऊ शकता. जर तुम्ही वेळ वाया न घालवता तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीवर तुमचा वेळ आणि कष्ट खर्च करत असाल तर तम्हाला पश्वात्ताप होणार नाही. जर तुमच्या वेळेला आणि जगण्याला अर्थ यावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला चांगले काम केले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल मग त्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरी ते करा. लक्षात ठेवा चांगले काम आत्मविश्वास आणि आळस पश्वात्ताप देतो.

(६)स्वतःची दया काढणे आणि स्वतःची माफी मागणे थांबवा.

आपल्या कडून चूक होईल म्हणून काम न करण्याची कारण देणे चूका करण्यापेक्षा अधिक वाईट आहे. स्वतःच्या कामासाठी, चूकांसाठी स्वतः जबाबदारी घ्या. काम न करण्यासाठी कारणं देऊ नका, दूसर्‍याकडून सहानभूतीची अपेक्षा ठेवू नका. आपण स्वतःला घालून दिलेल्या चौकटीच्या बाहेर पडून जेव्हा तुम्ही काहीतरी कराल तेव्हा तुमचा स्वतःवरचा आत्मविश्वास वाढेल.

(७)नकार द्यायला शिका.

तुम्हाला जे सांगितलय ते सर्व करण्यासाठी तुम्ही बांधिल नाही आहात हे लक्षात घ्या. खासकरुन अशा गोष्टी ज्यामुळे तुमचा स्वाभिमान दूखावला जाईल किंवा दूसर्‍याला त्याचा त्रास होईल. … कधी कधी एखाद्या गोष्टीला नकार देणे ती गोष्ट निमूटपणे करण्यापेक्षा योग्य असते. त्यामुळे लक्षपूर्वक आपली कामे करा आणि नकार द्यायला शिका.

(८)जिथे बोलायची गरज असेल आणि आपल्याबोलण्याने एखाद्याची मदत होणार असेल तिथेच बोला.

जिथे गरज नाही किंवा आपल्या बोलण्याने काहीच फरक पडणार नाही तिथे शांत राहीलेले कधीही चांगले. असं म्हणतात बोलण चांदी प्रमाणे असेल तर शांत राहणे सोन्याप्रमाणे आहे. योग्य ठिकाणी आणि योग्य ते बोलणे हुशारीचे लक्षण आहे. जर तुम्हाला तुमचे बोलणे काहीतरी बदल घडवून आणणारे किंवा स्वतःचा आत्मविश्वास वाढवणारे वाटत नसेल, तर शांत रहा.

(९)जे आपल्याला गैरसोयीचे किंवा त्रासदायक वाटते अशी कामं करण्यासाठी लाजू नका.

यश आणि तुमच्यामध्ये नेहमी भीती उभी असते. अशा वेळी थोडीशी हिंमत दाखवून एखादी गोष्ट करुन पहा कारण अनुभव अपयशापेक्षा कधीही महत्त्वाचा असतो. जितकी जास्त तुम्ही अशी कामं कराल ज्याची तुम्हाला भीती वाटते तितकी तुमची भीती कमी होईल आणि अशा गोष्टींना सहज हाताळण्याची क्षमता वाढेल. आणि स्वतःवरचा आत्मविश्वास देखिल वाढेल.

(१०)आत्मविश्वास वाढवण्यासाठी वाचा आणि आपले ज्ञान वाढवा.

माणसाची खरी संपती त्याच्याजवळ असलेलं ज्ञान आहे. नवीन गोष्टी शिकण्यासाठी नेहमी उत्सुक रहा. तुम्ही एखाद्याला तुमचा मुद्दा तेव्हाच पटवू शकता जेव्हा तुमच्या जवळ ज्ञान आणि अनुभव असेल. जर तुम्हाला स्वतःचा आत्मविशवास वाढवायचा असेल तर जास्तीत जास्त ज्ञान आणि अनुभव असणे फार महत्त्वाचे आहे.

(११)व्यायाम करा आणि शरिराची काळजी घ्या.

निरोगी मनासाठी निरोगी शरीर गरजेचे असते. तुमचा जर तुमच्या शरीरावर विश्वास नसेल तर तुम्ही इतरांमध्ये स्वतःवर आत्मविश्वास दाखवू शकत नाही. योग्य शरीर यष्टी आत्मविश्वास वाढवते. त्यामुळे व्यायाम करा आणि आपल्या शरीराची काळजी घ्या. व्यायामामुळे शरीरयष्टी सुधारते आणि त्यामुळे स्वतःवरचा आत्मविश्वास वाढतो.

(१२)आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःचा आदर करा.

gurucharitra falshruti aani mahiti  एकांतातसुध्दा स्वतःला अशी वागणूक द्या जशी तुम्हाला इतरांनी द्यायला आवडेल. स्वतःचा आदर करा. खरा आत्मविश्वास तेव्हा येतो जेव्हा तुम्ही स्वतःसमोरच आत्मविश्वासाने उभे असाल. इतरांकडून आदराची अपेक्षा करण्यापूर्वी स्वतःला स्वतः आदर द्या. अयोग्य आणि वाईट गोष्टी करुन आपला आदर घालवू नका. स्वतःच स्वतःच्या नजरेतून उतरले जाऊ असे कोणतेही काम करु नका. इतरांकडून विश्वास आणि आदर हवा असेल तर प्रथम स्वतःवर विश्वास दाखवा आणि स्वतःचा आदर करा

स्वभाव म्हणजे रंगांची पेटी कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल, याचा अंदाज बांधता येत नाही, फक्त स्व:ताचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी जास्त काळजी घेतली की मग आपले रंग देखील खूप छान खुलतात.

“सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो, काहींना ओंजळभर मिळते, तर काहींना रांजणभर, पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला” “दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच. फक्त थोड़ी वाट पहायची असते.

सहनशीलता आणि संयम याला कोणाची कमजोरी मानू नये, ती ताकदीची लक्षणे आहेत. संयम ही एक अशी सवारी आहे जी आपल्या स्वाराला कधीही पडू देत नाही. संयमाने हरलेली लढाई पण जिंकता येते.

सगळेच धडे शालेय पाठ्यपुस्तकातून, शिकायला मिळतात असे नाही, तर काही धडे.नाती, जिवलग मित्र, आणि समाजाकडूनही, शिकायला मिळतात. आयुष्यात तुम्ही कीती आनंदी आहात, याला महत्व नसून, तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत. हे बघणे जास्त महत्वाचे असते.!!

येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा, की संकटाला येण्यासाठी आधी विचार करावा लागेल. “आनंदी राहण्याचा साधा सरळ एकच उपाय आहे,अपेक्षा स्वतःकडून ठेवा समोरच्याकडून नाही..!

सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. लोकशाही व संविधानचे रक्षण करा ..!!!

एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका, वाद वाढऊ नका, दुसऱ्याच्या वहीवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे .!!!

समाजातील खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, खोट्या अफवानवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.!!!

“प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा”!!!

 

श्री स्वामी समर्थ

काळजी करू नका स्वामी आपल्यासोबत आहे

Exit mobile version