दिवाळीतील लक्ष्मीपूजन (वर्ष २०२३)
Diwali
यावर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजन दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ (रविवार) सायंकाळी ०५ वाजून ५९ मिनीटांपासून रात्रौ ८ वाजून ३३ मिनीटे या कालावधीत मुहूर्तानुसार आहे (एकूण कालावधी २ तास ३४ मिनिटे) हा आहे. यात संध्याकाळी ०५.५९ ते संध्याकाळी ०७.३५ या कालावधीत “शुभ” चौघडी असल्याने तो कालावधी शुभ आणि अनुकूल आहे ( १ तास ३६ मिनिटे) शुभ ही चौघडी शुभता आणि मांगल्य दर्शविते.
शक्यतो आपल्या घरातील लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी ०५.५९ ते ०७.३५ याच काळातच करावे ही नम्र विनंती. संध्याकाळी ०७.३५ नंतर रात्री ०९.११ पर्यंतच्या काळात अमृत ही शुभ चौघडी असल्याने त्याकाळात पूजन केले तरी चालेल. अधिक शुभत्व लाभासाठी मी संध्याकाळी ६.१२ पासून सुरु होणारे वृषभ हे स्थिर लग्न जास्त महत्वाचे मानतो त्यामुळे माझ्या अभ्यासानुसार लक्ष्मीपूजनाचा अधिकाधिक लाभ मिळण्यासाठी संध्याकाळी ६.१२ ते ७.३५ हा कालावधी जास्त शुभ आहे.
या पूजनाचे धार्मिक, आध्यात्मिक व व्यावहारिक मूल्य शब्दातीत आहे. इथे लक्ष्मी ही केवळ पैसा, धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसून ती “श्री” या संकल्पनेवर आधारित आहे. श्री म्हणजे धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धि, यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य या सर्वगुणसंपन्न अर्थाने येणे किंवा तिचे आगमन होणे अपेक्षित आहे. धनाइतकीच मनःशांती हीच खरी लक्ष्मी आहे.
या काळात शुचिर्भूतपणे श्रीमहालक्ष्मीच्या तसबिरीची किंवा मुर्तीची उत्तम चौरंगावर सुशोभित मांडणी करुन पूजन करावे. सोबत धन, सुवर्ण, बॅन्केची पासबुके, सर्टिफिकेट, नाणी यांचीही पूजा करावी. पूजा पंचोपचार केली तरी चालेल (म्हणजे स्नान, धुप, दीप, गंध आणि नैवेद्य).मनातील भाव हा कृतज्ञतेचा, श्रध्देचा असावा. बरेचदा श्रीलक्ष्मीपूजन करताना अनवधानाने श्रीविष्णूंचे स्मरण-प्रार्थना करणे राहुन जाते. श्रीमहालक्ष्मी तत्वाचं वैशिष्ठ्य म्हणजे जिथे विष्णूंचे स्मरण-प्रार्थना होते त्या ठिकाणी तिचा निवास रहातो. कारण ती विष्णुंशिवाय रहात नाही. त्यामुळे तिची पुजा अर्चना करण्याआधी विष्णूदेवांचे स्मरण करणे क्रमप्राप्त आहे हे विसरु नका…नुसते मानसिक स्मरण केले किंवा
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥ हा मंत्रजप ११ वेळा करा तरी चालेल
घरांतील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे..पूजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासुन करावेत. पण लक्ष्मीपूजनासाठी काही प्रभावी मंत्र पुढीलप्रमाणे आहेत. त्यांचा जप प्रत्येक मंत्राचा किमान १०८ वेळा तरी पूजनप्रसंगी करावा. काही मंत्र तंत्रोक्त आहेत तर काही पुराणॊक्त किंवा स्तोत्रातील आहेत. मंत्रजप हा शक्यतो पूजन झाल्यानंतर करावा. खाली दिलेल्या सर्वच मंत्रांचा जप करणं जमेल असं नाही पण निदान त्यातील दोन मंत्रांचा जप तरी प्रत्येकी १०८ वेळा करावा.जप झाल्यानंतर प्रार्थना करावी. या लेखात जे गुण लिहिले आहेत त्यांची (धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ति, सत्ता, आरोग्य, समृद्धी , यश, प्रतिष्ठा, मानसन्मान, लोकप्रियता, दीर्घायुष्य) प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करावी. नैवेद्य दाखवुन प्रसाद घरातील मंडळींना वाटावा.ज्यांना जमत असेल, येत असेल त्यांनी मंत्रजपानंतर “श्रीसूक्त” किंवा महालक्ष्मी_अष्टक” यांचेही पाठ करावेत.
महत्वाचे:- जर तुम्ही श्रीलक्ष्मीपूजन करणार असाल तर त्यादिवशी मांसाहार, मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक, अश्लाघ्य आणि अशुभ कृत्य करु नये. त्या दिवशी वादविवाद करु नये. दिवसभरात जमेल तेव्हा अन्नदान करावे. सुवासिनीची ओटी भरावी. कुलदेवतेचे स्मरणचिंतन करावे. (लक्ष्मीपूजनाचे वेळी घरच्या ओटीवर/अंगणात दिवे प्रज्जवलित असावेत)
श्रीलक्ष्मीदेवीचे काही प्रभावी मंत्र:- (यापैकी सर्व मंत्रांचा/किमान दोन मंत्रांचा तरी जप प्रत्येकी १०८ वेळा करावा. उच्चार करणे अजिबात शक्य नसेल तर निदान प्रार्थना तरी करावी.
Diwali
१) ॥ ॐ श्रीं नम: ॥ (यात श्री या शब्दावर अनुस्वार आहे त्यामुळे श्रीम असा उच्चार करावा)
२)॥ ॐ श्री महालक्ष्मी देव्यै नम: ॥
३) ॥ ॐ महालक्ष्मैच विद्महे, विष्णुपत्नैच धीमही, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ॥
४)॥ ॐ ह्रीम पद्मे स्वाहा ॥
५) ॥ ॐ श्रीम ह्रीम श्रींम कमले कमलालये, प्रसीद प्रसीद, श्रीम ह्रीम श्रीम ॐ महालक्ष्मै नम: ॥
६) ॥ ॐ या देवी सर्वभुतेषु लक्ष्मीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै, नमस्तस्यै नमो नम:॥
७) ॥ ॐ आदी लक्ष्मी नमस्तेsस्तु, परब्रह्म स्वरुपिणी, यशो देही, धनं देही, सर्व कामांश्च देही मे ॥
तर आपण अत्यंत श्रध्देने आणि वर दिलेल्या शुभपर्वकालात अवश्य श्री महालक्ष्मीपुजन करा. मंत्रजप करा, प्रार्थना करा आणि एक श्रीमंत-समृध्द-ऐश्वर्यसंपन्न व आरोग्यसंपन्न मन:शांतीयुक्त जीवनाचा आनंद तुम्हाला प्राप्त होवो हीच सदिच्छा.
आपल्या हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण येतोय दीपावली, ज्याला आपण दिवाळी म्हणतो
Diwali
परंतु ३०% लोकांनाच माहीत आहे की दिवाळी हा सण का साजरा केला जातो. बाकी ७०% तर फक्त लहानपणापासून असे समजतात की फक्त दिवे लावणे, फराळ, आणि फटाके फोडणे, लक्ष्मी पूजन करणे, बस हीच आहे दिवाळी. असो काही हरकत नाही.
आज मी सांगणार आहे की दिवाळी कां साजरी केली जाते आणि दिवाळीला प्रभु श्रीराम यांच्या जागी महालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा कां केली जाते.
हा सण हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे. या दिवशी प्रभु श्रीराम, बंधू लक्ष्मण आणि सितामाता यांच्यासोबत १४ वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते. अयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळले की प्रभु श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत तेव्हा पूर्ण अयोध्ये मधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्या पासूनच रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या सजवली होती.
जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला त्याच्या बरोबर २१ दिवसांनी श्रीराम हे अयोध्येत पोहोचले होते तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो. म्हणजे लाखो वर्षांपासूनची ही परंपरा अजूनही हिंदू बांधव साजरी करतात.
दिवाळी हा सण ५ दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व आहे.
१:- पहिला दिवस धनत्रयोदशी
पूर्वीच्या मान्यते नुसार सगळ्या देवांनी असुरां सोबत समुद्रमंथन केलं होतं तेव्हा समुद्रातून १४ रत्न निघाले. याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी. आपल्या पंचांगानुसार पितृपक्षाच्या १३ दिवसांनंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रातून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत. त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली. त्यादिवसांपासून या दिवसाला धनतेरस, धनत्रयोदशी असे नांव पडले आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो.
२:- दुसरा दिवस नरकचतुर्दशी.
एके काळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता, त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो. पुढच्या जन्मात भूमिदेवीने सत्यभामाच्या रूपात अवतार घेतला, सत्यभामेचे लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झाले. त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला. तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरकचतुर्दशी या नावाने ओळखलं जातं.
३:- तिसरा दिवस लक्ष्मीपुजन.
देव आणि दैत्य जेव्हा समुद्र मंथन करत होते तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली होती. तेव्हापासून त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश, सुख आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मी यांची पुजा होते.
दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश यांची सुध्दा पुजा होते. पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माता पार्वतीचे २ पुत्र होते.
लक्ष्मीने पार्वतीजवळ श्री गणेश यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली. पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही. मग गणपतीची काळजी ती कशी घेईल. याच्यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जाईन तिथे गणपतीला सोबतच घेऊन जाईन. म्हणून तेव्हापासून जिथे लक्ष्मीची तिथे गणपतीची सुध्दा पुजा होते.
खरंतर दिवाळीच्या दिवशी श्रीराम अयोध्येत आले होते परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पुजा होते. पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णू हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत. त्यामुळे श्रीराम यांची पुजा केली जात नाही.
४:- अश्विन अमावस्येला लक्ष्मीपुजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा
हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो. साडे तीन मुहूर्तांपैकी एक हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. अक्षयतृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे. यादिवशी सोने खरेदी, सुवासिनी कडून पतिला ओवाळले जाते. असे खूप काही महत्त्व आहेत. व्यापारी लोकांचे नविन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते.
हिशोबाच्या नविन वह्या ज्याला खतावणी म्हणतात त्यांचे पुजन करून नवीन सुरूवात केली जाते.
कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो.
५:- पाचवा दिवस गोवर्धन पुजा.
रामायणानुसार जेव्हा श्री राम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते तेव्हा सगळे वानर हे आपापल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते तेव्हा हनुमानजीनी हा सेतू बांधण्यासाठी गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता. परंतु ते यायच्या आतच सेतूचं काम झालं होतं. सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं. श्री राम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील. आणि हनुमंताला सांगितले की हा पर्वत पुन्हा त्या जागी ठेवून ये. पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी कृष्ण अवतार घेतला तेव्हा गावातील लोकांना गोवर्धनाची पुजा करण्यास सांगितली.
याला नाराज होऊन इंद्राने गोवर्धन पर्वतावर आक्रमण केले. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला. तेव्हापासून गोवर्धनाची पुजा केली जाते.
६:- सहावा दिवस भाऊबीज
यादिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले. तेव्हा यमराजांनी हे वरदान दिले की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.यादिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात.
तर मित्रांनो हे सहा दिवस दिवाळीचे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आपल्याला या गोष्टी 💯% माहीत असायला हव्यात.
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
आली दिवाळी ..
दिपावली तील सोपा उपाय
Diwali
५नोव्हेंबर २०२३ पासून म्हणजेच रविवारी आश्विन कराष्टमी पासून दिवाळीचा प्रारंभ होत आहे, या दिवसापासून आपल्या घराच्या ओसरीवर , अंगणात तीन किंवा पाच पणत्या लावाव्यात त्यातील एक पणती देवासमोर लावावी,
दीपावलीच्या मुख्य दिवसात किती पणत्या लावाव्यात ते पाहूया,
कराष्टमी पासून एकादशी पर्यंत रोज ३किंवा ५पणत्या लावाव्यात.
वसुबारस दिवशी ९ किंवा ११ पणत्या लावाव्यात.
नरक चतुर्दशीच्या दिवशी ११किंवा १५ पणत्या लावाव्यात.
दीपावली अमावस्या दिवशी १५ किंवा १९ किंवा २१ पणत्या लावाव्यात.
दिवाळी पाडवा दिवशी १३ किंवा १५ पणत्या लावाव्यात.
भाऊबीजेच्या दिवशी ११ किंवा १३ पणत्या लावाव्यात.
तुम्ही या पणत्या तुळशीपुढे, देवापुढे, अंगणात आणि इतरत्र कोठेही लावू शकता.
दिपावली मुहूर्त शके १९४५ – २०२३
Diwali
(मुहूर्त नाशिक साठी आहेत)
वही खरेदी
शनिवार दिनांक ४ – ११ – २०२३
लाभ /अमृत वेळ :-
दुपारी १:४० ते ४:२८
पुष्य नक्षत्र
रविवारी ५/११/२३
सकाळी ९:२८ ते १०:५२
धनत्रयोदशी – शनिवार दिनांक ११/११/२३
शुभ वेळ:-
सकाळी ८:०९ ते ९:३२
लाभ / अमृत :-
दुपारी १:४१ ते ४:२७
———————————————–
धनत्रयोदशी – शुक्रवार दिनांक १०/११/२३
धनपूजन , कुबेर पूजन
प्रदोष वेळ :-
संध्याकाळी ५:५० ते ८:२९
लाभवेळ :-
९:४ ते १०/४१
शुभ :-
रात्री १२:१८ ते पहाटे ३:३५
——————————–
दीपावली – रविवार १२/११/२३
गादी स्थापना , शाई भरणे पेन ठेवणे
लाभ /अमृतवेळ :-
सकाळी ९:३२ ते १२:१८
अभिजीत वेळ :-
सकाळी ११:५४ ते १२:४२
शुभ वेळ :-
दुपारी १:४१ ते ३:०४
——————————–
लक्ष्मीपूजन – रविवार १२/११/२३
प्रदोष वेळ :-
सायंकाळी ५:५० ते ८:२९
शुभ /अमृतवेळ :-
५:५० ते ९:०८
ऋषभ लग्न :-
सायंकाळी ६:०४ ते ८:०१
श्रेष्ठ वेळ – यावेळेस ऋषभ लग्न , प्रदोष वेळ , शुभ / अमृतवेळ एकत्र आहेत
सायंकाळी ६:०४ ते ८:०१
सिंह लग्न
रात्री १२:३२ ते २:४७
लाभ वेळ
रात्री १:५५ ते ३:२२
———————————
वही पूजन – मंगळवार १४/११/२३
लाभ / अमृतवेळ
सकाळी १०:५५ ते दुपारी १:४१
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे