Dahihandi
कृष्णाला बर्याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे.
पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.
” श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा”
दहीहंडी
Dahihandi
श्रीकृष्ण जयंती च्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला / दहीहंडी हा सण साजरा केला जातो. या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते आणि गोविदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात. गाणी, नाच, उंच चढणार्या गोविंदांच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न असा एकच दंगा यावेळी चाललेला असतो. या मडक्याचा तुकडा मिळाला तर घरी आणून सांभाळून ठेवला जातो. त्याने घरात समृद्धी येते अशी भावना आहे.
दहीहंडी उत्सव साजरा करण्याची पद्धत.
गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.
दहीकाला – दहीहंडी.
विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला’ होय. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. मासिक पाळी, अशौच व स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या दिवशी केलेल्या उपवासाने कमी होतो. तसेच हे व्रत केल्याने संतती, संपत्ती व अंती वैकुंठ लोक यांची प्राप्ती होते, असे सांगितले आहे.
दहीहंडी / गोपाळकाळयाचे आध्यात्मिक महत्त्व.
गोपाळकाला म्हणजे पांढर्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय. `काला’ हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणार्या क्रियेशी संबंधित आहे. `काला’ म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणार्या घटनांचे एकत्रीकरण. पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ व स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात. `गोपाळकाला’ हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो.
काल्यातील प्रमुख घटक
पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत..
पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी..)
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्या मातृभक्तीचे प्रतीक.
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक.
ताक : गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक.
लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते… काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.
गोपाळकाला
Dahihandi
गोपाळकाला म्हटले की, उंचच्या उंच हंड्या आणि त्या फोडण्यासाठी जिवाचे रान करणारे तरुण डोळ्यांसमोर येतात; मात्र गोपाळकाला या सणाला आध्यात्मिक आणि पौराणिक पार्श्वभूमी असून ते शास्त्र लक्षात घेऊन साजरा केल्याने जिवाला त्याची अनुभूती घेता येते. गोपाळकाल्याचे आध्यात्मिक महत्त्व आणि त्याचे लाभ यांविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊया.
१. ‘गोपाळकाला’चा अर्थ.
अ. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला आणि सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.
आ. गोपाळकाला म्हणजे पांढर्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा अधिकाधिक प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा आणि पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समूच्चय ‘काला’ हा शब्द एकसंध आणि वेगात सातत्य असणार्या क्रियेशी संबंधित आहे. ‘काला’ म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्टपूर्ण कार्य दर्शवणार्या घटनांचे एकत्रिकरण.
पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ आणि स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात. ‘गोपाळकाला’ हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो.
२. काल्यातील प्रमुख घटक.
पोहे, दही, दूध, ताक आणि लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.
अ. पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले, तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी.)
आ. दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्या मातृभक्तीचे प्रतीक.
इ. दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक.
ई. ताक : गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक.
उ. लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुण भक्तीचे प्रतीक.
या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते. काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.
३. इतर लाभ.
अ. शरीर आणि मन यांना पोषक.
या दिवशी वायूमंडल आपतत्त्वाने भारित असल्याने देहातील पंचप्राणांच्या वहनाला पोषक असल्याने मनाला उत्साह देणारे आणि देहाची कार्यक्षमता वाढवणारे असते
आ. सर्व सृष्टीच आनंदी असणे.
वायूमंडलातील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने वृक्षचरही चैतन्ययुक्त लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अत्यंत संवेदनशील बनल्याने सर्व सृष्टीच आनंदी असते.
एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ११.८.२००५, दुपारी १२.२४)
४. ईश्वराची अनंत प्रकटीकरण रूपे आणि त्यात एकत्वाच्या अनुभूतीद्वारे होणारी आनंदाची प्राप्ती म्हणजे गोपाळकाला
‘ऋषीमुनींनी अनेक तत्त्वांचे शोध लावल्याने हिंदु धर्म वटवृक्षाप्रमाणे प्रगल्भ आणि परिपूर्ण असल्याची अनुभूती येते. जसे खाणे, पिणे, रहाणे, बोलणे, लिहिणे, भाषा, शब्द आणि ग्रंथ हे सर्व अनेक अनेक असते, तशी ईश्वराची अनेक प्रकृतींद्वारे अनंत प्रकटीकरण रूपे आहेत. अनेक तत्त्वांमध्ये एकत्वाच्या अनुभूतींद्वारा जी आनंदप्राप्ती होते, तो म्हणजे गोपाळकाला प्रसाद. त्याची गोडी अवर्णनीय असते.
५. अनुभूतीचे प्रतीक म्हणजे गोपाळकाला, आणि केवळ सद्गुरुकृपेने हे पूर्णत्व अनुभवता येणे, हिंदु धर्मात पूर्णत्वासाठी ‘ब्रह्मांडी ते पिंडी’ असा प्रवास सांगितला आहे. कुलदेवता साधकाच्या पिंडात ब्रह्मांडातील ३३ कोटी तत्त्वे ३० प्रतिशतने वाढवते. या कारणास्तव जलद आध्यात्मिक उन्नतीसाठी कुलदेवतेचे नामस्मरण हे सर्वांत फलदायी आहे. ब्रह्मांडातील सर्व तत्त्वे पिंडात १०० प्रतिशत आल्यावर पूर्णत्वाच्या म्हणजे सच्चिदानंदाच्या अनुभूतीचे प्रतीक म्हणजे गोपाळकाला होय. केवळ नामाने नाही किंवा कोणत्याही साधनामार्गाने नाही, तर केवळ सद्गुरुकृपेने हे पूर्णत्व अनुभवता येते.
६. गोपाळकाला, गोपाळकाल्याची दिव्य चव आणि दहीहंडी फोडणे यांचा भावार्थ
दृश्य स्वरूपात गोपाळकाला म्हणजे कीर्तनानंतर किंवा गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी फोडून ग्रहण करतो, तो प्रसाद.
गोपाळकाल्याची दिव्य चव, वरील सर्व पदार्थ एकत्र आणि एकजीव करून ग्रहण केल्यावर त्याची चव अवर्णनीय असते. त्याची चव अतिशय दिव्य असते.
दहीहंडी फोडणे.
दहीहंडी हे जिवाचे प्रतीक आहे.दहीहंडी फोडणे, हे जिवाने देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीत स्थिर होणे, या अर्थाने आहे आणि दिव्य चव हे आनंदाचे प्रतीक आहे.
सनातन भारत
दहीहंडी
Dahihandi
श्रीकृष्ण जयंती च्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला / दहीहंडी हा सण साजरा केला जातो. या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते आणि गोविदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात. गाणी, नाच, उंच चढणार्या गोविंदांच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न असा एकच दंगा यावेळी चाललेला असतो. या मडक्याचा तुकडा मिळाला तर घरी आणून सांभाळून ठेवला जातो. त्याने घरात समृद्धी येते अशी भावना आहे.
दहीहंडी उत्सव साजरा करण्याची पद्धत.
गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता पाळण्यातील बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात व मग प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसर्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.
दहीकाला – दहीहंडी.
विविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे `काला’ होय. श्रीकृष्णाने काजमंडळात गायी चारतांना स्वत:ची व सवंगड्यांच्या शिदोर्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. मासिक पाळी, अशौच व स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या दिवशी केलेल्या उपवासाने कमी होतो. तसेच हे व्रत केल्याने संतती, संपत्ती व अंती वैकुंठ लोक यांची प्राप्ती होते, असे सांगितले आहे.
दहीहंडी / गोपाळकाळयाचे आध्यात्मिक महत्त्व.
गोपाळकाला म्हणजे पांढर्या रंगाच्या पाच रसात्मक स्वादांचा जास्तीतजास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा व पूर्णावतारी कृष्णकार्याचे दर्शक असलेला समुच्चय. `काला’ हा शब्द एकसंध व वेगात सातत्य असणार्या क्रियेशी संबंधित आहे. `काला’ म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणार्या घटनांचे एकत्रीकरण. पूर्णावतारी कार्य हे स्थळ, काळ व स्तर या तीनही घटकांवर आदर्शवत असेच असते. या कार्यप्रक्रियेत विविधांगी जीवनाचे पैलू आध्यात्मिकरीत्या ईश्वरी नियोजनाद्वारे मानवजातीसमोर लीलया उलगडून दाखवले जातात. `गोपाळकाला’ हा श्रीकृष्णाच्या विविधांगी पूर्णावतारी कार्याचे प्रातिनिधीत्व करतो.
काल्यातील प्रमुख घटक.
पोहे, दही, दूध, ताक व लोणी हे काल्यातील प्रमुख घटक त्या त्या स्तरावरील भक्तीचे निदर्शक आहेत.
पोहे : वस्तूनिष्ठ गोपभक्तीचे प्रतीक (काहीही झाले तरी श्रीकृष्णाला धरून ठेवणारे सवंगडी.)
दही : वात्सल्यभावातून प्रसंगी शिक्षा करणार्या मातृभक्तीचे प्रतीक.
दूध : गोपींच्या सहज सगुण मधुराभक्तीचे प्रतीक..
ताक : गोपींच्या विरोधभक्तीचे प्रतीक.
लोणी : सर्वांच्या श्रीकृष्णावरील अवीट प्रेमाच्या निर्गुणभक्तीचे प्रतीक या दिवशी ब्रह्मांडात कृष्णतत्त्वाच्या आपतत्त्वात्मक प्रवाही गतिमान लहरींचे आगमन होते.काल्यातील पदार्थ या लहरी ग्रहण करण्यात अग्रेसर असतात.
Dahihandi
कृष्ण जयंतीचा उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हा जेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपालकाला होतो. म्हणूनच त्या कीर्तनाला “काल्याचे” कीर्तन म्हणतात.
ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर, अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते..
दहीहंडी .
कृष्ण जयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत: कोकणात या उत्सवानिमित्त दहीकाला होतो. श्रीकृष्ण त्याच्या बालपणी आपल्या मित्रांसह गोकुळातील घरांमध्ये जाऊन टांगलेल्या शिंकाळ्याच्या मडक्यातील दही खात असे. त्यासाठी मुले मानवी मनोरा करून मडके फोडीत असत. ही परंपरा आजही भारतात दहीहंडीच्या रूपाने साजरी केली जाते. ‘गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला’ असे गाणे गात अनेक लहान थोर पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात. कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून कृष्ण चरित्रातील सोंगे आणण्याचाही प्रघात आहे.
गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे.पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो. हा कृष्णास फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत असे मानले जाते.
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्यापाठीशी आहे