श्री स्वामी समर्थ
अधिक मासातील मुख्य पाच पर्वकाळ
Adhik masache mahatva-
१) व्यतीपात योग – शुक्रवार दिनांक ,२१ जुलै २०२३ आणि १५ ऑगस्ट २०२३ ह्या दोन दिवशी
२) वैधृती योग व द्वादशी एकाच दिवशी ३० जुलै २०२३
३) अधिक मास पौर्णिमा १ ऑगस्ट २०२३
१३) वद्य द्वादशी १३ ऑगस्ट २०२३
अधिक मासात पंचपर्वकाल महत्वाचे सांगितले आहेत.
ज्यांना नित्य दान वा व्रत जमत नाही.त्यांनी कमीकमीत या पर्वावर गरजु व्यक्तीस दान करावे
श्रीकृष्ण उवाचः-
श्रृणु देवि प्रवाक्ष्यामि पर्वाणि तु यथाक्रमं
वैधृतीश्चव्यतिपातोराकाचेवकुहुस्तथा
मग वदे देवाधिदेवो /पाच पर्वाचा अभिप्रावो
वैधृती व्यतिपात पाहा हा /केला निर्णय शास्राते
(आणखी पुढे अधिकमास महात्म्य अ.११/श्लोक०७ पुढे)
वैधृती,व्यतिपात,पोर्णिमा,अमावस्या,द्वादशी
निदान पुण्य मिळवण्याच्या हेतुने का होईना लोक दान करण्यासाठी प्रवृत्त होतील ह्या हेतुने शास्त्रकारांनी दानाचे महत्त्व आणि त्याला मुहूर्त विज्ञान जोडले आहे. ते अनुभाव्य विषय असल्याने त्यावर चर्चा नको. पण आपण किमान दोन वेळेस सुखाने जेवू शकतो अश्या कुटुंबातील लोक आहोत. आपल्या समाजात अनेक गरजु विद्यार्थी , गो वंश जतन पालन करणाऱ्या संस्था , भाषा आणि संस्कृती विषयक कार्य करणाऱ्या संस्था किंवा बुध्दीमान आणि होतकरू तरुण व्यक्ती ज्यांना भांडवल मिळाल्यास उत्तम व्यवसाय करू शकतील इतरांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतील अश्या व्यक्तींना आपण आपल्या परीने अर्थ सहाय्य केल्यास ती ही एक समष्टी साधनाच होईल. ह्याचा विचार करून आपणही ह्या अधिक मासात सुयोग्य ठिकाणी दान ह्या भावनेने नाही तर आपलं सामाजिक दायित्व म्हणुन धन खर्च करूया. अधिकस्य अधिकं फलम् ह्या न्यायाने भगवान पुरुषोत्तम सर्वांनाच उत्तम फळ देतील ह्यात शंकाच नाही.
पुरुषोत्तम अधिक मास महत्त्व
१. अधिक मास अधिक पुण्य देणारा महिना आहे. अथर्ववेदात या मासाला भगवान महाविष्णूंचे घर म्हटले आहे. ‘त्रयोदशो मास: इन्द्रस्य गृह:।’
२. भगवान महाविष्णू या अधिक मासाचे अधिपती आहेत. अधिक मासाची कथा कृष्णावतार व नृसिंहअवतार यांच्याशी निगडित आहे. म्हणून या महिन्यात भगवान श्रीकृष्ण आणि भगवान नृसिंह यांचीही पूजा केली जाते.
.३) या महिन्यात भगवद्गीता, श्रीराम कथा, गजेंद्र मोक्ष कथा, नृसिंह कथा यांचे पारायण केले जाते. त्या दृष्टीने ही उपासना अधिक फलदायी मानली जाते. जी व्यक्ती या महिन्यात व्रत, उपासना करते, ती सर्व पापांतून मुक्त होते, व मरणोत्तर तिला वैकुंठप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.
४. या मासात पूजा-पाठ, धार्मिक कृत्ये, दान धर्म केले असता, कायमस्वरूपी दारिद्र्य, दु:ख नष्ट होते आणि व्यक्ती प्रापंचिक दु:खातून तरून जाते.
५. ज्याप्रमाणे भक्त प्रल्हादाने जप, तप, साधन करून भगवान नृसिंहाना प्रसन्न करून घेतले, त्याप्रमाणे भाविकांनी आपले मनोरथ पूर्ण होण्यासाठी काया, वाचा, मनाने भगवंताची उपासना केली असता, त्यांनाही भगवद्प्राप्ती होते.
६. या महिन्यात भगवान महाविष्णूंच्या ३३ अवतारांची पूजा केली जाते – विष्णू, जिष्णू, महाविष्णू, हरि, कृष्ण, भधोक्षज, केशव, माधव, राम, अच्युत, पुरुषोत्तम, गोविंद, वामन, श्रीश, श्रीकांत, नारायण, मधुरिपु, अनिरुद्ध, त्रीविक्रम, वासुदेव, यगत्योनि, अनंत, विश्वाक्षिभूषण, शेषशायिन, संकर्षण, प्रदुम्न, दैत्यारि, विश्वतोमुख, जनार्दन, धारावास, दामोदर, मघार्दन, श्रीपती
७. या महिन्यात देवघरात शाळीग्राम असल्यास त्याच्या बाजूला अखंड दीप तेवत ठेवला जातो.
८. पुरुषोत्तम मासानिमित्त भगवद्गीतेचे पठण लाभदायी ठरते, विशेषत: चौदावा अध्याय म्हटला पाहिजे.
९. `ऊँ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप करावा.
१०. या महिन्यात पुरुषोत्तम महात्म्याचेही पठण करता येईल.
११. अधिक महिन्यात धार्मिक विधींना विशेष महत्त्व असते. त्यानिमित्त दीपदान, ध्वजदान किंवा अन्नदानही केले जाते.
१२. हिंदू धर्मात गोमातेला खूप महत्त्व आहे. म्हणून शक्य तेव्हा, गायीला ताजा आणि हिरवा चारा द्यावा.
१३. या मासात एकभूक्त राहून, आपल्या वाटणीचे एकवेळचे जेवण किंवा कोरडे धान्य दान द्यावे. गहू, तांदूळ, डाळ, कणिक, मीठ, मोहरी, जिरे, दूध, दही, आवळे, पान-सुपारी इ.
१४. अधिक महिन्यात चातुर्मास किंवा श्रावणाप्रमाणे कांदा, लसूण, मांसाहार, मद्य आदि पदार्थ व्यर्ज्य करावेत.
१५. अधिक महिना शुभ आहे, तरीदेखील या महिन्यात साखरपुडा, लग्न, मुंज, खरेदी इ. शुभ कार्ये करत नाहीत. कारण हा महिना अध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा असतो. त्यावर लक्ष केंद्रित करून पुण्य पदरात पाडून घेतले पाहिजे.
१६. अधिक मासात सर्वार्थसिद्धी योग, द्विपुष्कर योग, अमृतसिद्धी योग जुळून आले आहेत. दान-धर्म करून या योगांचा लाभ घ्यावा.
१७. या महिन्यात विष्णू सहस्रनाम ऐकण्याला अतिशय महत्त्व आहे. विष्णूंची हजार नावे घेतली किंवा कानावर जरी पडली, तरी सकारात्मक वातावरण निर्मिती होते आणि घरातील नैराश्य, दु:ख दूर होते.
१८. असे म्हणतात, की अधिक मासात केलेल्या व्रत-वैकल्यांना इतर वेळी केलेल्या व्रतांपेक्षा १० पट अधिक फळ मिळते. देवी भागवत, विष्णु पुराण, भागवत पुराण आदि धार्मिक ग्रंथांचे पारायण करावे.
१९. आध्यात्मिक उन्नतीसाठी हा महिना अतिशय फलदायी आहे. या महिन्यात कोणतीही उपासना मनोभावे केली, तरी कुंडलीतील दोष दूर होतात आणि पुण्य प्राप्त होते.
२०. आरोग्यवर्धनाच्या दृष्टीनेही अधिक मास ‘अधिक’ फलदायी आहे. त्याचा जरूर लाभ करून घ्यावा आणि देहाची व मनाची अंतर्बाह्य शुद्धी करून घ्यावी.
अधिक मासाला पुरुषोत्तम मास ,मल मास,संसर्प मास किंवा धोंड्याचा महिना असेही म्हणतात. चैत्रा पासून अश्विन महिन्यापर्यंत कोणताही महिना अधिक मास म्हणून येऊ शकतो कारण या महिन्यात सूर्याची गती मंद असते आणि त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला वेळ लागतो.
सर्वात उत्तम महिना म्हणून अधिक महिन्याची गणना होते. या महिन्यात शुभ कार्य होत नसली तरी धार्मिक वा अध्यात्मिक हेतूंच्या प्राप्तीला सहाय्यकारक महिना मानला जातो..
भारतीय ज्योतिष्यात अधिक मासाला ‘तेरावा महिना’ म्हणतात. ३२ महिने १६ दिवस अन ४ घटकांतर सूर्याला संक्रांत बसते ..त्या महिन्याला अधिक मास संभोधतात..
या महिन्यात दान धर्माला खूप महत्व आहे. तिथी नुसार तूप सोने खारीक कपूर मोती सुती वस्त्र रेशमी वस्त्र साखर मध यांचे दान करतात दीप दानाला अनन्यसाधारण महत्व आहे!
हिंदू धर्मात मुलगी आणि जावई यांना लक्षमीनारायणाचा जोडा मानतात..जावयाला तुपात तळलेले ३३ च्या पटी त अनारसे देतात. चांदीच्या किंवा तांब्याच्या ताम्हनात अनारसे व त्यावर निरंजन किंवा दिवा लाऊन देतात. खर तर जाळीदार वस्तू दयावी अशी प्रथा!
Adhik masache mahatva:जुन्या चालीरीती काही कारणास्तव असाव्यात अशी माझी समजूत आहे! त्यातल्या किती मानायच्या. किती सोडून द्यायच आपल आपण ठरवायचं. ज्या गोष्टीतून आनंद मिळतो घरात सकारात्मक विचार येतात ,मन प्रसन्न राहत त्या गोष्टी कराव्यात. त्या निमित्ताने घरात स्वच्छत्ता होते पोथी वाचनाने मन एकाग्र होते. अन नेहमी छान काही तरी करत राहायची स्फूर्ती न प्रेरणा मिळते. रांगोळी. सवाष्ण ओटी भरण मिष्टान्न जेवण आप्तेशांनी भरलेल घर भरभराटीचं द्योतक असतात.
न आपल्याला रोज मदत करणाऱ्या कामवाल्या बायकांची ओटी भरून दीप दान केल…त्यांचे प्रसन्न चेहरे न त्यांनी दिलेले भरभरून आशीर्वाद यानी भरून पावले…
कर्मकांडाच्या नादी लागू नये…पण श्रद्धा असावी…हौस असावी .उरक असावा…. न श्रद्धा अगदी देवा वर नसली तरी चालेल… आई वडील निसर्ग कशावरही ठेवा...जिथे नतमस्तक होता येईल अन अहंकार गळून पडेल..
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे