ओळख देवीच्या विविध स्तोत्राची

 भाग १

Deviche stotra

१) रात्री सूक्त :
हया स्तोत्राचा पाठ रोज संध्याकाळी केल्यास,देवी प्रसन्न होऊन आपल्यातील तमोगुणाचा, आळस, नैराश्य दूर करते,व दुष्ट
शत्रूचा नाश होतो.

२) देव्या कवच :-
सर्व देव कवचात श्रेष्ठ कवच आहे.देवी उपासकानी ह्या कवचाचा पाठ केला असता त्यांना देवी कवच एक अभेद्य कवच प्राप्त होते.त्यामुळे सर्व संकटाचे निराकरण होते.तसेच जे देवी उपासक श्री सप्तशतीचे पाठ करतात त्यांनी पाठापुर्वी दुर्गाकवच,अर्गला,किलक स्तोत्राचा पाठ करणे फार महत्त्वाचे असते.

३)भगवती किलक स्तोत्र:-
या स्तोत्राच्या नित्य वाचनामुळे अपमृत्यू ढळतो आरोग्य,सौभाग्य, संपदा प्राप्त करून देणारे आहे.
कृष्णाष्टमी, कृष्ण चतुर्दशीला सकाळ संध्याकाळ वाचन करावे.

४)सिद्ध कुंजीका स्तोत्र :-
आई भगवती चे हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे.
याचे रोज ९ वेळा वाचन केल्यास एका सप्तशती पाठाचे फळ मिळते.

५)कनक धारा स्तोत्र:-
हे आद्यशंकराचार्यानी हे स्तोत्र लिहलेले आहे.हे स्तोत्र रोज सकाळसंध्याकाळ म्हटले असता धनलक्ष्मी प्राप्ती व सद् भाग्य प्राप्ती होते.

६)देवी अथर्वशीर्ष :-
या अश्विन महिन्यातील नवरात्र उपासनेत हे स्तोत्र आवर्जून म्हटले जाते.
हयाच्या शिवाय सप्तशतीचा
पाठ करणे फलदायी ठरत नाही.
मंगळवार,शुक्रवार,पौर्णिमा हया दिवशी हे अवश्य म्हणावे.
हया देव्यथर्वशीर्षाचे एक वार पठण केले तर पूर्वीच्या १२तासात जाणता अजाणता केलेल्या पापांचा नाश होतो.
रोज दहा वेळा हे म्हटले तर संकटापासून सुटका होते.हे स्तोत्र जर १०८वेळा म्हटले तर त्याचे पुरश्चरण होते.

७)त्रिपुर सुंदरी स्तोत्र:-
रोज संध्याकाळी देवापुढे तेलवात लावून शांत व प्रसन्न मनाने हे स्तोत्र म्हटले असता ऎहिक सुखाची व मनःशांती प्राप्ती होते.

८)महालक्ष्मी कवच :-
हया अष्टकाचे रोज पठण केल्यास त्यामुळे पापमुक्ती होते.तसेच जर हे अष्टक रोज दोनवेळा म्हटले तर संपत्तीलाभ होतो.त्रिकाळ पठण केले तर महाशत्रूसुध्दा नाश होतो.

ओळख देवीच्या विविध स्तोत्राची

 भाग २

Deviche stotra

९) श्रीमहालक्ष्मीकवचम :
रोज नित्य म्हटल्यावर लक्ष्मीमातेच्या
कृपेने आपल्याला सौख्य लाभते.
सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी॥”महालक्ष्मीच विद्ममहे।विष्णूपत्नीच धिमही।तन्नौ लक्ष्मी प्रचोदयात”॥ हा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणून मग हया कवचाचे वाचन करावे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन कृपा करते.

१०)श्रीमहालक्ष्म्यष्टकम :
हया अष्टकाचे रोज पठण केल्यास पापमुक्ती होते.
तसेच जर हेअष्टक रोज दोनवेळा म्हटले तर संपत्तीलाभ होतो.त्रिकाळ पठण केले तर महाशत्रूचा नाश होतो.

११)श्रीभवानी_अष्टक स्तोत्र:
हया स्तोत्र पठणाने दारिद्रय,दुःख हयाचे निवारण होऊन माता भवानी आईचा कृपाप्रसाद प्राप्त होतो.
ज्यांची कुलदेवता तुळजा भवानी माता आहे त्यांनी नित्य उपासनेत याचे पठन अवश्य करावे.

१२) श्रीदुर्गाष्टोत्तरशतनाम स्तोत्रम् :
हया श्री दुर्गा देवीच्या १०८ नाम स्तोत्राचे पठण केले असता,भक्ताचे अंगी सद्गगुण वृध्दींगत होतात.
सुख समृद्धी व शांती मिळते.

१३) एकश्लोकी_सप्तशती :
संपूर्ण दुर्गा सप्तशती हा ग्रंथ सर्वानाच सहज वाचायला जमत नाही.म्हणूनच निदान हया एकश्लोकी सप्तशतीचे वाचन करुन भक्तीची फुल ना फुलाची पाकळी तरी त्या शक्ती देवताच्या पायी अर्पण करावी.

१४)सप्तश्लोकी_दुर्गास्तोत्र :
हया स्तोत्राचा पाठ केल्यावर देवी भक्तावर प्रसन्न होते.त्यांच्या संकटाचा,आधी व्याधी रोगांचा नाश
होतो.सर्व इच्छा पूर्ण होतात.शत्रूचा नाश होतो.
नावाप्रमाणेच हे सात श्लोकातील सप्तशती स्तोत्र आहे.

१५) महालक्ष्मीस्तोत्रम् :
या स्तोत्राच्या नित्य पठणाने देवी उपासकाचे सर्वतोपरी कल्याण होते.तसेच संतान प्राप्तीची मनोकामना करणाऱ्यानी हया स्तोत्राचा पाठ रोज सायंकाळी केला तर महालक्ष्मीकृपेने उत्तम,सद्गगुणी पुत्रप्राप्ती होते.

१६)वंशवृध्दीकरं वंशकवचम् :
संतान प्राप्ती होऊन वंश विस्तारासाठी रोज हे स्तोत्र एक ग्लासवर पाणी घेऊन त्यावर हात ठेवून हे स्तोत्र सात वेळा म्हणावे व हे तिर्थ समजून स्त्रीने प्राशन करावे.
त्यामुळे गर्भसंरक्षण व गर्भवृध्दी व्यवस्थित होते.सर्व बाधा टळतात, नावा प्रमाणेच वंशवेल वृध्दी करणारे स्तोत्र आहे.

१७)देवीक्षमापनस्तोत्रम् :
सामान्य माणूस देवी उपासना करत असताना त्यांच्याकडून साहित्य, उच्चार,मंत्रपठण,स्तोत्र वाचन,
पुजापाठ, होमहवन,किंवा साधे ग्रंथ वाचन करताना ही अनेकादा काही चुका होतात.
काही उणिवा राहून जातात.त्याचा दोष लागू नये व केलेली सश्रध्द व भोळिभाबडी उपासना फलद्रुप व्हावी आणि महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ह्यांनी आपल्यावर कृपा करावी म्हणून देवी उपासनेत शेवटी अवश्य म्हणावे.

|| श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती राजराजेश्वरी जगदंबिका चरणार्पणमस्तु ||

◆आई भगवती आदिशक्ती सर्व भक्तांचे कल्याण करो◆

Deviche stotra

 

श्री स्वामी समर्थ

 

Deviche stotra

पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते..
आळंदीहून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता ही चार भावंडं पहिल्यांदा ज्या वेळी पंढरपूरला आली त्या वेळी विठोबाचं दर्शन घेताना त्यांना खूप आनंद झाला…

या आनंदाचं वर्णन करताना शेजारी उभ्या असलेल्या मुक्ताला ज्ञानदेव म्हणाले,

“रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी..”

मुक्ताला ते कौतुकानं साजणी म्हणत आहेत.

त्यावर मुक्तानं विचारलं,
“दादा, विठोबाचं रूप पाहून तुम्ही सुखी झाला तसं इतर लोकांना विठोबाचं दर्शन घेतल्यावर सुख का मिळत नाही.?”
तुम्ही म्हणता,

“तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा..” तसं इतर लोकांना का वाटत नाही.?

त्यावर ज्ञानोबा म्हणाले,

“मुक्ते, ‘बहुत सुकृतांची जोडी, म्हणूनी विठ्ठले आवडी.”

अगं मुक्ता, “पूर्व जन्मीची पुण्याई असेल तरच ईश्वराची आवड उत्पन्न होते.” म्हणजे नीती

धर्माचे आचरण, ईश्वराची उपासना आणि शुद्ध मनाने जीवनाची वाटचाल केली असेल तरच या जन्मी ईश्वराची आवड उत्पन्न होईल..

तुला सांगतो, “सर्व सुखाचे आगर हा विठोबाच आहे.. हा विठोबा केवळ मूर्तीत नसून चराचरात भरलेला आहे..”

हा अनुभव ज्ञानेश्वरांनी घेतला, त्या वेळी ते म्हणतात,

“अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे हरी पाहिला रे..”

हे सुख काय आहे याची आपल्याला कल्पना नसते.

तुकारामांना हा अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला, “आनंदाचे डोही आनंद तरंग..”

नामदेवांना अनुभव आला त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला,

“सुखाचे हे सुख श्रीहरी मुख, पाहता भूक तहान गेली.’”

संत अमृतराय म्हणतात, “अजी मी ब्रह्म पाहिले, अगणित सुरगण वर्णीति ज्यासी, कटीकर नटसम, चरण विटेवरी.”

संत सेना महाराज म्हणतात,

“जाता पंढरिसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची.”

आपण पाहतो सर्व संतांना विठोबाला पाहून खूप आनंद होतो.

असा आनंद आपल्याला मिळण्यासाठी, ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात,

“संतांचे संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती, येणे पंथे.”

संतांची संगत, त्यांचे ग्रंथ, यामुळे मन निर्मळ होते आणि मन निर्मळ झाले की ईश्वराची आवड उत्पन्न होते.

म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, “काय वानू मी या संतांचे उपकार, मज निरंतर जागविती.”

काय स्थिती असेल या *संतांची. अस म्हणतात ब्रह्मानंदी जीव होई वेडा की पिसा.
शेवटी म्हणावेसे वाटते संत संग देई सदा

Deviche stotra

कधी कधी केवळ असा एखादा छोटासा जरी लेख वाचला, तरी रोमांच उभे राहतात.
धन्य ती आपली संत परंपरा, संतांचे जीवन-आदर्श आणि अर्थातच त्यांची जन्मोजन्मीची साधना.

 

श्री स्वामी समर्थ

काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

4 thoughts on “Deviche stotra

  1. Waa khup sunder mahiti ahe Komal
    Tuzyamule he sarvsna samjte
    Tuzya saglya post khup chan astat
    Thank u Komal

  2. Pingback: Dattavtar mahiti -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *