परिवर्तिनी एकादशी
Parivartini Ekadashi
एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या ९६ मिनिटांत जर दशमी असेल, आणि, (अ) सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा, व (आ) सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्यापुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे समजतात.भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होते. परिवर्तिनी एकादशीला काही शुभ योग जुळून येत आहेत. परिवर्तिनी एकादशीचे व्रताचरण, पूजनविधी, महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घेऊया.
आषाढी एकादशीपासून सुरू होणारा चातुर्मासाचा सात्विक काळ हा व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांसाठी विशेष करून ओळखला जातो.चातुर्मासाचा प्रारंभ आणि सांगता एकादशीच्या व्रताने केली जाते. चातुर्मासातील पहिल्या श्रावण महिन्यात व्रत-वैकल्यांची अगदी रेलचेल असते.
गोकुळाष्टमीनंतर सर्वांना वेध लागतात गणेश चतुर्थी म्हणजेच ते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणारी एकादशी परिवर्तिनी एकादशी या नावाने ओळखली जाते.
आषाढी एकादशीपासून श्रीविष्णू शयन करतात, अशी मान्यता आहे. म्हणूनच याला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. हा काळ कार्तिकी एकादशीपर्यंत असतो. भाद्रपद महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला श्रीविष्णू शयनावस्थेत असताना कूस बदलतात. यामुळे विष्णूंच्या स्थानात बदल होतो, म्हणून या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे संबोधले जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते..
यासाठी या एकादशीचे व्रत महत्त्वाचे मानले गेले आहे.परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्याने वाजपेय यज्ञाचे पुण्यप्राप्ती होते. या एकादशीला केलेल्या श्रीविष्णू पूजनामुळे मोक्षप्राप्ती होते, असे सांगितले जाते.
स्मार्त व भागवत एकादशी
Parivartini Ekadashi
एकादशी हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या पक्षातला (पंधरवड्यातला) अकरावा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे महिन्यातला दोन पंधरवड्यांत(पक्षांत) प्रत्येकी एक अशा किमान दोन एकादश्या येतात. मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशात महिन्यातला कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाच्या आधी येत असल्याने कृष्ण पक्षात येणारी विशिष्ट नावाची एकादशी नंतरचे नाव असलेल्या महिन्यात येते. उदा० ज्या दिवशी महाराष्ट्रात आषाढ महिन्यातील कामिका एकादशी असते, त्यादिवशी मध्य प्रदेशात श्रावण महिन्यातली कामिका एकादशी असते. हा प्रकार शुक्ल एकादश्यांच्या बाबतीत होत नाही.
एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या ९६ मिनिटांत जर दशमी असेल, आणि, (१) सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा, व (२) सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्यापुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे समजतात.
कधीकधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अश्या पाठोपाठ दोन एकादश्या असतात.पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. दर महिन्यात येणाऱ्या एकादश्यांची नावे अशी (पहिले नाव शुक्ल पक्षातल्या, तर दुसरे कृष्ण पक्षातल्या एकादशीचे आहे). :
हिंदू महिना (इंग्रजी) पालक देव शुक्लपक्षातली एकादशी कृष्णपक्षातली एकादशी
चैत्र (मार्च–एप्रिल) विष्णू कामदा एकादशी वरूथिनी एकादशी
वैशाख (एप्रिल–मे) मधुसूदन मोहिनी एकादशी अपरा एकादशी
ज्येष्ठ (मे–जून) त्रिविक्रम निर्जला एकादशी योगिनी एकादशी
आषाढ (जून–जुलै) वामन शयनी एकादशी कामिका एकादशी
श्रावण (जुलै-ऑगस्ट) श्रीधर पुत्रदा एकादशी अजा एकादशी
भाद्रपद (ऑगस्ट–सप्टेंबर) हृषीकेश की वामन? परिवर्तिनी एकादशी/पद्मा एकादशी इंदिरा एकादशी
आश्विन (सप्टेंबर–ऑक्टोबर) पद्मनाभ पाशांकुशा एकादशी रमा एकादशी
कार्तिक (ऑक्टोबर–नोव्हेंबर) दामोदर प्रबोधिनी एकादशी उत्पत्ती एकादशी
मार्गशीर्ष (नोव्हेंबर–डिसेंबर) केशव मोक्षदा एकादशी सफला एकादशी
पौष (डिसेंबर–जानेवारी) नारायण पुत्रदा एकादशी षट्तिला एकादशी
माघ (जानेवारी–फेब्रुवारी) माधव जया एकादशी विजया एकादशी
फाल्गुन (फेब्रुवारी–मार्च) गोविंद आमलकी एकादशी पापमोचिनी एकादशी
अधिक मास (३ वर्षांतून एकदा) पुरुषोत्तम कमला एकादशी कमला एकादशी
महिना-शुक्लपक्ष; कृष्णपक्ष
चैत्र – कामदा; वरूथिनी
वैशाख – मोहिनी; अपरा
ज्येष्ठ – निर्जला/पांडव/भीमसेनी; योगिनी
आषाढ – शयनी; कामिका
श्रावण – पुत्रदा; अजा
भाद्रपद – परिवर्तिनी/पद्मा; इंदिरा
आश्विन – पाशांकुशा; रमा
कार्तिक – प्रबोधिनी/देवउठणी; उत्पत्ती एकादशी, उत्पन्ना एकादशी, देवी एकादशीचा प्रकटदिन
मार्गशीर्ष – मोक्षदा; सफला
पौष – पुत्रदा; षट्तिला
माघ – जया; विजया
फाल्गुन – आमलकी; पापमोचनी
अधिक महिन्यातल्या दोनही एकादश्यांचे नाव ‘कमला‘ असते. (पर्यायी नावे – पहिली पद्मिनी, दुसरी परम)
अजा एकादशी : अन्नदा एकादशी
आमलकी एकादशी : फाल्गुन शुक्ल एकादशीला काशीमध्ये रंगभरी/रंगभरनी/रंगभरणी एकादशी म्हणतात. ह्या दिवशी बाबा विश्वनाथाचा विशेष श्रृंगार होतो आणि काशीमध्ये होळीच्या पर्वकालाचा प्रारंभ होतो. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा करतात. जे लोक आमलकी एकादशीचे व्रत करू शकत नाहीत, त्यांनी या दिवशी आवळा सेवन केला पाहिजे, असे सांगितले जाते. या एकादशीला विष्णूची पूजा फलदायी मानली जाते. मथुरा येथे रंगभरनी एकादशी मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते.
उत्पत्ती एकादशी : उत्पन्ना एकादशी
(अधिक महिन्यातल्या शुक्ल पक्षातली) कमला एकादशी : पद्मिनी एकादशी
(अधिक महिन्यातल्या कृष्ण पक्षातली) कमला एकादशी : परम एकादशी
जया एकादशी : भैमी/भौमी एकादशी, भीष्म एकादशी (कर्नाटकात)
निर्जला एकादशी : पांडव एकादशी, भीमसेनी एकदेशी. या दिवशी गायत्री जयंती असते.
परिवर्तनी एकादशी : पार्श्व एकादशी
पुत्रदा एकादशी : पवित्रोपना एकादशी
(पौष महिन्यातील) पुत्रदा एकादशी : पौष पुत्रदा एकादशी
(श्रावण महिन्यातली) पुत्रदा एकादशी : श्रावण पुत्रदा एकादशी
प्रबोधिनी एकादशी : देव उत्थान एकादशी; देवउठणी एकादशी
मुख्य एकादशीनंतर जर दुसऱ्या दिवशीही एकादशी असेल तर तिला गौण एकादशी किंवा वैष्णव एकादशी म्हणतात. उदा० गौण जया एकादशी, वैष्णव जया एकादशी, वगैरे.
एकादशीचे धार्मिक महत्त्व
Parivartini Ekadashi
आषाढ शुद्ध एकादशीला नुसते आषाढी आणि कार्तिक शुद्ध एकादशीला नुसते कार्तिकी असे म्हणायची रूढी आहे आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला,शेषशायी भगवान श्री विष्णू झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल ११ला होतो व कार्तिक शुक्ल ११ला संपतो. धार्मिक वृत्तीची माणसे हे चार महिने व्रतस्थ राहतात.चातुर्मासातील चार महिन्यात अनेक व्रते पाळायची असतात ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आषाढीच्या दिवशी करतात. चातुर्मासात जैन साधू गावोगावी न जाता एकाच देरासरात स्थानकवासी होतात.चातुर्मासाचे शुद्ध नाव चतुर्मास आहे. पण चातुर्मास म्हणायची पद्धत आहे. आषाढ शुद्ध एकादशीच्या एक-दोन दिवस आधी येणाऱ्या नवमीला महाराष्ट्रात कांदे नवमी म्हणतात.
कार्तिकी एकादशी देवउठणी एकादशी. प्रबोधिनी एकादशी. या दिवशी, आषाढी एकादशीला शेषशायी झालेले विष्णू भगवान जागे होतात. कार्तिकी एकादशीपासून तुळशी विवाह सुरू होतात, ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी करता येतात. पंढरपूरची यात्रा या दिवशी संपते.
एकादशीला उपवास करण्याची प्रथा आहे. असा उपास करणाऱ्यांमध्ये दोन भेद आहेत. स्मार्त आणि भागवत. त्यासाठी दोन प्रकारच्या एकादश्या मानल्या जातात. भागवत धर्म पाळणारे, वारकरी इत्यादी लोक भागवत एकादशी, तर स्मृतींना मानणारे स्मार्त एकादशी पाळतात. एखाद्या महिन्यात दशमीचा, एकादशीचा वा द्वादशीचा क्षय असेल किंवा द्वादशीची वृद्धी असेल तर त्या महिन्यात बहुधा, स्मार्त आणि भागवत अश्या दोन एकादश्या दोन स्वतंत्र दिवशी येतात. दर महिन्याच्या प्रत्येक पक्षात अश्या दोन एकादश्या दोन वेगवेगळ्या दिवशी येतीलच असे नाही. पण जेव्हा एखाद्या पक्षात येतात तेव्हा, त्या एकादश्यांच्या निर्णयाचे नियम खाली क्रमवार दिले आहेत.
१. एकादशीच्या सूर्योदयापूर्वीच्या ९६ मिनिटांत जर दशमी असेल, आणि, (अ) सूर्योदयापूर्वीच दशमी संपली तर दशमीचा, व (आ) सूर्योदयानंतर संपली तर एकादशीचा क्षय असतो. तेव्हा त्यापुढच्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे समजतात..
२. द्वादशीचा क्षय झाला असेल तर एकादशी व द्वादशीच्या युग्माच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या आधीच्या दिवशी स्मार्त एकादशी आहे असे मानले जाते.
३. द्वादश्या जर दोन असतील तर पहिल्या द्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी आणि त्याच्या पूर्वीच्या दिवशी स्मार्त एकादशी धरतात.
४. एकादश्या जर दोन असतील तर भागवत आणि स्मार्त असे दोन्ही पक्ष दुसरी एकादशी धरतात.
५. वरील चार अपवाद वगळता, एरवी सूर्योदयाची जी एकादशी असेल ती स्मार्त आणि भागवत अशा दोन्ही पक्षांची एकादशी समजतात.
६. पक्षात पहिल्यांदा येणाऱ्या (स्मार्त) एकादशीला नाव असते, भागवत एकादशीला नसते. पण त्या पक्षात लागोपाठच्या दोन सूर्योदयांना दोन एकादश्या येत असतील तर दुसरीला नाव असते वतीच मोठी एकादशी असते.
७, एकादशी हा अनेकांचा उपासाचा दिवस असतो. हा उपवास द्वादशीला सोडतात. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग (तिथिवासर/हरिवासर) येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असे शास्त्र सांगते. हा तिथिवासराचा काळ संपल्यानंतरच उपास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो.
सूर्योदयापूर्वीच तिथिवासर संपले असेल तर पंचांगात तसे लिहिण्याची गरज नसते. अश्यावेळी सूर्योदयानंतर केव्हाही उपवास सोडता येतो.
एकादशीचा उपवास द्वादशीलाच का सोडावा?
Parivartini Ekadashi
शास्त्र व पुराणानुसार एकादशीचे व्रत अत्यंत महत्वाचे व्रत समजले जाते. हा उपवास एकादशीच्या संपूर्ण दिवसभराचा असून दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला सोडावा असं शास्त्रात व पुराणात सांगितलं जातं. असं का? सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठुमाऊलीच्या प्रेमासाठी हे व्रत अनेक भाविक, वारकरी नियमित करत असतात. याशिवाय रोजची चपाती भाजी खाऊन कंटाळा आला म्हणून उपवासाचे पदार्थ खायला मिळावे यासाठीही अनेक जण करतात. पण या व्रताचे काही नियम आहेत. त्यातीलच एक म्हणजे उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो.
एकादशी उपवासाचे मुख्य दोन प्रकार आहेत, स्मार्त आणि भागवत. बहुतांश वारकरी मंडळी भागवत पद्धत मानतात. तर स्मृतींना मानणारे लोक स्मार्त एकादशीचे व्रत करतात.एकादशीचा उपवास का करतात? एकादशीच्या व्रताविषयी अनेक कथा आहेत.त्यातलीच एक देव दानव युद्धाची कथा आहे.
कुंभ नावाच्या राक्षसाचा मुलगा मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपड मिळवलं. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णू, शिव अशा सर्वांपेक्षा तो बलवान झाला होतो. त्याच्या भीतीने सर्व देव त्रिकूट पर्वतावर एका गुहेत लपून बसले होते. त्या दिवशी एकादशी होती. त्यांनी आषाढी एकादशीचा उपवास केला आणि या उपवासामुळे त्यांना शक्ती मिळाली. त्यानंतर सर्व देवांनी गुहेच्या दाराजवळ बसलेल्या मृदुमान्य राक्षसाला ठार मारलं. ही शक्ती म्हणजे एकादशी असं सांगण्यात येतं. एकूण एकादशी व्रतामागे अनेक कथा सांगितल्या जात असल्या तरी त्याचा अर्थ जन कल्याण एवढाच आहे. उपवास द्वादशीलाच का सोडतात?एकादशीचा उपवास बहुतांश दुसऱ्या दिवशी द्वादशीला सोडला जातो. परंतु द्वादशीच्या सूर्योदयानंतर द्वादशीचा चौथा भाग येत असेल तर त्या काळात उपवास सोडू नये असं मानलं जातं. हा काळ संपल्यावरच उपवास सोडतात. हा काळ पंचांगात दिलेला असतो.
द्वादशीला वारकरी संप्रदायात फार महत्व आहे. या दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शीला भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होतो. एकादशीचा उपवास केल्यावर वारकरी द्वादशीच्या परण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शीला भगवंत दर्शनाला जातात. आणि उपवास सोडतात. याची कथा
अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत रत असे. संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्योदयाला भोजन करून उपवास सोडत. एकदा एकादशीला दुर्वास ऋषी हे अंबरीश ऋषींच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली. दुर्वास ऋषींनी मान्यता देऊन नदीवर गेले. सूर्यास्त होऊनही ते परत न आल्याने अंबरीश ऋषींसमोर प्रश्न उभा राहिला. अखेर त्यांनी थेंब भर पाणी पिऊन उपास सोडला आणि यजमान येण्याआधी भोजन न करता त्यांचा मानही ठेवला. मात्र दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजल्यावर ते चिडले. अंबरीश ऋषींना १० जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. यानंतर भगवंताने आपल्या भक्तावरील हा शाप स्वतःवर घेतला. आणि त्यांनी दहा अवतार घेतले, अशी मान्यता वारकरी संप्रदायात आहे.
परिवर्तीनी एकादशी
Parivartini Ekadashi
हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. वर्षभरात चोवीस वेळा एकादशी येते. तर अधिक मासच्या परिस्थितीत एकादशी सव्वीस वेळा येते. एकादशीचे व्रत भगवान विष्णुला समर्पित आहे. यादिवशी विधिवत पूजनासह व्रत केल्याने जीवनातील पाप नष्ट होते. भगवान विष्णूच्या कृपेसोबतच लक्ष्मीचीही कृपा प्राप्त होते. यामुळे घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही. यावेळी भाद्रपद मासातील परिवर्तिनी एकादशीचे व्रत २५ सप्टेंबर २०२३ रोजी आहे. या एकादशीलाश्री विष्णू आपल्या निद्रअवसस्तेत असताना आपली कुस बदलतात हेच विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी तीन दुर्मिळ योग जुळून येत आहे. त्यानुसार जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि पूजाविधी.
या तिथीला आहे एकादशी
यंदा परिवर्तिनी एकादशी २५ व २६ सप्टेंबर २०२३ रोजी भागवत एकादशी आहे. याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. हिंदू धर्मात शौव हे स्मार्त एकादशीचा ऊपवास करतात तर दुसऱ्या दिवशी वैष्णव भागवत एकादशी करतात. भाद्रपद शुक्ल पक्षातील परिवर्तिनी एकादशी तिथी २५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी प्रारंभ होत दुसऱ्या दिवशी २६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ५ वाजता समाप्त होईल.
हे आहेत शुभ योग परिवर्तिनी एकादशीला अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहेत. त्यामुळे या एकादशीचे महत्त्व वाढले आहे. या योगांमध्ये भगवान विष्णूची आराधना करून व्रत केल्यास शुभ फळ प्राप्त होते. या दिवशी उत्तराषाढ, श्रावण नक्षत्र तयार होत आहे. ही दोन्ही नक्षत्रे शुभ मानली जातात. या नक्षत्रांमध्ये केलेले सर्व कार्य अत्यंत फलदायी आणि शुभ असते. तसेच एकादशीला रवियोग, सुकर्म योग आणि सर्वार्थ योग तयार होत आहेत. जो अत्यंत दुर्मिळ आणि शुभ आहे.त्यानुसार २५ सप्टेंबर २०२३ रोजी सुकर्म योग दुपारी ०३ वाजून २३ मिनिटांनी सुरु होत २६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ५ वाजून ४६ मिनिटांपर्यंत असेल. तर सर्वार्थ सिद्धी योग २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी २६ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजून ११ पर्यंत असेल. तर रवि योग २५ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजून ११ मिनिटे ते ११ वाजून ५५ मिनिटांपर्यंत राहील.
पूजेचा शुभ मुहूर्त परिवर्तिनी एकादशीला शुभ मुहूर्तावर पूजेला महत्त्व आहे. शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास सकारात्मक लाभ होत भक्तांच्या मनोकामना पुर्ण होतात. त्यानुसार पूजेचा शुभ मुहूर्त २५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून १२ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून ४२ मिनिटांपर्यंत असेल. व्रत पारायण २५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजून २५ मिनिटापासून ते २६ सप्टेंबर रोजी दुपारी वाजून -११ मिनिटांपर्यंत असेल.
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे
Shri Swami Samarth 🙏
भागवत एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा