
श्रावण सोमवार
नमस्कार, श्री स्वामी समर्थ
श्रावण महिना आला म्हणजे आपल्या हिंदू धर्मात सगळ्या सणावाराला सुरुवात होते, आज निज श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तसेच या वेळेस पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी सोबत एकाच दिवशी आलेली आहे. या वर्षी श्रावण सोमवार ५ आहे.
-
पहिला सोमवार २१ ऑगस्ट
-
दुसरा सोमवार २८ ऑगस्ट
-
तिसरा सोमवार ४ सप्टेंबर
-
चौथा सोमवार ११ सप्टेंबर आणि
-
पाचवा सोमवार १८ सप्टेंबर ला आहे
त्या दिवशी हरतालिका पूजन आहे.
shravanmas ani 16 somwar mahiti तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे सूर. ‘दिव्याची आवस’ म्हणून जाड कणिक केशरी गूळ वापरून केलेले खमंग दिवे आणि त्यावर मुक्तहस्ते घातलेलं रवाळ तूप.. म्हणजेच येणाऱ्या श्रावणाची चाहूल ..!!
डबा भर चिरलेला पिवळा धम्मक गूळ, हरभरा डाळ, भाजलेले दाणे, फुटाणे, दाण्याचं खमंग कूट, नुकतीच करून ठेवलेली वेलचीची पुड, उपासाची भाजणी राजगिरा लाडू व खजूर यांनी भरलेले डबे, म्हणजेच श्रावणाच्या स्वागतासाठी सजलेलं घरातलं स्वयंपाकघर .!!
जिवतीचा फोटो, कहाण्यांच पुस्तक, स्वच्छ घासून चमकणारं पळीपंचपात्र , दिव्यांनी सजलेलं देवघर, फुलपुडीतून डोकावणाऱ्या दुर्वा, आघाडा, फुलं आणि सगळी मरगळ झटकून सजलेेलं घर म्हणजेच श्रावणाचं आगमन .!!
श्रावण म्हणजे आवर्जून करायचं पुरण, भाजणीचे वडे, नारळी भात, नारळाच्या वडया, वालाचं बिरडं, गव्हाची खीर, हारोळ्याचे लाडू, भोपळयाचे घारगे, गाकर, पुरणाची पोळी, पुरणाचे दिंड आणि दूध फुटाण्याचा नैवेद्य.. श्रावण म्हणजे वेगवेेगळ्या चवींतून घरांत दरवळणारा गंध ..!!
श्रावण म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाची राखी, आईने मुलांसाठी केलेली जिवतीची पूजा, शुक्रवारी मुलांच केलेलं पुरणाचं औक्षण, आपल्या घरासाठी सर्वांच्या आनंदासाठी केलेली देवीची पूजा, माहेरची येणारी आठवण म्हणून आई वहीनीकडे झालेलं सवाष्ण जेवण व मैत्रिणींबरोबर सजलेली मंगळागौर.. प्रत्येक नात्याला जपणारा हा श्रावण, अनेक रंगांची उधळण करत येणारा श्रावण .!!
श्रावण म्हणजे गाभाऱ्यात उमटणारे ओंकार.. श्रावण म्हणजे समईतल्या शुभ्र प्रकाशात दिसणारं पांढऱ्या फुलांनी सजलेलं शिवलिंग, कापसाच्या वस्त्रानं, हळदी कुंकवाच्या करंड्यानं धुप अगरबत्ती दिवा आणि चंदनाने सजलेलं पूजेचं ताट, गोकर्ण जाई जुई तगर जास्वंद बेल दुर्वा पत्री तुळस यांनी सजलेली पूजेची परडी. श्रावण म्हणजे प्राजक्ताच्या सडयाने नटलेलं आणि श्रावण सरींनी सजलेलं माझं आंगण. !!
श्रावण म्हणजे हिरवा ऋतु.. या सजलेल्या निसर्गाच्या बरोबरीने सजायचे दिवस.. कांकणांची किणकीण, काचेचा चुडा, हातावरची मेंदी, जरी काठाच्या साड्या, केसांत जुईचा गजरा, पायी जोडव्यांचा आवाज, गळ्यांत मंगळसूत्राबरोबर चमकणारा सर, कानांत कुड्या आणि पायांत पैंजण. म्हणजेच घरातही भेटणारा, सजवणारा श्रावण.. !!
श्रावण म्हणजे आठवणींची सर.
श्रावण म्हणजे डोळे मिटतां केवड्याच्या पानाचा पसरलेला गंध तर कधी तिच्या चाहुलीने दरवळणारा सभोवताल..
श्रावण म्हणजे नेमाने देवळांत जाणाऱ्या तिची आठवण करून देणारा सण, तर कधी मंगळागौर उजवताना तिला दिलेल्या वाणाची एक गोड आठवण..
श्रावण म्हणजे शुक्रवारी न चुकता तिनं केलेलं औक्षण, माहेरवाशीण म्हणून भरलेली ओटी आणि तिने आग्रहानं खावू घातलेली पुरणाची मऊसूत पोळी..
श्रावण म्हणजे देव्हाऱ्यांत समईच्या मंद प्रकाशात दिसणारं तिचं प्रसन्न रूप..
श्रावण म्हणजे आई. तुझ्या आठवणींचा पाऊस .!!!
शिवामूठ म्हणजे काय ? श्रावणी सोमवार आणि शिवामूठ
shravanmas ani 16 somwar mahiti श्रावण महिन्यातील दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन त्याची पूजा करावी आणि शक्य असल्यास निराहार उपवास करावा किंवा नक्त व्रत करावे. यामुळे शंकर प्रसन्न होऊन शिवसायुज्य मुक्ती मिळते. आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. जर शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी. तेही उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्या चार सोमवारी ४ प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. शिवाला शिवामूठ अर्पण करण्याचे महत्त्व आणि हे व्रत करतांना सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते, हे या लेखातून जाणून घेऊया.
शंकराला श्रावणातल्या सोमवारी वाहायची धान्याची मूठ. शिवामुठ वाहताना शंकराची गंध, फूल, बेलाची पाने वाहून पूजा करतात. शिवामुठीचे प्रत्येक सोमवारचे धान्य निराळे असते.*
१) पहिल्या सोमवारी तांदूळ,
२)दुसऱ्या सोमवारी तीळ,
३) तिसऱ्या सोमवारी मूग,
४) चौथ्या सोमवारी जव वाहतात.
५) पाचवा सोमवार आला तर त्या सोमवारी सातूची मूठ वाहतात.
श्रावण महिन्यातील शिवमूठ
शिवमुठ वाहण्याचा मंत्र
नमः शिवाय शांताय पंचवक्त्राय शूलिने ।
शृंगिभृंगिमहाकालगणयुक्ताय शंभवे।।
किंवा
“शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या ईच्छा पूर्ण कर रे देवा” असे तीन वेळा म्हणावे.
शिवामुठीची कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं. राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला.
पहिला सोमवार आला. ही रानीं गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, “बाई बाई, कुठं जातां?” ” महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहतों.” “यानं काय होतं?” “भ्रताराची भक्ति होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. नावडतीं माणसं आवडतीं होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ति होते.” मग त्यानीं हिला विचारलं, “तूं कोणाची कोण?” “मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते.”
त्यांचेबरोबर देवळांत गेली. नागकन्या-देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, “काय ग बायांनो वसा वसतां?”, “आम्ही शिवामुठीचा वसा वसतों.” “त्या वशाला काय करावं?” “मूठ चिमूट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलाचीं पानं घ्यावीं. मनोभावं पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टंमाष्टं खाऊं नये. दिवसा निजूं नये. उपास नाहीं निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळीं आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पांच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्यास तीळ, तिसर्यास मूग, चवथ्यास जव आणि पांचवा आला तर सातू शिवामूठीकरितां घेत जावे.”
पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनीं दिलं, आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला संगितलं. त्या दिवशीं हिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानणंदांनीं उष्टंमाष्टं पान दिलं. तें तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली.
पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरांतून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानांत जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावें पूजा केली आणि “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळीं सासर्यानं विचारलं. “तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, “माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, कांटेकुटे आहेत. साप-वाघ आहेत, तिथं माझा देव आहे.”
पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊं लागली. घरचीं माणसं मागं चाललीं. “नावडते, तुझा देव दाखव,” म्हणून म्हणूं लागलीं. नावडतीला रोजचा सराव होता. तिला कांहीं वाटलं नाहीं. ह्यांना कांटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानांत कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, हांड्या गलासं लागलीं. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनीं देवाचं दर्शन घेतलं. नावडाती पूजा करूं लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर मूग घेऊन “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून शिवाला वाहिलें.
राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळीं माणसं बाहेर आलीं. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळीं राहिलं देवळाकडे आणायला गेला. तों तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हां त्यांने सुनेला विचारलं, ” हें असं कसं झालं?” “माझा गरिबाचा हाच देव. मीं देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हांला दर्शन दिलं.” सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखींत घालून घरीं आणलं. नावडती होती ती आवडती झाली.*
*जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी. पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.
श्रावणातील वार विशेष
shravanmas ani 16 somwar mahiti चार्तुमासातला अत्यंत महत्त्वाचा असा हा महिना आहे.. या महिन्यातील प्रत्येक वार हा काहीतरी विशेष असतो. आठवड्यातील सातही दिवसांना आपले एक महत्त्व आहे. एरवी बुधवारला तसे काही नसते, मात्र श्रावणात बुधवारचेही आपले महत्त्व आहे. तर पाहुया आठवड्यातील प्रत्येक वाराचे श्रावणी महत्त्व.
रविवार ..
श्रावणातील प्रत्येक रविवारी गभस्ती नावाच्या सूर्याचे पूजन करण्यास सांगितले आहे. हे पूजन मौनाने करावे, असेही शास्त्रात सांगितले आहे.
सोमवार ..
श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवांचे पूजन करण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्येक सोमवारी शिवमुठ नावाचे व्रत करावे. हे व्रत विवाह (लग्न) पश्चात पाच वर्षे करावे. सोमवारी एकभुक्त (एक वेळ जेवण) राहून शिविंलगाची पूजा करावी. प्रत्येक सोमवारी धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या. जे धान्य घेणार त्याच्यापैकी तांदूळ असल्यास त्याचा एक दाणा रुप्याचा व इतर ध्यान्यामध्ये एक सोन्याचा दाणा अर्पण करावा. मूठ वाहताना म्हणावयाचा मंत्र असा,
नम: शिवाय शान्ताय पञ्चवक्त्राय शूलिने ।
शृङगभङ्गिमहाकालगणयुक्ताय शम्भवे ।।
पहिल्या सोमवारी -तांदूळ, दुसर्या तीळ, तिसर्या मूग, चौथ्या जवस, पाचव्या सातू अशा मुठी वाहत असतात. या व्रताची पाच वर्षे झाल्यावर उद्यापन करतात..
मंगळवार
श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगलागौरी यांचे व्रत केले जाते. हे व्रत नवोढा (नवविवाहित) मुलींचे नित्य आहे. विवाहानंतर ५ किंवा ७ वर्षे हे व्रत करतात. या व्रताच्या देवता शिव, गणेश यांचे बरोबर गौरी आहे. पूजनाचा मंत्र असा, “पुत्रान् देहि धनं देहि सौभाग्यं देहि मङले । अन्यांश्च सर्वकामांश्च देहि देवि नमोऽऽस्तुते ।।” पूजन झाल्यावर या व्रताची कहाणी ऐकावी.
बुधवार:
महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुध बृहस्पती पूजनाचे व्रत केले जाते.. बुध बृहस्पतीचे (गुरू) चित्र घेतात किंवा रेखाटतात. त्यांची पूजा करतात. दही भाताचा नैवेद्य दाखवतात. सात वर्षांनंतर काही स्त्रिया याचे उद्यापन करतात.
गुरुवार :
श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पती पूजन करण्यास सांगितले आहे.. यांची देवता बृहस्पती (गुरू) आहे.
शुक्रवार :
श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्यास सांगितले आहे. ही बालसंरक्षक आहे पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जिवंतिकेचे चित्र काढतात. आता सर्वत्र छापील चित्र मिळते. जिवंतिकेचे ध्यान असे आहे,
जरे जिवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि । रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोऽस्तुते
जीवंतिकेची पूजा करून देवीला ओवाळतात व देवीची प्रार्थना करतात. ‘अक्षतां निक्षिपाम्यम्ब यत्र मे बालको भवेत् । तत्र त्वया रक्षणीयो जीवन्ति करूणार्णवे !!’ हे करूणामयी माते मी जिकडे अक्षता टाकते, त्या दिशेला असणार्या माझ्या बालकाचे तू रक्षण कर. अशी ही प्रार्थना माता आपल्या अपत्यांसाठी करत असते. आपल्या इकडे जरा -जिवंतिका म्हणतात. यात जरा ही देवीसुद्धा बालकांची रक्षण करणारी आहे.
शनिवार .
श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी शनीपीडेचा त्रास होऊ नये म्हणून हे व्रत केले जाते. शनीची लोखंडाची मूर्ती बनवावी व पंचामृती पूजा करावी. शनीच्या कोणस्थ, पिंगल, बभ्रू, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरी शनैश्र्चर आणि मंद या नावांचा जप करावा. उडीद-तांदूळाची खिचडी करावी, पायस, आंबिल, पुर्या यांचा नेवैद्य अर्पण करावा.
या व्रताचा पर्याय :
प्रत्येक शनिवारी लक्ष्मी-नृसिंह, शनी, हनुमान यांची पूजा करावी.. मारूतीला रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. लक्ष्मी नृसिंहाप्रित्यर्थ ब्राह्मण सवाष्ण भोजनाला बोलवावे. शनीप्रित्यर्थ सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करावी. मुंज्या मुलाला अभ्यंगस्नान व भोजन द्यावे. एकभुक्त राहावे. श्रावणातील शनिवाराला संपत शनिवार म्हणतात.
shravanmas ani 16 somwar mahiti
श्रावण मास सोळा सोमवारचे उपवास
shravanmas ani 16 somwar mahiti श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे.. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा २३ जुले ते २२ ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो..
श्रावणाला हिंदीत सावन म्हणतात, संस्कृतमध्ये श्रावण आणि नभ(स्) असे कमीतकमी दोन शब्द आहेत.
श्रावणामध्ये पावसाच्या दोन जोरदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते.. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते. ते ज्याला सोसत नाही, ती व्यक्ती खरोखरच नाजूक असली पाहिजे या श्रावणातल्य
श्रावण महिन्यास सर्वात पवित्र महिना समजण्यात येते, कारण ह्या महिन्यात भगवान श्रीशंकराची पूजा – अर्चा ह्यास विशेष असे महत्व आहे.
इंग्रजी कालगणनेनुसार हा महिना साधारणतः जुलै – ऑगस्ट महिन्या दरम्यान येत असतो.. ह्या वर्षी तो ३१ ऑगस्ट २०२० पासून सुरु होत आहे.
श्रावण महिन्यातील सोमवार ह्या पवित्र महिन्यात भक्तजन दोन प्रकारे सोमवार करतात.
श्रावणी सोमवार.
ह्या दिवशी करण्यात येणारा उपास हा श्रावणी सोमवार ह्या नावाने ओळखला जातो. सोमवार हा दिवस भगवान श्रीशंकरास समर्पित आहे.
सोळा सोमवारचे उपवास
श्रावण हा पवित्र महिना असल्याने १६ सोमवारचे उपास सुरु करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ समजण्यात येतो.
श्रावण महिन्याचे १६ सोमवार..
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार पासून सुरवात करून सलग १६ सोमवार हा उपवास करण्यात येतो. ह्यास १६ सोमवारचा उपास असे संबोधले जाते.
श्रावण सोमवारचा उपवास हा भगवान श्रीशंकरास अतिशय प्रिय असल्याने त्याला सर्वाधिक महत्व प्राप्त होते. श्रावण महिन्यात सोमवारचा उपवास करण्याची परंपरा आहे. ह्या महिन्यात बिल्वपत्राने भगवान श्रीशंकराचे पूजन व पाण्याचा अभिषेक अत्यंत फलदायी ठरते अशी एक मान्यता आहे.
जेव्हा भक्त सोमवारचा उपवास करतो, तेव्हा भगवान श्रीशंकर त्याच्या सर्व ईच्छा पूर्ण करतात. ह्या महिन्यात ज्योतिर्लिंग दर्शनासाठी लाखो भाविक हरद्वार, उज्जैन, नाशिक इत्यादी सहित सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी दर्शन घेतात.
श्रावण महिन्या पासून १६ सोमवारचे महत्व व पूजा विधी.
श्रावण महिन्यास सर्वात पवित्र महिना समजण्यात येते, कारण ह्या महिन्यात भगवान श्रीशंकराची पूजा – अर्चा ह्यास विशेष असे महत्व आहे..
इंग्रजी कालगणनेनुसार हा महिना साधारणतः जुलै – ऑगस्ट महिन्या दरम्यान येत असतो. ह्या वर्षी तो ३१ ऑगस्ट २०२० पासून सुरु होत आहे..
श्रावण महिन्यातील सोमवार ह्या पवित्र महिन्यात भक्तजन दोन प्रकारे सोमवार करतात.
श्रावणी सोमवार.
ह्या दिवशी करण्यात येणारा उपास हा श्रावणी सोमवार ह्या नावाने ओळखला जातो. सोमवार हा दिवस भगवान श्रीशंकरास समर्पित आहे.
सोळा सोमवारचे उपवास.
श्रावण हा पवित्र महिना असल्याने १६ सोमवारचे उपास सुरु करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ समजण्यात येतो.
श्रावण महिन्याचे १६ सोमवार
श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार पासून सुरवात करून सलग १६ सोमवार हा उपास करण्यात येतो. ह्यास १६ सोमवारचा उपास असे संबोधले जाते..
श्रावण सोमवारचा उपवास हा भगवान श्रीशंकरास अतिशय प्रिय असल्याने त्याला सर्वाधिक महत्व प्राप्त होते. श्रावण महिन्यात सोमवारचा उपवास करण्याची परंपरा आहे. ह्या महिन्यात बिल्वपत्राने भगवान श्रीशंकराचे पूजन व पाण्याचा अभिषेक अत्यंत फलदायी ठरते अशी एक मान्यता आहे.
जेव्हा भक्त सोमवारचा उपवास करतो, तेव्हा भगवान श्रीशंकर त्याच्या सर्व ईच्छा पूर्ण करतात. ह्या महिन्यात ज्योतिर्लिंग दर्शनासाठी लाखो भाविक हरद्वार, उज्जैन, नाशिक इत्यादी सहित सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी दर्शन घेतात.
श्री महादेव रूद्राभिषेकाचे महत्त्व आणि फलश्रुती
shravanmas ani 16 somwar mahiti कलीयुगामध्ये आपल्यावरती येत असलेल्या नाना प्रकारच्या संकटातून आपली सुटका करावयाची असल्यास तसेच, आपल्या वास्तुतील दोष व कलह परिहार करण्यासाठी, सर्व विघ्ने दूर होण्यासाठी, सर्व रोग नाहिसे होऊन दिर्घ आयुष्य प्राप्त व्हावे यासाठी, विद्या व लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आणि मनातील ईच्छा पूर्ण होण्यासाठी, श्रीशिवाचे आशिर्वाद मिळविण्यासाठी आपल्याला ”रुद्र अभिषेक” हे प्रभावी अनुष्ठान आहे
रुद्राभिषेकाचे महत्व
रुद्र ही एक वैदिक देवता आहे. रुद्राचा अविष्कार हा ऋग्वेदापासून आहे, ऋग्वेदात रुद्राचे एकूण ७५ उल्लेख आहे ही देवता शंकरात नंतर विकसित झाली. रुद्र हा शब्द रोदीती अथवा रोदयति अर्थातच रडविणारा या शब्दावरून आला आहे. या देवतेचे वेद्पश्चात शंकर, शिव यांच्याशी एकीकरण झाले आहे ते फार नंतरचे. रुद्राचे मूलस्वरूप हे फार भीषण, हिंसक असे आहे, त्यामुळे भक्त त्याला सतत विनंती करतो की माझ्यावर दया कर, मला मारू नकोस, प्रसन्न होऊन मला हव्या त्या वस्तू दे. रुद्राचे दुसरे स्वरूप भद्र म्हणजे कल्याण करणारा असेही आहे. म्हणून रुद्रसूक्त हे त्या भद्र रुपाला प्रसन्न करण्यासाठी आहे. रुद्र हा अग्नी स्वरुप आहे तसेच जल स्वरुप आहे. तो पंच महाभुतांचा अधिपति आहे. रुद्र हा नागर संस्कृतिच्या आधीपासून सनातन धर्मात अस्तित्वात आहे.
रुद्रसूक्त हा यजुर्वेदाच्या तैतेरीय संहितेचा भाग आहे. आपल्या समाजात रुद्र सूक्ताच्या पठणाची एकादशणी आणि लघुरुद्र ही दोन रूपे जास्त प्रचलित आहेत. याचीच विस्तरीत आवृत्ती म्हणजे महारुद्र आणि अतिरुद्र होत. एकादशणी मध्ये रुद्र्सुक्ताच्या ११ आवृत्या करायची पद्धत आहे आणि पुढील रुपात आवर्तनाची संख्या ११ च्या पटीत वाढत जाते. लघुरुद्र करताना १२१ आवर्तने होणे आवश्यक असते म्हणून ११ पुरोहित असतात. ११ पुरोहित ११ वेळा पाठ करतात. रुद्र्सुक्तात रुद्राची १०० नावे आहेत म्हणून या सुक्ताला शतरुद्रीय असेही म्हणतात.
श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.
रुद्र्सुक्ताचे दोन भाग आहेत
१] अकरा नमके ज्यात रुद्राच्या नावामागे वंदन असो याअर्थी “नमः” असे पद येते. नमकात आधी देवतेची स्तुती केली जाते आणि त्या स्तुतीने ते अकरा रुद्र प्रसन्न झाले की मग उत्तरार्ध येतो.
२] अकरा चमके म्हणजे ज्यात “च मे” हे शब्द आहेत ज्याचा अर्थ हे मला हवे अथवा मला हे दे. चमकामध्ये स्तोत्रपठण करणारा किंवा करविणारा मग त्या रुद्रांकडे आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मागतो. चमक आणि नमक ही नावे पुराणकाळात रूढ झाली, त्याचा व्याकरणाशी संबंध नाही.
याशिवाय रुद्रसुक्ताचा भाग नसलेला “ओम शान्तिः शान्तिः शान्तिः” हा शांतीमंत्र सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात. घरात सर्वसाधारणपणे होम करतात आणि होमाला या सूत्राच्या आवर्तनाची जोड दिली जाते. ११ रुद्र असल्याने ११ या संख्येला महत्व आहे असे दिसते.
यजुर्वेदकाळातही चोर, डाकू, दरोडेखोर होते आणि त्यांचे नियंत्रण त्यांच्यापासून संरक्षण करणे हे काम रुद्राला दिले आहे, फसविणाऱ्या, लबाड लोकांचे, तलवारी घेऊन हत्या करणाऱ्या चोराचे, वाटमाऱ्याचे इत्यादीचे पालकत्व रुद्राला दिले आहे. [नमक ३]
तसेच मर्दानी, घाव घालणाऱ्या स्त्रियांचे, विषयलंपट, टोळ्या आणि त्यांचे पुढारी, भूत आणि इतर गणांचा अधिपती ज्याचे अक्राळ विक्राळ आणि नानारुपधारी असे अनुयायी आहेत, कुंभार, लोहार, पारधी, कोळी, शिकारी इ. चा नायक अशीही स्तुती आहे. [नमक ४]
सृष्टीवर पूर्ण प्रभुत्व असणारा, वाळवांटात, बर्फात, धुळीत, खडकात, जमिनीवर आणि हिरवळीवर असणारा अशी पण स्तुती आहे [नमक ९]
त्याचे फार मोठे सैन्य आहे, आणि आळवणी जी केली जात आहे ती अश्या या सामर्थ्यवान देवाने आपल्याला त्रास देणार्या शक्तींपासून आपले रक्षण करावे, कृपा करावी म्हणून हे सुक्त आहे.
आता भक्त ज्या वस्तू त्या काळास अनुसरून मागतो आहे ती यादी बरीच लंबीचौडी आहे आणि एकदा नजरेखालून घालण्यासारखी आहे. त्यात तांदूळ, सातू, मका, उडीद, तील, मूग, हरभरे इ. इ. धान्य मागितली जात आहेत. सोने, लोखंड, शिसे, बीड, जस्त, कथील हे धातू मागितले जात आहेत. यावरून आपल्या पूर्वजांना हे धातू वेदकाळात माहिती होते हे सिद्ध होते. पूजेचे सामान, यज्ञाचे सामान मागतो आहे. सुक्तपठनकर्ता दूध, तूप, मध इ. मागतो आहे. दीर्घायुष्य, औषधे, सुंदर कांती, धनसंपदा, शेती हे पण मागतो आहे. तसेच आयुष्य, प्राण, अपान, चक्षु, कान, मन वाणी, आत्मा इत्यादींची पुष्टी मागतो आहे.
तसेच विषम संख्याची भाजणी, चारच्या पाढ्याची भाजणी हे मांडून याच्या पटीत सौख्य मागतो आहे. त्यावरून त्याकाळचे गणिताचे ज्ञान दिसते.
रुद्र्सुक्तात मागितलेल्या सर्व गोष्टी या ऐहिक जीवनात उपयोगी पडणाऱ्या आहेत, पारमार्थिक नाही. सुक्तकार हा धनधान्य, घरदार, बायकामुले, गुरेढोरे, शेती इ. सगळ्या गोष्टी मागतो आहे, द्युतासारखी क्रीडाही मागतो आहे. सुक्तकाराच्या पारलौकिक मागण्या या स्वर्गापर्यंत सीमित आहेत. रुद्राचे भयंकर सामर्थ्य आणि सैन्य हे आपल्या शत्रूवर वापरले जावे ही इच्छा तो व्यक्त करत आहे.
हा एक रुद्राचा साधासुधा भक्त आहे ज्याला जनावरे, रान, शत्रू, चोर, दरोडेखोर आणि रुद्रासारखे भीषण दैवत यांची भीती आहे. हे सुक्त हे रुद्राशी बोलणे आहे, ज्यात सुक्तकार आधी स्तुती, आळवणी करून मग आपल्याला काय पाहिजे त्याची यादी देत आहे. हा रुद्र्सुक्तातला लपवालपवी न करणारा साधेपणा फार लोभस आहे. रुद्रसुक्ताचे पठण हा एक अनुभव आहे.
या सूक्ताचे पठन करण्याच्या विशिष्ट पद्धती आहेत, त्यामध्ये एकादशीनी, लघुरूद्र, महारुद्र, अतिरुद्र इत्यादि प्रयोग आहेत. श्रावणी सोमवार, महाशिवरात्री इत्यादि पवित्र दिवशी लघुरूद्र करण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे काही लोक रोजच्या पूजेत अभिषेकच्या वेळी रुद्र म्हणतात.
अभिषेक :
अभिषेकाचा अर्थ असतो स्नान करणे किंवा करविने. ज्यामुळे त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. रद्र अभिषेकामुळे समृद्धी होते. सर्व इच्छा पूर्ण होण्याची ताकद मिळते, जीवनात आनंद प्राप्त होतो.
श्री शंकराचे विविध संख्यावाचक अभिषेक.
रुद्र एकादशिनी अभिषेक :- (रुद्र -एकादशिनी ) – ११ आवर्तने.
लघुरुद्र अभिषेक :- (लघुरुद्र ) -१२१ आवर्तने.
महारुद्र अभिषेक:- (महारुद्र) – १३३१ आवर्तने.
अतिरुद्र अभिषेक :- (अतीरुद्र) – १४६४१ आवर्तने
स्वामी समर्थ
काळजी करू नका स्वामी आपल्या पाठीशी आहे