नागपंचमी

Nagpanchmi pujavidhi

 

Nagpanchmi pujavidhi: नागपंचमी म्हणजे श्रावण महिण्यातला पहिला सण , नागपंचमी ला शेतकऱयांचा मित्र म्हणजे नागोबाची पूजा केली जाते. श्रावण महिना आला म्हणजे आपल्या हिंदू धर्मात सगळ्या सणावाराला सुरुवात होते, आज निज श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे तसेच या वेळेस पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी सोबत एकाच दिवशी आलेली आहे, नागपंचमी श्रावण महिण्याच्या पाचव्या दिवशी अति उत्सहात हा सण साजरा केला जातो. गावाकडे नागपंचमी म्हणजे झोके खेळणे, नवीन लग्न झालेली मुलगी या सणाला माहेरी येते, आमच्या गावाला पद्धत आहे कि उकडलेले अन्न खायचे त्यात भात किंवा चपाती नाही खायची. आपल्या गावच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या असू शकतात. सगळ्या कुटुंबात स्वामी भक्त असो किंवा नसो ते नागदेवतेची पूजा करतातच. या सोबत काही आजार असतील किंवा कालसर्प असल्यास नागदेवदेतची पूजा करतात. महादेवाचं एक प्रतीक म्हणजे नागदेवता. नागपंचमी २१ ऑगस्ट पहिला श्रावणी सोमवार या रोजी आहे.

श्री नाग पंचमी :नाग देवता पूजन विधी

साहित्य :- पूजेसाठी पाणी, पळी, प्लेट, हळदी, कुंकू,अक्षता, गंध गोळी/चंदन, पाट/चौरंग,फुले,बेलपत्र,तुळशी पत्र,धूप/अगरबत्ती,दीप, कापूर, नैवेद्य साठी दूध – लाह्या किंवा आपल्या परंपरे नुसार,पानाचा विडा(दोन पानावर सुपारी, बदाम,खारीक)

पूर्व तयारी :-
सर्व प्रथम हळद मिश्रित चंदनाने किंवा गंध गोळी च्या साह्याने पाटावर किंवा चौरंगावर किंवा भिंतीवर, कागदावर (आपल्या येथील परंरेप्रमाणे) नऊ नागांचे चित्र(आकृती) काढून घ्यावी. खालील प्रमाणे पूजन संपन्न करावे…

१)मंगल तीलक

पुरुषांनी स्वतःच्या कपाळी गंध, चंदन,अक्षता इ लावाव्यात, सुवासिनी महिलांनी हळदी कुंकू व श्रीमती भगिनींनी गंध लावावा.

२)आचमन
पुढील ३ नावे उच्चारल्यावर प्रत्येक नावाच्या शेवटी डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन प्यावे –

श्री केशवाय नमः । श्री नारायणाय नमः । श्री माधवाय नमः । खालील नावाने हातावर पाणी घेऊन खाली ताम्हणात सोडावे – श्री गोविन्दाय नमः त्यानंतर पुढील नावे अनुक्रमे उच्चारावीत –
विष्णवे नमः । मधुसूदनाय नमः । त्रिविक्रमाय नमः । वामनाय नमः । श्रीधराय नमः । हृषीकेशाय नमः । पद्मनाभाय नमः । दामोदराय नमः । संकर्षणाय नमः । वासुदेवाय नमः । प्रद्युम्नाय नमः । अनिरुद्धाय नमः । पुरुषोत्तमाय नमः । अधोक्षजाय नमः । नारसिंहाय नमः । अच्युताय नमः । जनार्दनाय नमः । उपेन्द्राय नमः । हरये नमः । श्रीकृष्णाय नमः ।

२.प्रार्थना(हात जोडावे.)
श्रीमन्महागणाधिपतये नमः । इष्टदेवताभ्यो नमः ।
कुलदेवताभ्यो नमः । ग्रामदेवताभ्यो नमः । स्थानदेवताभ्यो नमः ।वास्तुदेवताभ्यो नमः ।आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः ।सर्वेभ्यो देवेभ्यो नमः ।सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः ।अविघ्नमस्तु ।

सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः । लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।।धूम्रकेतु र्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः ।द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।।

सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलम् ।येषां हृदिस्थो भगवान्मङ्गलायतनं हरिः ।।
यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः । तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।

विनायकं गुरुं भानुं ब्रह्मविष्णुमहेश्वरान् ।सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये ।।
अभीप्सितार्थसिद्धयर्थं पूजितो यः सुरासुरैः । सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ।।

सर्वेष्वारब्ध कार्येषु त्रयस्त्रि भुवनेश्वराः । देवा दिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशानजनार्दनाः ।।

३.देशकाल
आपल्या डोळ्यांना पाणी लावून पुढील देशकाल म्हणावा.

श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्‍वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथमचरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणपथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः उत्तर/दक्षिणे तीरेे शालिवाहन शके अस्मिन् वर्तमाने व्यावहारिके शुभकृतनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ श्रावण मासे शुक्लपक्षे पंचम्यां तिथौ सोम वासरे चित्रा दिवसनक्षत्रे शुभ योगे बव करणे कन्या स्थिते वर्तमाने श्रीचंद्रे सिंह स्थिते वर्तमाने श्रीसूर्ये मेष स्थिते वर्तमाने श्रीदेवगुरौ शेषेषु सर्वग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु एवङ् ग्रह-गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ…

४.संकल्प
(उजव्या हातात दोन पळी पाणी घेऊन त्यात अक्षता टाकाव्यात आणि पुढील संकल्प म्हणावा.)

मम आत्मनः परमेश्वर- आज्ञारूप -सकल- शास्त्र- श्रुतिस्मृति- पुराणोक्त-फल-प्राप्तिद्वारा मम सकुटुम्बस्य सपरिवारस्य सर्वदा सर्वतः सर्पभय निवृत्ति पूर्वकं सर्पप्रसाद सिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं श्रावण शुक्ल पञ्चम्यां यथा मीलितोपचारैः नागपूजां करिष्ये । तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति स्मरणं करिष्ये । शरीरशुद्ध्यर्थं दशवारं विष्णुस्मरणं करिष्ये। कलश-घण्टा-दीप-पूजनं च करिष्ये ।
(पाणी उजव्या हातावरून खाली सोडावे.)

श्रीगणपति स्मरण
वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ।।
महागणपतये नमः । ध्यायामि ।

त्यानंतर शरीरशुद्धीसाठी दहा वेळा श्रीविष्णूचे स्मरण करावे
– नऊ वेळा ‘विष्णवे नमो’ आणि शेवटी ‘विष्णवे नमः ।’ असे म्हणावे.

कलशपूजन पूजेच्या तांब्या वर उजवा हात ठेवावा

गङ्गे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
नर्मदे सिन्धुकावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु ।। कलशाय नमः ।
कलशे गङ्गादितीर्थान् आवाहयामि ।कलशदेवताभ्यो नमः ।
सकल पूजार्थे गन्धाक्षत पुष्पं समर्पयामि ।
(कलशात गंध, फूल आणि अक्षता वाहाव्यात.)

घंटापूजन
आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् ।कुर्वे घण्टारवं तत्र देवताह्वानलक्षणम् ।।घण्टायै नमः।

सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि
(घंटेला गंध, फूल आणि अक्षता वाहाव्यात.)

दीपपूजन
भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः ।
आरोग्यं देहि पुत्रांश्च मत: शान्तिं प्रयच्छ मे ।।
दीपदेवताभ्यो नमः ।सकलपूजार्थे गन्धाक्षतपुष्पं समर्पयामि
(समईला गंध, फूल आणि अक्षता वाहाव्यात.)

अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थाङ्गतोऽपि वा ।
यः स्मरेत्पुण्डरीकाक्षं स बाह्याभ्यन्तरः शुचिः ।।

(या मंत्राने तुळशीपत्र पाण्यात भिजवून पूजा साहित्यावर आणि आपल्या अंगावर पाणी प्रोक्षण करावे.)

 

नागपंचमीपूजन 

 

 

श्री नवनाग आवाहन :-

गंधाने काढलेल्या किंवा चित्ररुपी
नव नागांच्या ठिकाणी पुढील नाममंत्रांनी नवनागांचे आवाहन करावे. प्रत्येक नाम मंत्राने उजव्या हातात अक्षता घेऊन ‘आवाहयामि’ असे म्हणतांना एक – एक नाग देवतेच्या चरणी अक्षता वहाव्यात.

ॐ अनन्ताय नमः । अनन्तम् आवाहयामि ।।
ॐ वासुकये नम: । वासुकिम् आवाहयामि ।।
ॐ शेषाय नम: । शेषम् आवाहयामि ।।
ॐ शङ्खपालाय नम: । शङ्खपालम् आवाहयामि ।।
ॐ पद्माय नम: । पद्मम् आवाहयामि ।।
ॐ कम्बलाय नम: । कम्बलम् आवाहयामि ।।
ॐ धृतराष्ट्राय नम: । धृतराष्ट्रम् आवाहयामि ।।
ॐ तक्षकाय नम: । तक्षकम् आवाहयामि ।।
ॐ कालियाय नम: । कालियम् आवाहयामि ।।
ॐ नागपत्नीभ्यो नमः । नागपत्नीः आवाहयामि ।।

ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नम: । ध्यायामि । नमस्कार करावा

१. ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । आवाहयामि । (पुन्हा अक्षता वहाव्या.)

२. ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । आसनार्थे अक्षतान् समर्पयामि ।(अक्षता वाहाव्यात.)

३. ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । पाद्यं समर्पयामि । (पाय धुण्यासाठी एक पळी पाणी ताम्हणात सोडावे.)

४. ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । अर्घ्यं समर्पयामि । (अर्घ्यासाठी कापूर,गंध मिशित्त एक पळी पाणी ताम्हणात सोडावे.)

५. ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । आचमनीयं समर्पयामि ।(आचमनासाठी एक पळी पाणी ताम्हणात सोडावे.)

६.ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । स्नानं समर्पयामि । (स्नानासाठी एक पळी पाणी ताम्हणात सोडावे.)

७. ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । वस्त्रं समर्पयामि । (वस्त्र अर्पण करावे किंवा वस्त्र प्रीत्यर्थ अक्षता अर्पण कराव्या)

८. ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । उपवीतं समर्पयामि । (जानवे किंवा अक्षता वहाव्यात.)

९. ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । चन्दनं समर्पयामि । (अनंतादी नवनागांना गंध-फुल वहावे.)

१०.नागपत्नीभ्योनमः । हरिद्रां समर्पयामि । (हळद वाहावी.)

११. नागपत्नीभ्योनमः । कुङ्कुमं समर्पयामि । (नागपत्नींना कुंकू वाहावे.)

१२. ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । अलङ्कारार्थे अक्षतान् समर्पयामि ।  (अक्षता अर्पण कराव्या.)

१३. ॐ अनन्तादिvनागदेवताभ्यो नमः । पूजार्थे ऋतुकालो द्भवपुष्पाणि तुलसी पत्राणि बिल्व पत्राणि दूर्वाङ्कुरांश्च समर्पयामि। (उपलब्ध फुले,हार तसेच तुळशीपत्रे, बेलाची पाने, दूर्वा अर्पण करावीत.)

१४. ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । धूपं समर्पयामि ।
(धूप /उदबत्ती ओवाळावी.)

१५. ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । दीपं समर्पयामि ।
(निरांजन ओवाळावे.)

१६. ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । नैवेद्यार्थे पुरतस्थापित नैवेद्यं निवेदयामि । (दूध-साखर, लाह्या यांचा तसेच कुलपरंपरेनुसार खीर इत्यादि पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.तीन वेळा पाणी फिरवावे)
प्राणाय स्वाहा ।
अपानाय स्वाहा ।
व्यानाय स्वाहा ।
उदानाय स्वाहा ।
समानाय स्वाहा |
ब्रह्मणे स्वाहा ।
ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । नैवेद्यं समर्पयामि ।

(‘समर्पयामि’ म्हणतांना एक एक पळीने पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.)
मध्ये पानीयं समर्पयामि ।
उत्तरापोशनं समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनं समर्पयामि ।
मुखप्रक्षालनं समर्पयामि ।

करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि । (चंदन अर्पण करावे.)

मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि ।(विडा/ पान-सुपारी अर्पण करावी.त्यावर पळीभर पाणी वहावे)

ॐ अनन्तादि नागदेवताभ्यो नमः । मङ्गलार्तिक्यदीपं समर्पयामि | (दिप/आरती ओवळवी)

ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । कर्पूरदीपं समर्पयामि ।
(कापराची आरती ओवाळावी.)

ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । नमस्कारान् समर्पयामि ।(साष्टांग नमस्कार घालावा.)

ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । प्रदक्षिणां समर्पयामि ।
(डावीकडून उजवीकडे वर्तुळाकार फिरत स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी.)

(हात जोडून खालील प्रार्थना करावी.)

श्रावणे शुक्लपञ्चम्यां यत्कृतं नागपूजनम् ।
तेन तृप्यन्तु मे नागा भवन्तु सुखदाः सदा ।।अज्ञानाज्ज्ञानतो वाऽपि यन्मया पूजनं कृतम् ।
न्यूनातिरिक्तं तत्सर्वं भो नागाः क्षन्तुमर्हथ ।।
युष्मत्प्रसादा त्सफला मम सन्तु मनोरथाः ।
सर्वदा मत्कुले मास्तु भयं सर्पविषोद्भवम् ।।
ॐ अनन्तादिनागदेवताभ्यो नमः । प्रार्थनां समर्पयामि ।

क्षमा प्रार्थना :–

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ।।

मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ।।

कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् ।करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पये तत् ।।

(खालील मंत्र म्हणून उजव्या हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे आणि त्या नंतर दोन वेळा आचमन करावे.)

अनेन कृतपूजनेन अनन्तादिनवनागदेवता: प्रीयन्ताम् ।

सायंकाळी विसर्जनाच्या वेळी पुढील श्लोक म्हणून पूजन केलेल्या नागदेवतांच्या चरणी अक्षता वाहून विसर्जन करावे.

यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवात् ।
इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च ।।

|| श्री परमेश्वरार्पन मस्तू ||

श्री स्वामी समर्थ 

nagpanchami pujavidhi
Nagpanchmi pujavidhi: जसा श्रावण मास भगवान शिवाच्या अति उच्च सेवेचा कालावधी आहे. तसाच या मासात जे प्रमुख शिवगण आहेत त्यांचीही उपासना ,पंचरात्र,नवरात्र या स्वरूपामध्ये केली जाते.नागपंचमी हा पंच रात्री उत्सवातील प्रमुख दिवस आहे .
नागपंचमी ची पूजा श्रावण शु.पंचमी लाच का केली जाते?
समुद्र मंथनातून 14 प्रकारचे रत्न बाहेर पडले होते. त्यातील एक रत्न उच्चैश्रवा अश्व होता…त्या अश्वाचा वेग वाऱ्यालाही न जुमाणारा होता.ती दुधासारखा पांढरा शुभ्र होता.
आपण सर्व कश्यप ऋषींची संतान आहोत.म्हणून ज्या वेळेस आपण पूजेच्या वेळेस संकल्प करतो तेव्हा ज्यांना आपले गोत्र माहित नसेल तर आपण कश्यप गोत्र म्हणतो. कश्यप हे प्रमुख गोत्र ऋषी आहेत. काश्यपा पासून सर्व देव,मानव , असुर,राक्षस, पशु पक्षी,वृक्ष वेली ,नागाची सृष्टी निर्माण झाली आहे.
कश्यापांच्या दोन पत्नी होत्या .

1.विनिता ..या पत्नीपासून त्यांना दोन संतान झाले.
१.अरुण…जे सूर्याचे सारथी आहेत
२ गरुड.. जे विष्णुंचे वाहन आहेत
2.कद्रू…या पत्नी पासून सर्व विषारी पशू पक्षी व. सर्पांची उत्पत्ती झाली.

समुद्र मंथनातून जेव्हा उच्चैश्रवा अश्व बाहेर निघाले तेव्हा या दोन्ही सवती विनिता आणि कद्रू मध्ये वाद सुरू झाला.
विनिता म्हणाली उच्चैश्रवा हा अश्व पूर्ण पांढरा आहे.तेव्हा कद्रू म्हणाली की जरी हा अश्व पांढरा आहे तरी त्याच्या मानेवर काळे केस आहेत.वाद सुरू झाला .
शेवटी पंच नियुक्त झाला. त्यात असे ठरले की जो हरेल त्याने जिंकणाऱ्याच्या घरी दासीचे काम करेल.
नंतर कद्रूने त्यांच्या सर्प मुलांना एकदम लहान रूप घेवून त्या अश्वच्या मानेच्या केसांना घट्ट चिकटून बसा.जेणेकरून लांबून पाहिले तर मानेवरचे केस काळे दिसतील .त्यातील काही सर्पानी होकार दिला.आणि काहींनी नकार दिला.त्यावर कद्रूने सर्पाना शाप दिला की तुम्ही जनमेजयाच्या सर्प यज्ञात ठार व्हाल. त्यानंतर वासुकीसह जे कद्रूनी शाप दिलेले सर्प गण होते ते ब्रम्हदेवाकडे गेले.आणि त्यांना सांगितले. त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणाले . *वासुकीची जी मानस बहीण आहे शिवमानस कन्या मन्सा आहे,त्यांचा मुलगा आस्तिक ऋषी या सर्प यज्ञात मध्यस्थी करेल आणि सर्प यज्ञ थांबवून तुमच्या सर्वांची प्राणहानी वाचवेल असा आशिर्वाद ब्रम्हदेवाकडून मिळाला होता.
तो दिवस होता श्रावण शु.पंचमी चा दिवस
म्हणून नाग वंशात हा दिवस जिवदानाचा दिवस मानला जातो

म्हणून या दिवशी जर आपण सर्पांचे पूजन केले तर आपल्याला सर्पाची भीती राहत नाही आणि कोणताही सर्प आपल्याला दंश करत नाही.

परंतु जर सर्पाला छेडखानी केली तर या दिवशी झालेले सर्प दंश विघात जात नाही. म्हणजे वाया जात नाही.परिणाम दाखवतो.
या दिवशी ब्रम्हदेवकडून नाग वंशाला अभय, आशिर्वाद मिळाले होते .म्हणून नागपंचमी आपण साजरी करतो.
तसेच सर्प यज्ञ सुरू झाल्यावर आस्तिक ऋषींनी मध्यस्थी करून हा यज्ञ थांबवला होता तो दिवसही नाग पंचमी चा च होता .या दिवशी नाग लोकांना जीवदान मिळाले होते.म्हणून या दिवशी आस्तिक ऋषींचे स्मरण केले तरी आपल्याला कोणताच सर्प दंश करत नाही.अशी दंत कथा आणि भावना आहे.

नाग शक्ती आणि कुंडलिनी शक्ती यांचा जवळचा संबंध आहे कारण कुंडलिनी शक्ती सुध्दा साडेतीन वेढे देवून सर्पिनीच्या रुपात मूलाधारात निवास करते.ज्यावेळेस आपण ध्यान धारणा करतो आणि आपल्यावर गुरुकृपा होते त्यावेळेस हीच कुंडलिनी शक्ती तिचे साडेतीन वेढे सोडत ब्रम्ह रंध्रात जाते आणि अमृत स्त्रवत. आणि त्यातून आपल्याला ब्रम्हानंदाची प्राप्ती होते
मानवी जीवनातल्या अनेक समस्या या सर्पांवर अवलंबून आहेत, नव्हे तर जीवन मधल्या प्रमुख देवतांच्या सेवे साठी सुध्दा सर्प लोक कारणीभूत आहेत .
अनंत नागाने या भूमीचा भार घेतला आहे

शेष नागाने भगवान विष्णूंना शय्या म्हणून आधार दिला आहे.

वासुकी नाग भगवान शिवाच्या गळ्यामध्ये आहे

अशा अनेक देवी देवतांच्या ठिकाणी नागवंश मदतीला आहे.एवढेच नव्हे तर
ज्यावेळेस भगवान शिवांनी हलाहल प्राशन केले होते ,तेव्हा हलाहल त्यांच्या ओंजळीतून बाहेर पडले.त्या हलाहल पासून जीवसृष्टीचे रक्षण व्हावे म्हणून सर्पानी ते हलाहल प्राशन केले होते तेव्हा महादेवांनी प्रसन्न होवून त्यांना आशिर्वाद दिला होता की बाळांनो तुम्ही माझ्या कार्यात सहभाग दिला म्हणून आजपासून तुमची सुध्दा माझ्यासारखी पूजा होईल नव्हे तर तुमची पूजा माझी झाली असे मानेल.आणि त्यांना अभय वरदान दिले .म्हणून नाग पंचमी साजरी केली जाते आधार गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नागपंचमी पूजा व्हिडिओ ,दिंडोरी प्रणित.

 

श्री स्वामी समर्थ

काळजी करू नका स्वामी आपल्या पाठीशी आहे

3 thoughts on “Nagpanchmi pujavidhi

  1. खूप छान माहिती दिली ….श्रवण महिन्यातील… सोमवार आणि नागपंचमी एका दिवशी त्याच महत्व….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *