।। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली ।।
swamicharitra mahiti aani seva:आपल्या आयुष्या साठी उत्तम मार्ग म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि निष्काम भक्ती कुठेच कसली अडचण नाही आणि कसलीच भीती नाही. स्वामी म्हणजे सर्व काही स्वामी म्हणजे ब्रह्मांडनायक
हिऱ्याप्रमाणे पैलू पाडतो तो गुरु, जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोय तो गुरु,जीवनातला खरा आनंद शोधायला शिकवतो तो गुरु, संकटावर मात करायला शिकवतो तो गुरु.
श्री स्वामी चरीत्र सारामृताचे ३ अध्याय
व
“श्री स्वामी समर्थ” मंत्र ११ माळी कशासाठी
swamicharitra mahiti aani seva
1)पहिला अध्याय पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी ..
2)दुसरा अध्याय वर्तमान काळामध्ये सद्बुध्दी व चांगले कर्म घडण्यासाठी..
3)तिसरा अध्याय भविष्य उज्वल होण्यासाठी …
व ११ माळीमधील
पहिली
१ माळ गुरुसाठी .
२ मातेसाठी ..
३ पित्यासाठी ..
४ पितरासाठी..
(पुढील ६ माळी षडरिपू साठी)
5 काम..
६ क्रोध..
७ लोभ ..
८ मोह ..
९ मद..
१० मत्सर ..
आणि फक्त आणि फक्त
११ वी माळ स्वतःसाठी असते
swamicharitra mahiti aani seva
कारण आपली पायरी हि ११ वी आहे गुरु पासून अनुक्रमे प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते नंतर आपले काम होते कारण षडरिपू आपल्या आध्यत्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असते .
कुणी सेवे मध्ये शॉर्टकट मारायला पाहतात म्हणून काम होत नाही म्हणजे पहिल्या पायरीवरून एकदम ११ वी पायरी गाठायची प्रयत्न जर केला तर आपण तोंडावर पडू शकतो .
म्हणून ११ माळी जप करावा लागतो…
ही सर्व सेवा करत असताना प्रत्येकाने..
सत्कर्म
परोपकार
दान
अशा या सेवेत स्वतः पण सहभागी झाले पाहिजे आणि इतरांना ही या सेवेत सहभागी करून घेतले पाहिजे.
म्हणजेच काय तर प्रत्येक सेवेकर्याने…
श्री जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला पाहिजे.
श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक लावले पाहिजे
पितरांच्या नावाने दान केले पाहिजे.
अनंतकोटी ब्रम्हांडनायक
।। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली ।।
रूद्र यंत्रावर करावयाच्या सेवा
swamicharitra mahiti aani seva
१} रोग, शारिरीक व्याधी निवारण्यासाठी:-
३ वेळा महामृत्यूंजय कवच, १ माळ महामृत्यूंजय मंत्र याचा अभिषेक.
२} संतती प्राप्तीसाठी:-
रूद्र, शिवमहिन्म स्तोत्र, महामृत्युंजय कवच यांनी देशी गाईच्या दुधाने अभिषेक करून उभयतांनी ते तिर्थ घेणे.
३} विविहासाठी:-
उपवरांनी – ॐ त्र्यंबकं यजामहे | सुगंधी पत्नी वेदनम् || उर्वारूकमिंव बंधनान् | मृत्योर्मुक्षीय मामृतात ||
उपवधूने – ॐ त्र्यंबकं यजामहे | सुगंधी पती वेदनम् || उर्वारूकमिंव बंधनान् | मृत्योर्मुक्षीय मामृतात ||
वरील मंत्र महामृत्यूंजय यंत्रावर १ माळ अभिषेक करून ते तीर्थ उपवर व उपवधूने घ्यावे.
४} पितृदोष निवारण्यासाठी:-
रूद्र अथर्वशीर्षाचा महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक करून घरात सर्वत्र ते तीर्थ शिंपडणे.
५} पती-पत्नीमध्ये विवाह किंवा कलह होत असल्यास:-
सुगंधित जलाने (पाण्याने) किंवा उसाच्या रसाने रूद्र, महामृत्युंजय कवच, महामृत्युंजय मंत्र यांनी महामृत्युंजय यंत्रावर अभिषेक करणे व ते तीर्थ घ्यावे.
६} प्रखर बाधा असल्यास:-
१ माळ महामृत्युंजय मंत्राचे जायफळांच्या तुकड्याने हवन करणे.
!! श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु !!
दत्त देवतेचे विविधांगी दर्शन
swamicharitra mahiti aani seva
भगवान दत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीतील अद्भुत निर्मिती आहे ! ते अत्री व अनसूया यांचे पुत्र आणि विष्णूचे अंश होत.. दत्तात्रेयांचा प्रभाव शैव, वैष्णव, शाक्त या तिन्ही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून उरणारा आहे. दत्तात्रेयांविषयीचा उत्कट श्रद्धाभाव महानुभाव, नाथ, वारकरी, समर्थ अशा वेगवेगळ्या संप्रदायांतही आहे. दत्तात्रेयांची चरित्रकथा अनेक पुराणांत वर्णन केलेली आहे..
दत्तात्रेयांचे उल्लेख महाभारतात आढळतात. दत्तात्रेयांनी सहस्रार्जुन या त्यांच्या शिष्यावर कृपा केल्याचा उल्लेख महाभारताच्या वनपर्वात, शांतिपर्वात, अनुशासनपर्वात येतो.. एक विशेष उल्लेख अनुशासनपर्वाच्या एक्याण्णव्या अध्यायात आला आहे. “अत्रीच्या वंशात जन्मलेल्या दत्तात्रेयाला निमी नावाचा पुत्र होता आणि निमीला श्रीमान नावाचा पुत्र होता.” दत्तात्रेयांचे स्वत:चे गृहस्थ जीवन असे क्वचितच कोठे प्रकट झाले असेल..
swamicharitra mahiti aani seva
भविष्यपुराणातील कथेनुसार ब्रह्म-विष्णू-महेश हे तिन्ही देव अतिथींच्या रूपात अत्री आश्रमाच्या दारी येऊन उभे राहिले व त्यांनी अनसूयेला इच्छाभोजन मागितले.तिने पतीचे चिंतन करून अतिथींवर तीर्थ शिंपडले. त्याबरोबर तिघांची तीन बालके झाली. अनसूयेने अत्री यांच्यासमोर ती तिन्ही बालके ठेवून “स्वामिन्, देवेन् दत्तम’ असे म्हटले. तिन्ही देवांनी त्यांची मूळ रूपे धारण केली. ब्रह्मा चंद्र झाले, शिव दुर्वास झाले. ते तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले. विष्णू मात्र अत्री व अनसूया यांच्या इच्छेनुसार दत्तरूपाने तेथेच राहिले. त्यांनी त्यांच्या सहा हातांत तिन्ही देवांचे प्रतीक म्हणून ब्रह्मदेवाचा कमंडलू आणि जपमाला, शंकराचा त्रिशूल आणि डमरू, विष्णूचे चक्र आणि शंख धारण केले..
दत्त म्हणजे ज्याने त्याच्या भक्तांना सर्वस्व दिले आहे असा.. ‘दत्तात्रेय’ हा शब्द दत्त अत्रेय असा बनला आहे. अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा. अत्री यांची इच्छा ईश्वर त्यांना पुत्ररूपाने लाभावा अशी होती. भगवंताने त्यांच्यावर प्रसन्न होऊन म्हटले, “मी स्वतःला तुला देऊ (दत्त) केले आहे!’ त्यामुळे त्या अवताराला दत्त’ असे म्हणतात.
अत्री ऋषींचा उल्लेख ऋग्वेदातील पाचव्या मंडलात आहे..त्यांनी ग्रहणकाळातील सूर्याचे निरीक्षण केले होते. ते अग्निपूजक, सूर्योपासक होते. त्यांचे पर्जन्यसूक्त प्रसिद्ध आहे. अत्रिसंहिता व अत्रिस्मृती असे दोन ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. त्यांच्याविषयीचा कथाभाग गोपथ ब्राह्मण ग्रंथात आला आहे..
दत्तमाता सती अनसूया म्हणजे कर्दम ऋषी आणि देवहूती यांच्या कन्या..अनसूया धर्मपरायण तपस्विनी होत्या. कपिल मुनी हे त्यांचे बंधू
swamicharitra mahiti aani seva
दत्तात्रेय यांचा अवतार अत्री ऋषी व सती अनसूया अशा दाम्पत्याच्या आश्रमात झाला.. मात्र दत्तजन्म वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. तो एकमुखी दत्त मंदिरात मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या माध्यान्हकाळी झाला असे गृहित धरले जाते. दत्तजन्म अन्य ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी प्रदोषसमयी झाला असे मानतात..
दत्तात्रेयांची मूर्तिवर्णने अग्निपुराण, विष्णुधर्मोत्तर पुराण, दत्तात्रेयकल्प या ग्रंथांत आढळतात..दत्तात्रेय हे त्रिमुख आणि षड्भुज, एकमुख आणि षड्भुज, एकमुख आणि द्विभुजही आहेत. ‘श्रीदत्तहृदय’ नावाच्या ग्रंथात तीन मुखे आणि दहा हात असलेल्या दत्त ध्यानाचे वर्णन आले आहे..
दत्ताच्या त्रिमूर्तीची कल्पना पुराणकाळात रूढ झाली.. दत्तात्रेयाचे सूचन ‘पृथ्वीपती’, ‘स्वर्णसिंहासनस्थ’ या विशेषणांवरून राजयोगी म्हणून होते. ब्रह्मा-विष्णू-महेश, सत्त्व-रज-तम, उत्पत्ती-स्थिती-लय, जागृती-स्वप्न-सुषुप्ती या तिन्हींच्या वर्णनाची परंपरा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. त्रिमूर्तीची वर्णने ‘उत्तरकामिकामगम्’, ‘रूपावतार’, ‘रूपमंडन’, ‘शिल्परत्न’ आदी ग्रंथांतून आढळतात..
श्रीदत्तांना गिरिकंदरांमध्ये एकांतात वास्तव्य करणे फार आवडते..ते ‘सह्याद्री-निलय:, ‘श्रीमेरूनिलय:’, ‘श्रीशैलवनचारी’, ‘गिरीनारवासी’ आदी त्यांच्या विशेषणांवरून सूचित होते. त्यांच्या वास्तव्याचे पर्वत प्राय: त्रिकूट अथवा त्रिशिखर अशा स्वरूपाचे आहेत. औदुंबर वृक्षाने अश्वत्थ, तुलसी, बिल्व या तिन्ही वृक्षांचे स्थान कलियुगामध्ये घेतले असल्याची समजूत आहे. त्यामुळे त्याला कलियुगातील कल्पवृक्ष असे समजले जाते. त्यासाठीच जेथे जेथे श्रीदत्तमूर्ती व पादुका असतील तेथे तेथे औदुंबर वृक्ष असल्याचे दृष्टीस पडते. त्यांच्या पाठीमागे गाय उभी दिसते. पृथ्वी आणि कामधेनू हे त्या गायी
II श्री स्वामी समर्थ II
swamicharitra mahiti aani seva
१. श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना फक्त आपले काम सफल होईपर्यंत संकल्पित सेवा करायची नसून स्वामी सेवेच्या व्रताशी आपण सर्व बांधील आहोत या उद्देशाने सेवा करावी.
२. यश, अपयश, राग, अपमान हे सर्वच पचवता आले पाहिजे असे झाल्यास आत्महत्याचा विषय पुढे येणार नाही. शरीराप्रमाणे मनही खंबीर पाहीजेल.
३. मुलांना सहज मिळणाऱ्या पॉकेटमनी मूळे त्यांना पैशाचे महत्व उरले नाही यातूनच व्यसनाधीनता, आजार, नैराश्य, माता-पिता यांकडे दुर्लक्ष अशा अनेक समस्या उद्भवत आहेत.
४. गुरूंची आज्ञा पूर्ण श्रद्धेने व दृढ निश्चयाने पाळावी. गुरूंना व्यक्ती समजणे, त्यांचे आचरण तपासणे, तो ज्ञानी आहे की नाही याची चिकित्सा करणे यामुळे शिष्याचे परमहित साधत नाही उलट त्याचे अहित होते. म्हणून आपल्या गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांची आज्ञा पाळावी.
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे
Shri Swami Samarth 🙏