श्री स्वामी समर्थ
आजच्या सेवे मध्ये श्री स्वामी समर्थ Shree Swami Samarth यांच्या भूपाळी आरती काकड आरती, सिद्धमंगल स्तोत्रम, करुणाष्टक, शिवस्तुती, श्रीराम रक्षा स्रोत्रम, सद्गुरू प्रार्थना,स्वामी समर्थ तारक मंत्र, दत्तात्रय आरती इत्यादी ची माहिती खाली दिली आहे
काकड आरती
ओवाळीतो काकड आरती !
स्वमिसमार्था तुज प्रती !!
ओवाळीतो काकड आरती !
स्वमिसमार्था तुज प्रती !!
चरण दावे जगत्पते !
स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!
ओवाळीतो काकड आरती !
स्वमिसमार्था तुज प्रती !!
चरण दावे जगत्पते !
स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!
भक्तजन येउनिया !द्वारी उभे स्वामीराया !
चरण तुझे पहावया !तिष्ठती अतिप्रती !!१!!
ओवाळीतो काकड आरती !
स्वमिसमार्था तुज प्रती !!
चरण दावे जगत्पते !
स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!
भक्तांच्या कैवारे समर्थ निर्धारे
हात ठेउनिया चरणावरी !!
गातो आम्ही तुझी स्तुती !!२!!
ओवाळीतो काकड आरती !
स्वमिसमार्था तुज प्रती !!
चरण दावे जगत्पते !
स्तवितो तुझी आदिमुर्ती !!धृ!!
भूपाळी
श्री स्वामी समर्थ
स्वामीसुत
उठा उठा सकळ जन ! पाहूचला स्वामी चरण !! तर तुटोनि जाईल भवबंधन ! भावेचरण पाहतांची !!धृ!!
त्यांचे होतांचि दर्शन ! तृप्त होतीन नयन !!
भावे घालोनि लोटांगण ! चरण तुम्ही वंदाते !!१!!
कोटि तीर्थ चरणापाशी ! त्या चरणी सदभावेसी !!
विनदुनि तुम्ही अहर्निशीं ! जन्म मरण चुकवा कीं !!२!!
रुप पाहाताचि लोचनी ! सुख होईल साजण !!
अज्ञान जाऊनि तत्क्षणीं ! ज्ञानज्योती प्रगटेल !!३!!
जपा नाम निर्धारी ! पावन ते पंचदशाक्षरी !!
तेणे चुकूनि तुमची फेरी ! मोक्षपद मिळेल कीं !!४!!
परब्रम्ह हे अवतरले ! म्हणुनी नाम ते पावलें !!
आता जपा तोंचि वाहिले ! तुम्हा सुख व्हावया !!५!!
स्वामी नाम हाचि वन्ही ! महापापें ती तत्क्षणीं !!
तृणवत टाकील जाळुनी ! प्रातःकाळ…
प्रातःस्मरणम्
कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती |
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ||
समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले ।
विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ।।
गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पतिन् ।पञ्चैतानि स्मरेन्नित्यं वेदवाणी प्रवृत्तये ॥
तुज देखें जो नरु त्यास सुखाचा होय संसारु । यालागी नामादरू विघ्नहरु तुज साजे ।।
ओम नमो भगवते गजाननाय ।
ध्यानमूलं गुरोः मूर्तिः पूजामूलं गुरोःपदम् । मंत्रमूलं गुरोः वाक्यं मोक्षमूलं गुरोःक्रुपा ।।
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरम् । तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरूवे नमः।।
श्रीमन् महागणाधिपतये नमः ।।
श्री कुलदेवताभ्यो नमः ।।
श्री गुरुभ्यो नम:
अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगिराज, परब्रह्म, सच्चिदानंद सदगुरू
अक्कलकोट निवासी, पूर्णदत्तावतार
श्री स्वामी समर्थ महाराज की जय💐
ॐ रक्तांगं रक्तवर्णं पद्म नेत्रम
सुहास्य वदनं कंथा टोपीच माला
दंड कमंडलुधर कट्यांकर रक्षक
त्रैगुण्यरहित, त्रैलोक्यपालक, विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे
श्री स्वामी समर्थावतार धारक पाहिमाम्।
ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तीं ।
द्वंद्वातीतं गगन सदृश्यं
तत्त्वमस्यादी लक्ष्यम ।।
एकं नित्यम विमलं अचलं
सर्वाधी साक्षीभूतं ।
भावातीतं त्रिगुण रहितं
सद्गुरुं तम नमामि ।।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा:
गुरु:साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
मूकं करोति वाचालम् पंगुं लंघयते गिरिम्
यत्कृपा तमहं वंदे परमानं…
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
नि:शंक हो रे मना,निर्भय हो रे मना।
प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना।।
अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी।
अशक्य ही शक्य करतील स्वामी।।१।।
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय।
स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय।।
आज्ञे वीणा काळ ना नेई त्याला।
परलोकी ही ना भीती तयाला।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी।। २ ।।
उगाची भीतोसी भय हे पळू दे।
जवळी उभी स्वामी शक्ति कळू दे।।
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा।
नको घाबरू तू असे बाळ त्याचा।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी।। ३ ।।
खरा होई जागा श्रद्धेसहित।
कसा होशी त्याविणा तू स्वामीभक्त।।
कितीदा दिला बोल त्यांनीच हात।
नको डगमगू स्वामी देतील साथ।।
अशक्य ही शक्य करतील स्वामी।। ४ ।।
विभूती नमन नामध्यानाधी तीर्थ।
स्वामीच या पंचप्राणामृतात।।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती।
न सोडी कदा स्वामी जया घेई हा…
सद्गुरू प्रार्थना
सद्गुरु नाथा, हात जोडीतो अंत नको पाहू |
उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू
||धृ||
निशीदिनी श्रमसी,मम हितार्थ तू,किती तुज शीण देऊ |
ह्रदयी वससी,परी नच दिससी,कैसे तुज पाहू ||१||
उत्तीर्ण नव्हे,तव उपकारा, जरी तनु तुज वाहू |
बोधूनि दाविसी,इहपर नश्वर, मनी उठला बाऊ ||२||
कोण,कुठील मी,कवण कार्य मम,जनी कैसा राहू |
करी मज ऐसा,निर्भय निश्र्चल,सम सकला पाहू ||३||
अजाण हतबल,भ्रमित मनिची,तळमळ कशी साहू |
निरसूनी माया,दावी अनुभव,प्रचिती नको पाहू ||४||
सद्गुरु नाथा,हात जोडीतो, अंत नको पाहू |
उकलुनी मनीचे,हितगुज सारे, वद कवणा दावू
||धृ||
श्री स्वामी समर्थ
दत्तात्रय आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ करुणाष्टक
असे पातकी दीन मी स्वामी राया
पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया
नसे अन्य त्राता जगी या दिनाला
समर्था, तुझ्यावीण प्रार्थू कुणाला?
मला माय ना बाप ना आप्त बंधू
सखा, सोयरा सर्व तू दीनबंधू
तुझा मात्र आधार या लेकराला
समर्था, तुझ्यावीण प्रार्थू कुणाला?
नसे शास्त्र विद्या कलादीक काही
नसे ज्ञान वैराग्य ते सर्वथाही
तुझे लेकरू ही अहंता मनाला
समर्था, तुझ्यावीण प्रार्थू कुणाला?
प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा
तुझा दास मी ही स्मृती ना मनाला
क्षमेची असे याचना त्वत्पदाला
समर्था, तुझ्यावीण प्रार्थू कुणाला?
मला काम क्रोधादीकी नागविले
म्हणोनी समर्था तुला जागविले
नको दूर लोटू तुझ्या लेकराला
समर्था, तुझ्यावीण प्रार्थू कुणाला?
नको अंत पाहू त्वरे धाव घेई
तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई
अनाथासी आधार तुझा दयाळा
समर्था, तुझ्यावीण प्रार्थू कुणाला?
कधी गोड वाणी न येई मुखाला,
कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला
कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला
समर्था, तुझ्यावीण प्रार्थू कुणाला?
मला एवढी घाल भिक्षा समर्था
मुखे नित्य गावी तुझी गुणगाथा.
घडो पाद सेवा तुझ्या किंकराला
समर्था, तुझ्यावीण प्रार्थू कुणाला?
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
घोरकष्टोधरण स्तोत्र
श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव । श्रीदत्तास्मान्पाहि देवाधि देव ।
भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥१॥
त्वं नो माता त्वं पिताप्तोऽधिपस्त्वं । त्राता योगक्षेमकृत्सदगुरूस्त्वं ।
त्वं सर्वस्वं ना प्रभो विश्वमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥२॥
पापं तापं व्याधिंमाधिं च दैन्यं । भीतिं क्लेशं त्वं हराऽशुत्व दैन्यम् ।
त्रातारं नो वीक्ष ईशास्त जूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥३॥
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता । त्वतो देव त्वं शरण्योऽकहर्ता ॥
कुर्वात्रेयानुग्रहं पुर्णराते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥४॥
धर्मेप्रीतिं सन्मतिं देवभक्तिम् । सत्संगप्राप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिम् ।
भावासक्तिर्चाखिलानंदमूर्ते । घोरात्कष्टादुद्धरास्मान्नमस्ते ॥५॥
॥श्लोकपंचकमेतद्यो लोकमंगलवर्धनम् ॥
॥प्रपठेन्नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियोभवेत् ॥
श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामीविरचितं घोरकष्टोद्धरण स्तोत्रम्
।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ।।
सिध्दमंगल स्तोत्रम
श्री मदनंत श्रीविभीषित अप्पल लक्ष्मी नरसिंह राजा । जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥
श्रीविद्याधरि राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा। जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥
माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा । जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥
सत्यऋषीश्वर दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा। जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥
सवित्रकाठकचयन पुण्यफल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा । जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥
दौ चौपाती देव लक्ष्मी धनस्ख्या बोधित श्रीचरणा । जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥
पुण्यरूपिणी राजमांब सुत गर्भ पुण्यफल संजाता। जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥
सुमतीनंदन नरहरिनंदन दत्तदेवप्रभु श्रीपादा। जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥
पीठिकापुर नित्यविहारा मधुमति दत्ता मंगलरूपा। जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥
श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये
श्रीराम रक्षास्तोत्रम
ॐ अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीताराम चन्द्रोदेवता अनुष्टुप् छन्दः सीता शक्तिः श्रीमान् हनुमान् कीलकं श्रीरामचन्द्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्रजपे विनियोगः
ध्यानम्
ध्यायेदाजानुबाहुं धृतशर धनुषं बद्ध पद्मासनस्थं । पीतं वासोवसानं नवकमल दलस्पर्थि नेत्रं प्रसन्नम् । वामाङ्कारूढ सीतामुख कमल मिलल्लोचनं नीरदाभं । नानालङ्कार दीप्तं दधतमुरु जटामण्डलं रामचन्द्रम् ।
स्तोत्रम् ।
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातक नाशनम् ।
ध्यात्वा नीलोत्पल श्यामं रामं राजीवलोचनम् । जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुट मण्डितम् ।
सासितूण धनुर्बाण पाणिं नक्तं चरान्तकम् । स्वलीलया जगत्रातु माविर्भूतमजं विभुम् ।
रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघवः पातुफालं…
शिवस्तुती
कैलासराणा शिव चंद्रमौळी ।
फणींद्र माथा मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥१॥
रवींदुदानावल पूर्ण भाळीं ।
स्वतेज नेत्रीं तिमीरौघ जाळी ।
ब्रह्मांडधीशा मदनान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥२॥
जटा विभूती उटि चंदनाची ।
कपालमाला प्रित गौतमीची ।
पंचानना विश्वनिवांतकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥३॥
वैराग्य योगी शिव शूलपाणी ।
सदा समाधी निजबोधवाणी ।
उमानिवासा त्रिपुरान्तकारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥४॥
उदारमेरु पति शैलजेचा ।
श्रीविश्वनाथ म्हणती सुरांचा ।
दयानिधी तो गजचर्मधारी ।
तुजवीण शंभो मज कोण तारी ॥५॥
करुणात्रिपदी या सुंदर रचनेचा पूर्ण अर्थ
प. प. श्री. थोरले महाराज भगवान श्रीदत्तप्रभूंची विनवणी करताना पहिल्या पदात म्हणतात,
शांत हो श्रीगुरुदत्ता, मम चित्ता शमवी आतां ॥ ध्रु.॥
तूं केवळ माता जनिता, सर्वथा तूं हितकर्ता । तूं आप्तस्वजन भ्राता, सर्वथा तूंचि त्राता । भयकर्ता तूं भयहर्ता, दंडधर्ता तूं परिपाता । तुजवांचुनि न दुजी वार्ता । तू आर्ता आश्रय दत्ता ॥१॥
अपराधास्तव गुरुनाथा, जरि दंडा धरिसी यथार्था । तरि आम्हीं गाउनि गाथा, तव चरणीं नमवूं माथा । तूं तथापि दंडिसि देवा, कोणाचा मग करुं धावा । सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ॥२॥
तूं नटसा होउनि कोपी, दंडितांहि आम्ही पापी । पुनरपिही चुकत तथापि, आम्हांवरि न च संतापी । गच्छतः स्खलनं क्वापि, असें मानुनी नच होऊ कोपी । निजकृपा लेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ॥३॥
तव पदरीं असता ताता, आडमार्गीं पाउल पडतां । सांभाळुनि मार्गावरता, आणिता न दुजा त्राता । निज बिरुदा आणुनि चित्ता, तूं पतितपावन दत्ता । वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तू गुरुनाथा ॥४॥
सहकुटुंब सहपरिवार, दास आम्ही हें घरदार । तव पदी अर्पूं असार । संसाराहित हा भार । परिहरिसी करुणासिंधो, तूं दीनानाथ सुबंधो । आम्हां अघलेश न बाधो । वासुदे-प्रार्थित दत्ता ॥५॥
श्रीनृसिंहवाडीच्या पुजा-यांच्या मनमानी कारभारावर कोपाविष्ट झालेल्या श्रीदत्तप्रभूंची करुणा भाकताना स्वामी महाराज म्हणतात,
“हे श्रीगुरु दत्तराया, आपण नेहमी शांतच असता. आपल्याला क्रोध येणे संभवतच नाही. पण भक्तांच्या हितासाठी आपण धारण या कृतक कोपाने माझ्या मनाला अस्वस्थता आलेली आहे, तेवढी घालवून आपण मला शांती प्रदान करावी ॥ ध्रु.॥
( प.पू.श्री.शिरीषदादा कवडे यांनी एका प्रवचनात फार मार्मिक सांगितले होते की, करुणात्रिपदीमधील ‘शांत हो श्रीगुरुदत्ता’ मध्ये, ‘अहो शांत श्रीगुरुदत्ता’ असाच अधाहृत पाठ आहे. तेथे ‘शांत’ हे श्रीदत्तप्रभूंचे विशेषण आहे. स्वभावत:च जे नित्यशांत आहेत, त्यांना आणखी कशाला बरे स्वामी महाराज शांत व्हा म्हणतील?)
देवा, आपणच आमची माता आहात, आम्हांला जन्माला घालणारे जनितेही आपणच आहात. आपणच आमचे सर्व बाजूंनी हित करणारे आमचे आप्त, जवळचे नातेवाईक, सगेसोयरे, आमचे वाडवडील, बंधू आणि आमचे रक्षणकर्ते आहात. प्रसंगी आम्ही नीट वागावे म्हणून भय दाखविणारे व ती सुयोग्य जाणीव झाल्यावर ते भय हरण करणारेही आपणच आहात. म्हणूनच तुम्ही दंड धारण केलेला आहे. शिवाय तो दंड आमच्या संकटांचा, शत्रूंचा नाश करण्याच्या आपल्या लीलेचा द्योतकही आहे. म्हणूनच श्रीदत्तराया, तुमच्याशिवाय आम्हांला अन्य कोणीही माहीतच नाही. देवा, आपणच आमच्यासारख्या आर्तांचे एकमात्र आश्रय आहात. ॥१॥
हे दयाळू भगवंता, आपण चुकलेल्यांना अपराधांची शिक्षा देण्यासाठीच हा दंड हाती धरलेला आहे. हे जरी यथार्थ असले तरी आम्ही अपराधी भक्त, आमच्या चुकांची कबूली देऊन, तुमची यशोगाथा गाऊन तुमच्या चरणीं मस्तक नमवून करुणा भाकत आहोत. तरीही आपण आम्हां अज्ञ लेकरांना दंड देणार असाल, तर मग आम्ही कोणाचा धावा करावा? तुमच्याशिवाय आम्हांला संकटांमधून सोडवणारे कोण आहे दुसरे? ( एरवी तुम्हीच आम्हांला सर्व संकटांमधून बाहेर काढता, आता जर तुम्हीच संकट रूपाने समोर उभे ठाकलात तर आम्ही बापुड्यांनी जायचे कुठे?) ॥२॥
हे दत्तात्रेयप्रभो, आम्ही सुधारावे म्हणून आपण नटाप्रमाणे क्रोधाचा आवेश आणून आम्हां पापी जीवांना एकवेळ दंड द्याल. पण आम्ही अज्ञानी, संसारी जीव पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करणार. तेव्हा आपण आम्हांवर असे रागावू नका. पडून पडून आम्ही जाणार कुठे? तुमच्याच चरणांवर पडणार ना? तेव्हा आमच्यावर आता आपण निजकृपेचा वर्षाव करावा हीच आमची कळकळीची प्रार्थना आहे. ॥३॥
हे पतितपावना, आपल्या पदांचा एकदा का आश्रय घेतला, की समजा चुकून आडमार्गावर पाउल जरी पडले, तरीही आम्हांला त्या परिस्थितीतून सांभाळून सुखरूप पुन्हा आपणच योग्य मार्गावर आणता. हेच आपले भक्तवात्सल्याचे अलौकिक ब्रीद आहे. तेव्हा आता त्याच आपल्या ब्रीदाची आठवण काढून, हे करुणाघन गुरुनाथा, आपण आपला कोप सोडून पुन्हा आमच्यावर कृपावंत व्हावे. ॥४॥
श्री स्वामी समर्थ
काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे
Khoop chan shree Swami Samarth
Shree swami samarth
Shree Swami Samarth 🙏🙏👌👌👌
Guru meri pooja🙏 guru govind 🙏Guru Mera par bramha 🙏 Guru bhagavant🙏
🌷श्री स्वामी समर्थ 🌷
🙏श्री स्वामी समर्थ 🙏