गुरुचरित्र करताना सूचना (नियमावली)

गुरुचरित्र बसणारे सेवेकरी यांना सूचना

gurucharitra_swamikrupa

 

 

 

१) 1दिवस अगोदर ४ श्वान व् १ गायी यांना नैवेद्य ( पोळी) द्यावा.
श्री स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो असला तरी चालेल. पोथी आसन या सात दिवस हलवले जाणार नाही असे नियोजन करून बसावे.

२) ७ दिवस ब्रम्हचर्य पालन करावे.

३) जमिनीवर/चटई / सतरंजी वर शयन करने. म्हणजे गादी वर झोपू नये

४) ७ दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खावु नये. सेवेकर्यांचे घरचे परान्न होत नाही.

५) शक्यतो गांव वेश सोडून जावु नए अतितटी च्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जावु नये.

६) ७ दिवस शुभ बोला कोनाविषयी द्वेष ठेवु नका. तसेच आयुष्यात पुढेपण असच रहाण्याचा प्रयत्न करा.

७) गर्भवती स्री पारायणास बसु शकते पण शास्त्र वचन म्हणते की ७ व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैढक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनि बसण्यास हरकत नाही.

८) कांदा, लसुन खावु नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होवू शकतो.

९) एसिडिटी वाढणार यास्तव डाळ, द्विदल धान्य वर्ज्य करावी. त्याबदल्यात दूध पोळी, हिरवी भाजी पाले भाजी फळ भाजी घ्यावी फळे ही चालतात. सात दिवसात उपवास दिवस आल्यास साबुदाणा भगर शेंगदाणे चालतील. दोन्ही वेळ जेवण करावे. सात दिवस उपवास करण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात आहार शास्त्र महत्वाचे आहेत.

१०) काळे वस्त्र पारायण सुरु झाल्यावर किमान ७ दिवस वापरू नये तसेच चामड्याचे वस्तू शक्यतो वापरू नये

११) गुरुचरित्र हा ५ वा वेद आहे. यामुळेच पारायण काळात अभद्र बोलले गेले वागले गेले शब्ध उचार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्रि किंवा झोपण्या पूर्वी विष्णु सहस्त्रनाम वाचन एक वेळ घरी करावे

१३) या सप्ताहात अजुन पूण्य कमवायचे असेल तर दुखी आर्त आहेत त्यांना हा दुःख मुक्तीचा हा स्वामी मार्ग समजावू सांगणे.

१४) परस्त्री माते समान हे मार्गाचे वैशिष्ठ आहे या प्रमाणे आचरण करावे.

१५) पारायण समाप्ती ला पोथी साठी एक, देवांसाठी एक, गाई साठी एक, असे नैवेद्य दाखवावा त्यात वरण भात, श्रावण घेवडा भाजी, कांदा भजी, गोड पदार्थ, चपाती/पुरी, मीठ लिंबू चटणी कोशिंबीर, करावे. देवांना कांदा लसूण साठी चा नियम नाही त्यामूळे नैवेद्यात ते असले तरी चालते.

🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏

 

श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे रहस्यमय फायदे

वास्तुशास्त्राचे अनेक दोष तसेच, घरातील मतभेद या गोष्टीमुळे आज आपण प्रत्येक जण असंख्य दुःखाने संकटाने तसेच मानसिक अशांतता अनुभवतो. घरात व घराबाहेरील सार्वजनिक तसेच सामुदायिक जीवनात प्रत्येकाला काहीना काही ही समस्येने घेरलेले आहे आणि सर्वजण या गोष्टीमुळे त्रस्त आहेत, अशा असंख्य गोष्टींच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अध्यात्मशास्त्र व श्री दत्त संप्रदायामध्ये यावर एक प्रभावी अध्यात्मिक उपासना सांगितली गेली आहे ते म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण. वेदा प्रमाणे मान्यता असणाऱ्या श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने काय दिव्य फायदे होतात ते पुढील प्रमाणे विशद करत आहोत ;

✅ ज्यावेळी एखादी गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावर येते आणि अशा वेळेस काय करावे हे सुचत नाही त्यावेळेस या अमृततुल्य ग्रंथात च्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे.

✅ श्री दत्त उपासक सांगतात कि या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्र प्रमाणे आहे तुमच्या कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होते, गुरूंचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःख मुक्त होतो अशी दृढ श्रद्धा भाविकांमध्ये आहे.

✅ स्वतःच्या घरामध्ये गुरूचरित्र वाचनाने नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळावेगळा आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते.

✅ प्रखर पितृदोष व प्रकार वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्प युक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लोकर प्रभावी अनुभव येतात.

✅ गुरुचरित्र ग्रंथ केवळ आध्यात्मिक उपासनेसाठी नसून आपला आदर्श अध्यात्मिक जीवन नीतिमूल्ये जपून कसं जगावं याविषयी देखील दत्त महाराजांनी या ग्रंथात सूचक मार्गदर्शन केले आहे.

✅ विशिष्ट समस्यांवर जसे विवाह, शिक्षण ,आरोग्य, यामध्ये येत असणाऱ्या अडचणीं वर संकल्प युक्त गुरुचरित्र केल्यास हमखास अनुभव येतो असे जाणकारांचे मत आहे.

✅ सात दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धती आहे आणि त्यासोबत काही सात दिवसात पाळावयाचे महत्त्वाचे आहार ,विहार आणि विचार याविषयीचे नियम असतात.

✅ दत्त जयंतीनिमित्त संपूर्ण भारतामध्ये दत्त उपासकांच्या सेवेत श्री गुरुचरित्र पारायण हे आवर्जून केले जाते आणि दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो.

✅ अनेक एक दत्त शक्ती पिठामध्ये सामुदायिक पद्धतीने श्रीगुरुचरित्र वाचन केले जाते आणि दत्तजयंतीच्या दिवशी सामूहिक पद्धतीने दत्तजन्म साजरा करून महाप्रसादाचे आयोजन करण्याची प्रथा आहे.

✅ आपल्या पत्रिकेतील ग्रहतारे, पितृ दोष, प्रारब्ध दोष यावरती गुरुचरित्र एक रामबाण उपाय आहे असे अनेक एक प्रख्यात ज्योतिषी देखील उपासनेत सांगतात किंबहुना या ग्रंथांमध्ये देखील याचा निश्चित उल्लेख आहे.

✅ म्हणून आल्या जन्मी आपण एकदा तरी श्री गुरुचरित्र पारायण वाचून कृतकृत्य व्हावं आणि या अध्यात्मिक उपासनेचा डोळसपणाने आनंद घ्यावा.

 

 

श्री स्वामी समर्थ

काळजी करू नका, स्वामी आपल्या पाठीशी आहे

2 thoughts on “गुरुचरित्र करताना सूचना (नियमावली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *